* गरिमा पंकज
एकल मातेला एकाकीपणे स्वत:च्या बळावर मुलाचे संगोपन करणे आणि त्याला सक्षम बनविणे सोपे नसते, परंतु जर तिने हिंमत बाळगली तर ती केवळ तिच्या कार्यातच यशस्वी होत नाही तर ती इतरांसाठीही प्रेरणा बनते, काहीशी अशाप्रकारे
काम आणि मुलाशी असलेले नाते जतन करा : कार्यालयातील आनंदी तास, मैत्रिणीची वाढदिवसाची पार्टी, तयारी विना डेट यासारखे प्रसंग मुलांमुळे तर कधी हृदयभंगामुळे प्राधान्यक्रमात मागे पडतात. याचप्रमाणे कधीकधी डॉक्टरकडे जाणे किंवा ब्युटी पार्लरला जाणेदेखील टाळले जाते. हे खरे आहे की एकल पालक या नात्याने आपले मुलाबरोबर शारीरिक आणि भावनिक पातळीवर असणे आपल्यासाठी महत्वाचे आहे, परंतु यामुळे समाजापासून वेगळे राहणे आणि गरजा टाळणे योग्य नाही.
काहीवेळा आपल्या मातृत्वाच्या जबाबदारीपासून मोकळे होऊन स्वत:साठी काही वेळ घालवणे महत्वाचे असते, जेणेकरून आपली उर्जेची बॅटरी रीचार्ज होत राहील आणि आपण जबाबदारी अधिक चांगल्याप्रकारे पार पाडू शकाल.
आपली सकारात्मकता कायम ठेवा आणि जीवनात पुढे जाण्याचे मार्ग खुले ठेवा. लोकांना भेटा, मान उंचावून लोकांमध्ये फिरा. आपल्याला लपण्याची किंवा स्वत:साठी दु:खी होण्याची आवश्यकता नाही.
समुदायाचा पाठिंबा शोधा : एकल मातांना बऱ्याचदा स्वत:ला एकटे व अस्वस्थ वाटते. त्यांना वाटते की त्या एकट्या आहेत परंतु ही विचारसरणी योग्य नाही. आपण पेरेंट्स विदाउट पार्टनर्स, सिंगल मॉम्स कनेक्ट ऑर्गेनाइजेशन यासारख्या एकल मातांशी संबंधित संस्थांच्या सदस्य बनू शकता. मित्र, शेजारी आणि आपल्यासारख्या एकल मातादेखील आपल्या सपोर्ट सिस्टिम बनू शकतात. आपण ऑनलाईनदेखील एखाद्या समुदायाच्या सदस्य बनून पाठिंबा मिळवू शकाल.
मदत मागा : बऱ्याच वेळा एकल माता मदतीसाठी विचारण्यास किंवा आवश्यक मदत स्वीकारण्यास अगदीच संकोच करतात. समजा, तुम्हाला २-३ तास एखाद्या महत्त्वपूर्ण कामासाठी बाहेर जायचे आहे किंवा तुमची तब्येत ठीक नसेल तर तुमच्या घराभोवती मदत शोधा. मदत मागण्यास शेजारी, मित्र किंवा कुटूंबीय कोणीही असू शकतात.