* प्रतिनिधी

अफगाणिस्तानच्या नवीन राज्यकर्त्यांनी मुलींचे शिक्षण पूर्णपणे बंद केले, याचे कोणालाही आश्चर्य वाटता कामा नये. इराण, सौदी अरेबिया, यूएई, कतार, इराक, लिबिया यांची सत्ता असती तर त्यांनी फार वर्षांपूर्वीच असे केले असते, पण या तेल विकणाऱ्या देशांना पाश्चिमात्य देशांना खूश ठेवायचे होते, म्हणूनच त्यांनी अर्धवट इस्लामिक देश तयार केले, जिथे महिलांना काही सवलत देण्यात आली.

अफगाणिस्तानकडे आता तेल नाही, रशिया किंवा चीनच्या सैन्यासाठी तो महत्त्वाचा देश नाही आणि म्हणूनच तो पूर्णपणे इस्लामिक देश बनला आहे. इस्लामची किंवा कोणत्याही धर्माची पहिली अट आहे की, महिलांनी शिकू नये, फक्त मुले जन्माला घालावीत आणि धर्माची सेवा करावी. इसाई देशांत शतकानुशतके हेच घडत आले, परंतु वृत्तपत्रांच्या आगमनानंतर नव्या विचारांची लाट आली. त्यामुळे तंत्रज्ञान वाढले, जगण्याची पद्धत सुधारली आणि त्यासोबतच महिलांना स्वातंत्र्य मिळाले.

अफगाणिस्तानला काहीच नको आहे. तो आपल्या मेंढरांमध्ये, डोंगरावर पिकवल्या जाणाऱ्या पिकांमध्ये, पूजापाठ आणि रक्तपातात खुश आहे. तिथल्या तालिबान्यांना शिक्षण किंवा काहीतरी चांगले बनणे म्हणजे काय, हेच माहीत नाही. त्यांना फक्त कसे मारायचे एवढेच माहीत आहे. कसेबसे ते आधुनिक शस्त्रे वापरण्यास शिकले आहेत. पेट्रोल, बंदुका, तोफा, वाहने, दारूगोळा मिळवण्यासाठी ते शेतातून काढलेले मादक पदार्थ, चटई वगैरे विकतात. आज ते कच्चा रस्ते, कच्ची घरे, हातांनी बनवलेल्या कपडयांमध्ये आनंदी आहेत, त्यामुळे पाश्चिमात्य देश असोत किंवा चीन, पाकिस्तान अथवा रशिया, ते त्यांना कोणत्याही प्रकारे तयार करू शकत नाहीत.

आज तिथे महिलांसोबत जे काही घडत आहे, त्यामागे महिलांचाच हात आहे, हे विसरता येणार नाही. त्यांना पुष्कळ मुलं असतात. त्यातली २-४ मारली गेली तर दु:ख कसले? त्या आपल्या मुलींवर स्वत:हूनच धर्मांधतेने हल्ले करतात. त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतात. त्यांचे बाहेर पडणारे पाय तोडून टाकतात.

अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था अफगाण महिलांच्या मदतीने चालते. त्या गालिचे विणतात, पिकांची काळजी घेतात, जनावरे पाळतात. त्या स्वत: गुलाम असल्या तरी इतर महिलांना कायम गुलाम बनवून ठेवतात. मुलींना शाळेत न पाठवण्याच्या निर्णयामागे जास्त करून महिलाच आहेत. त्यांनी या निर्णयाला विरोध केला असता तर तालिबान सरकार काहीच करू शकले नसते.

सार्वजनिक ठिकाणी महिलांना मारल्यावर अनेक महिला टाळया वाजवतात. महिलांचा श्वास कोंडण्याच्या राजवटीला थोडासाही विरोध करणाऱ्या महिलांचा त्यांना राग येतो.

भारतात हाच प्रयत्न दिवसरात्र सुरू आहे. मुलींनी काय परिधान करावे, काय खावे, कुठे फिरावे, कोणाशी मैत्री करावी, लग्न कसे करावे, कशा प्रकारची पत्नी बनून राहावे, हे सर्व महिला ठरवतात. त्या रात्रंदिवस धर्माची जपमाळ जपतात. हिंदू राष्ट्राच्या नावाने मतदान करतात.

याचा अंतिम थांबा अफगाणिस्तान आहे, त्यांनी हे विसरता कामा नये की, हिंदु राष्ट्र म्हणजे मुस्लीमबहुल देश नाही. हा असा देश आहे जिथे महिलांना वाटेल तेव्हा पळवून नेले जाऊ शकते. वाटेल तेव्हा त्यांचे नाक-कान कापले जाऊ शकतात. पाहिजे तेव्हा त्यांच्यावर घाणेरडे आरोप, बलात्कार केला जाऊ शकतो. वाटेल तेव्हा त्यांचे तुकडे केले जाऊ शकतात, वाटेल तेव्हा जमिनीखाली गाडून घेण्यासाठी त्यांच्यावर सक्ती केली जाऊ शकते. तालिबानी केवळ काळया रंगात नाहीत तर ते भगव्या आणि पांढऱ्या रंगातही असतात.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...