* पूजा भारद्वाज
जीवाणूंपासून बचाव करण्यासाठी उरलेले अन्न फ्रिजमध्ये ठेवलेले तुम्ही बहुतेकदा घरात पाहिले असेलच. जर तुम्ही फ्रिजमध्ये ठेवलेले सकाळचे जेवण संध्याकाळपर्यंत खात असाल तर त्यात काही अडचण नाही, परंतू बरेच लोक आठवडाभर फ्रिजमध्ये ठेवलेले खाद्यदेखील हे म्हणत खातात की फ्रिजमध्ये तर ठेवले होते, खराब थोडेच झाले असेल. परूंतु आता आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण बऱ्याच दिवसांपासून स्टोर केलेले अन्न खाल्ल्यास आपणास जीवाणूपासून अनेक आजार उद्भवू शकतात. या, आपण यामुळे काय-काय नुकसान होऊ शकते ते समजून घेऊ या :
अन्न विषबाधा
संशोधनात असे दिसून आले आहे की शिळया अन्नात जीवाणू वाढू लागतात. दीर्घकाळ ठेवलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने त्यात निर्मित झालेल्या जीवाणूंमुळे विषबाधासुद्धा होऊ शकते.
पोटाची समस्या
दोन तासांपेक्षा जास्त वेळापूर्वी बनविलेले अन्न आपल्या आरोग्यास हानी पोहोचवते, तर शिळया अन्नात वाढणारे जीवाणू पोटात जातात आणि अन्न सडवण्यास सुरूवात करतात. ज्यामुळे पोटदुखी सुरू होते. जर हे शिळे अन्न १-२ दिवस जुने असेल तर यामुळे उलटयादेखील होऊ शकतात.
अतिसार
शिळे अन्न खाल्ल्याने अतिसारदेखील होतो, ज्यामुळे शरीरात पाण्याचा अभाव होतो. यामुळे शारीरिक अशक्तता जाणवते.
अन्नामध्ये सकसता राहत नाही
जरी आपणास फ्रीजमध्ये ठेवलेल्या शिळया अन्नाच्या चवीमध्ये काही फरक जाणवत नसला तरी, वास्तविक शिळया अन्नातील सर्व पोषक मूल्य नष्ट झालेले असतात आणि त्यामध्ये शरीराला नुकसान पोहोचवणारे जीवाणू वाढलेले असतात.
अन्न साठवण्याच्या योग्य पद्धती
* प्रकार आणि आवश्यकतेनुसार कच्चे प्रक्रिया केलेले किंवा पॅक केलेले अन्न साठवणे आवश्यक आहे.
* फ्रिजचे तापमान -५ डिग्री सेल्सिअसवर ठेवले पाहिजे.
* फ्रीजरचे तापमान -१८ डिग्री सेल्सिअसवर ठेवले पाहिजे.
* सर्व खाद्यपदार्थ व्यवस्थित थंड होतील हे सुनिश्चित करण्यासाठी फ्रिजमध्ये खाद्यपदार्थ लहान खंडात विभागले पाहिजेत.
* ताजी चिरलेली आणि रसाळ फळे त्वरित खावीत. शिवाय ती थोड्या काळासाठी फ्रिजमध्ये ठेवता येतात.
* फ्रिजमध्ये शिजविलेले अन्न वरच्या शेल्फवर आणि कच्चे अन्न खालच्या शेल्फमध्ये ठेवले पाहिजे.