* सीमा ठाकूर
मुंबईत दरवर्षी कितीतरी मुलं वेगवेगळया शहरातून शिक्षणासाठी वा नोकरीसाठी येतात. इथे त्यांच्यासाठी सर्वकाही असतं, परंतु त्यांचे कुटुंबिय आणि बालपणीचे मित्र नसतात, ज्यांच्यासोबत ते दरवर्षी दिवाळी साजरी करत आलेले असतात.
दिवाळी आपल्या जिवलगांसोबत साजरा करण्याचा सणउत्सव आहे. साधारणपणे आपल्या कुटुंबीयांसोबत राहणाऱ्या मुलांसाठी दिवाळी म्हणजे महिन्याभरा पूर्वीपासूनच आई-बाबांसोबत मिळून घराची साफसफाई करणं, खरेदीला जाणं, भेटवस्तू खरेदी करणं, घर सजवणं आणि दिवाळीच्यादिवशी खूप मजा करणं.
परंतु, अशी काही मुलं असतात जी होस्टेलमध्ये अनेक मैलाचा प्रवास करून घरी फक्त दिवाळी साजरी करण्यासाठी पोहोचतात. दिवाळी फक्त एक सण नाही तर त्यांच्यासाठी एक आठवण आहे, एक असं प्रेम आहे जे स्वत:च्या कुटुंबियांसाठी या सणाला खास बनवितो.
मुंबई, दिल्लीसारख्या शहरात दरवर्षी अशी कितीतरी मुलं वेगळया शहरातून शिकायला आणि नोकरी करण्यासाठी येतात. तिथे त्यांच्यासाठी सर्वकाही असतं, परंतु त्यांचे कुटुंबिय आणि बालपणीचे मित्र नसतात. ज्यांच्यासोबत ते दरवर्षी दिवाळी साजरी करत आलेले असतात. याचमुळे वर्षभर ते भलेही आपल्या घरी गेले नसले तरी दिवाळीसाठी नक्कीच जातात.
दिल्ली युनिव्हर्सिटीत शिकणारी कशिश सांगते, ‘‘हॉस्टेलमधून घरी जाण्यासाठी मला सर्वात मोठा त्रास असतो तो कपडे पॅक करण्याचा. कपाटातून काढा, कपडयांची निवड करा आणि नंतर पॅक करा, खूपच कटकटीचं असतं. सर्वात जास्त टेन्शनचं काम असतं हॉस्टेलमधून परवानगी घेणं. अगोदर तर दहा प्रकारचे असे फॉर्म सही करून घेतात. त्यानंतर पालकांच्या आयडीवरून मेल पाठवावा लागतो. त्यानंतर हॉस्टेलमधून बाहेर पडताना पालकांशी बोलून द्यावं लागतं. नंतर एक एन्ट्री हॉस्टेलचा गेटवर आणि एक कॉलेजच्या गेटवरती करावी लागते. या सर्वानंतर कॉलेजमधून बाहेर पडल्यावर सुट्टयांमुळे कोणतीही रिक्षा मिळत नाही. एकतर स्वत:च्या सामानसोबत उभे राहा वा रोड क्रॉस करून जा. कसंबसं करून मेट्रोपर्यंत पोहोचताच एवढं भारी सामान उचला आणि स्क्रीनिंगवरती टाका. कधी फोन पडतो व कधी हॅन्ड बॅग आणि चुकून जर फोन बॅगमध्ये टाकून विसरलो तर समजा मिनी हार्ट अटॅक येता येता राहून जातो.
‘‘तसं मी माझ्या घरी फ्लाईटनेच जाते येते, परंतु दिवाळीच्या वेळी फ्लाईट खूपच एक्स्पेन्सिव्ह होतात. दिल्लीवरून लखनौच्या फ्लाईटमुळे तसाही वेळ वाचतो. परंतु सामान अधिक जास्त असेल तर त्रास होतो. ट्रेनने गेल्यास कमीत कमी ९ ते १० तास लागतात. जेव्हा मी पहिल्या वर्षाला होती तेव्हा मी पहिल्यांदा दिल्लीवरून लखनौला एकटी जात होती, कारण अॅडमिशनच्यावेळी आईसोबत आली होती आणि त्यानंतर मी सरळ दिवाळीला जात होती. माझी ट्रेन पूर्ण ६ तास लेट होती. तिची वेळ होती संध्याकाळी ७ वाजता पोहोचण्याची आणि मी पोहोचली रात्री दीड वाजता. आई बाबा तर खूपच चिंतेत होते. ११ वाजल्यापासून एक वाजेपर्यंत ती ट्रेन जागेवरून हललीच नव्हती आणि स्टेशनला पोहोचण्यासाठी चार किलोमीटर बाकी होते. मला वाटलं की थोडंसं डिस्टन्स मी कव्हर करेन म्हणून मी निघाली. खाणं फक्त मी एक वेळचंच आणलं होतं, तेदेखील मेसवाल्या दादाला प्लीज प्लीज बोलून, जे खूपच अगोदर संपलं होतं. माझी अवस्था खूपच बिकट झाली होती. नंतर स्टेशनवर आई बाबांचा चेहरा पाहिला तेव्हा मी सर्व काही विसरून गेली.’’
