कथा * कुसुम आगरकर

पूजा दिल्लीच्या या नव्या कॉलनीत राहायला आल्यापासून तिचं लक्ष सतत समोरच्या फ्लॅटकडे असायचं. तो फ्लॅट तिच्या स्वयंपाकघराच्या खिडकीच्या अगदी समोर पडायचा. काहीसं गूढ पण मनाला ओढ लावणारं घर असं तिनं त्याचं नाव ठेवलं होतं. सुमारे ३०-३५ वर्षांचा एक पुरूष सतत आतबाहेर करताना दिसायचा. त्याची धावपळ कळायची. एक वयस्कर जोडपंही अधूनमधून दिसे. ५-६ वर्षांचा एक गोजिरवाणा मुलगाही दिसायचा.

त्या घराविषयीची पूजाची उत्सुकता अधिकच चाळवली जेव्हा त्या घरात तिला एक तरूण सुंदर मुलगीही दिसली. क्वचितच ती बाहेर पडत असावी. तिचा सुंदर निरागस चेहरा आणि उन्हाळ्यातही तिनं डोक्याला बांधलेला स्कार्फ बघून पूजाचं कुतुहुल आणखी वाढलं.

शेवटी एकदा पूजानं तिच्या दूधवाल्या गवळ्याला विचारलंच, ‘‘भाऊ, तुम्ही समोरच्या घरातही रतीब घालता ना? कोण कोण राहतं तिथं?’’

हे ऐकून दूधवाल्यानं सांगितलं, ‘‘ताई, गेली वीस वर्षं मी त्यांच्याकडे रतीब घालतोय. पण हे वर्ष मात्र त्यांच्यासाठी फारच वाईट ठरलं आहे.’’ बोलता बोलता त्याचे डोळे भरून आले, कंठ दाटून आला. कसाबसा तो बोलला, ‘‘कधी शत्रूवरही अशी वेळ येऊ नये.’’

‘‘भाऊ शांत व्हा...मी सहजच बोलले...’’

पूजाला थोडं अपराधी वाटलं. तरीही नेमकं काय घडलं ते जाणून घेण्याची उत्सुकताही वाढली.

दूधवाल्यालाही कुठं तरी मन मोकळं करावं असं वाटलं असावं. तो स्वत:ला सावरून बोलायला लागला, ‘‘काय सांगू ताई. लहानशी, भाहुलीसारखी होती सलोनी, तेव्हापासून दूध घालतोय मी. बघता बघता ती मोठी झाली. अशी गुणी, हुशार अन् सुंदर पोर की तिला कुणीही पसंत करावी. पण तिच्यासारख्या रत्नासाठी तेवढंच तोलामोलाचं स्थळ हवं होतं.

‘‘एक दिवस आकाशसाहेब त्यांच्या घरी आले. स्वत:ची ओळख करून देऊन म्हणाले की कदाचित सलोनीनं तुम्हांला सांगितलं नसेल पण आमचं एकमेकांवर प्रेम आहे अन् आम्हाला लग्न करायचं आहे.

‘‘आकाशसाहेब स्वत: दिसायला चांगले, उच्चशिक्षित, उत्तम नोकरी, चांगलं घराणं, एकुलता एक मुलगा...अजून काय हवं? सलोनीच्या आईवडिलांना एकदम पसंत पडले. त्यांनी म्हटलं, ‘‘आम्हाला जावई म्हणून तुम्ही पसंत आहात, पण तुमच्या आईवडिलांना हे नातं पसंत आहे का?’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...