* भारत भूषण श्रीवास्तव

पत्नींच्या हट्टीपणाचा फटका पतींना सहन करावा लागतो, याचे उदाहरण म्हणजे सीतेचा हट्ट, ज्यामुळे तिला स्वत:ला रावणाच्या बंदिवासात राहावे लागले, सोबतच पती राम आणि दीर लक्ष्मण यांनाही तिने संकटात टाकले. ही गोष्ट प्रचलित आहे की, वनवासात सीतेने जंगलात सोन्याचे हरण पाहिले आणि तेच हवे असा हट्ट केला.

मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामाने तिला खूप समजावले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे ते मारीच नावाच्या हरणाला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावले. त्यानंतर जे झाले ते रामायण न वाचणाऱ्यांनाही माहीत आहे की, राम-रावण युद्धात लाखो लोक मारले गेले.

त्रेता युगापासून ते आजपर्यंत पत्नीच्या हट्टी स्वभावात फारसा फरक पडलेला नाही. त्यांचा निरर्थक हट्ट त्यांच्या पती आणि कुटुंबासाठी किती डोईजड ठरत आहे, याबाबत त्यांना काहीही देणेघेणे नसते. त्यांना जे हवे आहे ते मिळवण्यासाठी त्या काहीही करायला तयार असतात. कधीकधी तर असे वाटते की, पतींना संकटात टाकणे, हीच त्यांच्या आयुष्यातील प्राथमिकता असते.

आजची सीता

भोपाळच्या आनंद नगर भागात राहाणारी २२ वर्षीय पूजा आर्याचा हट्ट सीतेपेक्षा कमी नाही. फरक एवढाच होता की, तिला अकल्पनीय सोन्याचे हरण नको होते तर एका खास ब्रँडचा मोबाईल हवा होता. पूजाचा पती विशालचा रेलिंगचा व्यवसाय होता. त्याचे उत्पन्न एवढे नव्हते की, तो पूजाच्या आवडीचा महागडा मोबाईल खरेदी करू शकेल.

त्यामुळे त्याने पूजाला समजावले. कमी उत्पन्न आणि वाढलेला खर्च सोबतच मोबाईलच्या उपयुक्ततेचीही जाणीव करून दिली, पण पूजा काहीच ऐकायला तयार नव्हती. सीतेप्रमाणेच ती आपल्या हट्टावर ठाम होती की, काहीही झाले तरी मी १५ हजारांचाच मोबाइल घेईन…

हट्टाने उद्धवस्त केले जीवन

११ जुलै रोजी मोबाईलची गरज समजून विशालने बाजारातून ७ हजारांचा मोबाईल विकत घेऊन पूजाला दिला. पूजाला मोबाईल न आवडल्यामुळे तिने पतीसोबत वाद घातला. अहोरात्र मेहनत करून घर चालवणाऱ्या विशालला राग येणे स्वाभाविक होते. त्यामुळे रागाच्या भरात त्याने पूजाला मारहाण केली. त्यामुळे रागावलेल्या पूजाने आपल्या दीड वर्षाच्या मुलीचा विचारही न करता गळफास लावून आत्महत्या केली.

आता विशाल दु:खात आहे आणि त्याने कोणताही हिंसाचार केला नसल्याचे स्पष्ट करत पोलीस ठाण्यात हेलपाटे घालत आहे. कदाचित २-४ वर्षात त्याची कायद्याच्या कचाट्यातून सुटका होईलही, पण त्याला आयुष्यभर याची खंत राहील की, ८ हजार आणखी टाकून १५ हजार रुपयांचा मोबाईल आणला असता तर पूजा वाचली असती.

पण याचीही खात्री देता येणार नव्हती की, त्यानंतर पूजाने महागडया वस्तूंचा हट्ट केला नसता, उलट तिचा हा हट्ट आणखी वाढण्याची भीती होती, कारण तिला तिचा पती आणि लहान मुलीपेक्षा जास्त महागडया मोबाईलची ओढ लागली होती.

जे झाले ते योग्यच झाले असे नाही, पण हट्टी पत्नी बरे-वाईट कशाचाही विचार करत नाही. मोबाईलच्या वापराचा त्याच्या किंमतीशी काहीही संबंध नसतो, हे पूजाला समजायला हवे होते आणि पतीने तिच्या मागणीचा किंवा इच्छेचा अनादर केला नव्हता, तर त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्याने तिला मोबाईल खरेदी करून दिला. पण, पूजाच्या निरर्थक हट्टामुळे एक हसतखेळते कुटुंब उद्धवस्त झाले. यालाही पूजाच जबाबदार होती.

