आरोग्य परामर्श

* डॉ. आमोद मनोचा, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, साकेत, दिल्ली

प्रश्न : माझे वय ६५ आहे. २०१० मध्ये मला माझ्या पाठीत आणि पायांमध्ये तीव्र वेदना होत होत्या. उपचारासाठी ५ वेळा मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेने मला पायाच्या दुखण्यापासून आराम मिळाला असला तरी पाठदुखीचा त्रास अजूनही सतावत आहे. अगदी मला उठणे-बसणे ही अवघड झाले आहे. कृपया मला याचा उपाय सांगा?

उत्तर : योग्य उपचारांसाठी समस्येचे कारण जाणून घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे सर्वप्रथम हे तपासा. मणक्याच्या सांध्यातील वेदना दूर करण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी अॅब्लेशन आरएफए हा एक चांगला पर्याय मानला जातो. दिल्लीत अशी अनेक रुग्णालये आहेत, जिथे हे तंत्रज्ञान वापरले जाते. या उपचाराच्या मदतीने तुम्हाला १८ ते २४ महिन्यांत वेदनांपासून पूर्ण आराम मिळेल. मणक्याच्या ज्या नसांमध्ये वेदना होतात त्यांच्याजवळ विशिष्ट प्रकारच्या सुया लावल्या जातात. विशेष उपकरणांच्या साहाय्याने रेडिओ लहरींद्वारे निर्माण होणाऱ्या विद्युत प्रवाहाचा वापर करून या नसांजवळील एक छोटा भाग गरम केला जातो. हे मज्जातंतूं मधून मेंदूकडे जाणाऱ्या वेदना कमी करते, ज्यामुळे तुम्हाला वेदनापासून आराम मिळेल. या उपचाराचे अनेक फायदे आहेत जसे की तुम्हाला हॉस्पिटलमधून लवकर डिस्चार्ज मिळेल, तुमची रिकव्हरी जलद होईल आणि तुम्ही लवकरच काम सुरू करू शकाल.

प्रश्न : मी ३५ वर्षांचा आहे. गेल्या काही दिवसांपासून माझे खांदे अचानक दुखायला लागतात. मला औषधे घेणे अजिबात आवडत नाही. यातून सुटका मिळवण्यासाठी कृपया दुसरा एखादा मार्ग सुचवा?

उत्तर : काळ बदलला आहे तसंच लोकांची जीवनशैलीही बदलली आहे, त्यामुळे तरुण आणि कमी वयाचे लोक ही शरीराच्या विविध भागातील वेदनेने त्रस्त आहेत. त्याचवेळी बहुतेक लोक या वेदनांकडे दुर्लक्ष करत राहतात, ज्यामुळे वेळोवेळी समस्या गंभीर होत जाते. तुम्ही ही म्हण तर ऐकली असेलच की उपचारापेक्षा रोगाचा प्रतिबंध करणे चांगले आहे. होय, जर तुम्ही प्रतिबंध करण्याच्या पद्धतींचे पालन केले तर आजार तुम्हाला स्पर्शही करणार नाहीत. वाढत्या वयाबरोबर वाढत्या वेदना टाळण्यासाठी निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीचे अनुसरण करा. सकस आहार घ्या, दारू आणि धूम्रपानापासून दूर राहा, रोजच्या व्यायामासाठी वेळ काढा, तणावापासून दूर राहा, वजन नियंत्रणात ठेवा. असे केल्याने तुम्हाला दीर्घायुष्यासाठी निरोगी शरीर मिळू शकेल.

प्रश्न : मी ७० वर्षांचा आहे. अनेकदा माझे सांधे दुखतात. उपचार चालू आहेत, पण विशेष फायदा होत नाही. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की या वयात वेदना होणे हे सामान्य आहे, मात्र मला हे दुखणे सहन करणे कठीण होत आहे. यातून सुटका मिळवण्याचा दुसरा कुठला मार्ग आहे का?

उत्तर : या वयात शरीर अनेक आजारांना बळी पडते. या वयात प्रत्येकजण वेदनांची तक्रार करू लागतो, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण त्यापासून मुक्त होऊ शकत नाही. तुझा उपचार सुरू असल्याचे तू सांगितलेस. प्रत्येक उपचाराची एक प्रक्रिया असते, जिचा प्रभाव होण्यास वेळ लागतो. तथापि आज वेदना दूर करण्यासाठी अनेक नॉन-इनवेसिव्ह पर्याय उपलब्ध आहेत, जसे की रेडिओफ्रिक्वेन्सी उपचार, सांधे बदलणे, पुनरुत्पादक औषध इ. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही गरजेनुसार योग्य पर्याय निवडू शकता. यासोबतच तुमची जीवनशैली आणि आहार सुधारा. चांगले अन्न खा, व्यायाम करा, आठवडयातून दोनदा सांध्यांची मसाज करा, मद्यपान आणि धुम्रपान टाळा, नियमित सांधे तपासणी करा.

प्रश्न : मी २५ वर्षांचा आहे. मी एक फोटोग्राफर आहे, त्यामुळे मला दिवसभर उभे राहून फोटोशूट करावे लागते. कधी-कधी बाहेरही जावं लागतं, जिथे विश्रांतीसाठी वेळ मिळत नसतो. अशा परिस्थितीत माझे शरीर दुखण्याने जणू मोडू लागते आणि डोकेदुखीही होते, त्यामुळे मला वेदनाशामक औषध घ्यावे लागते. वेदनाशामक औषधाने माझ्या तब्येतीवर परिणाम तर होणार नाही ना अशी मला भीती वाटते, कृपया मला या समस्येपासून मुक्त होण्यासाठी उपाय सांगा?

