* डॉक्टर गाजिंदर कुमार गोयल, संचालक, कार्डीयोलॉजी मेरेंगो क्यूआरजी इस्पितळ फरीदाबाद

प्रश्न : मी ५२ वर्षीय नोकरदार महिला आहे. मला एकदा हार्ट अटॅक येऊन गेलाय. माझ्यासाठी दुसरा हार्ट अटॅकचा धोका वाढला आहे का?

उत्तर : ज्यांना पहिला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, त्यांना पुन्हा येण्याची शक्यता सामान्य लोकांपेक्षा अधिक असते. दरवर्षी हा धोका १० ते १५ टक्के वाढू शकतो. पाच वर्षात पन्नास टक्के लोकांना दुसरा अटॅक येतो. पहिल्या हार्ट अटॅकनंतर जीवनशैलीमध्ये बदल करा, तळलेल्या खाद्यपदार्थांचं सेवन करू नका, बाहेरचं खाणं खाऊ नका घरी बनवलेलं साधं खाणं खा.
तुमच्या रक्तामध्ये साखर आणि कोलेस्ट्रॉलचा स्तर आणि रक्तदाब नियंत्रित ठेवा. वेळेवर औषध घ्या. धूम्रपान दुसरा हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढवतो, म्हणून जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ते पूर्णपणे बंद करा.

प्रश्न : मला गेल्या चार-पाच वर्षापासून उच्च रक्तदाबाची तक्रार आहे. मला वारंवार चक्कर येऊ लागते. हृदय धडधड करू लागतं मी काय करू?

उत्तर : जर रक्तदाब १४०-९० पेक्षा अधिक असेल तर त्याला उच्च रक्तदाब मानलं जातं. मिठाचे सेवन कमी करा, नियमितपणे व्यायाम करा, तुमचं वजन वाढू देऊ नका, जर वाढलं असेल तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा. धूम्रपान आणि दारूचे सेवन पूर्णपणे बंद करा. जर रक्तदाब नियंत्रणात ठेवला नाही तर हार्ट अटॅक, किडनी डिजिज, स्ट्रोक, पायाच्या धामणीमध्ये ब्लॉकेज येणे, डोळयांच्या पडद्यामध्ये ब्लीडिंग झाल्यामुळे डोळयांचा दृष्टी निघून जाणं सारख्या आरोग्य समस्यांच्या धोका अधिक वाढतो.

प्रश्न : माझ्या पतींना काही दिवसापूर्वी हार्ट अटॅक आला होता. हार्ट अटॅकपासून रिकव्हर होतेवेळी आहार कसा असायला हवा आणि कोणकोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं?

उत्तर : पहिले दोन महिने खूपच महत्त्वाचे असतात. हार्ट अटॅकने रिकव्हर व्हायला ७ ते ८ आठवडे लागतात. निरोगी राहण्यासाठी प्रोटीन, कॅलरी, कार्बोहायड्रेट तिन्ही खूपच गरजेचं आहे. परंतु हार्ट अटॅक आलेल्या लोकांनी स्वत:च्या आहारात फॅट्सचं प्रमाण खूपच कमी करायला हवं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ थोडया प्रमाणात घ्या. देशी तूप, लोणीचं सेवन खूप कमी प्रमाणात करा. तळलेल्या अन्नाचं सेवन करू नका.
सुका मेवामध्ये बदाम, अक्रोड खाऊ शकता. रिफाइंड ऑइलमध्ये ऑलिव्ह आणि कनोला ऑइलचं सेवन करा. तेल वेगवेगळे वापरत राहा कारण सर्वांमध्ये वेगवेगळे गुण असतात. शारीरिक हालचाल हळूहळू वाढवा. ९-१० दिवस तर पूर्णपणे बेडरेस्ट करा. नंतर हळूहळू घरातल्या घरातच थोडं चालायला सुरुवात करा. १ महिनानंतर १ किलोमीटर रोज पायी चाला. २ महिन्यानंतर ३-४ किलोमीटर दररोज पायी चाला. हा हृदय आणि तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी एक उत्तम उपाय आहे.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...