कथा * अर्चना पाटील

मेजर प्रभास आपल्या मोठा भाऊ वीरच्या लग्नासाठी घरी आलेला होता. घरात आनंदी वातावरण होते. वीर बँगलोरला एका कंपनीत इंजिनिअर होता. कुलकर्णी कुटुंबातील तीनही मुलींमध्ये दिया मोठी मुलगी. कुलकर्णी लवकरात लवकर दियाचा विवाह आटपून एका जबाबदारीतून मोकळया होण्याच्या मार्गावर होते. दियासुद्धा काही दिवसांपासून पुण्यात जॉब करत होती. पण आता सर्वकाही मागे सुटून जाणार होते. त्या मैत्रिणी, त्या पार्ट्या, ते होस्टेल...

प्रभास आर्मीत असल्याने सर्वचजणांना त्याचे खूप कौतुक होते. लग्नाच्या गडबडीतही त्याचे चहापाणी, जेवण यांची सर्वजण आवर्जून चौकशी करत. हळदीच्या रात्री सर्वजण खूप नाचले. लग्नाच्या दिवशी पहाटे पहाटे प्रभासला त्याच्या सवयीप्रमाणे चार वाजता जाग आली. प्रभासने शेजारी पाहीले तर वीरचा पत्ता नव्हता. प्रभासने पूर्ण घरात चक्कर टाकली. फिरून परत पलंगावर बसला तर वीरची चिठ्ठीच सापडली. चिठ्ठीत लिहिले होते ,‘‘प्रभास, मला माफ कर. पण माझे अनन्या नावाच्या मुलीशी अगोदरच रजिस्टर मॅरेज झाले आहे. ती दुसऱ्या जातीची आहे. त्यामुळे आईबाबा अनन्याला कधीच स्वीकारणार नाहीत. म्हणूनच मी कायमचे घर सोडून जातो आहे.’’

चिठ्ठी वाचताच प्रभास बाबांकडे गेला. घरातील सर्वजण चिंतेत पडले. मुलीकडच्यांना काय सांगायचे हा प्रश्न त्यांना पडला. शेवटी घरातील सर्व वडीलधाऱ्या लोकांनी प्रभासलाच नवरदेव म्हणून उभे केले. परिस्थिती पाहून प्रभासचाही नाईलाज झाला. मुलीकडच्यांच्या संमतीने दिया व प्रभासचा विवाह थाटामाटात पार पडला. पण प्रभास या लग्नाने आनंदी नव्हता. त्याची सुट्टी संपण्यापूर्वीच तो ड्युटीवर हजर होण्याच्या हालचाली करु लागला. दियाच्या सासुनेही दोघांमधील दुरावा कमी व्हावा यासाठी दियाला सोबतच घेऊन जा म्हणून हट्टच धरला. आईबाबांची कटकट नको म्हणून प्रभास दियाला घेऊन श्रीनगरला निघाला. तेथे एका मित्राची बायको बाळंतपणासाठी माहेरी गेली असल्याने घर रिकामे होते. तेथेच दियासोबत काही दिवस राहण्याचे ठरले. रेल्वेच्या पूर्ण प्रवासात प्रभास एक मिनीटही दियाजवळ बसला नाही. प्रभास पूर्ण वेळ रेल्वेच्या दरवाज्यातच उभा होता. प्रभासचे हे वागणे पाहून दियाच्या डोळयात नकळतपणे पाणी येऊ लागले.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...