उत्तर : अशा प्रकारच्या व्यस्त जीवनशैलीमुळे तरुणाई अनेकदा अशा समस्यांच्या गर्तेत सापडते. दिवसभर एकाच आसनात उभे राहिल्याने किंवा बसल्याने मज्जातंतूंवर दाब पडतो, त्यामुळे वेदना होण्याची तक्रार असते. थकवा, भूकेले राहणे, कमी पाणी पिणे आणि विश्रांती न मिळाल्याने डोकेदुखीची समस्या उद्भवते. याला आपणच जबाबदार असतो. कामाला महत्त्व देण्याच्या प्रवुत्तीमुळे ते स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत. समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर सर्वप्रथम शरीराला विश्रांती द्यायला शिका. कामाच्या दरम्यान थोडा वेळ काढून शरीर  ताणून घ्या, वेळेवर अन्न खा, पुरेसे पाणी प्या आणि अधूनमधून बसून शरीराला विश्रांती द्या. याशिवाय व्यायाम, पौष्टिक आहार इत्यादींचा नित्यक्रमात समावेश करा. समस्या वाढत राहिल्यास डॉक्टरांचा सल्ल घ्या. यास  लाइटली घेणे आपल्याला जड जाऊ शकते. कोणत्याही समस्येसाठी कधीही स्वत:च औषधोपचार करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषध घ्या.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • मी २५ वर्षीय विवाहित स्त्री आहे. विवाहाला ३ वर्षं झाली आहेत. आम्ही अजूनही शरीरसंबंध साधले नाहीत. विवाहाच्या पहिल्या रात्री शरीरसंबंध साधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु वेदना झाल्यामुळे मी पतीला अडवलं. त्याच भीतीने पुन्हा प्रयत्नच केला नाही. पतीनेही कधी बळजबरी केली नाही, परंतु आता घरची मंडळी मुल हवं म्हणून मागे लागली आहेत. त्यांना अधिक काळ टाळता येणार नाही. तसं बघता अपत्य आम्हालाही हवं आहे. शरीरसंबंधाशिवाय हे शक्य नाही, परंतु यादरम्यान होणाऱ्या वेदना मी सहन करू शकले नाही कर काय होणार?

पहिल्यांदा शरीरसंबंध साधताना स्त्रीला थोडीशी वेदना आणि रक्तस्त्राव होतो, परंतु ही वेदना असहनीय नसते. संभोगादरम्यान मिळणाऱ्या लैंगिक सुखासमोर ही वेदना काहीच नसते. विवाहाला इतका कालावधी लोटला असूनही तुम्ही अजून सेक्सचा आनंद उपभोगू शकला नाहीत. तुमच्या मनातील सेक्सप्रतिची भीती दूर करून शरीरसंबंध साधा आणि आपलं गृहस्थ जीवन आनंदी बनवा.

  • मी एका मुलावर प्रेम करत होते. प्रेमात आम्ही मर्यादा ओलांडून परस्परांशी अनैतिक संबंध ठेवले होते. काही वर्षांपूर्वी आमचा ब्रेकअप झाला. आता घरात माझ्या लग्नाचा विषय सुरू आहे. मी मात्र अजिबात उत्साहित नाही. कारण मला भीती आहे की लग्नाच्या पहिल्या रात्री संबंध साधल्यावर मला रक्तस्त्राव झाला नाही, तर पतीला पहिल्या रात्रीच समजेल की माझे विवाहपूर्व शारीरिक संबंध होते. पती मला अपमानित करून घराबाहेर काढेल. यापेक्षा मी लग्न न करणंच योग्य ठरेल. तुमचं काय मत आहे?

तुम्ही भूतकाळात जी चूक केली, त्यासाठी आता पश्चाताप वा लग्न न करण्याचा तुमचा निर्णय योग्य नाही. तुम्ही जोपर्यंत आपल्या मुखाने स्विकारणार नाही की तुम्ही कधी कुणाशी संबंध साधले आहेत तोवर पतीला समजणार नाही. तेव्हा या गोष्टी विसरून लग्नाची तयारी करा.

  • मी २२ वर्षीय तरुण आहे. एका मुलीवर ३-४ वर्षांपासून प्रेम करत होतो. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर मागच्या वर्षी प्रथम मंदिरात आणि त्यानंतर कोर्ट मॅरेज केलं. आम्हा दोघांचे कुंटुंबीय विवाहासाठी तयार नव्हते, त्यामुळे पैशांची व्यवस्था करून मी स्वतंत्र खोली घेतली आणि मग तिला सोबत राहायला बोलावलं. महिनाभर आम्ही अतिशय आनंदात राहिलो, परंतु त्यानंतर ती आपल्या घरच्यांना भेटू लागली. कुणास ठाऊक तिच्या घरच्यांनी तिला काय समजावलं? ती आपल्या घरी निघून गेली आणि पुन्हा परतलीच नाही. फोनसुद्धा बंद केला.

एके दिवशी तिचे भाऊ येऊन मला घरातून उचलून घेऊन गेले आणि चौकीत तक्रार नोंदवली. परंतु माझी काहीच चूक नसल्याने त्यांना मला सोडावं लागलं. आता मुलीकडील लोक दबाव आणत आहेत की मी घटस्फोट द्यावा. मला समजत नाहीए की परस्परसंमतीने विवाह केल्यानंतरही तिने माझी अशी फसवणूक का केली?

तुमच्या पत्नीचं वय खूप कमी आहे. त्यामुळे प्रेम आणि विवाहाप्रति त्या फारशा गंभीर दिसत नाहीत. शिवाय किशोरावस्थेत विरूद्धलिंगी व्यक्तिप्रति निर्माण झालेले आकर्षण प्रेम नसतं. हे लैंगिक आकर्षण जितक्या वेगाने निर्माण होतं, तितक्याच वेगाने लोप पावतं. हेच कारण आहे की भावनेच्या भरात तुम्ही दोघांनी (विशेषत: तुमच्या पत्नीने) विवाह केला, परंतु लवकरच एकमेकांकडून अपेक्षाभंग झाला. जर मुलगी कुटुंबियांच्या दबावाखाली येऊन तुमच्याकडे घटस्फोटाची मागणी करत असेल तर तो तुम्ही दिली पाहिजे.

  • मी २७ वर्षीय तरुणी आहे. माझ्या विवाहाला ४ वर्षं झाली आहेत. माझे पती माझ्यावर खूप प्रेम करतात. मीसुद्धा त्यांच्यावर प्रेम करते. परंतु सद्यस्थितित मी थोडी द्विधा मन:स्थितीत आहे. माझ्या ऑफिसमध्ये माझा एक सहकारी मला पसंत करतो. प्रत्येक लहानसहान समस्येमध्ये नेहमी मला सहकार्य करतो. तो माझ्याशी मैत्री करू इच्छितो, परंतु मल भीती वाटते की माझ्या पतींनी ही मैत्री गैरअर्थाने घेऊ नये आणि यामुळे माझं वैवाहिक जीवन प्रभावित होऊ नये. मला माहीत आहे की माझे पती तितके उदारमतवादी नाहीत. आमच्या गप्पांमध्येही नकळत त्याचा विषय निघाला तरी त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलतात. मी काय केलं पाहिजे, ते सांगा?

