* डॉ. अभिनव गुप्ता, निर्देशक, न्यूरो अँड स्पाइन, बालाजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, साहिबाबाद

प्रश्न : माझ्या वडिलांना स्पाइनल डिस्कचा त्रास झालाय. डॉक्टरांनी सर्जरी करायला सांगितली. आम्हाला जाणून घ्यायचयं की ओपन सर्जरीच्या तुलनेत मिनिमली इनवेसीव सर्जरी किती योग्य आहे?

उत्तर : ज्या रुग्णांचं डिस्क खूप खराब झालं आहे त्यांना स्पाईन सर्जरीची गरज असते. अलीकडे मिनिमली इनवेसीव डीकनप्रेशन आणि मिनिमली इनवेसीव स्टॅबिलायझेशन प्रक्रियेचं चलन खूपच वाढलंय. ओपन सर्जरीच्या तुलनेत हे खूपच सुरक्षित आणि प्रभावी पर्याय आहे. यामध्ये स्पाईनच्या आजूबाजूच्या मांसपेशीना मोठमोठे चिरा देऊन कापणं आणि वेगळं करण्याची गरज पडत नाही. यामध्ये छोटीशी चीर देऊन सर्जरी केली जाऊ शकते.

मिनीमली इनवेसीव सर्जरीचे साईड इफेक्ट्स कमी असतात आणि रिकव्हर होण्यास वेळदेखील कमी लागतो.

प्रश्न : मी ४३ वर्षीय प्राध्यापिका आहे. गेल्या दोन महिन्यापासून कमरेखालती वेदना होतात. तपासणी केल्यानंतर बल्जिंग डिस्क असल्याचं समजलं. मी काय करू?

उत्तर : बल्जिंग डिस्कच्या उपचारात फिजिओथेरपी खूपच प्रभावी आहे. जर यापासून आराम मिळाला नाही तर सर्जरीची गरज लागते. आर्टिफिशियल डिस्क रिप्लेसमेंटद्वारे ही समस्या दूर होऊ शकते. या सर्जरीद्वारे क्षतिग्रस्त डिस्कला आर्टिफिशियल डिस्कमध्ये बदललं जातं. हे डिस्क लागल्यानंतर पीडित व्यक्तीला पुढे मागे वाकण्यात आणि इतर कार्य करण्यात त्रास होत नाही. पाठीच्या कण्याचा लवचिकपणा पूर्वीप्रमाणे सामान्य होतो आणि मणक्याच्या हाडांवर पडणारा झटका सहन करण्याची क्षमतादेखील वाढते. आर्टिफिशियल डिस्कचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुम्ही आयुष्यभर काम करू शकता.

प्रश्न : मी ५२ वर्षीय नोकरदार स्त्री आहे. माझ्या कमरे खालचा भाग आणि कुल्ह्यामध्ये सतत वेदना असतात. मी काय करू?

उत्तर : तुम्हाला  सायटिकाचा त्रास आहे. खरंतर सायटिकामुळे होणाऱ्या वेदना खूपच गंभीर असतात. परंतु अनेक प्रकरणात हे कोणत्याही ऑपरेशनशिवाय काही आठवडयातदेखील बरं होतं. अनेक लोकं हॉट पॅक्स, कोल्ड पॅक्स आणि स्ट्रेचिंगने या समस्येपासून आराम मिळतो. परंतु ज्या लोकांना सायटिकामुळे पाय अधिक बारीक झाले आहेत वा ब्लॅडर वा बाऊलमध्ये परिवर्तन झाल्याने मलमूत्र त्यागण्याच्या सवयीमध्ये बदल होऊ शकतो. त्यांच्यासाठी ऑपरेशन करणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त जीवनशैलीमध्ये बदल करा. असं भोजन करा ज्यामध्ये कॅल्शियम आणि विटामिन डी पुरेपूर असेल. शारीरिकरित्या सक्रिय राहून नियमितपणे व्यायाम करा. नेहमी आरामदायक बिछानावरती झोपा. जे खूप कडक नसावं आणि अगदी खूप मऊदेखील नसावं.

प्रश्न : माझ्या सासूबाईंना एकदा ब्रेन स्ट्रोक झाला आहे. त्या खूपच अशक्त झाल्या आहेत. त्यांना हा त्रास पुन्हा होण्याचा धोका आहे का?

उत्तर : उपचारानंतरदेखील आवश्यक काळजी घेणं गरजेचं आहे. कारण एकदा स्ट्रोक आल्यानंतर पुन्हा स्ट्रोक होण्याची शक्यता पहिल्या आठवडयात ११ टक्के आणि पहिल्या तीन महिन्यांमध्ये २० टक्के असते. त्यांच्या आहाराकडे लक्ष द्या. त्यांना संतुलित आणि पोषक भोजन द्या. हा हलकेफुलके व्यायाम करणे व फिरण्यासाठी सांगा. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवरती द्या.

प्रश्न : मी आणि माझे पती दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर आहोत. गॅझेट्स आमच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. मला जाणून घ्यायचे की गॅझेटच्या अतिवापराने स्पाईनशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात का?

उत्तर : गॅझेटचा वाढता वापर अलीकडेच स्पाइनशी संबंधित समस्यांचं एक सर्वात मोठं कारण पुढे येतंय. याच्या वापराच्या दरम्यान योग्य पोश्चर न ठेवल्याने याचा धोका अधिक वाढतो. कारण यामुळे मास पेशींवरती दबाव पडतो. गॅझेट्सच्या अत्याधिक वापरापासून दूर रहा. करतेवेळी स्वत:चे पोश्चर ठीक ठेवा. प्रत्येक दोन तासानंतर एक ब्रेक घ्या. काही मिनिटं ऑफिस वा घरात इकडे तिकडे चालत राहा. थोडसं स्ट्रेचिंग करा. यामुळे तुमच्या मासपेशी आणि सांध्यांना आराम मिळेल. आठवडयातून एकदा डिजिटल डिटॉक्स आवर्जून करून घ्या. यादरम्यान गॅझेटचा वापर अजिबात करू नका.

प्रश्न : मला स्पॉडिलाइटिस आहे, परंतु समस्या एवढी गंभीर नाहीए. मला जाणून घ्यायचेय की काही घरगुती उपायाने आराम मिळू शकतो का?

उत्तर : जर स्पॉडिलाइटिसची समस्या किरकोळ असेल तर घरगुती उपायांनी आराम मिळू शकतो. यासाठी हॉट आणि कोल्ड थेरीपी खूपच महत्त्वाची आहे. यामुळे सांधे आणि मांसपेशीमधील वेदना आणि घट्टपणा दूर होतो. जिथे  तुम्हाला वेदना होत असेल तिथे हीटिंग पॅड्स लावा. तुम्ही हॉटशॉवरदेखील घेऊ  शकता. सूज कमी करण्यासाठी सुजलेल्या जागी बर्फ लावा. यामुळे सूजदेखील कमी होईल आणि वेदनेपासूनदेखील आराम मिळेल. या व्यतिरिक्त सूज, वेदना आणि घट्टपणा कमी करण्यासाठी नॉन स्टेरिएड अँड टू इनफ्लॅमेटरी ड्रग्सदेखील घेऊ शकता. फिजिकल थेरेपीदेखील याच्या उपचाराचा महत्त्वाचा भाग आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...