* दीपिका नयाल वरींद्रर
कृती ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तिच्या वडिलांना हवं तेव्हा फोन करते. कधी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी, तर कधी एखाद्या नव्या चित्रपटासाठी, मित्राच्या घरी जाण्यासाठी वा एखाद्या पार्टीमध्ये जाण्यासाठी. कृतीला प्रत्येक ठिकाणी तिच्या वडिलांना न्यायला आवडतं. यासाठी नाही की तिचे वडील इतर फ्रेंड्सच्या वडिलांच्या तुलनेत तरुण आहेत तर यासाठी की तिला तिच्या वडिलांची कंपनी खूप आवडते. कृतीचे वडील आपल्या एकुलत्या एका मुलीच्या गरजांची काळजी घेतात. तिच्या प्रत्येक छोटया-मोठया गोष्टीत ती काही बोलण्यापूर्वीच समजून घेतात.
खरंतर कृतीचे वडील कितीही कामात व्यस्त का असू देत त्यांच्या लाडक्या लेकीसाठी ते कायमच फ्री असतात. यामुळेच शाळेच्या शिक्षकांपासून कृतीच्या मित्र-मैत्रिणीपर्यंत सर्वजण कृतीच्या वडिलांचं उदाहरण देतात.
बापलेकीची मैत्री
एक काळ होता जेव्हा मुलींना घराचा मान समजून त्यांना बंद दाराआड ठेवलं जात असे. कपडयांपासून त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर नजरच ठेवली जात होती. परंतु आता वडील खूपच बदलले आहेत. ते मुलीना बंधनात ठेवण्याऐवजी त्यांच्या प्रत्येक इच्छा स्वत:च्या इच्छा समजून पूर्ण करतात. मग ती गोष्ट कपडयांची असो वा फिरण्याची. बदलत्या काळाबरोबरच आता ते प्रेम अधिक दृढ होत चाललं आहे.
मुलींना मिळू लागलीये स्पेस
असं नाही की वडील प्रत्येकवेळी मुलींनाच चिटकून राहतात उलट आता मुलीच वडिलांसोबत वेळ घालवणं पसंत करू लागल्या आहेत. कृतीच्या शाळेत अनेक मित्र असेदेखील आहे जे कृतीला अनेकदा चिडवतात की बघा कृती आज तिच्या बॉयफ्रेंडसोबत आली आहे. परंतु या गोष्टीवर चिडण्याऐवजी कृती ही गोष्ट मजेच्या रुपात घेते आणि अभिमानाने सर्वांसमोर सांगते की होय माझे वडील माझे बॉयफ्रेंड आहेत. कोणाला काही त्रास आहे का? कृतीचं हे रूप पाहून सगळेजण हसल्याशिवाय राहत नाही.
खूपच वेगळं आहे हे नातं
वडील मुलीचं नातं वेगळं असतं. थोडं कटू तर थोडं गोडदेखील. कधी खूप प्रेम असतं तर कधी चिडचिडदेखील असते. बदलत्या काळाबरोबरच आई-वडिलांमध्ये खूपच बदल झाला आहे असं यासाठी नाही की ते त्यांच्या मनाप्रमाणे सगळया इच्छा पूर्ण करून त्यांना बिघडवत आहेत, उलट अलीकडे आई-वडीलदेखील मुलांसोबत चालतात. एक काळ होता जेव्हा आई-वडिलांमध्ये जनरेशन गॅप येत होती, परंतु काळाबरोबरच आई-वडिलांनी स्वत:ला बरंच हायटेक केलं आहे. या कारणामुळेच मुलं आई-वडिलांकडे दुर्लक्ष करू शकत नाही.
जर नातं चांगलं नसेल तर
जेव्हा आई-वडील आपल्या मुलांवरती बंधनं लादतात. त्यांना कुठे जाऊ देत नाहीत, परंतु असं केल्यामुळे मुलांच्या विकासावर फरक पडण्याबरोबरच आईवडीलांबाबत मुलांची मतंदेखील बदलू लागतात. टीनएज असं वय असतं ज्यामध्ये मुलं अनेकदा आईवडीलांना चुकीचं समजू लागतात. त्यांना स्वत:चे शत्रू समजून बसतात. यासाठी मुलांचे मित्र व्हा. त्यांना त्यांचा त्रास विचारा कारण या वयात अनेकदा मुलं विद्रोही बनतात. त्यांना प्रेमाने समजवा की त्यांच्यासाठी काय चूक आणि काय बरोबर आहे. त्यांना फिरायला घेऊन जा.
कदाचित तुमच्याजवळ वेळ कमी असेल,परंतु मुलांना वेळेची गरज असते. सुट्टीच्या दिवसात फिरायला घेऊन जा, सिनेमा दाखवा, बाहेर खायला न्या. हळूहळू तुमचं नातं अधिक मधुर होऊन जाईल.