तुम्ही समजदार तरुणी आहात. तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे की जर आपल्या तथाकथित सहकाऱ्याशी तुम्ही मैत्री केली, तर ही गोष्ट तुमच्या पतीला आवडणार नाही. केवळ तुमचे पतीच नव्हे सामान्यत: प्रत्येक पतीला हेच वाटतं की त्याच्या पत्नीने केवळ त्याचंच असावं. अन्य पुरुषासोबत पत्नीची जवळीक कोणत्याही पतीच्या गळी उतरत नाही. तेव्हा आपल्या सहकाऱ्याला सहकारीच राहू द्या. आवश्यकता भासल्यासच त्याची आपल्या ऑफिसच्या कामात मदत घ्या. शक्यता आहे की तुम्हाला आकर्षित करण्यासाठी वा तुमच्याशी जवळीक वाढवण्यासाठीच तो तुम्हाला तत्परतेने मदत करत असेल. ऑफिसमध्ये पुरुष सहकाऱ्यांशी थोडं अंतर राखून वागणंच योग्य असतं. तुम्हीही थोड्याशा सावध राहिलात तर तुमचं वैवाहिक जीवन प्रभावित होणार नाही.

सौंदर्य समस्या

* प्रतिनिधी

  • मी २१ वर्षांची आहे. माझ्या ओठांच्या बाजूला लहान-लहान मुरुमे आहेत. ते दिसायला अतिशय विचित्र आणि कुरूप वाटतात. कृपया मला उपाय सांगा?

ओठांभोवती मुरुमे येण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे उष्णता, मेकअप व्यवस्थित साफ न करणे इ. लिपस्टिकमध्ये असलेल्या रसायनांमुळेही संक्रमण होऊ शकते.

याचे निराकरण करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा लाभ घेऊ शकता. उदा :

बर्फाने शेक द्या : बर्फ सूज कमी करण्यास मदत करते. तसेच त्वचेतील घाण काढून टाकण्यासही मदत होते. जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुमे किंवा पिंपल्स असतील तरीही तुम्ही बर्फ वापरू शकता. बर्फाने शेक देण्यासाठी बर्फ एखाद्या कापडाने गुंडाळा आणि नंतर तो प्रभावित जागेवर लावा.

हळद : हळद त्वचा आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. हळदीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आढळतात, जे चेहऱ्यावरील मुरुमे काढून टाकण्याचे काम करतात.

हळद वापरण्यासाठी तुम्हाला हळदीची पेस्ट बनवावी लागेल.

यासाठी तुम्ही १ टीस्पून हळद घ्या आणि त्यात थोडे गुलाबपाणी मिसळून पेस्ट बनवा.

आता ही पेस्ट ओठांवर लावा आणि १० मिनिटे सोडा.

मध : मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे आणि विरोधी दाहक गुणधर्म आढळतात, जे मुरुमांना कारणीभूत असलेल्या जीवाणूंना मारण्याचे काम करतात.

मध सूज कमी करण्यासाठीदेखील कार्य करते. जर तुम्हाला फोडे येण्याची समस्या असेल तरी तुम्ही मध वापरू शकता. संसर्गापासून मुक्त होण्यासाठी ओठांच्याभोवती मध चांगल्या प्रकारे लावा. ही प्रक्रिया २-३ वेळा पुन्हा करा.

  • मी १९ वर्षांची आहे. पूर्वी माझे दात पांढरे दिसायचे, पण आता ते हळूहळू पिवळे होत आहेत. मी सकाळी दातदेखील चांगले स्वच्छ करते. माझे दात पूर्वीप्रमाणे पांढरे दिसण्यासाठी मी काय करावे?

दातांची योग्य काळजी न घेतल्याने दात पिवळे होऊ लागतात. दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी आपण या उपायांचे पालन केले पाहिजे :

तुळस : तुळशी हा दातांचा पिवळसरपणा दूर करण्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे. तुळशी अनेक रोगांपासून दातांचे रक्षणदेखील करते. तसेच तोंड आणि दातांच्या आजारांपासून सुटकाही मिळते.  हिचा वापर करण्यासाठी तुळशीची पाने उन्हात वाळवा. यांची पावडर टूथपेस्टमध्ये मिसळून ब्रश केल्याने दात चमकू लागतात.

मीठ : मीठ ही दात स्वच्छ करण्याची खूप जुनी कृती आहे. मीठात थोडा कोळसा घातल्याने दात चमकू लागतात.

व्हिनेगर : सफरचंद व्हिनेगर १ चमचे ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळा. तुमचा टूथब्रश या मिश्रणात बुडवा आणि हळूवारपणे आपल्या दातांवर ब्रश करा. ही प्रक्रिया सकाळी आणि रात्री पुन्हा करा. हे मिश्रण वापरल्याने दातांचा पिवळसरपणा दूर होतो. तसेच श्वासातील दुर्गंधीची समस्यादेखील राहत नाही.

  • मी २२ वर्षांची आहे. जेव्हाही मी वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग करते, माझे केस पूर्णपणे निघत नाहीत. हे केस खूप लहान असतात, जे त्वचेतून बाहेर पडताना दिसतात. कृपया मला सांगा की ते पूर्णपणे कसे काढायचे?

या केसांना इनग्रोथ हेअर म्हणतात. आपण त्यांना एक्सफोलीएट करून काढू शकता. यामुळे त्वचेच्या आत अडकलेले केस मऊ होतील आणि बाहेर येतील. यासाठी तुम्ही घरी उपलब्ध साहित्य वापरू शकता.

एवोकॅडो आणि मध : एवोकॅडो मॅश करा, आता त्यात २ टेबलस्पून मध आणि १ टेबलस्पून साखर घाला. साखर एक सौम्य एक्सफोलिएशन देईल आणि मध व एवोकॅडो आपल्या त्वचेला पोषण देईल.

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही १-२ चमचे ताज्या लिंबाचा रस घालू शकता. लिंबाच्या रसाने त्वचा घट्ट होईल आणि यामुळे छिद्रदेखील बंद होतील.

हा मास्क १५-२० मिनिटांसाठी लावून ठेवा आणि नंतर तो पूर्णपणे धुऊन काढा.

टीट्री ऑइल : टीट्री ऑइलमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे, जंतुनाशक आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेच्या संसर्गाचा धोका टाळतात आणि इनग्रोथ केसांची समस्यादेखील दूर करतात. टीट्री ऑइलमध्ये डिस्टिल्ड वॉटर मिसळून ते त्वचेवर लावा आणि काही वेळानंतर स्वच्छ पाण्याने स्वच्छ करा. वॅक्सिंगनंतर १ दिवसांनी हे उपाय अवलंबा.

  • मी २८ वर्षांची महिला आहे. मला पायाच्या नखांमध्ये बुरशीजन्य संसर्ग झाला आहे. याचे निराकरण करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगा?