असा देतात त्रास

सीतेच्या हट्टापुढे राम जसा हतबल झाला, तसाच प्रकार विशालच्या बाबतीतही घडला आणि हट्टी पत्नी मिळणाऱ्या जवळपास प्रत्येक पतीसोबतही असेच घडते. जर पती तिचा हट्ट पूर्ण करत नसेल तर ती त्याचे खाणे-पिणे, झोपण्यासह त्याचा शारीरिक सुखाचा अधिकारही हिरावून घेते.

भोपाळमधीलच एक व्यावसायिक रिव अरोराची खंत होती की, जेव्हा त्याची पत्नी एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करते जी त्याला पूर्ण करता येत नाही तेव्हा ती त्याला हात लावू देत नाही. ती भाजीत जास्त मीठ टाकते आणि प्रत्येकवेळी उलट उत्तर देते.

आपल्या दुकानात वेगवेगळया ग्राहकांसमोर डोके फोडून रोज २-३ हजार कमावणाऱ्या रवीच्या आयुष्यातील दु:ख कोणीही सहजासहजी समजू शकणार नाही, त्याचे त्याच्या पत्नीवर जीवपाड प्रेम आहे, पण तिच्या हट्टीपणामुळे त्याला डोकं धरून बसावे लागते की, मी माझ्या पत्नीच्या सर्व न्याय्य मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून घरात शांतता आणि आनंद नांदावा, पण तिला ते पटत नाही, त्यामुळे मी करू तरी काय?

पती घाबरतात

भोपाळमधील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात असेच आणखी एक मनोरंजक प्रकरण समोर आले. या प्रकरणात पत्नीचा हट्ट होता की, तिला तिची आवडती मालिका ‘बिग बॉस’ पाहता आली नाही म्हणून पतीने तिच्या खोलीत वेगळा टीव्ही लावावा. पत्नीची तक्रार होती की, घरात एकच टीव्ही आहे आणि त्यावर सासरे त्यांची आवडती मालिका ‘क्राइम पेट्रोल’ पाहातात.

समस्येवरचा उपाय नाही

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आशुतोष मिश्रा यांनी संपूर्ण प्रकरण ऐकून घेतल्यानंतर पतीला महिनाभरात पत्नीसाठी टीव्हीची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. आशुतोष मिश्रा यांच्या मते, अलीकडे अशी ३ प्रकरणे घडली जिथे पतींना पत्नीसाठी स्वतंत्र मोबाईल आणि टीव्हीची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले. पत्नींनाही समजावले होते की, त्यांनी कुटुंबाशी ताळमेळ राखावा.

पण, हा समस्येवरचा उपाय नाही, उलट पत्नींच्या हट्टीपणाला खतपाणी घालण्यासारखे आहे. त्यांच्याही स्वत:च्या इच्छा आणि गरजा असतात हे ठीक आहे, पण त्या कोणत्या आहेत आणि पती त्या पूर्ण करू शकतात की नाही, हेही त्यांनी पाहिले पाहिजे.

भांडण नको प्रयत्न करा

पत्नीला टाळयावर आणण्यासाठी पतीने स्वत:चे खर्च आणि गरजा कमी करून तिला याची जाणीव करून द्यावी की, तिचा हट्ट किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी तो हे करत आहे. तरच वास्तव तिच्या लक्षात येऊ शकेल.

त्यानंतरही तो ऐकायला तयार नसेल तर तिचे ऐकण्यावाचून दुसरा पर्याय उरत नाही. जर तिने असहकाराचे धोरण अवलंबले, खासकरून लैंगिक संबंधावेळी, तर ते आव्हान म्हणून घेऊ नका, उलट सामान्य जीवनात कुठलीही बाधा येणार नाही, यासाठी प्रयत्न करा.

पत्नी रागाच्या भरात धमक्या देऊ लागली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हा असा हट्ट असतो जिथे पत्नी तिचे म्हणणे पटवून देण्याचे मनोमन ठरवते आणि हट्ट पूर्ण न झाल्यास दिलेली धमकी खरी करून दाखवते. परिणामी, हा समस्येवर उपाय नाही, उलट बिचारा पती अडकतो. पत्नी आत्महत्या करू शकते, तिच्या माहेरी जाऊ शकते आणि कौटुंबिक हिंसाचार झाल्याचे सांगून पोलिसात जाऊ शकते, त्यामुळे फायदेशीर बाब काय आहे, याचा पतीने सारासार विचार करायला हवा.

शेवटी असा विचार करूनच समाधान मानावे की, जेव्हा रामाचेही पत्नीसमोर काही चालले नाही तिथे आपले काय?

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...