कथा * मीना गुप्ते

किती तरी दिवसांपासून गाजत असलेलं प्रसिद्ध उद्योगपती गौतम खन्ना आणि विश्वसुंदरी यशोधरा यांचं लग्न शेवटी आज झालं होतं. ‘अशी देखणी जोडी आजपर्यंत बघितलीच नव्हती’ अशी प्रतिक्रिया लग्नाला येणारा प्रत्येकजण देत होता. नवरानवरी लोकांना भेटत होती, आशिर्वाद, शुभेच्छांचा स्वीकार करत होती. त्यावेळीही त्यांच्या डोळ्यांतलं परस्परांविषयीचं प्रेम लपत नव्हतं.

गौतम ब्युटी कॉन्टेस्टमध्ये जज म्हणून गेला होता, त्यावेळी मिस वर्ल्ड कॉन्टेस्टमधून निवडली गेलेली ब्रेन एन्ड ब्युटी यशोधराच्या प्रेमातच पडला. हिला विश्वसुंदरीचा मुकुट मिळायलाच हवा अशी खूणगाठ त्यानं मनाशी बांधली.

विश्वसुंदरीच्या तयारीसाठी यशोधराला गौतमनं सर्व प्रकारची मदत केली. तिच्या प्रशिक्षणाच्या काळात तो तिला सतत प्रोत्साहन देत होता. यशोधराची मेहनत आणि गौतमचे प्रयास यामुळेच मुख्य स्पर्धेत शंभरपेक्षा अधिक सुंदऱ्यांमधून यशोधरेची विश्वसुंदरी म्हणून निवड झाली. तिच्या माथ्यावर तो झकाळणारा क्राउन बघून गौतमच्या प्रयत्नांचं सार्थक झालं. त्यानंतर दोघांमधली मैत्री प्रेमात बदलली अन् आज त्यांचं लग्न लागलं होतं.

वरवधू दोघांच्याही घरातून या लग्नाला संमती होती. दोघांच्याही आईवडिलांच्या चेहऱ्यावर समाधान अन् आनंद होता. दोन आठवड्यांचा हनिमून आटोपून गौतम अन् यशोधरा परत आली होती.

नेहमीचं आयुष्य सुरू झालं. गौतम त्याच्या धंद्याच्या व्यापात गुंतला. विश्वसुंदरी झाल्यामुळे यशोधरेलाही बरीच कॉन्ट्रॅक्ट्स पूर्ण करायची होती. कुठल्या वा कुठल्या कार्यक्रमात चीफगेस्ट म्हणून बोलावलेलं असायचं. बरेचदा ती सासूसासऱ्यांना बरोबर न्यायाची. कधी तरी गौतमही तिच्यासोबत असायचा. तिला परदेशातही बोलावणी असायची. एकदा स्वित्झलंडमध्ये असताना तिच्या चाहत्यांनी तिला गराडा घातला. कसंबसं पोलिसांच्या मदतीनं गौतमनं तिला या गर्दीतून बाहेर काढून हॉटेलपर्यंत नेलं होतं. राष्ट्रीय आतंरराष्ट्रीय बाजारातील सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिरातींसाठीही तिला बोलावणी येत. फिल्म आणि मॉडेलिंगसाठीही विचारणा सुरूच होती. मिडियावाले सतत घरी यायचे. आपल्या या यशामुळे यशोधरा तर हवेतच तरंगत होती.

सुरूवातीला गौतमनं तिला सहकार्यही खूप केलं. नंतर त्याला त्या कार्यक्रमांचा कंटाळा यायला लागला. कारण तो जरी तिचा नवरा असला तरी लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू यशोधराच असायची. काहीवेळा तर गर्दीत यशोधराला प्रोटेक्ट करताना धक्काबुक्की व्हायची. तरीही तो खुश होता. त्याला यशोधराविषयी तक्रार नव्हती.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...