नखांमध्ये बुरशीची समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा आपले पाय शूजमध्ये बराच काळ बंद असतात, ते व्यवस्थित साफ केले जात नाहीत. बुरशीपासून मुक्त होण्यासाठी लसूण आणि लवंग तेल मोहरीच्या तेलात मिसळा आणि चांगले गरम करा. आता रात्री झोपण्यापूर्वी ते पाय आणि नखांवर लावा.

तेल लावल्यानंतर मोजे घाला आणि झोपा. असे केल्याने, बुरशीजन्य संसर्गामध्ये सुधारणा दिसून येईल.

त्यातून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही अँटीस्पिरंट पावडरदेखील वापरू शकता. जर समस्या अजूनही कायम राहिली तर निश्चिंतपणे संबंधित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आरोग्य परामर्श

* डॉ. यतीश अग्रवाल

प्रश्न : मी २८ वर्षीय विवाहित महिला आहे. माझा रंग सावळा आहे. मी आता गरोदर आहे. असा काहीतरी उपाय सांगा की बाळ गोऱ्या रंगाचे होईल. आहाराने त्याच्यावर काही प्रभाव पडतो का? दुसरे काही घरगुती उपाय असतील, तर तेही सांगा? गृहशोभिकेच्या याच स्तंभात काही महिन्यांपूर्वी त्वचेच्या रंगामागे मिलेनोसाइटची माहिती दिली होती. असा काही उपाय आहे का की बाळाची मिलेनोसाइट अपरिणामकारक राहील व बाळ गोरेगोमटे होईल?

उत्तर : आपल्या चेहऱ्याची ठेवण आणि इतर शारीरिक गुण उदा. उंचीप्रमाणेच आपल्या त्वचेचा रंग ठरवणाऱ्या मिलेनोसाइट्सच्या घनत्वाचे गणितही आपले जीन्स निश्चित करतात. ते आपल्या आईवडील आणि इतर पूर्वजांशी जुळतात. त्यांना कशाही प्रकारे बदलता येत नाही.

तसेही एखाद्या व्यक्तिचे रूप-सौंदर्य केवळ त्याच्या रंगावरच अवलंबून नसते. अनेक सावळ्या रंगाचे लोकही खूप सुंदर दिसतात आणि अनेक गोरेगोमटे सामाजिक दृष्ट्या सुंदर नसतात. त्यामुळे आपण उगाचच स्वत:च्या व होणाऱ्या बाळाच्या रंगाबाबत एवढा विचार करू नका.

गरोदरपणानुसार उचित प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरलयुक्त आहार घ्या. त्यामध्ये फळे, पालेभाज्या, दूध, अंडी, डाळी पुरेशा प्रमाणात असावीत. जेणेकरून आपल्याला व आपल्या बाळाला सर्व पोषक तत्त्वे पुरेशा प्रमाणात मिळू शकतील.

प्रश्न : मी २८ वर्षांची तरुणी आहे. मला पाळी येत नाही. गेल्या काही दिवसात मी डॉक्टरांच्या सल्ल्यावरून आपले पेल्विक अल्ट्रासाउंड करून घेतले होते. त्याच्या रिपोर्टनुसार, माझ्या युटेरसची साइज २९ मिलीमीटर १८ मिलीमीटर १३ मिलीमीटर आहे. मला पुढे कधी गर्भधारणा होईल का? मी काय केले पाहिजे, योग्य सल्ला द्या?

उत्तर : तुम्ही तुमच्या अल्ट्रासाउंडचा पूर्ण रिपोर्ट पाठवला असता, तर चांगले झाले असते. त्यामुळे युटेरसबरोबरच ओव्हरीजबाबतही माहिती मिळाली असती. राहिला प्रश्न युटेरसचा, तर युटेरस लहान असून, त्याचा व्यवस्थित विकास झालेला नाहीए. याला हाइपोप्लास्टिक युटेरसचा दर्जा दिला जातो. हा विकार अनेक कारणांनी होतो. त्याच्या मुळाशी जाण्यासाठी सविस्तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

काही महिलांमध्ये युटेरस सुरुवातीपासूनच लहान असतो आणि ही स्थिती एखाद्या मोठ्या सिंड्रोमचा भाग असते. त्यामध्ये केवळ युटेरसच नव्हे, तर व्हेजाइनाचाही व्यवस्थित विकास होत नाही. काही महिलांमध्ये युटेरसचे लहान असणे त्या मोठ्या क्रोमोझमल विकाराचा भाग असतो, ज्याला टर्नर सिंड्रोम असे नाव दिले गेले आहे. त्यामध्ये मोठी सुधारणा होण्याची शक्यता नसते. एखाद्या मुलीमध्ये हा लैंगिक अवयवांचा विकास अर्धवट राहतो, जेव्हा ती आईच्या गर्भात असते आणि आई सिंथेटिक इस्टरोजेन म्हणजेच डाईइथाइलस्टील्बेस्ट्रो घेते.

काही उदाहरणांत ही संपूर्ण समस्या हार्मोनल पातळीवर निर्माण होते. किशोरावस्थेत जेव्हा शरीर प्यूबर्टीसह होणाऱ्या हार्मोनल बदलांच्या देखरेखीत स्वत:ला वाढत्या वयासाठी तयार करते आणि इतर सेक्शुअल गुणांसोबतच लैंगिक अवयवही परिपक्व होऊन मातृत्वाची जबाबदारी सांभाळण्यासाठी विकसित होतात, त्यावेळी अंतर्गत हार्मोनल गडबड झाल्यामुळे युटेरसचा विकास मध्येच अर्धवट राहतो. ही विकारमय स्थिती प्रामुख्याने पिट्युटरी ग्लँडमध्ये बनणाऱ्या प्रोलॅक्टिन हार्मोनच्या अधिकतेमुळे निर्माण होते.

आपला युटेरस का हाइपोप्लास्टिक म्हणजे अल्पविकसित राहिला, याची योग्यप्रकारे डॉक्टरी तपासणी केल्यानंतरच स्पष्ट होईल की आपल्या मदतीसाठी काय केले जाऊ शकते? ही तपासणी आपण एखाद्या मोठ्या हॉस्पिटलच्या गायनोकोलॉजी विभागामध्ये करू शकता. या तपासणीत बराच काळ लागेल आणि येणाऱ्या खर्चासाठीही आपल्याला तयार राहावे लागेल. कारण स्पष्ट झाल्यानंतरही उपचार यशस्वी होण्याची शक्यता मर्यादित राहील.

जिथे आपली पाळी न येण्याचा प्रश्न आहे, तर त्याचे मूळही युटेरसचे हाइपोप्लास्टिक होणे आहे.

