*गृहशोभिका टीम
- मी २७ वर्षीय विवाहित महिला आहे. माझे लग्न १० महिन्यांपूर्वी झाले आहे. माझे पती माझ्यावर खूप प्रेम करतात, पण मी त्यांना सेक्सच्या बाबतीत संपूर्णपणे समाधानी करू शकत नाही. कारण आहे माझ्या व्हजायनल मसल्स गरजेपेक्षा जास्त आकुंचित म्हणजे जास्त टाईट आहेत. सेक्स संबंध करताना या कारणामुळे मी माझ्या पतिला साथ देऊ शकत नाही. या दरम्यान मला अत्यंत वेदना होतात. पतिच्या आग्रहाला मी नाकारूही शकत नाही. पण सेक्स करण्याच्या नावाने माझे हात पाय गळतात आणि टाळण्याचा पूर्ण प्रयत्न करते. यामुळे माझे पती नाराज राहू लागले आहेत. सांगा मी काय करू?
आधी तर तुम्हाला तुमच्या मनात सेक्सबद्दल बसलेली भीती काढावी लागेल, कारण ही निसर्गाने दिलेली देणगी आहे जी वैवाहिक जीवनातील ऊब कायम ठेवते.
दुसरे, व्हजायनल मसल्स गरजेपेक्षा जास्त टाईट असणे फार गंभीर समस्या नाहीए, शिवाय लग्नाच्या सुरूवातीच्या दिवसांमधील ही एक सामान्य समस्या असू शकते किंवा मनात बसलेल्या भीतिमुळे तुम्ही व्हजायना संकुचित करत असाल.
त्यापेक्षा सेक्स करण्याअगोदर फोरप्ले करणं अधिक योग्य ठरेल आणि याचा वेळ सुरूवातीला एवढा जास्त असावा की तुम्ही सेक्ससाठी पूर्णत: तयार व्हाल. हे आणखी इंटरेस्टिंग व्हावे यासाठी पतिला सांगा की त्याने ल्युब्रिकंट वा चिकट तेलाचा वापर करावा.
बाजारात आजकाल व्हजायनल मोल्ड्ससुद्धा उपलब्ध आहेत, ज्याच्या वापराने सेक्सक्रिया आणखी आनंदी केली जाऊ शकते. पतिला सेक्स संबंधांच्या काळात पेनिट्रेशन स्लो ठेवायला सांगा. हळूहळू तुम्हालासुद्धा याचा आनंद घेता येईल आणि तुम्ही मोकळेपणाने आनंद उपभोगाल. या शिवाय जर समस्या जशीच्या तशी राहिली तर एखाद्या स्त्रीरोगतज्ज्ञाला भेटा.
- मी २८ वर्षांची विवाहित महिला आहे. लग्नाला २ वर्ष झाली आहेत. सासरी कशाची कमी नाही. पती सरकारी नोकरी करतात आणि उच्चपदस्थ आहेत. ते स्कूल टॉपर विद्यार्थी होतेच शिवाय कॉलेज आणि युनिव्हर्सिटीतसुद्धा टॉपर होते. आपल्या कार्यालयातसुद्धा त्यांच्या कामाला कोणी नावं ठेवत नाहीत. पण समस्या माझ्या व्यक्तिगत आयुष्यातील आहे आणि अशी आहे की जी आजवर केवळ माझ्या आईला आणि सासूला माहीत आहे. खरेतर, पती सेक्स संबंध ठेवताना हिंसक बनतात. ते मला त्यांच्यासोबत पॉर्न मुव्ही बघायला सांगतात आणि मग सेक्स करतात. यादरम्यान ते माझ्या कोमल अवयवांना जोरजोरात घर्षण करतात आणि त्यावर दातसुद्धा रुतवतात. कधीकधी तर माझ्या ब्रेस्टमधून रक्तसुद्धा निघू लागते. अशा असह्य वेदना सहन केल्यावर माझ्याच्याने अंथरुणातून उठणेसुद्धा होत नाही. माझे पती माझी ही अवस्था पाहून खेद व्यक्त करतात आणि सारखे क्षमा मागत राहतात. कधीकधी वाटते की आत्महत्या करावी. खरेतर माझे पती माझी गरजेपेक्षा काळजी करतात आणि माझे त्यांच्यापासून दूर राहणे त्यांना इतके खटकते की ते माझ्याविना एक क्षणही राहू शकत नाही.
जर पती केवळ मानसिक त्रास देत असते आणि प्रेम केले नसते तर मी त्यांना केव्हाच घटस्फोट दिला असता पण वाटते की कदाचित ते एखाद्या मानसिक रोगाने ग्रासले आहेत. आणि असा विचार करूनच मी पतिला सोडू शकत नाही. मी माझ्या सासूला, ज्या मला आपल्या मुलीपेक्षा जास्त प्रेम करतात, हे सगळे सांगितले तर त्या गप्प बसल्या. त्या केवळ एवढेच म्हणाल्या की हळूहळू सगळे नीट होईल. इकडे आईला सांगितले तेव्हा ती संतापली आणि सर्वाना एकत्र बसवून ती यावर चर्चा करू इच्छित होती. अजून हे माझाया बाबांना माहीत नाही, कारण मला माहीत आहे की ते या मुद्द्यावर गप्प बसणार नाहीत. पती, सासर आणि माहेर हे नाते क्षणात संपू शकते. काहीच समजत नाही की काय करू? कृपया सल्ला द्या?