* पारुल भटनागर

त्वचेवर कोणत्याही प्रकारचा डाग कोणालादेखील आवडत नाही. परंतु हे डाग तर दूरच त्वचेवरती जेव्हा मोठमोठे ओपन पोर्स दिसू लागतात तेव्हा त्वचेचं आकर्षण कमी होण्याबरोबरच ती निस्तेज दिसू लागते. सोबतच अनेक स्कीन प्रॉब्लेम्स जसं अॅक्ने, ब्लॅकहेडससारख्या समस्यादेखील निर्माण होऊ लागतात.

तसही या समस्यांपासून दूर राहण्यासाठी बाजारात अनेक सोल्युशन्स उपलब्ध आहेत, परंतु आपण आपल्या त्वचेला केमिकल्सपासून दूर ठेवून काही अशा होममेड रेमेडीजबद्दल सांगणार आहोत, ज्या  सहजपणे उपलब्ध होण्याबरोबरच तुमच्या त्वचेचं कोणतही नुकसान करत नाहीत.

चला तर या संबंधित जाणून घेऊया कॉस्मेटोलॉजीस्ट पूजा नागदेव यांच्याकडून :

आईस क्यूब

तुम्हाला माहित आहे का बर्फामध्ये त्वचा टाइटनींग प्रॉपर्टीज असतात, जे मोठे पोर्स छोटं करण्याचे तसेच अतिरिक्त ऑईल कमी करण्याचं काम करतात. सोबतच फेशियल ब्लड सर्क्युलेशनला इंप्रुव्ह करून त्वचेच्या हेल्थलादेखील इंप्रुव्ह करण्याचं काम करतात. हे अप्लाय केल्यानंतर काही वेळातच त्वचा मऊ मुलायम दिसू लागते. यासाठी तुम्ही एका स्वच्छ कपडयांमध्ये बर्फ घेऊन त्याने थोडा वेळ चेहऱ्यावर व्यवस्थित मसाज करा वा मग बर्फाच्या थंड पाण्याने त्वचा स्वच्छ करू शकता. असं तुम्ही एक महिन्यापर्यंत दररोज काही सेकंद करा. तुमच्या त्वचेत तुम्हाला फरक दिसू लागेल.

एप्पल साइडर विनेगर

एप्पल साइडर विनेगरमध्ये एंटीइनफ्लॅमेटरी प्रापर्तीज असण्याबरोबरच हे अॅक्नेला ट्रीट करण्याबरोबरच त्वचेची पीएच पातळीदेखील बॅलन्स ठेवतं. सोबतच मोठे पोर्स कमी करून स्किन टाईटेनिंगचंदेखील काम करतं.

यासाठी तुम्ही एका बाउलमध्ये एक छोटा चमचा एप्पल साइडर विनेगर घेऊन त्यामध्ये दोन छोटे चमचे पाणी एकत्रित करा. नंतर कापसाच्या मदतीने तयार मिश्रणला फेसवर अप्लाय करून पाच ते दहा मिनिटांसाठी सोडून द्या. नंतर चेहरा स्वच्छ धुऊन त्यावर मॉइश्चरायझर अप्लाय करा. असं काही महिन्यापर्यंत आठवडयातील दोन-तीन वेळा करा यामुळे मोठे पोर्स श्रींक होऊ लागतील आणि तुमचं हरवलेलं आकर्षण पुन्हा पूर्ववत होईल.

शुगर स्क्रब

तसंही तुम्ही हे ऐकलं असेल की जर तुमच्या चेहऱ्यावर मोठमोठे पोर्स असतील तर तुम्ही स्क्रबिंग करता कामा नये. परंतु तुम्हाला सांगतो की आठवडयातून एकदा स्क्रबिंग हे प्रत्येकासाठी गरजेचं आहे. कारण यामुळे त्वचेतील जमा झालेली धूळ आणि रोगजंतू निघून जातात.

शुगरबद्दल सांगायचं तर हे त्वचेला खूपच योग्य प्रकारे एक्सफोलिएट करून पोर्समधील अतिरिक्त तेल व धूळ काढण्याचं काम करते. हे त्वचेतील पोर्सदेखील काही आठवडे छोटी करण्यात मदत करतं. यासाठी तुम्ही लिंबाच्या अर्ध्या तुकडयावर साखर लावा.

नंतर हे हलक्या हाताने चेहऱ्यावर रब करत ज्यूस व शुगर क्रिस्टल्सला चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांसाठी सोडून द्या. नंतर स्वच्छ धुवा. महिनाभरात तुम्हाला त्वचेतील फरक दिसून येईल.

बेकिंग सोडा

बेकिंग सोडामध्ये त्वचेतील पीएच लेवल बॅलन्स ठेवण्याची क्षमता असते. यामध्ये अँटीइनफ्लैमेटरी व अँटीबॅक्टरियल प्रोपर्टीज होण्याबरोबरच हे अॅक्कने आणि पिंपल्सना काढण्याचं काम करतो. यासाठी तुम्हाला दोन मोठे चमचे बेकिंग सोडामध्ये दोन मोठे चमचे पाणी एकत्रित करून मिश्रण चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा. नंतर हे चेहऱ्यावर पाच मिनिटांसाठी लावून सोडून द्या. नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करून घ्या.

टोमॅटो स्क्रब

टोमॅटोमध्ये एस्ट्रीजेंट प्रॉपर्टी असल्यामुळे हे त्वचेतील अतिरिक्त ऑईल कमी करण्याबरोबरच त्वचेला टाईट करून मोठया पोर्सना श्रींक करण्याचं काम करतं. सोबतच टोमॅटोमध्ये अधिक प्रमाणात अँटिऑक्सिडंट असल्यामुळे हे एजिंग प्रोसेसदेखील कमी करतं. यासाठी तुम्ही एक चमचा टोमॅटोच्या रसात तीन-चार थेंब लिंबाचा रस टाकून व ही पेस्ट चेहऱ्यावर २० मिनिटापर्यंत अप्लाय करा. नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

तुम्हाला एकाच वापरानंतर तुमच्या चेहऱ्यावर ग्लो दिसून येईल आणि मोठया पोर्सची समस्यादेखील एक दोन महिन्यात ठीक होईल. परंतु यासाठी तुम्हाला हा पॅक आठवडयातून तीन वेळा अप्लाय करावा लागणार.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...