* शाहनवाज

तुम्ही कधी विचार केला आहे की २ व्यक्तींना नात्यात बांधण्यासाठी बाजारात किती किंमत मोजावी लागते? साहजिकच जेव्हा गोष्ट खर्चाची येते तेव्हा त्याकडे डोळेझाक करून चालत नाही.

मला २ वर्षांपूर्वी माझ्या मित्राने त्याच्या काकाच्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण दिले होते. लग्न उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे होणार होते. लग्नाच्या एक दिवस आधी मी तिथे पोहोचलो. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, हे घर पाहून माझ्या लक्षात आले. त्याचे काका छोटयाशा जमिनीवर शेती करायचे आणि शेतीचा हंगाम संपला की शहरात जाऊन मजुरी करायचे.

माझ्या मित्राने मला सांगितले की, मुलाकडून कोणत्याही प्रकारची हुंडयाची मागणी करण्यात आलेली नाही. फक्त त्यांनी लग्नात येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींच्या स्वागतात कोणतीही कमतरता ठेवू नका, असे सांगितले आहे.

जेव्हा वधू आणि वराला ७ फेऱ्या मारण्यासाठी उभे केले जात होते, तेव्हा मला मंडपाच्या बाहेर एक ट्रक दिसला, ज्यामध्ये टीव्ही, फ्रीज, पलंग, कपाट इत्यादी घरगुती वस्तू ठेवण्यात येत होत्या. अचानक मला माझ्या मित्राने हुंडा न घेण्याबाबत जे सांगितले होते ते आठवले, पण त्यावेळी त्याच्याशी या विषयावर काही बोलणे मला योग्य वाटले नाही.

लग्न आटोपून आम्ही दिल्लीला निघालो. बसमधून प्रवास करत असताना मी त्याला विचारले की, नवऱ्या मुलाकडून हुंडा मागण्यात आला नाही, असे तूच मला सांगितले होतेस ना? मग ते  सामान का भरले जात होते?

त्याने उत्तर दिले की, काकांनी ते सर्व सामान स्वत:च्या वतीने भेट म्हणून दिले होते, जेणेकरून उद्या काहीही घडले तरी कोणीही त्यांच्या मुलीला नावे ठेवू नयेत. मुलीला रिकाम्या हाती पाठवले असे टोमणे नवऱ्याकडच्या मंडळींसह काकांच्या स्वत:च्या नातेवाईकांनीही मारू नयेत, हे त्यामागचे कारण होते.

त्याने सांगितले की, कुटुंबातील इतर लग्नांमध्येही काकांना अशाच पद्धतीने मुलींना घरासाठीच्या सर्व वस्तू  द्याव्या लागल्या होत्या. कारण या वस्तू न दिल्यामुळे आपल्याच नातेवाईकांमध्ये रंगणाऱ्या गप्पा, कुजबूज, टोमणे त्यांना ऐकायचे नव्हते. आपल्या नातेवाईकांच्या गोतावळयात असलेली चांगली प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी ते हा सर्व खर्च झेपत नसतानाही करत होते.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सब्सक्राइब करें

डिजिटल + 24 प्रिंट मैगजीन

(1 साल)
USD79
 
सब्सक्राइब करें
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...