* पारुल भटनागर
सणवार येऊ घातले आहेत आणि बाजारात ब्युटी प्रॉडक्ट्स म्हणजेच सौंदर्य उत्पादनांची स्पर्धा लागली आहे. विविध ब्रॅण्ड्स आकर्षक ऑफर्सने सर्वांनाच आकर्षित करत आहेत. कारण सणावारी प्रत्येक स्त्रीला स्वत: सुंदर दिसण्यासाठी बाजारात आलेल्या विविध सौंदर्य उत्पादन ट्राय करु इच्छिते. अशावेळी तुमच्यासाठी हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की तुम्ही कोणती सौंदर्य उत्पादनं विकत घ्यावी, कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं, केव्हा विकत घ्यावीत, कुठून विकत घेणं अधिक उपयुक्त आहे ज्यामुळे तुमचं सौंदर्य अधिक उजळेल आणि सोबतच तुमचं बजेटदेखील कंट्रोलमध्ये राहील. तर चला जाणून घेऊ याबाबत काही खास टिप्स :
लीपकेअर
लिप्स म्हणजेच ओठांना सणावारी तयार करण्याकडे तुम्ही फार लक्ष देत नसाल तर थोडं लक्ष इकडेदेखील द्या कारण पूर्ण चेहऱ्याच्या हा एक महत्त्वाचा भाग असतो लिपस्टिक आणि तुम्ही कितीही चांगला आऊटफिट घातला असेल परंतु लिप्स असे फिक्कट सोडले तर तुमच्या ना आऊटफिट्सवर कोणाचंही लक्ष जाईल आणि ना ही तुमच्याबद्दल आकर्षण दिसून येईल.
तर आम्ही तुम्हाला सांगतोय टॉप लीपस्टिक ब्रांडसबद्दल जे तुम्ही स्मार्टली खरेदी करून स्वत:ला स्मार्ट लुक देऊ शकता.
टॉप ५ लिपस्टिक ब्रांडस इन ट्रेंड्स : आम्ही इथे सांगत आहोत मॅटपासून हाय शाइन फिनिश लिपस्टिकबद्दल, ज्या तुम्ही तुमच्या पसंतीनुसार निवडाल आणि मग ते लावून फेस्टिवलमध्ये सेक्सी दिसाल. अहो, सेक्सी फक्त फिगरने नाही तर लिप्सनेदेखील दिसू शकता.
लॅक्मे ९ टू ५ मॅट लिप कलर, यामध्ये आहेत सेक्सी कलर्स निवडण्याचे पर्याय. नायका सो मॅट लिपस्टिक, याचे रेड कलर व क्रंची कलर तुमच्या ओठांवर क्रंच आणण्याबरोबरच खूपच पॉकेट फ्रेंडलीदेखील आहेत.
लॅक्मे एब्सोल्यूट मसाबा रेज, जे १०पेक्षा अधिक शेडसमध्ये उपलब्ध असण्याबरोबरच भारतीय त्वचेसाठी एकदम परिपूर्ण आहेत. तर शुगरची लिक्किड लिपस्टिकदेखील परफेक्ट आहे आणि बजेटमध्येदेखील आहे, जी तुम्ही नायकाच्या साइटवर डिस्काउंट मिळवून विकत घेऊ शकता.
नेलकेयर
जर ड्रेस रेडी असेल तर नेल्स ना ट्रेंडी नेल पॉलिश म्हणजे नेल आर्टने स्टाइलिश लुक द्या, ते ही घर बसल्या.
नेल पॉलिश इन ट्रेन्डस : जेव्हा नेल पॉलिश विकत घ्याल तेव्हा सर्वप्रथम तुमचं माईंड सेट करून घ्या की तुम्हाला मेट वा ग्लॉसी नेल पॉलिशपैकी कोणती विकत घ्यायची आहे, कारण दोन्ही अलीकडे ट्रेन्डमध्ये आहेत. कलर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये तुम्हाला आम्ही मदत करू, टॉप ट्रेंडी कलर्स सांगू जे प्रत्येक ड्रेस व प्रत्येक स्किन टोनवर सुट करतील, जे तुम्हाला तुमच्या आवडत्या साइटवरून निवडणं सहज सोपे होईल.
जर तुम्हाला ग्लिटर नेल पेंट लावण्याची आवड असेल तर स्विस ब्युटी हाय शाइन ग्लिटर नेलपॉलिश विकत घेण्याचे ऑप्शन्स निवडू शकता. ज्युसी रेड कलर, जो प्रत्येकाच्या आवडत्या यादीमध्ये सहभागी असतो. कारण यामुळे हात उठून दिसतात. यासाठी तुम्ही नायका, रेवलोन व कलरबारसारखे ब्रांड निवडू शकता. रॉयल डार्क टिल कलर तुमच्या हातांना रॉयल लुक देण्याचं काम करेल.
