मिश्किली * डॉ. गोपाळ नारायण आवटे

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून आमच्या बायकोला व्हॉट्सअॅपचं वेड लागलंय. रात्र रात्र जागून मेसेज पाठवत असते. मेसेज वाचत असते. एकदा रात्री जागा झालो अन् सौ.ला बघून घाबरलोच. ती चक्क एकटीच हसत होती. आम्ही घाबरून विचारलं, ‘‘काय झालं गं?’’

हसू आवरत ती उत्तरली, ‘‘एक जोक आलाय. ग्रूपला जॉइन झेलेय ना मी, त्यामुळे फोटो आणि मेसेजेस येत असतात. ऐकवू?’’ ती फारच उत्साहात होती.

रात्रीचे दोन वाजले होते. आम्ही झोपाळू आवाजात म्हणालो, ‘‘ऐकव.’’

बायको ऐकवत होती. जेव्हा तिचं ऐकवून झालं, तेव्हा तिला बरं वाटावं म्हणून आम्ही म्हणालो, ‘‘व्वा! फारच छान.’’

‘‘एक बोधकथाही आलीए. तीही ऐकवू?’’ अन् आमच्या ‘हो, नाही’ची वाटही न बघता ती वाचायला लागली.

सौ.च्या गदागदा हलवण्याने आम्ही दचकून जागे झालो. ‘‘का गं? काय झालं?’’

‘‘कशी होती बोधकथा?’’

‘‘कोणाची बोधकथा?’’

‘‘जी मी आता वाचली ती...’’

‘‘सॉरी डियर, आम्हाला झोप लागली होती.’’

‘‘मी कधीची तुम्हाला वाचून दाखवतेय...’’ सौ. रूसून म्हणाली.

‘‘माय लव्ह, रात्री तीन वाजता माणूस झोपेलच ना? रात्रभर जागलो तर सकाळी लवकर उठणार कसे? दुपारी ऑफिसात काम कसं करणार?’’ डोळे चोळत आम्ही म्हणालो.

‘‘तुमचं मुळी माझ्यावर प्रेमच नाहीए,’’ सौ. आता संतापण्याच्या बेतात होती.

आम्ही पटकन् उठून बसलो, ‘‘बरं, वाच,’’ म्हटल्याबरोबर ती मोबाइलवरची कथा वाचायला लागली. साडेतीनपर्यंत आम्ही जागलो अन् ऑफिसला उशिरा पोहोचलो.

पूर्वी बायको आमच्याशी बोलायची. आम्ही ऑफिसातून परतून आलो की चहाफराळाचं बघायची. पण हे व्हॉट्सअॅप आलं अन् ती पार बदलली की हो, आता ती कुणास ठाऊक कुणाकुणाशी सतत मोबाइलवरून मेसेजची देवाणघेवाण करत असते. नेट अन् मोबाइलचं बिल आम्ही भरतोए. अन् जेवायला अगदीच काही तरी थातुरमातुर समोर येतंय अन् सकाळसंध्याकाळच्या ब्रेकफास्ट अन् स्नॅक्सची तर अजूनही वाईट परिस्थिती आहे.

आम्ही विचार केला सासूबाईंची मदत घ्यावी, त्या काही तरी तोड काढतील. तर त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘बेबीला रागावू नका...सामोपचाराने तोडगा काढा.’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सब्सक्राइब करें

डिजिटल + 24 प्रिंट मैगजीन

(1 साल)
USD79
 
सब्सक्राइब करें
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...