* गृहशोभिका
जर गर्भाशयात कोणत्याही प्रकारचे सिस्ट किंवा फायब्रॉइड (गाठ) असल्यास आई होणे शक्य नसते. याशिवाय ओव्हरी सिंड्रोम, अॅनिमिया असे अनेक आजार आहेत, जे दिसायला लहान वाटतात, पण या सर्व समस्या बाळाला जन्म देताना खूप मोठया होतात.
गर्भाशयात विकसित होणारे गैर-कर्करोग (सौम्य) गर्भाशय फायब्रॉइड्स हे स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे एक प्रमुख कारण आहे.
गर्भाशयातील फायब्रॉइड्स फॅलोपियन ट्यूबमध्ये अडथळा आणून किंवा फलित अंडी गर्भाशयात रोपण करण्यापासून रोखून प्रजननक्षमता कमी करू शकतात. गर्भाशयात कमी जागेमुळे, मोठया फायब्रॉइड्समुळे गर्भ पूर्णपणे विकसित होऊ शकत नाही.
फायब्रॉइड्स नाळेच्या विघटनाचा धोका वाढवू शकतात, कारण फायब्रॉइडमुळे नाळेत अडथळा येऊ शकतो आणि ती गर्भाशयाच्या भिंतीपासून वेगळी होऊ शकते, परिणामी गर्भाला कमी ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळतात. यामुळे बाळाचा अकाली जन्म किंवा गर्भपात होण्याची शक्यता वाढते.
गर्भाशय फायब्रॉइड्स हे गर्भाशयाच्या स्नायूंच्या ऊतींचे सौम्य (कर्करहित) ट्यूमर असतात. त्यांना मायोमा किंवा लियोमायोमा असेही म्हणतात. हे फायब्रॉइड्स तेव्हा तयार होतात जेव्हा गर्भाशयाच्या भिंतीतील एक स्नायू पेशी गुणाकार करते आणि कर्करोग नसलेल्या ट्यूमरमध्ये बदलते.
फायब्रॉइड्सचा आकार लहान दाण्यापासून मोठया दाण्यापर्यंत असू शकतो, जो गर्भाशयाला मोठा करतो. फायब्रॉइड्सचे स्थान, आकार आणि संख्या हे निर्धारित करतात की, ही केवळ लक्षणे आहेत किंवा उपचार घेणे आवश्यक आहे.
गर्भाशयाच्या फायब्रॉइड्सचे वर्गीकरण त्यांच्या स्थानाच्या आधारावर केले जाते. हे ३ मोठया श्रेणींमध्ये विभागलेले आहेत :
सबसेरोसल फायब्रॉइड्स : हे गर्भाशयाच्या भिंतीच्या बाहेरील भागात विकसित होते. असा फायब्रॉइड ट्यूमर बाहेरील भागात विकसित होऊ शकतो आणि आकार वाढू शकतो. सबसेरोसल फायब्रॉइड ट्यूमर सभोवतालच्या अवयवांवर दबाव आणतात, ज्यामुळे ओटीपोटात वेदना हे प्रारंभिक लक्षण म्हणून दिसून येते.
इंट्राम्युरल फायब्रॉइड्स : इंट्राम्युरल फायब्रॉइड्स गर्भाशयाच्या भिंतीच्या आत विकसित होतात आणि तिथे वाढतात. जेव्हा इंट्राम्युरल फायब्रॉइडचा आकार वाढतो तेव्हा गर्भाशयाचा आकार सामान्यपेक्षा जास्त होतो. फायब्रॉइड्सचा आकार जसजसा वाढत जातो, तसतसे मासिक पाळीत जड रक्तस्त्राव होतो, ओटीपोटात वेदना होतात आणि वारंवार लघवी होते.
सबम्यूकोसल फायब्रॉइड्स : हा फायब्रॉइड गर्भाशयाच्या पोकळीच्या अगदी खाली तयार होतो. मोठया सबम्यूकोसल फायब्रॉइड्समुळे गर्भाशयाच्या पोकळीचा आकार वाढू शकतो आणि फॅलोपियन नलिका ब्लॉक होऊ शकतात, ज्यामुळे प्रजननक्षमतेमध्ये समस्या निर्माण होतात. याच्याशी निगडीत लक्षणांमध्ये मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव जाणे आणि तो दीर्घकाळ राहणे यांचा समावेश होतो.
कसे ओळखावे?
गर्भाशयाचा फायब्रॉइड्स पेल्विक तपासणी, प्रयोगशाळेच्या चाचण्या आणि इमेजिंग चाचण्यांद्वारे शोधून काढला जातो. आजार शोधण्यासाठी इमेजिंग चाचण्या केल्या जातात. यात ओटीपोटाचा अल्ट्रासाऊंड, योनीचा अल्ट्रासाऊंड आणि हिस्टेरोस्कोपीचा समावेश आहे. हिस्टेरोस्कोपी दरम्यान, हिस्टेरोस्कोप नावाची एक लहान प्रकाशाची दुर्बीण गर्भाशयाच्या मुखातून गर्भाशयात घातली जाते.
सलाईन इंजेक्शननंतर गर्भाशयाची पोकळी पसरते, ज्यामुळे स्त्रीरोगतज्ज्ञाला गर्भाशयाच्या भिंती आणि फॅलोपियन ट्यूब उघडण्याची तपासणी करता येते. काही प्रकरणांमध्ये, एमआरआयचीही गरज भासू शकते.