* प्रतिभा अग्निहोत्री

आज वनिता सोसायटीच्या आवारात प्रचंड खळबळ उडाली होती. मिसेस वर्माचा कर्कश्श आवाज सगळयांच्या कानठळया बसवत होता. ‘‘कोण म्हणाले की माझ्या मुलाचा घटस्फोट होणार आहे? घटस्फोट होवो माझ्या अशा शत्रूचा. माहीत नाही लोक अशाकशा अफवा पसरवतात. आधी आपल्या घरात डोकावून बघा आणि मग दुसऱ्याबाबत बोला. जे बोलायचे ते माझ्यासमोर येऊन बोला. मागून बोलून काय फायदा?’’

सर्वाना हे ऐकवून मिसेस वर्मा तर बडबडत घरात निघून गेल्या, पण सोसायटीतील इतर स्त्रियांना मात्र गॉसिप करायला छान मसाला देऊन गेल्या.

‘‘आम्ही तर ऐकले होते...अगं पण आपण परवाच बोलत होतो. कोणी सांगितले मिसेस वर्माना...काल रात्री तर मिसेस वर्मा आणि त्यांचा मुलगा आणि सुनेचा जोरजोरात आवाज येत होता. त्यांच्या घरात नेहमीचेच नाटक आहे. कधी सासूच्या रडण्याचा आवाज येतो तर कधी सुनेच्या. मिसेस वर्मा त्यांच्या सुनेवर टीका करत असतात तर त्यांची सून त्यांच्यावर. कोणीच कोणापेक्षा कमी नाही,’’ सगळया शेजारणी मिसेस वर्मांबाबत आपापले कयास लावत होत्या. आश्चर्य म्हणजे या घटनेच्या तिसऱ्या दिवशीच त्यांच्यातील काही स्त्रिया मिसेस वर्माकडे बसून हसत गप्पा करत चहानाश्ता करत होत्या.

वीणा आणि तिची शेजारीण रश्मी यांचे पारिवारिक घनिष्ठ संबंध होते. दोघी आपल्या घरातील प्रत्येक गोष्ट एकमेकींशी बोलत असत. एकदा रश्मीला आपल्या शेजारिणीकडून त्या गोष्टी कळल्या, ज्या तिने फक्त वीणालाच सांगितल्या होत्या. रश्मीला हे ऐकून खूप वाईट वाटले की ज्या मैत्रिणीवर आपण विश्वास ठेवून आपल्या व्यक्तिगत गोष्टी शेअर केल्या, तिने आपल्याशी असे वागावे. हळूहळू रश्मीने वीणाशी संबंध कमी केले. वीणाच्या मूर्खपणामुळे दोन परिवारांमधील वर्षानुवर्षांचे घनिष्ठ संबंध खराब झाले.

वास्तविक, ज्या मैत्रिणीला वीणाने रश्मीबाबत सांगितले होते, तिनेच रश्मीला फोन करून सगळे संभाषण ऐकवले.

अर्चना जेव्हा आपल्या नव्या घरात शिफ्ट झाली तेव्हा तिच्या एका शेजारणीने दुसरीबाबत सावध करताना सांगितले, ‘‘आपल्या त्या शेजारणीपासून जरा सावध राहा. जास्तच आगाऊ आहे.’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...