प्रश्न : माझे वय १५ वर्षे आहे. मला वेळेवर पाळी येत नाही. बहुतेकदा निश्चित वेळे, २-४ दिवस निघून गेल्यानंतर येते. याचे काय कारण आहे? मी या समस्येसाठी एखाद्या डॉक्टरकडे जाऊन आपली तपासणी करून घेतली पाहिजे का? माझ्या एका मैत्रिणीचे म्हणणे आहे की हे योग्य नाहीए. त्यामुळे पुढे मला याचा त्रास  सहन करावा लागू शकतो. कृपया योग्य सल्ला द्या?

उत्तर : तुम्ही असे काळजी करणे योग्य नाहीए. सत्य हे आहे की ज्या गोष्टीबाबत आपण काळजी करत आहात, ती गोष्ट अगदी सामान्य आहे. हे खरे आहे की बहुतेक महिलांमध्ये मासिकपाळीचे चक्र २८ दिवसांचे असते. पण हे सत्यही तेवढेच मोठे आहे की, बऱ्याचशा स्त्रियांमध्ये हे चक्र २६ दिवस, २७ दिवस, २९ दिवस किंवा मग ३० दिवसांचे असते. प्रत्येक स्त्रीच्या शरीरात बनणाऱ्या लैंगिक हार्मोनचे वाढणे-कमी होणे, तिच्या शरीराच्या लयीवर अवलंबून असते, जी तिचे विशेष असते. एवढेच नव्हे, हे मासिक चक्र बऱ्याचशा अंतर्गत आणि बाहेरील तत्त्वांनी प्रभावित होऊ शकते. भौगोलिक स्थान परिवर्तन, जलवायू, व्यक्तिगत आरोग्य, मानसिक आरोग्य आणि एवढेच नव्हे, तर घरात किंवा हॉस्टेलमध्ये अन्य महिलांच्या मासिक चक्राचाही यावर प्रभाव पडताना आढळला आहे.

तुमचे मासिक चक्र ३०-३२ दिवसांचे आहे, तर यात काही विशेष गोष्ट नाही. याबाबत ना ही आपल्याला एखाद्या डॉक्टरकडे जायची गरज आहे आणि ना ही अशा एखाद्या मैत्रिणीच्या सल्ल्याने काळजीत पडण्याची गरज आहे, जिला मासिकपाळीच्या नियमांबाबत नीट माहिती नाहीए. तपासणीची आवश्यकता तेव्हाच असते, जेव्हा मासिकपाळी उशिरा येण्याबरोबरच अनियमित असेल किंवा त्यात मासिक स्त्राव थोड्याच प्रमाणात होत असेल.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • मी २१ वर्षांचा तरूण आहे. माझं एका मुलीवर खूप प्रेम आहे. तिचंसुद्धा माझ्यावर निरतिशय प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचं आहे. पण जेव्हा मुलीने तिच्या घरी याविषयी सांगितलं तेव्हा तिच्या घरात हल्लकल्लोळ माजला. तिच्या घरच्यांनी मुलीला मारहाण केली व तिचा मोबाइल ताब्यात घेतला. एवढंच नाही तर तिचं घराबाहेर येणंजाणं बंद केलं. तिने माझ्याशी संबंध तोडले नाहीत तर ते मला खोट्या केसमध्ये अडकवून तुरूंगात पाठवतील वा मला जीवे मारतील अशी तिला धमकी दिली. मुलगी यामुळे खूप घाबरली. तिने खाणंपिणं सोडून दिलं, प्रत्येक वेळी रडत राहते. तिच्यामुळे माझ्या जिवाला धोका पोहोचू नये असं तिला वाटतं.

आम्ही दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नाही. आम्ही मुलीच्या घरच्यांना लग्नासाठी मनवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते काही ऐकत नाही. लग्नाला नकार देण्यामागचं कारण हे आहे की मुलीच्या आजीची जात (गोत्र) आणि आमची जात एक आहे. त्यामुळे नात्याने आम्ही दोघे भाऊबहिण आहोत.

माझ्या घरच्यांचा यावर अजिबात विश्वास नाही. त्यांच्याकडून लग्नासाठी पूर्ण होकार आहे. परंतु मुलीकडच्यांची सहमती नाही. दुसरीकडे कुठे तरी लग्नासाठी ते मुलीवर दबाव आणत आहेत. पण मुलगी मात्र अडून बसली आहे की लग्न करणार तर माझ्याशीच. नाहीतर मरून जाईन असं तिचं म्हणणं आहे. मला काही समजत नाही की काय करू?

मी मुलीच्या आई व मोठ्या बहिणीला भेटलो. आम्ही दोघं एकमेकांबाबत खूप गंभीर आहोत, आम्ही एकमेकांबरोबर खूप सुखी राहू तेव्हा आमच्या लग्नाला परवानगी द्या, असं समजवायचा प्रयत्न केला. परंतु त्या काहीच करू शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. समाज आमचं लग्न कधीच स्वीकारणार नाही. शेवटी याच समाजात त्यांना राहायचं आहे. समाजाच्या विरोधात त्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलीचा मी पिच्छा सोडणं योग्य अन्यथा अघटित घडू शकतं. घरच्यांच्या विरोधात जाऊन आम्ही लग्न करू शकत नाही. सांगा, आम्ही काय करावं?

एकतर आपण २१व्या शतकात जगतो आहे. आपण सुशिक्षित आहोत व स्वत:ला सुधारक मानतो. असं असूनही जात, गोत्र, जन्मकुंडली याच चक्रात अडकून आहोत. जेव्हा आंतरजातीय विवाहाचा मुद्दा समोर येतो, तेव्हा काही ना काही वाद जरूर होतो.

जन्मपत्रिकेत जर वधूवराचे गुण मिळाले तर विवाह यशस्वी होतात असं मानलं जातं. परंतु प्रत्यक्षात मात्र विवाह यशस्वी होण्यात या गोष्टींचं काहीही योगदान नाही. या अशा जुन्या गोष्टींच्या मोहात अडकवून ज्योतिष-पूजारी आपलं दुकान चालवत असतात. खरंतर लोक हे वास्तव जाणून असतात. पण समाजातील तथाकथिक ठेकेदारांच्या दादागिरीमुळे विरोध करायला घाबरतात.

आता तर तुम्ही फक्त २१ वर्षांचे आहात. तुम्ही लग्नासाठी वाट पाहू शकता. शक्यता आहे की तुमच्या दबावात येऊन उशीरा का होईना मुलीकडचे होकार देतील. जर कोणत्याही परिस्थितीत मुलीकडचे मानायला तयार नसतील तर तुम्ही कोर्ट मॅरेज करू शकता. एकदा लग्न झालं की थोड्या नाराजीनंतर ते तुम्हाला स्वीकारतील.