व्हिडिओग्राफर म्हणून नोकरी करणारा निलेश आपल्या कॉलेजच्या दिवसांची आठवण काढत दिवाळीच्या दरम्यान केलेला स्वत:चं हॉस्टेल ते घर प्रवासाची आठवण काढत सांगतो, ‘‘कॉलेजचे पहिलं वर्ष होतं. घर नागपूरमध्ये होतं आणि सर्व मित्र तिथेच होते. मला खूपच एकटेपणा वाटत होता. कॉलेज सुरू झाल्यानंतरदेखील दिवाळीची सुट्टी केव्हा पडेल आणि मी केव्हा घरी जाईन याची वाट पाहत होतो. त्यावेळी मला स्वत:च्या सामानसोबत कसं मॅनेज करायचं आणि प्रवास करायचा हे माहीत नव्हतं. मी घरी कोणालाही सांगितलं नव्हतं की मी येतोय. मी आगाऊपणे अगोदर कॉल करून सांगितलं होतं की मी येणार नाही. यावेळी मला अभ्यासाचं प्रेशर खूपच जास्त आहे.
‘‘मी कोल्हापूरला जाण्यासाठी ट्रेनचं तिकीट बूक केलं. मी माझा वेळ मॅनेज करण्यासाठी एक चार्ट बनवला की दोन दिवसात कोणा कोणाला भेटायचं आहे, काय करायचं आणि काय नाही करायचं, एवढं सगळं. मी रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी होस्टेलवरून निघालो आणि कॅबमध्ये बसलो. कॅबमध्ये बसल्यानंतर पंक्चर झाली. मला अर्ध्या तासाच्या अंतरासाठी दोन तास लागले. कारण जेव्हा मी कॅबमधून उतरलो तेव्हा समोरच रिक्षा मिळाली परंतु नेमकं तिचं सीएनजी संपलं होतं. त्यांनी मला सांगितलं की रस्ता फक्त २ किलोमीटरचा आहे. तू पायी जाऊ शकतोस. पुढे खूपच ट्रॅफिक होतं, त्यामुळे कोणतीही रिक्षा मला मिळत नव्हती.
‘‘मी २ किलोमीटर पायी चाललो आणि जसं स्टेशन वरती पोहोचलो तेव्हा ट्रेन निघणारच होती. हे पाहून मी माझं सामान माझ्या डोक्यावर उचललं आणि धावलो. माझं सामान आतमध्ये फेकलं आणि चढलो. माझा कोच होता बी २ आणि मी चढलो होतो एस १ मध्ये. नंतर हळूहळू आतून निघत मी माझ्या जागेवरती पोहोचलो. मी हॉस्टेलवर रहात असल्यामुळे प्रवासासाठी खाणं पॅक करून देणारं कोणीच नव्हतं. परंतु मी ज्या डब्यामध्ये होतो, त्यामध्ये बसलेल्या काकाकाकूंनी माझ्यासोबत त्यांचा डबा शेअर केला. माझा वेळ ट्रेनमध्ये छान गेला. मी आजूबाजूच्या बसलेल्या लोकांशी गप्पा मारु लागलो. छान झोपलोदेखील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरी पोहोचलो. मी घराचा गेट उघडला आणि जेव्हा आईने मला पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो माझ्यासाठी सगळा थकवा घालवणारा होता. माझ्यासाठी ही दिवाळी गेल्या दिवाळीपेक्षा खूपच खास होती.’’
कॉलेजच्या सहामाहीच्या ब्रेकमध्ये जिथे परीक्षेच्या टेन्शनमुळे सर्वच मुलं चिंतेत असतात, तिथे हॉस्टेलमधून घरी जाणाऱ्या मुलांच्या डोक्यावर तर जणू संकटांचा डोंगर पडलेला असतो. ईशान दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्यावेळी हॉस्टेलमधून त्याच्या घरी गोव्याला जातो. तो त्याचा अनुभव शेअर करत सांगतो, ‘‘घरापासून दूर राहिल्यावर घराचं महत्त्व समजतं. दिवाळीत घरी एक वेगळीच रोनक असते. त्यामुळे सतत वाटतं की या सगळया गोष्टींचा भाग बनावा. मला घरी जाण्यापूर्वी कॉलेजची सर्व कामे करावी लागतात. कारण २ ते ३ दिवसाची सुट्टी मिळते. मित्रांसोबत अनेक प्लान्स कॅन्सल करावे लागतात. परीक्षेसाठी अगोदरच अभ्यास करून ठेवावा लागतो. आई-बाबा फोन करतात तेव्हा सांगतात की तुझ्यासाठी काय काय खरेदी करणार आहे वा काय खरेदी करून ठेवले आहे. आता तर सांगावंदेखील लागत नाही जसं लहानपणी सांगाव लागायचं.
खाणंदेखील माझ्या आवडीचं असतं. घरी जाऊन वाटतं की आपण पुन्हा लहान मुलं झालो आहोत. इथे मुंबईमध्ये वाटत रहातं की आपण खूप मोठे आहोत. परंतु घरी जाऊन एकदम वेगळंच वाटतं. हा, दिवाळीमध्ये फ्लाइटचं तिकीट खूपच महाग असतं आणि विचार करावा लागतो की घरी जाऊ की नको, १०,००० पेक्षा कमी नसतं व परंतु घरी जाण्याचा आनंदापुढे सगळं काही लहान दिसू लागतं. २ दिवस घरी खूपच छान वाटतं. आपल्या गावात पाऊल ठेवताच एक वेगळीच अनुभूती येते. सगळीकडे दिवाळीची खूप धामधूम असते.’’
अशीच काहीशी असते हॉस्टेलवाल्यांची दिवाळी, जिथे त्यांच्यासाठी दिवाळी फक्त दोन दिवसांचा सणवार नसतो, तर १२ ते १५ तासांचा थकविणारा प्रवासदेखील असतो, ज्याचा थकवा आणि त्रास घरातल्यांबरोबर दिवाळी साजरा करण्याच्या आनंदा खाली दबून जातो.