* सोमा घोष

डोळे दिसणारा संदेश मेंदूपर्यंत पोहोचवतात. हा शरीराचा सर्वात नाजूक भाग आहे, म्हणूनच त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे नेहमीच गरजेचे असते. एका संशोधनानुसार भारतात सुमारे २ लाख मुले अंध आहेत, त्यापैकी काहींनाच दृष्टी मिळते, बाकीच्यांना दृष्टीविना जीवन जगावे लागते.

कोविड महामारीने डोळयांवरही जास्तीत जास्त ताण आला आहे, कारण आजकाल लहान मुलांपासून मोठयांपर्यंत प्रत्येकाला तासनतास संगणकासमोर बसावे लागते. यामुळे डोळे लाल होणे, चिकट श्लेष्मा जमा होणे, डोळयांत किरकिरी किंवा जडपणा जाणवणे इत्यादींमुळे अश्रुंची निर्मिती कमी होते आणि डोळयांमध्ये कोरडेपणा येण्याचा धोका असतो.

श्री रामकृष्ण हॉस्पिटलचे डॉ. नितीन देशपांडे सांगतात की, कोविड -१९ महामारीमुळे जीवनशैलीत बदल झाला आहे. या दरम्यान डोळे कोरडे होण्याची समस्या अधिक वाढली. डोळे कोरडे होणे ही एक गंभीर स्थिती आहे, ज्यामुळे अस्वस्थता तसेच दृष्टी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

स्क्रीन टाईममध्ये वाढ, पौष्टिक खाण्याकडे दुर्लक्ष आणि अनियमित झोप इत्यादींमुळे डोळे कोरडे होण्याचे प्रमाण वाढत आहे. यापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी काही उपाय पुढीलप्रमाणे आहेत :

डॉ. नितीन सांगतात की, डोळे कोरडे होण्याचे प्रमाण वाढण्याबरोबरच घरात किंवा घराच्या आतच सतत राहिल्याने लक्षणेही वाढली आहेत. घरातील हवेच्या गुणवत्तेमुळे डोळे कोरडे पडण्याची समस्याही वाढते, त्यामुळे डोळयातील पाण्याचे बाष्पीभवनात रूपांतर होऊन डोळे कोरडे होतात. नेत्रतज्ज्ञांच्या मते, जेवण बनवणे आणि खाण्याच्या दिनचर्येत बदल तसेच अयोग्य आहार यामुळे शरीरात आवश्यक फॅटी अॅसिड उपलब्ध होत नाहीत. जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व डची कमतरता, जे डोळयांचे आरोग्य राखण्यासाठी महत्वाचे असते.

पापण्यांची कमी उघडझा

डॉ. नितीन सांगतात की, वाढता स्क्रीन टाइम हे डोळे कोरडे होण्याचे मुख्य कारण आहे. साधारणपणे पापण्यांची मिनिटाला १५ वेळा उघडझाप व्हावी लागते. स्क्रीन टाइमने ही वेळ कमी करून ती मिनिटाला ५ ते ७ वेळा उघडझाप एवढी कमी केली आहे. पापण्यांची कमी आणि अर्धवट उघडझाप डोळयांच्या पृष्ठभागावरील ओलावा कमी करते.

संशोधनानुसार, स्क्रीनवरील निळा प्रकाश डोळयांसाठी नुकसानकारक नसतो, पण तो झोपेची वेळ प्रभावित करू शकतो. झोप कमी झाल्यामुळे डोळयांमध्ये कोरडेपणा येऊ शकतो. सोबतच कोविड-१९ चे नियम, मास्क लावण्याच्या अयोग्य पद्धतीमुळे डोळयांचा कोरडेपणा वाढू शकतो, कारण मास्कसह श्वास घेतल्याने हवा वरच्या दिशेने वाहते, परिणामी अश्रूंचे बाष्पीभवन होते.

२०:२०:२० पद्धत

सल्लागार ऑप्थॅल्मोलॉजिस्ट आणि विट्रेओरेटिनल शल्य विशारद डॉ. प्रेरणा शाह सांगतात की, आजकाल सर्व काही संगणक, लॅपटॉप किंवा मोबाइलवर केले जाते, त्यामुळे खालील काही उपाय करून हा वेळ कमी करता येऊ शकतो.

* नेत्ररोग तज्ज्ञांनी लोकांना २०:२०:२० पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्तीला दर २० मिनिटांनी स्क्रीनवरून बाजूला जाऊन २० फूट दूर असलेल्या वस्तूकडे २० सेकंद पाहाण्याचा सल्ला दिला आहे.

* हवेचा प्रवाह वर जाण्यापासून रोखण्यासाठी योग्य प्रकारे मास्क घालावा. झोपण्याच्या २-३ तास आधी स्मार्टफोन किंवा लॅपटॉप बंद करावा.

* लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स वापरावेत आणि काही समस्या आल्यास त्वरित डॉक्टरकडे जावे.

* डोळयांची नियमित तपासणी करून याला काही प्रमाणात कमी करता येऊ शकते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...