  • मी एक विवाहित स्त्री आहे. माझ्या लग्नाला २ वर्षं झालीत. हे माझं दुसरं लग्नं आहे. पहिल्या पतीशी घटस्फोट झाल्यानंतर मी खूप दु:खी असायचे. कारण माहेरून मला कुणाचाच आधार नव्हता. अशात माझ्या नवऱ्याने मला मित्राप्रमाणे सांभाळून घेतलं आणि आमच्या मैत्रीचं रूपांतर केव्हा प्रेमात झालं कळलंच नाही. त्यांनी मग घरच्यांशी बोलून माझ्याशी विवाह केला. माझे पती मुसलमान व मी हिंदू आहे. लग्नानंतरचे ३-४ महिने चांगले गेले. त्यानंतर सासूच्या वागण्यात बदल दिसू लागला. ती माझ्याशी नेहमी भांडते. नवऱ्याला मी याबाबत सांगते, पण तो आईला काहीही बोलत नाही. मी खूप चिंतेत असते.

पहिल्या विवाहातून मला दोन मुलं आहेत. ज्यांना पतिने घटस्फोटानंतर स्वत:जवळ ठेवून घेतलं आहे. मला त्यांची खूप आठवण येते. पण माझ्या नवऱ्याशी मी याबाबत काही बोलू शकत नाही. सतत बेचैन असते. वाटतं की दुसरं लग्न करून मी चूक केली. मी काय करू?

तुम्ही सांगितलं नाही की पहिल्या पतीशी तुमचा घटस्फोट का झाला, जेव्हा की तुम्ही दोन मुलांची आई आहात. शिवाय आयुष्यातला एवढा मोठा निर्णय घेण्याआधी तुम्ही मुलांचा विचार करायला हवा होता. पण तुम्ही आपल्या स्वार्थापायी त्यांचा तसूभरही विचार केला नाही. घटस्फोटाचे परीणाम सर्वात जास्त मुलांना भोगावे लागतात हे तुम्हाला समजायला हवं होतं.

शिवाय नवरा म्हणजे काही वस्तू नाही मनात आलं की बदलून टाका. विवाह म्हणजे तडजोड असते. ज्यात पतीपत्नींना स्वत:चे अहं बाजूला ठेवून ताळमेळ बसवावा लागतो. विशेषत: जेव्हा तुमच्यावर मुलांची जबाबदारी असते. तुमच्या बाबतीत असं वाटतं की तुम्ही आवेशात येऊन घाईघाईने निर्णय घेतला. एवढं करूनही दुसऱ्या लग्नातही तुम्ही सुखी नाही. म्हणजे की तुमच्या स्वभावातच काहीतरी खोट आहे. नातेसंबंध निभावून न्यायला शिका. हेच तुमच्यासाठी योग्य होईल. मुलांसाठी तुमचा जीव तगमगतो ते व्यर्थ आहे. याचा तुम्ही आधीच विचार करायला हवा होता. आता तर तुमच्या मुलांनाही तुम्हाला भेटायची इच्छा नसेल. शिवाय तुमचे पती व परिवार यांनासुद्धा तुमचा मूर्खपणा असह्य होईल.

लग्न म्हणजे स्वतःला गमावणे असा नाही

* गरिमा पंकज

लॅन्सेट पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित नुकत्याच झालेल्या जागतिक सर्वेक्षणानुसार, २०१६ मध्ये आत्महत्या केलेल्या सर्व महिलांपैकी प्रत्येक तिसरी महिला म्हणजे ३७% भारतीय आहे.

लहान वयात लग्न आणि मुले, घरगुती हिंसाचार, समाजातील दुय्यम दर्जा, करिअरसह कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे, मतभेद, आर्थिक अवलंबित्व यासारख्या कारणांमुळे त्यांना नैराश्य येते. त्यांची बाजू बोलायची असेल तर त्यांना गप्प केले जाते. त्यांच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष केले जाते.

खरं तर, बहुतेक स्त्रिया एका गोष्टीसाठी संघर्ष करतात किंवा म्हणू शकतात की त्या त्यासाठी तयार नाहीत, तो म्हणजे त्यांच्या स्वतःच्या अपेक्षा आणि त्यांच्याकडून इतरांच्या अपेक्षा यांच्यातील विरोधाभास.

२८ वर्षीय प्रज्ञा सांगतात, “लग्न होण्यापूर्वी माझा प्रियकर वेगळा होता. आमच्या दोघांमध्ये खूप समजूत होती पण लग्नानंतर ती पूर्णपणे बदलली आहे. मला सांगते की मला त्याच्या आई-वडिलांच्या मागे लागावे लागेल. असे वाटते की माझे स्वतःचे अस्तित्व नाही.

खरं तर, लग्नानंतर स्त्रियांनी स्वतःहून आधुनिक पद्धतींकडून पारंपारिक पद्धतींकडे जाण्याची अपेक्षा केली जाते आणि त्यांना या दुहेरी भूमिकेसाठी तयार होण्यासाठी वेळही दिला जात नाही.

अनेक महिलांना लग्नानंतर नोकरी करायची असते पण त्यांनी तसे न करणे अपेक्षित असते. काही वेळा नोकरदार महिलांनी घर सांभाळणे तसेच आपली कमाई घरात देणे अपेक्षित असते.

याशिवाय लहान कुटुंबांमध्ये घरच्या जबाबदाऱ्या वाटणे हाही वादाचा विषय आहे. आर्थिक निर्णय आणि अगदी सामान्य निर्णय घेणे ही अजूनही पुरुषांची मक्तेदारी मानली जाते आणि महिलांना या गोष्टींपासून दूर राहण्यास भाग पाडले जाते.

कुटुंब सुरू करण्यासाठी महिलांना अनेकदा त्यांचे करिअर सोडावे लागते आणि काहीवेळा ते परत येऊ शकत नाहीत. आजच्या काळात महिला केवळ आर्थिक कारणांसाठी काम करत नाहीत, तर त्यांना या माध्यमातून आपले अस्तित्व अनुभवायचे असते. नोकरीमुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो.

वैवाहिक संघर्षाचे सर्वात मोठे मूळ म्हणजे स्त्रियांना त्यांचे मत व्यक्त करण्याचे आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हवे असते पण लग्नानंतर ते मिळत नाही.

