कथा * अर्चना पाटील

मंजिरी आणि मानस यांच्या लग्नाला एक आठवडा झाला. पण मानस काही हनिमुनचं नाव घेत नव्हता. शेवटी मंजिरीनेच एका रात्री विषय काढला.

‘‘काहो, माझी रजाही संपली आता. आपण कुठेच फिरायला गेलो नाही. माझ्या मैत्रिणी शिमला, कुलु...फार नाही तर महाबळेश्वरला तरी जातात.’’

‘‘जाऊ ना नंतर ..आईबाबा काय म्हणतील...अजून अख्खं आयुष्य पडलं. झोप आता.’’

‘‘काय बोरींग आहे हा! आईबाबांसाठी हनिमूनला जायला घाबरतोय हा...’’

मनातल्या मनात नवऱ्याला दोन तीन शिव्या देऊन मंजिरी झोपली. दुसऱ्या दिवसापासून मंजिरी आणि मानस दोघेही ऑफिसला जायला लागले. संध्याकाळी मंजिरी सहालाच घरी आली. स्वयंपाक वगैरे आटोपून ती बसली होती. तेवढयात मंजिरीचा दिर वेद कामावरून आला.

‘‘काय मग वहिनी, चलता का आइस्क्रिम खायला? पैसे मीच देईन चिंता करु नका.’’

‘‘अरे व्वा, नक्कीच येणार मी.’’

मंजिरी आणि वेदची चांगलीच मैत्री जमली. आठवडयातून तीन चार वेळा तरी ते एकमेकांसोबत घराबाहेर कोणत्या तरी बहाण्याने जात होते. कधी किराणा आणायला, कधी नातेवाईकांना भेटायला. मानस आणि मंजिरी फक्त रात्रीच बेडवर थोडेफार बोलत होते आणि दिवस जात होते. मानस दिवसांतून एकही फोन मंजिरीला करत नसे. याउलट वेद दिवसातून वेळ काढून एक फोनतरी न चुकता आठवणीने करत असे. एक दिवस मंजिरीने आपल्या वैवाहिक गोष्टी वेदला सांगायला सुरुवात केली.

‘‘वेद, मला कुठेतरी बाहेर फिरायला जायचंय रे. तुझा भाऊ घाबरतो आईबाबांना. त्याला लाज वाटते बायकोसोबत फिरण्याची. आज लग्नाला सहा महिने होऊन गेले तरी कुठे जायचा विषयही काढत नाही. माझं मेलीचं नशीबच फुटकं. बापपण तसाच आणि नवरापण तसाच भेटला. आम्हीही चार बहीणी त्यामुळे माहेरीपण बापाने कधीच कुठे फिरायला नेले नाही की हौस पूर्ण केली नाही...’’ बोलता बोलता मंजिरी रडायलाच लागली.

‘‘जाऊ दे गं वहिनी, मी नेतो तुला फिरायला. सांग कुठे जायचं आहे?’’

‘‘कुलु, शिमला, मनाली...’’

‘‘बस्स इतकंच ना, मी नेतो तुला. तू फक्त घरातल्यांना सांभाळ.’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...