कथा * अनुजा कुलकर्णी

अरे व्वा...इंटरकॉलेज फोटोग्राफीमध्ये आपल्या कॉलेजच्या शंतनूला पहिले बक्षिस मिळाले. आर्या, तुला माहितीए का गं कोण शंतनू?’’ निशा कॉलेजमधला बोर्ड पाहून उत्साहात बोलायला लागली.

‘‘नो नो निशा...मला नाही माहिती शंतनू. कोणती स्ट्रीम, कोणते वर्ष दिले आहे का? थांब जरा पाहू.’’ बोर्ड पाहत आर्या बोलली, ‘‘अरे आपल्या वर्गातलाच आहे की हा. पण कधी पाहिलं नाही. वर्गात येतो का कधी?’’ हसत आर्या बोलली.

‘‘येत असेल आर्या. आपणच किती बंक करतो कॉलेज.’’ निशा बोलली आणि दोघी हसायला लागल्या.

‘‘ए, पण आपण जाऊन बघून येऊ कोणत्या फोटोला इंटरकॉलेजमध्ये पहिलं बक्षिस मिळालं. मला तर असलं भारी वाटतंय. आपल्या कॉलेजला इंटरकॉलेज स्पर्धेत पहिला नंबर...व्वा! तो फोटो छानच असेल, पण काय फोटो आहे हे पहायची माझी उत्सुकता ताणली गेली आहे. आज दुपारी जाऊन पाहून येऊ आणि शंतनू भेटतो आहे का तेसुद्धा पाहू.’’

‘‘चालेल पण आता लेक्चरला जायचं?’’

‘‘हो.’’ इतकं बोलून दोघी क्लासमध्ये शिरल्या. कशीबशी २ लेक्चरं केली आणि मग मात्र त्यांना वेध लागले होते फोटो प्रदर्शन पहायला जायचे. दोघी प्रदर्शन पाहायला गेल्या. तिथे खूप गर्दी होती. सगळया कॉलेजचे मुलं मुली फोटो पहायला आले होते. आर्या तिथे आली आणि प्रदर्शन असलेल्या हॉलमधून बाहेर पडणारे सगळे तिच्याकडे पाहून छान, मस्त अश्या खुणा करत होते. हे काय चाललं आहे ते आर्याला आणि निशाला समजत नव्हतं. त्यात कोणी ओळखीचे नव्हते, म्हणून कोणाला थांबवून बोलायचं कसं हेसुद्धा दोघींना कळत नव्हतं.

शेवटी घाई घाईने आर्या आणि निशा हॉलमध्ये शिरल्या. तिथे बरीच गर्दी होती. गर्दीतून वाट काढत दोघी एक एक फोटो पाहायला लागल्या. आर्या खरं तर पहिल्या नंबरचा फोटो काय आहे ते पाहत होती. आपल्या वर्गात कोण इतके सुंदर फोटो काढतो हे तिला जाणून घ्यायचं होतं. पण पहिला नंबर मिळालेला फोटो काही सापडेना. तितक्यात तिला एक हाक ऐकू आली.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...