शेरोसे डॉट कॉमशी संबंधित लाइफ कोच मोनिका मजीठिया या संदर्भात काही टिप्स सांगताना सांगतात की, सुरुवात करण्यासाठी, महिलांना लग्नापूर्वी काही महत्त्वाचे संभाषण करण्याचा सल्ला दिला जातो. परंपरांच्या क्षेत्रात, महिला त्यांच्या आकांक्षा आणि स्वप्ने त्यांच्या भावी जीवनसाथीसोबत शेअर करू शकतात. असे करणे म्हणजे इतरांवर कोणतीही मागणी करणे नव्हे, तर स्वतःची ओळख जपणे असा आहे. लग्नाआधी तुमचे करिअर, आकांक्षा आणि लग्नानंतर तुम्ही दोघेही या गोष्टींचा समतोल कसा साधू शकता याविषयी चर्चा करण्याचा प्रयत्न करा.

तुम्ही समता तेव्हाच व्यक्त करू शकता जेव्हा तुम्हाला स्वतःसारखे वाटते. गुंतवणूक, बचत, विमा यासारख्या आर्थिक बाबींबद्दल स्वतःला शिक्षित करा. वैवाहिक जीवनातील बहुतेक वाद हे आर्थिक समस्यांमुळे होतात, त्यामुळे ते सोडवा किंवा समतोल साधा. तुमचा पगार पूर्णपणे कुटुंबातील सदस्यांच्या हाती देऊ नका, परंतु काही गुंतवणूक ठेवा जी वाईट काळात उपयोगी पडतील.

करिअरचे नियोजन करा. अनेकदा लग्नानंतर कुटुंब सुरू करून आई होण्यासाठी महिलांवर अप्रत्यक्ष दबाव असतो. त्यांची प्रमोशन होणार असली तरी पती आणि घरच्यांचा त्यांच्यावर कुटुंब सुरू करण्यासाठी दबाव टाकला जातो. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचे करिअर विसरून जावे.

कुटुंब सुरू करण्यासाठी तुम्हाला विश्रांतीची आवश्यकता असेल म्हणून तुमच्या करिअर ब्रेकची योजना करा आणि त्यानुसार कामावर परत या. स्वतःसाठी एक दिनचर्या तयार करा जिथे तुम्ही स्वतःसाठीही वेळ काढू शकता. व्यायाम करा, नवीन कौशल्ये विकसित करा आणि आपल्या छंदांचा पाठपुरावा करा.

नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करा आणि या बाबतीत तुम्हाला दोषी वाटण्याची गरज नाही. जर तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही तुमच्या कुटुंबालाही आनंदी ठेवू शकाल.

प्रेम किंवा लग्न म्हणजे स्वतःला गमावणे म्हणजे स्वाभिमान आणि प्रतिष्ठा गमावणे असा नाही. लक्षात ठेवा जर तुम्ही स्वतःवर प्रेम करत नसाल तर तुम्ही इतर कोणावरही प्रेम करू शकत नाही. विवाहाच्या बंधनात राहून, नेहमी “नम्र व्हा, इतरांचा आदर करा, परंतु नेहमी आपल्या दृष्टिकोनावर ठाम रहा.”

सौंदर्य समस्या

* प्रतिनिधी

  • मी १९ वर्षांची आहे. माझ्या चेहऱ्यावर ४-५ वर्षांपासून मुरुमांचा त्रास आहे. मी त्यांना फोडते, म्हणून माझ्या चेहऱ्यावर त्यांच्या खुणा आहेत. कृपया मला सांगा की मी या स्पॉट्सपासून कसे मुक्त होऊ?

आपल्याला ही समस्या आहे कारण आपल्या त्वचेचे छिद्र बंद झालेले आहेत आणि त्यात धूळ आणि घाण भरली आहे. तुम्ही रोज आपला चेहरा स्वच्छ करा. यासाठी क्लीनिंग, टोनिंग व मॉइश्चरायझिंग करा. मुरुमे फोडू नका. डाग काढून टाकण्यासाठी कडुनिंब पॅक लावा. तसेच तेलकट पदार्थ खाणे टाळा आणि दिवसाला ८-१० ग्लास पाणी अवश्य प्या.

  • मी ६ महिन्यांपूर्वी रीबॉन्डिंग केले होते. आता माझे केस मुळातून बाहेर येत आहेत. ते परत यावेत म्हणून मी काय करावे? मला एखादा शॅम्पू किंवा तेल सांगा, ज्याच्या मदतीने केस परत येतील?

रीबॉन्डिंग करताना रासायनिक उत्पादने वापरली जातात. म्हणून, रीबॉन्डिंगनंतर केसांची काळजी घेणे आवश्यक असते. आपण एखादा गुळगुळीत शॅम्पू वापरा आणि आठवडयातून एकदा हेअरमास्कदेखील लागू करा. त्याचबरोबर केसांना स्टीमही द्या. नक्कीच फायदा होईल.

  • मी १८ वर्षांची आहे. उन्हात गेल्यावर माझ्या सर्व चेहऱ्यावर लहान-लहान मुरुमे येतात. कृपया या समस्येपासून मुक्त होण्यासाठी कुठलाही घरगुती उपाय सुचवा?

कडुलिंब आणि तुळशीचा फेसपॅक लावा. यामुळे त्वचेत असणारी घाण साफ होईल. आठवडयातून एकदा जेल स्क्रब अवश्य लावा. अन्नामध्ये कमी तेल वापरा आणि बाहेर जाण्यापूर्वी आपले तोंड झाकून घ्या.

  • सनबर्नमुळे गळयाचा मागील भाग काळा झाला आहे. उत्कृष्ट ब्लीच आणि वॅक्स वापरुन प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. मला असे कोणतेही घरगुती उपचार सांगा ज्याद्वारे माझी समस्या सोडविली जाऊ शकेल?

जर उन्हामुळे होणाऱ्या त्रासाने मानेच्या मागील भागावर काळेपणा आला असेल तर आपण टोमॅटो, काकडी आणि बटाटा यांचा पॅक बनवून घ्या आणि लावा. नंतर २० मिनिटांनंतर हलके हातांनी चोळा आणि त्यातून मुक्त व्हा. त्यानंतर मॉइश्चरायझर लावा. हे दिवसातून ३ वेळा करा. काळेपणा दूर होईल.

  • माझा रंग सावळा आहे आणि चेहऱ्यावर चमक नाही. कृपया एखादा घरगुती उपाय सुचवा?

चेहऱ्यावर चमक आणण्याचा सर्वात चांगला आणि सोपा मार्ग म्हणजे दिवसाला  १०-१५ ग्लास पाणी पिणे. तसेच कोरफड जेलने दररोज चेहऱ्यावर मालिश करा. जेव्हापण आपण उन्हात बाहेर पडाल तेव्हा नेहमीच आपला चेहरा झाकून ठेवा.

