* समस्यांच्या समाधानासाठी एल्पस ब्युटी क्लीनिकच्या फाउंडर, डायरेक्टर डॉ. भारती तनेजा द्वारा
माझे केस काही महिन्यांपासून वेगाने गळत आहेत. त्यामध्ये कोंडादेखील आहे. यासाठी कोणती अशी ट्रीटमेंट आहे, ज्यामुळे माझी केसगळती बंद होईल आणि नवीन केस येतील?
केस गळण्यामागे अनेक कारणं असतात, ज्यामध्ये कोंडादेखील एक आहे. अशामध्ये कोंडा ठिक करणं गरजेचं आहे. तुमच्या केसांमध्ये याचं इन्फेक्शन पसरलं आहे, म्हणून आता हे नैसर्गिक पद्धतीने करणं कठीण आहे. कोंडयापासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही एखाद्या चांगल्या कॉस्मेटिक क्लिनिकमधून बायोप्ट्रान घेऊ शकता. या दोन्हीमुळे डिसइन्फेकशन होतं. ज्यामुळे कोंडादेखील जातो आणि केस गळतीदेखील बंद होते. यासोबतच लेझरने केसांचं नूतनीकरण होतं.
माझं वय ४० आहे.वाढत्या वयाचा परिणाम चेहऱ्यावर दिसू लागला आहे. या वयात मला कशा प्रकारचा मेकअप आणि स्किन केअर करायला हवी? कृपया सांगा?
चाळीशीनंतर त्वचा कोरडी होते. अशावेळी त्वचेला नरिश करण्यासाठी सिटीएमपी अर्थातच क्लींजिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग आणि प्रोटेक्शनची गरज आहे. क्लींजिंगसाठी तुम्ही नरिशिंग क्लिंजींग मिल्कचा वापर करायला हवा. हे त्वचेला डीप क्लीन करण्याबरोबरच कोरडेपणादेखील दूर करतं. त्वचेवर एजिंग दिसण्याचं प्रमुख कारण ओपन पोर्स आहे. हे पोर्स कमी करण्यासाठी क्लींजिंगनंतर टोनिंग करणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा की तुमचा टोनर अल्कोहोल युक्त नसावा. सोबत चेहऱ्याचा ओलावा कायम राखण्यासाठी मॉइश्चरायझर नक्की लावा. चेहऱ्याची केअर करणंही तेवढंच गरजेचं आहे, जेवढं त्याचा संरक्षण. सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचा करपली जाते. यामुळे सुरकुत्या, ब्राऊन स्पॉट्स इत्यादी एजिंगची लक्षणें दिसून येतात. म्हणूनच यापासून वाचण्यासाठी उन्हात निघण्यापूर्वी सन स्क्रीन आवर्जून लावा.
खूप काळापासून केसांना घरातच स्ट्रेट करते. परंतु त्याचा रिझल्ट पार्लरसारखा मिळत नाही. मला केस स्ट्रेट करण्याची योग्य पद्धत सांगा?
जेव्हा तुम्ही पार्लर वा क्लिनिकमध्ये केस स्ट्रेटनिंग करता तेव्हा ते करणारी लोकं नॉर्मली एक्सपर्टस असतात. जे केसांच्या पातळ पातळ लेयर्सना स्ट्रेटनिंग करतात, त्यांच्याद्वारे स्ट्रेटनिंग करण्यामध्ये वापरण्यात आलेलं स्ट्रेटनिंग उत्तम क्वालिटीचेदेखील असतातं, जे घरी तेवढया चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकत नाही. म्हणूनच तुम्ही दररोज घरच्या घरी स्ट्रेटनिंग करण्याच्या बदल्यात परमनंट स्ट्रेटनिंग करून घ्या. ज्यामुळे तुम्हाला पार्लरसारखे सरळ केस कायमचे मिळतील. स्ट्रेट केस ठेवण्यासाठी तुम्ही केसांना परमनंट हेअर एक्सटेन्शनदेखील करू शकता. जर परमनंट हेअर एक्सटेन्शन करायचं असेल, तर जेव्हादेखील बाहेर जाल तेव्हा बाहेर एक्सटेंशन लावूनदेखील केसांना सेट करू शकता. यामुळे केस खूपच सुंदर दिसतात.