* शैलेंद्र सिंह

देशाची राजधानी दिल्लीच नव्हे तर इतर सर्व शहरेही प्रदूषणामुळे चिंतेत आहेत. दिल्लीच्या सभोवताली पेंढा जाळल्यानेही प्रदूषण वाढते. दिवाळीच्या दिवशी फटाक्यांमुळे दिल्ली आणि आसपासच्या परिसरात सर्वाधिक प्रदूषण होते. जगातील १० सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील सर्वाधिक शहरे समाविष्ट आहेत, जो एक धोकादायक इशारा आहे.

कोणत्याही उत्सवाचा हेतू तेव्हाच सार्थक होतो जेव्हा तो समाजात आनंद पसरवितो. प्रदूषण हा संपूर्ण जगाचा सर्वात मोठा मुद्दा बनला आहे. येणाऱ्या काळात ही आणखी वाईट परिस्थिती असेल. आपल्या भावी पिढयांना स्वच्छ हवा आणि पाणी देण्यासाठी आपणास प्रदूषण निर्मूलनासाठी काम केले पाहिजे.

फटाके आनंद कमी, प्रदूषण अधिक देतात

दिवाळी हा आनंदाचा सण आहे. याचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे आनंद साजरा करण्यासाठी लोक फटाके आणि फुलबाजीचा अवलंब करतात, ज्यामधून धूर बाहेर पडून वातावरणात पसरतो आणि श्वसन रोगाचे रुग्ण असलेल्या लोकांना अधिक नुकसान पोहोचवतो.

श्वसन रोगाशिवाय फटाके वाजविल्याने होणाऱ्या मोठया आवाजाने कानदेखील खराब होतात, ज्याला ध्वनी प्रदूषण म्हणतात. ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठीच रुग्णालये आणि शाळांचे क्षेत्र सायलेंस झोन बनविले जातात. येथे मोठया आवाजात हॉर्न वाजवण्यास मनाई आहे.

जेव्हा लोक मोठया आवाजाचे फटाके, बॉम्ब आणि इतर वस्तू फोडतात तेव्हा ते आपल्या कानांवर हात ठेऊन आपले तोंड दुसऱ्या बाजूला करतात. याचा अर्थ असा की त्यांनादेखील हा आवाज आवडत नाही,

जे हे सिद्ध करते की गरजेपेक्षा मोठा आवाज कानांसाठी योग्य नाही. विचार करण्यासारखा मुद्दा असा आहे की जेव्हा एखादी गोष्ट आपल्या कानांना आवडत नाही तेव्हा ती इतरांना कशी आवडेल? म्हणूनच मोठया आवाजाचे फटाके वाजवू नयेत. फटाके केवळ वाजविणाऱ्यांनाच इजा पोहोचवत नाहीत तर त्यांना तयार करणाऱ्यांनाही इजा पोहोचवतात. फटाके तयार करण्यासाठी गनपाऊडरचा वापर केला जातो, यामुळे तयार करणाऱ्यांच्या हाताला नुकसान होते.

दिवाळीत आनंद साजरा करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे विद्युत दिवे वापरणे. यासाठी लोक मोठया संख्येने इलेक्ट्रिक स्कर्टिंग, बल्ब आणि इतर सजावटीच्या वस्तू वापरतात. यामधील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लोकांना इतरांचे पाहून आपले घर अधिकाधिक प्रकाशाने झळकावण्याची इच्छा असते. यासाठी विजेचा वापर होत आहे. यामुळे विजेचा खर्च वाढतो. त्याचा परिणाम असा होतो की वीजपुरवठयात अडचण तर येतेच शिवाय ज्या ठिकाणी तिची अत्यंत गरज आहे अशा ठिकाणी वीज पोहोचू शकत नाही. बरीच रुग्णालये, कार्यालये, रेल्वे स्थानके आणि बाजारपेठांमध्येही वीज मिळत नाही.

रांगोळीमध्ये नैसर्गिक रंग वापरा

रांगोळी तयार करण्यासाठी फक्त नैसर्गिक गोष्टींचा वापर केला पाहिजे. यासाठी, फुले आणि पाने वापरली जाऊ शकतात. तांदूळ रंगविण्यासाठीदेखील हळद वापरा. हिरव्या रंगासाठी पाने वापरा. पाने बारीक चिरून घ्यावी. याचा वापर रांगोळीला आकर्षक रूप देण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे वेगवेगळया रंगांची फुलेदेखील बारीक कापून रंगाच्या जागी वापरता येतात.

लखनौमधील रांगोळी कलाकार ज्योती रतन म्हणतात की आकर्षक आणि निरुपद्रवी रांगोळी नैसर्गिक रंगांनी बनवता येते. रांगोळीमध्ये तिची रचना आणि रंगांचा वापरच अधिक महत्वाचा असतो. आज, विविध प्रकारचे फुले प्राप्त होत आहेत, ज्यापासून रंगीबेरंगी रांगोळया तयार केल्या जाऊ शकतात.

अशा गोष्टींची काळजी घेत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी केली जाऊ शकते. यासह, खाद्यपदार्थ तयार करताना हे लक्षात ठेवा की त्यांच्यामध्ये आपल्या आरोग्यास हानी पोहोचविणाऱ्या गोष्टींचा वापर व्हायला नको.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...