कथा * संजीव जामकर

हॅलो पप्पा, माझं कॅम्पस सिलेक्शन झालं आहे.’’ ऐश्वर्या जवळजवळ ओरडतच फोनवर बोलत होती. तिचा आनंद ओसंडून वाहत होता.

‘‘अरे व्वा! अभिनंदन पोरी...कोणत्या कंपनीत झालंय?’’ पप्पांचाही आवाज आनंदानं ओथंबला होता.

‘‘रिव्होल्यूशन टेक्नोलॉजीमध्ये. खूप मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. बऱ्याच देशात शाखा आहेत या कंपनीच्या.’’ ऐश्वर्या आनंदानं सांगत होती. ‘‘कॉलेजमध्ये सर्वात जास्त पॅकेज मलाच मिळालंय. बहुतेकांना तीन ते साडे तीन लाखांचं पॅकेज मिळालं आहे, मला मात्र साडे चार लाखांचं पॅकेज दिलंय...पण?’’

‘‘पण...पण काय?’’

‘‘पप्पा, कंपनी दोन वर्षांचा बॉन्ड करून घेते आहे...मला समजत नाहीए...मी हो म्हणू की नको?’’

‘‘अगं, इतर कंपन्याही एक वर्षाचा बॉन्ड तर मागवतातच ना? चांगली सुरूवात होतेय तर दोन वर्षांचा बॉन्ड भरायला काहीच हरकत नाहीए. कारण दोन वर्षांनंतर कंपनी बदलावीशी वाटली तर तुला यापेक्षा वरचा जॉब मिळेल ना? उलट तुझ्या बरोबरीच्या मुलांना त्यावेळी जेमतेम तेवढा पगार मिळेल ज्यावर तू आज सुरूवात करते आहेस.’’ पप्पांनी समजावलं.

‘‘थँक्यू पप्पा, तुम्ही माझी काळजी दूर केलीत.’’

ऐश्वर्या लखनौच्या इंजिनियअरिंग कॉलेजची विद्यार्थीनी होती. प्रत्येक सेमिस्टरला टॉप करायची. सगळ्यांनाच तिच्या बुद्धिमत्तेचं कौतुक होतं. तिलाच सर्वात जास्त पॅकेज मिळणार हेही सर्व जाणून होते.

दोन दिवसांनी घरी पोहोचली, तेव्हा आईनं औक्षण करून तिचं स्वागत केलं. बाबांनी तिला जवळ घेऊन आशिर्वाद दिला. ‘‘तुला पोस्टिंग कुठं मिळेल?’’ आईनं विचारलं.

‘‘बंगळुरूला.’’

घरात एखाद्या सणा उत्सवाचं वातावरण होतं. त्या आनंदात सुट्या कधी संपल्या समजलंही नाही. ऐश्वर्या जेव्हा कंपनीत जॉईन झाली तेव्हा तिथली भव्यता बघून चकित झाली. बंगळुरूच्या आयटी हबमध्ये एका मल्टी स्टोरीड बिल्डिंगच्या सहाव्या माळ्यावर कंपनीचं आलिशान ऑफिस होतं.

सकाळी दहा वाजता कंपनीतले सर्व कर्मचारी मिनी ऑडिटोरियममध्ये पंधरा मिनिटं मेडिटेशन करायचे. त्यानंतर सर्व आपापल्या डिपार्टमेंटला निघून जायचे. ज्यूनिअर कर्मचाऱ्यांसाठी हॉलमध्ये लहान लहान क्यूबिकल्स होती. मॅनेजर आणि इतर वरच्या ऑफिसर्ससाठी केबिन्स होती. सर्व क्यूबिकल्स अन् केबिनची सजावट एकारखीच होती. त्यावरून कंपनीच्या ऐश्वर्याचा अंदाज करता येत होता.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...