कथा * रितु वर्मा

मानसीचा आज आपल्या सासरी पहिला दिवस होता. भावजय, नणंद, काकी सर्वजणी मस्करी करून हसत होत्या. अक्षत खोलीत येताच सुधा काकीने तिचा कान ओढत म्हटले, ‘‘अरे लबाडा, थोडेही थांबवत नाही का तुला? आयुष्यभराची सोबत आहे... थोडा धीर धर.’’

मानसीने बघितले की, सर्वजण थट्टा-मस्करी करत होते. मात्र अक्षतची आई म्हणजे मानसीची सासू माधुरीच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते. महागडे कपडे आणि दागदागिने घालूनही ती अतिशय सर्वसाधारण दिसत होती.

मानसी आणि अक्षतचे लग्न धुमधडाक्यात झाले होते. कुंदन हार आणि मोत्याच्या रंगाच्या घागरा-चोळीत मानसी अतिशय सुंदर दिसत होती. तर क्रीम रंगाच्या शेरवानीत अक्षतही देखणा दिसत होता.

दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत संपूर्ण घर रिकामी झाले. आता घरात फक्त मानसी, अक्षत, अक्षतची मोठी बहीण निधी आणि अक्षतचे वडील विनोद आणि आई माधुरी होते.

दुसऱ्या दिवशी माधुरीला पाचपरतावनासाठी माहेरी जायचे होते. कोणती साडी नेसायची हे ती ठरवत होती तेवढयात तिला वाटले की सासूबाईंनाच विचारुया. त्यानंतर हातात साडया घेऊन ती सासूबाईंकडे गेली. ‘‘आई सांगा ना, पिवळया आणि नारंगी रंगापैकी उद्या कोणती साडी नेसू?’’ तिने विचारले.

माधुरी म्हणाल्या, ‘‘बाळा, तुला जी चांगली वाटेल ती नेस, पण हा नारंगी रंग तुझ्यावर खुलून दिसेल.’’

तितक्यात विनोद रागाने म्हणाले, ‘‘तू तर अडाणीच राहिलीस... डोळयांना खुपणारा हा रंग थंडीत चांगला वाटतो, एप्रिल महिन्यात नाही.

माधुरी एकदम गप्प बसल्या. विनोद म्हणाले, ‘‘माधुरी बाळा, तू निधी ताईला विचार.’’

मानसीला आपल्या सासऱ्यांचे सासूबाईंशी असे वागणे अजिबात आवडले नाही. सोबतच तिला अशी भीतीही वाटू लागली की, अक्षतचा स्वभावही त्याच्या वडिलांसारखाच असला तर काय करायचे? शेवटी मुलामध्ये वडिलांचे थोडेफार गुण असतातच.

दुसऱ्या दिवशी मानसी पिवळया रंगाची शिफॉनची साडी नेसून गेली. माधुरी यांनी सकाळी बटाटयाची भाजी आणि मूग डाळीचा हलवा बनवला होता. निधी म्हणाली, ‘‘आई, तू आम्हाला लठ्ठ करणार असे वाटत आहे.’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सब्सक्राइब करें

डिजिटल + 24 प्रिंट मैगजीन

(1 साल)
USD79
 
सब्सक्राइब करें
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...