* गरिमा पंकज

आजच्या काळात जिथे एकीकडे कोरोनाची भीती आहे, तर दुसरीकडे जीवनातील व्यस्तता वाढत चालली आहे, अशा परिस्थितीत बाजारात जाऊन वस्तू खरेदी करण्यापेक्षा घरी बसून ऑनलाइन खरेदी करणे हा अतिशय सोयीचा आणि सोपा पर्याय आहे. आज लोक इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून घरगुती वस्तूंपर्यंत सर्व काही ऑनलाइन खरेदी करण्यास प्राधान्य देतात. आता सर्व काही ऑनलाइन उपलब्ध आहे.

भारतात ऑनलाइन खरेदीच्या सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत. जेव्हा आपण बूट, कपडे किंवा सौंदर्य प्रसाधने इत्यादी लहान वस्तूंच्या खरेदीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरतो तेव्हा आपण फारसा विचार करत नाही, परंतु जेव्हा फर्निचर इत्यादीसारख्या महागडया वस्तू खरेदी करायच्या असतात तेव्हा आपल्याला जास्त विचार करावा लागतो, कारण त्याच्या खरेदीसाठी एकाचवेळी भरपूर पैसे लागतात.

तसे तर फर्निचर ही केवळ आवश्यक वस्तूच नाही तर घराच्या सजवटीतही ते भर घालते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही ऑनलाइन फर्निचर खरेदी करत असाल तर केवळ त्याच्या डिझाइनकडे लक्ष देऊ नका. फर्निचर ऑनलाइन खरेदी करताना अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.

गरज असेल तेव्हाच खरेदी करा

अनेकदा ऑनलाइन खरेदी करताना आपण काही चांगले, कमी किंमतीचे डिझायनर फर्निचर पाहातो, मग फारसा विचार न करताच ते खरेदी करतो, पण घरात जागा कमी असल्याने घर खूपच छोटे दिसू लागते. म्हणूनच ऑनलाइन फर्निचरची खरेदी करण्यापूर्वी आपल्या गरजेकडे लक्ष द्या.

विश्वासार्ह साइटवर जा

नेहमी सुरक्षित साइटवरूनच फर्निचर खरेदी करणे योग्य ठरते. तसे तर अनेक ऑनलाइन मार्केट प्लॅटफॉर्म आहेत जे तुम्हाला आकर्षक फर्निचर देण्याचा दावा करतात, पण हे महत्त्वाचे असते की तुम्ही केवळ विश्वसनीय साइटचा पर्याय निवडावा. साइटची सुरक्षा जाणून घेण्यासाठी, लॉक चिन्हावर क्लिक करा, प्रोडक्ट संबंधी रिव्ह्यू वाचा आणि ईमेल किंवा फोनद्वारे कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला त्याची सत्यता तपासता येईल. संबंधित साइट नियमितपणे अपडेट होत आहे की नाही याकडेही लक्ष द्या.

मेजरमेंटकडे लक्ष द्या

प्रत्येक फर्निचर वेगवेगळा आकार आणि पॅटर्नमध्ये मिळते. त्यासाठीचे मटेरियल म्हणजे सामग्रीही वेगवेगळी असते. फर्निचरबाबत ऑनलाइन दिलेली माहिती नीट वाचा. डिझाइनसोबतच घरात उपलब्ध असलेली जागाही लक्षात घ्या. तुम्हाला फर्निचर कुठे ठेवायचे आहे आणि तिथे किती जागा आहे, हे आधीच ठरवा, जेणेकरून ती जागा छोटी दिसणार नाही.

अनेकदा आपण पलंग, सोफा किंवा इतर मोठे फर्निचर खरेदी करतो, पण ते जेव्हा घरी येते तेव्हा आपल्या खोलीत व्यवस्थित बसत नाही. अशावेळी मोठी समस्या निर्माण होते. म्हणूनच खोलीचे मेजरमेंट म्हणजे मोजमाप घ्यायला विसरू नका. सोबतच योग्य साईजचे फर्निचर निवडा. काही साइट्सवरून ग्राहकाच्या घरी इंटेरिअर स्पेशालिस्टला पाठवले जाते, तो ग्राहकांना योग्य फिटिंगचे फर्निचर घेण्यासाठी मदत करतो.

सवलतींचा फायदा घ्या

बहुतेक कंपन्या अनेकदा आपल्या उत्पादनांवर सवलत देत असतात. विशेष करून सण-उत्सवांवेळी जास्त सवलत मिळू शकते. त्यामुळे तुम्ही ऑनलाइन उत्पादन खरेदी करण्यापूर्वी सर्व साइट्सवर जाऊन सवलतींबद्दल जाणून घ्या. तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकेल.

