* मोनिका अग्रवाल
आपल्या पाल्यांना चांगल्या शिक्षणाबरोबरच त्यांचे चांगले पालनपोषण करणे हे प्रत्येक पालकांचे स्वप्न असते आणि या धडपडीत बऱ्याच वेळा कळत-नकळत त्यांच्याकडून बऱ्याच चुकादेखील केल्या जातात, ज्यामुळे मुलांवरही त्याचा वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत भावनिकदृष्टया परावलंबन येते. या परावलंबनास कोडिपेंडेंट पॅरेंटिंग म्हणतात.
हेलिकॉप्टर पॅरेंटींग प्रमाणेच कोडिपेंडेंट पॅरेंटिंगचेही बरेच हानिकारक प्रभाव असतात. अशा नातेसंबंधांमध्ये पालक आणि मुलं यांच्यात परावलंबन, अस्वास्थ्यकर व्यसन किंवा ओढ यांचा समावेश असतो, कारण याचा परिणाम पालक आणि मुलं या दोघांमधील नातेसंबंधांवर होतो.
मुलावर परिणाम
कोडिपेंडेंसी आपल्या नजरेत प्रेमळ नातं असू शकते, परंतु आपल्या मुलासाठी ते किती धोकादायक आहे हे आपल्याला कळत आहे का? खरं तर अशा नात्यांमध्ये मुले त्यांच्या भावनांना महत्त्व देत नाहीत. ते नेहमी त्यांच्या भावना त्यांच्या पालकांचे हित आणि त्यांच्या आनंदांशी जोडून ठेवतात. हेच कारण आहे की ते त्यांचा आनंद, त्यांचे लक्ष्य मागे सोडतात. मग ते स्वत: पालक झाल्यावर देखील हीच अपेक्षा करतात.
कसे ओळखावे
समजा एखादे मूल कुठेतरी जात आहे आणि त्याचे पालक त्याचे कपडे पाहून असे म्हणतात की कपडे काही खास नाहीत. हे एक साधे आणि परस्परातील निरोगी संभाषण आहे. परंतु जर त्यांनी ते कपडे बदलण्याचा आग्रह धरला आणि मुलाला कपडे बदलण्यास भाग पाडले तर ते एक आश्रित कार्य किंवा शैली आहे.
एनोरेक्सिया
तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की एनोरेक्सियाच्या परिणामी, कोडिपेंडेंट पालक नेहमीच चुकीच्या आणि अयोग्य पद्धतीने त्यांच्या मुलांद्वारे त्यांच्या भावनिक, सामाजिक आणि वैयक्तिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात जे मुलाच्या मानसिक विकासास हानिकारक आहे.
आम्ही बरोबर आहोत, तू नाहीस
हे वाक्य जवळजवळ प्रत्येक मुलगा ऐकतो, कारण त्याच्या प्रत्येक निर्णयावर पालक हे दर्शवू पाहतात की तो चुकीचा आहे आणि ते बरोबर आहेत. यासह वरून हा तोरा की जेव्हापण ते काही करतील तेव्हा ते मुलाच्या भल्यासाठीच करतील. जर मुलाने त्याची असहमती दर्शवली तर याचा अर्थ असा की पालकांच्या अधिकारास आव्हान देणे, त्यांच्या विरूद्ध जाणे.