दिर्घ कथा * राकेश भ्रमर

आत्तापर्यंत आपण वाचलंत :

व्यवसायानं आशीष डॉक्टर होता. नंदिताशी त्याचं लग्न झालं. दिसायला सुंदर, एका नामांकित कंपनीत सीनिअर मॅनेजर असलेली नंदिता लग्नानंतर उदास असायची, मोकळेपणानं बोलत नसे. एक पत्नी म्हणून ती आशीषला कधी समर्पित झालीच नाही. ती अशी का वागते हे आशीषला कळत नव्हतं, शेवटी त्यानं तिला खूपच प्रयत्नानं बोलती केली. तिने सांगितलं तिचं एका व्यक्तीबरोबर प्रेम आहे अन् ती त्याच्यासाठी वेडी झाली आहे. तो माणूस विवाहित आहे हे ही तिला ठाऊक आहे. हे ऐकून आशीषला मोठाच धक्का बसला.

- पुढे वाचा...

डॉ. आशीषनं खूप विचार केला. या स्थितीत त्यांच्याकडे दोनच पर्याय होते. एक तर नंदिताला मानसोपचार द्यायचं, समुपदेशन करून घ्यायचं किंवा सरळ घटस्फोट देऊन तिला मोकळं करायचं अन् आपणही मोकळं व्हायचं.

पहिला पर्याय वेळखाऊ, खर्चिक अन् अवघड होताच, यश कितपत मिळेल याचीही खात्री नव्हती. नंदितानं केलेला विश्वासघात मनात सलत राहणार होता. फक्त तिला सुधारण्याची एक संधी देऊन डॉक्टर स्वत:ला महान, महात्मा सिद्ध करू शकला असता. मुळात तो दयाळू वृत्तीचाच होता. पण एवढं सगळं झाल्यावरही जर नंदिता बदलली नाही तर? तर मग आशीष स्वत:ला सावरू शकला असता का? आपली बायको दिवसा दुसऱ्या पुरूषाला रिझावते, स्वत:ची सगळी ऊर्जा उष्मा त्याला समर्पित करते अन् रात्री अंथरूणात पतिशेजारी असताना बर्फाच्या लादीसारखी थंड, निष्क्रीय पडून राहते, जणू पतिविषयी तिला काहीच भावना नाहीएत...

ही अवस्था किती काळ तो सहन करू शकेल? त्यातून उद्या मुलंबाळं झालीच तर ती मुले आशीषचीच आहेत हे सिद्ध करायला तो पोरांचे डीएनए तपासत बसले का? की आयुष्य संशयाच्या भोवऱ्यात गरगरत राहणार?

लग्न करून घरी आणलेल्या नववधूचे कुणा दुसऱ्या पुरूषाबरोबर लैंगिक संबंध असणं ही बाब किती वेदनादायक असते हे डॉक्टर आशीष अनुभवत होता. ही एक अशी शिक्षा होती, ज्यात माणूस जगूही शकत नाही अन् मरूही शकत नाही. त्यापेक्षा दुसरा पर्याय अधिक सोपा होता.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...