अटी-शर्तींकडे लक्ष द्या

ऑनलाइन फर्निचर खरेदी करण्यापूर्वी डिस्क्रिप्शनमधील अटी-शर्ती व्यवस्थित वाचा. पुढे वाद झाल्यास विक्रेत्याकडे स्वत:ला वाचवण्याचा पर्याय रहातो. याशिवाय फर्निचर घेण्यापूर्वी कस्टमर रिव्ह्यू वाचा. त्यातून बरीच माहिती मिळते. मटेरियल, रंग इत्यादीबाबतही सविस्तर वाचा. त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ लागेल, पण त्यामुळे तुम्ही चुकीचे प्रोडक्ट घेण्यापासून वाचू शकाल.

डिलिव्हरी चार्जकडे दुर्लक्ष करू नका

अनेकदा ऑनलाइन खरेदीवेळी आपण डिलिव्हरी चार्ज म्हणजे वितरण शुल्काकडे लक्ष देत नाही.

महागडी वस्तू खरेदी केल्यामुळे त्याची मोफत डिलिव्हरी मिळेल, असा गैरसमज आपण करून घेतो, पण तसे होत नाही. तुम्हाला शिपिंग चार्जही द्यावा लागतो. तेव्हा फसवणूक झाल्यासारखे आपल्याला वाटते कारण त्यामुळे फर्निचर आणखी महागात पडते.

खरेदी करण्यापूर्वी यादी बनवा

ऑनलाइन फर्निचर खरेदी करणे तितकेसे सोपे नाही. तुम्ही व्यवस्थित माहिती काढूनच ती खरेदी करायला हवी. म्हणूनच एखादे प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी एक यादी तयार करा. त्यात आवडीच्या फर्निचरची नावे लिहा. शेवटी सर्व पर्याय पाहिल्यानंतर तुम्हाला हा निर्णय घेणे अधिक सोपे होईल की, तुमच्या घरासाठी कोणते फर्निचर योग्य ठरेल.

किंमतीची तुलना करा

इंटरनेटवर बऱ्याच ऑनलाइन शॉपिंग साईट्स आहेत. अनेकदा वेगवेगळया साइट्सवर एकाच प्रोडक्टच्या वेगवेगळया किंमती असतात. म्हणूनच कुठलेही फर्निचर खरेदी करण्यापूर्वी इतर साइट्सवरील त्याच्या किंमतीची तुलना करायला विसरू नका. वेगवेगळया साइट्सवर एकाच प्रोडक्टच्या किंमतीत १ हजारापासून ते १० हजार रुपयांपर्यंत फरक पाहायला मिळू शकतो. हे तपासायला विसरू नका की, कमी किंमतीच्या मोहात तुम्ही साध्या किंवा खराब लाकडाचे फर्निचर तर घेत नाही ना? म्हणूनच किंमतीसोबतच क्वालिटी अर्थात दर्जाकडे दुर्लक्ष करू नका.

कॅश ऑन डिलिव्हरी आहे उत्तम पर्याय

बनावट वस्तू किंवा कुठल्याही प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडणे गरजेचे असते. या पर्यायात ग्राहक प्रोडक्ट मिळाल्यावर त्याचे पैसे देतो. यामुळे तुम्ही अनेक प्रकारच्या समस्यांपासून वाचू शकता.

रिटर्न पॉलिसी

ऑनलाइन खरेदी करताना आपण बऱ्याचदा रिटर्न पॉलिसीचा विचार करत नाही, पण असे केल्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. अनेकदा फर्निचरची डिलिव्हरी झाल्यानंतर ते तुम्हाला आवडत नाही किंवा फर्निचरला तडा गेलेले अथवा त्यात दुसरी एखादी कमतरता आढळते. हे आपल्याला प्रोडक्ट घरी आल्यानंतरच समजते. अशावेळी कंपनीची ‘नो रिटर्न पॉलिसी’ असेल तर ते परत करणे अवघड होते आणि तुम्हाला मनाविरुद्ध ते फर्निचर ठेवून घ्यावे लागते. म्हणून अशाच साइट्सवरून ऑर्डर करा जिथे वस्तू न आवडल्यास ती परत करण्याचा पर्याय असेल.

जर वस्तूची तोडमोड झालेली असेल तर तुम्ही तिची डिलिव्हरी न घेणेच योग्य ठरेल. तुम्ही त्याचे फोटो काढून पाठवू शकता. ते तुमच्याकडे पुरावा म्हणून रूपात राहतील की, डिलिव्हरीपूर्वीच फर्निचरचा काही भाग डॅमेज झाला होता. यामुळे तुम्हाला कुठलेच पैसे किंवा रिटर्न कॉस्ट द्यावी लागणार नाही आणि तरीही प्रोडक्ट परत करता येईल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...