* पूजा यादव

वर्जीनिटी वा कौमार्य ना आज कोणती अद्भूत बाब आहे ना पूर्वी होती. पाश्चिमात्य देशांमध्ये नववधूला आपलं कौमार्य सिद्ध करण्यासाठी पहिल्या रात्री रक्ताने माखलेली चादर दाखवावी लागत होती. त्याचा अर्थ असा नाही की अनेक मुली लग्नापर्यंत वर्जिन राहत नव्हत्या. असा कोणताही नियम मुलांवरती लागू नव्हता. पूर्वी मुलीचं भविष्य चांगल्या पतीवर टिकून असायचं. आज मुलगा असो वा मुलगी घराबाहेर पडून शिक्षण वा नोकरी करतच असतात.

आज मुलं एक वा दोनच असतात आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. इयत्ता दहावी नंतर मुश्किलीने ते घरात रहातात. अधिकाधिक चांगल्या गोष्टीच्या शोधात मोठया शहरांकडे वा जिथे मनासारखा कोर्स मिळेल तिथे जातात आणि लग्न करण्याची कोणालाही घाई नसते.

तरुण पिढी लग्नाच्या बंधनापासून स्वत:ला वाचवत असते, परंतु शरीराची कोणतीही गरज पूर्ण करण्यासाठी ती घाबरत नाही. गरजा वयासोबतच जाग्या होतात. मोकळया वातावरणात तसंही कोणी नियंत्रित करणारं नसतं. मुलांना तर याबाबत नेहमीच सूट दिली जाते. त्यांच्यावर कोणीही लवकर वा सहजपणे नावं ठेवू शकत नाही. परंतु आता मुलीदेखील आत्मनिर्भर झाल्यामुळे त्यांच्यावर लवकर लग्न करण्याचा दबाव राहिलेला नाही.

बदलली आहे जीवनशैली

मुलंमुलींनी एकत्रित राहणं एक सामान्य गोष्ट नाही तर ती आता गरजदेखील बनली आहे. अनेकदा तीन-चार खोल्यांच्या सेटमध्ये दोन-तीन मुली आणि दोन-तीन मुलं एकत्र राहण्यात काहीही वाईट नाही. काही वर्षे एकत्रित राहून आपल्या सुविधेनुसार योग्यवेळी लग्न करण्याबाबत विचार करणं एक चांगलीच गोष्ट आहे. परंतु समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा काही काळ सोबत राहिल्यानंतर दोघांचे विचार मिळत नाही आणि ते वेगळे होतात.

कमी ना तर मुलांना मुलींची आहे आणि ना ही मुलींना मुलांची. कोणी दुसरा साथीदार मिळतो आणि पुन्हा ते सुरू होतं. आता शहरातील नोकरदार आणि यशस्वी तरुणांचं हेच राहणीमान बनलं आहे.

आता तर २७-२८ वय होताच घरातल्यान वाटू लागतं की आता मुलाचं लग्न व्हायला हवं आणि पुन्हा सुरू होते एक साधी, घरगुती, कमी वयाच्या अशा मुलीचा शोध जिला हवेनेदेखील टच केलेला नसेल नसेल म्हणजेच एकदम वर्जीन.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सब्सक्राइब करें

डिजिटल + 24 प्रिंट मैगजीन

(1 साल)
USD79
 
सब्सक्राइब करें
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...