याचं लॅक्मे ९ टू ५ उत्तम कलेक्शन आहे. तर मिल्क चॉकलेट कलर, जे हातांना अधिक ब्राईट करण्याचं काम करतात. यासाठी फेसेस कनाडा, लॅक्मेसारखे ब्रांड निवडून अमेझन, नायकावरून हे स्मार्टली विकत घेऊ शकता. अलीकडे बर्गंडी कलरलादेखील खूपच उत्तम मागणी आहे. तुम्ही ऑनलाईन थ्रीडी नेल आर्ट स्टीकरने स्वत: घरबसल्या नेल आर्टचा आनंद घेऊ शकता.
फेसकेअर
त्वचेवर काही तासातच ग्लो आणण्यासाठी उत्तम आहेत काही स्कीन प्रॉडक्टस, जी लावा आणि थोड्याच वेळात पहा त्वचेवर एक उत्तम परिणाम.
ट्रेंडमध्ये आहेत बरेच : चारकोल फेस मास्कचं जेवढं या दिवसात नाव आहे तेवढंच याचा त्वचेवर परिणामदेखील चांगला आहे. खासकरून मामा एअर्थचं सी-३ फेस मास्क, ज्यामध्ये आहे चारकोल, कॉफी व क्ले जे त्वचेतील सर्व धूळ काही मिनिटातच काढून ग्लोइंग स्किन देण्याचं काम करतं. तसंच याचा उबटन फेस स्क्राबदेखील विकत घेऊ शकता.
हा चेहरा स्वच्छ कारण्याबरोबरच ब्रायडलसारखा ग्लो मिनिटात देण्याचं काम करतो. म्हणून तर नाव आहे उबटन फेस स्क्रब आणि जर तुम्हाला फेस मास विकत घ्यायचा नसेल तर तुम्ही साराचा डिटेन पॅक खरेदी करा. कारण हे तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला पार्टी फेस्टिवलसाठी त्वरित स्वच्छ, मुलायम व ग्लोइंग बनवेल. हे तुम्ही फेस्टिवल सीजनमध्ये हेवी डिस्काउंटसोबत विकत घेऊन तुमची त्वचा ग्लोइंग बनवू शकता.
मेकअप किटमध्ये काय असायला हवं
कदाचित तुम्ही मेकअप शौकीन असाल किंवा नसाल परंतु सणावारी तुम्हाला थोडाफार मेकअप चांगला दिसतो, अन्यथा तुमचा लुक फिकट दिसेल आणि वेगळं दिसण्यासाठी सणावारी थोडेफार वेगळे दिसणंदेखील गरजेचे आहे आणि यामध्ये काही मेकअप टीप्सदेखील महत्त्वाची भूमिका निभावतात, जे त्वरित तुमच्या त्वचेवर ग्लो आणण्याबरोबरच तुमच्या पूर्ण चेहऱ्याला बदलण्याचं देखील काम करतील.
फॅशनमध्ये इन : प्रायमर आणि फाउंडेशन त्वचेवर स्मूद बेस बनविण्याबरोबरच कॉम्पलेक्शनला ब्राईट बनविण्याचंदेखील काम करतात. परंतु काही छान विकत घ्यायचं असेल तर स्मार्ट बनून तुम्ही वेगवेगळे विकत न घेता लॅक्मेचं ९ टू ५ प्रायमर +मॅट पावडर फाउंडेशन कॉम्पॅक्ट विकत घ्या. जे दोघांचेदेखील काम करून फेसला ओवर बनवत नाही. उलट नॅचरल टचप देण्याचं काम करतं. डोळयांना स्विस ब्युटीचं ९ कलर आयशॅडो लावा.
हे खूपच स्वस्त आहे, जे तुम्ही ब्लशर म्हणून वापरू शकता. याचा मल्टीपर्पज वापर करू शकता. तुम्ही ऑनलाईन ब्युटी साइट्सवरून स्वस्तात विकत घेऊ शकता.
हेअरकेअर
सणावारी केसांना अधिक स्टाइलिश बनवा या सौंदर्य उत्पादनांनी.
नॉर्मल केसांसाठी : जर तुम्हाला सणावारी स्ट्रेट आणि स्मूथ केस हवे असतील तर ट्राय करा मामा अर्थचा राईस वंडर वॉटर विथ केराटिन. हे केसांचं फ्रिझिनेस कमी करून त्यांना अधिक शाईनी बनविण्याचं काम करतं आणि तेदेखील तुमच्या बजेटमध्ये.
ट्रेंडी लुक : जर तुम्हाला तुमच्या केसांना हायलाईट करायचं असेल तर तुम्ही ट्रेंडमध्ये चालणारा चॉकलेट अँड कॅरामल बलायाग, लाईट ब्राऊन हेअर, रेडिश ब्राऊन हायलाईट, पार्टिकल कॅरमल हायलाईट, डार्क चॉकलेट लोक्स, ब्रँड हेअर कलर, ब्लीच हेयर, ब्राऊन हेअर कलर, ब्लॅक कलर विथ डार्क कॉपर हायलाईट, शायनी रोजवूड हायलाईट्स, गोल्डन हायलाइट्स इत्यादी.