* शिखा जैन
जगभरात अशा काही रोमॅण्टिक जागा आहेत जिथल्या वातावरणात प्रेम बसतं आणि जर या ठिकाणी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जाल तर प्रेमाच्या नव्या रंगात तुम्ही न्हाऊन जाल. चला तर, आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगतो जिथे जाऊन तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांमध्ये असे काही हरवून जाल की तुम्हाला परत यावंसंच वाटणार नाही.
गोवा : इथली स्वच्छंदी व उन्मुक्त जीवनशैली पर्यटकांना इथे खेचून आणते. तुम्हालादेखील तुमच्या जोडीदारासोबत काही अनमोल क्षण घालवायचे असतील तर गोवा यासाठी खूपच चांगलं पर्यटनस्थळ आहे. वॉटर स्पोर्ट्साठीदेखील गोवा खूपच प्रसिद्ध आहे. समुद्रांच्या लाटेवर तुम्ही वॉटर सर्फिंग, पॅरासेलिंग, वॉटर स्कीइंग, स्कूबा डायव्हिंग, वॉटर स्कूटर इत्यादींचा आनंद घेऊ शकता.
रोमांचकारक गोष्टींची आवड असणाऱ्यांना समुद्राची छाती चिरून चालणाऱ्या वॉटर स्कूटरची सवारी खूपच आकर्षित करते.
गोव्यातील काही प्रसिद्ध बीच डोना पावला, कोलबा, कलंगूट, मीरामार, अंजुना, बागातोर इत्यादी आहेत. पणजी, म्हापसा, मडगाव गोव्यातील काही प्रमुख शहरं आहेत.
पॅरिस : जगभरातील पर्यटकांचं हे स्वप्नातील शहर आहे. दरवर्षी जवळजवळ दीड कोटीपेक्षा अधिक लोक प्रेमाची नगरी पॅरिसला पाहायला येतात. इथल्या सीन नदीवर बनलेला सर्वात जुना पूल पोंट न्यूफ प्रेमी जोडप्यांमधे खास लोकप्रिय आहे. यामुळे याला प्रेमाची नगरीदेखील म्हटलं जातं. इथे प्रेमी जोडप्यांकडून लव्हलॉक लावलं जातं. तसेही इथले म्यूझियमदेखील जगभरात प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ, वॅक्स म्यूझियम इत्यादी.
तसंच पॅरिसच्या उत्तरेला १३० मीटर उंच मोंटमा डोंगरावर प्रेमाची भिंत आहे. ४० चौरस मीटरच्या या भिंतीवर कलाकारांनी ६१२ टाइल्सवर ३०० भाषांमध्ये ‘आय लव्ह यू’ लिहिलंय. हे पाहाण्यासाठीदेखील पर्यटकांची खूप गर्दी असते.
सिडनी : सिडनी हे ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठं आणि सर्वात जुनं शहर आहे. सिडनी शहराचं नाव येताच पर्यटकांच्या डोक्यात शंखाची आकृती असणारी ऑपेरा हाउसची बिल्डिंग नक्की येते. सिडनीच्या बेनिलॉग पॉईंटवर असलेल्या या सुंदर इमारतीचा समावेश युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज सूचीतदेखील सामील आहे.