  • माझ्याकडे असलेले बहुतेक कपडे शॉर्ट स्लीव्हचे आहेत. परंतु माझ्या हातांच्या रंगामुळे मी ते घालू शकत नाही. वास्तविक माझे अर्धे हात गोरे आणि अर्धे हात टॅनिंगमुळे काळे झाले आहेत. कृपया मला एखादा असा उपाय सांगा, ज्याद्वारे माझ्या हातांचा रंग एकसारखा होऊ शकेल?

जर हातांना टॅनिंग झाले असेल तर बेसन पीठ, हळद आणि दुधाची पेस्ट बनवून घ्या आणि लावा. थोडया वेळाने त्यातून मुक्त होण्यासाठी हलके हाताने चोळा. रंग हळूहळू साफ होईल. तसेच उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा आणि कॉटनचे हातमोजे अवश्य घाला.

  • माझे केस लांब आणि दाट तर आहेत, परंतु ते खूप विभाजित होत आहेत. बरेच ब्रँडेड शॅम्पू वापरण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. कृपया काही उपचार सांगा?

जर केस विभाजित होत असतील तर याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये प्रथिनांचा अभाव आहे. प्रथिने समृद्ध शॅम्पू आपल्या केसांना लावा आणि त्यानंतर केसांना प्रथिने क्रीम लावून १५ मिनिटांनी केस धुवा. दोन महिन्यांच्या अंतराने आपल्या केसांना ट्रिमिंगदेखील करत राहा.

  • मी ४० वर्षांची श्रमिक महिला आहे. प्रत्येक हंगामात माझ्या टाचा क्रॅक होतात. बरेच उपचार केलेत पण काही उपयोग झाला नाही? कृपया समस्या सोडवा?

आपल्या पायांची त्वचा कोरडी आहे. म्हणूनच रात्री झोपायच्या आधी आपले पाय कोमट पाण्यामध्ये काही काळ बुडवून ठेवा आणि नंतर मोहरीच्या तेलाने चांगले मसाज करा आणि काही काळ मोजे घाला. ऑफिसला जातानादेखील सॉक्स घाला. आपण आपले पाय जितके अधिक कव्हर कराल ते तितकेच नरम होतील.

  • मी ३५ वर्षांची श्रमिक महिला आहे. माझ्या केसांमध्ये वारंवार कोंडा होतो, ज्यामुळे ते खूप कोरडे होतात आणि डण्यास सुरवात करतात. मी नियमितपणे तेलदेखील लावते, तरीही असं होतं. कृपया घरगुती उपाय सुचवा?

तेल लावणे हा डोक्यातील कोंडयावर उपचार नाही. आपण कोरफड, नारळ आणि तुळशीच्या पानांची पेस्ट बनवून ती केसांवर लावा किंवा मध आणि ग्लिसरीन मिसळा आणि डोक्यातील कोंडा निघत नाही तोपर्यंत केसांना लावा. नियमितपणे हे केल्याने निश्चितच फायदा होईल आणि केस चमकतील.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • मी २६ वर्षांची विवाहित महिला आहे. गेल्या वर्षीच लग्न झाले होते. लग्नानंतर लवकरच मी गरोदर राहिले. पण मला लवकर आई व्हायचं नव्हतं, म्हणून मी गर्भपात करून घेतला. आता मला भीती वाटते की मी भविष्यात गर्भधारणा करू शकेन की नाही. कृपया मला काय करावे ते सांगा?

डॉक्टरांच्या देखरेखीखाली केला गेलेला गर्भपात सामान्यत: सुरक्षित असतो आणि भविष्यात कोणतीही समस्या उद्भवत नाही. होय, काही प्रकरणांमध्ये, काही कारणास्तव गर्भपात चुकीच्या पद्धतीने केला गेला असेल आणि जर त्यास संसर्ग झाला असेल तर ही अडचणीची बाब असू शकते.

जर आपल्याला या नंतर कोणताही संसर्ग झाला नसेल किंवा कोणतीही समस्या येत नसेल तर आपण निश्चितपणे पुन्हा गर्भधारणा करू शकता. आपण मात्र महिला डॉक्टरांकडून आपले चेकअप केले तर बरे. मग गर्भधारणेचा विचार करा. कधीकधी गर्भपात करणेदेखील चुकीचे नसते परंतु जर आपण ते रुग्णालयातच केले असेल तर.

  • मी २३ वर्षांचा अविवाहित तरुण आहे. कंडोम न घालता मी २-३ महिलांशी शारीरिक संबंध बनवले आहेत. मला आता काही दिवसांपासून एक समस्या येत आहे. लैंगिक संबंधानंतर माझा खाजगी भाग जळ-जळ होण्यास सुरुवात होते. आतील त्वचा लाल होते आणि कधीकधी खाजही येते. मला सांगा मी काय करू?

आजच्या जीवनशैलीत सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे फार महत्वाचे आहे आणि कंडोम हा एक सोपा आणि स्वस्त पर्याय आहे. कंडोमसह सेक्स केल्याने संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. जसे आपण नमूद केले आहे की आपले २-३ स्त्रियांशी संबंध झाले होते, तर हे स्पष्ट आहे की यामुळे आपल्याला प्रोस्टेटिक संक्रमण किंवा एखाद्या प्रकारचे बुरशीजन्य संसर्ग झाला असेल.

आपल्याला लवकरच यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्यायला हवा आणि नक्कीच, भविष्यात सेक्स करताना कंडोम वापरण्यास विसरू नका. कंडोम हा केवळ संक्रमणापासून संरक्षण करण्यासाठीच नव्हे तर गर्भनिरोधकासाठीदेखील चांगला पर्याय आहे.

  • मी २६ वर्षांची अविवाहित मुलगी आहे. मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करते. कार्यालयाचे वातावरण ठीक आहे परंतु मी माझ्या एका सहकर्मीमुळे चिंतीत आहे. खरंतर तो मला व्हाट्सएपवर रात्रंदिवस संदेश पाठवत राहतो. तो रिप्लाय देत जा असे म्हणतो पण मला ह्याचा वैताग येतो. एकतर वेळेचा अभाव आणि दुसरे म्हणजे कामाचा ताण. त्याचे संदेश मर्यादेबाहेर नसले तरी वारंवार संदेशांमुळे मी अस्वस्थ होते. माझे लक्षदेखील कामात लागत नाही. त्या सहकाऱ्याशी माझ्या अधिकृत वर्तनावर ग्रहण लागावे अशी माझी इच्छा नाही, परंतु त्याने मला या प्रकारे त्रास द्यावा अशीसुद्धा माझी इच्छा नाही. मला सांगा मी काय करू?

आपल्याला जर त्या सहकाऱ्याने केलेले व्हाट्सएप संदेश आवडत नसतील तर आपण त्याला स्पष्टपणे नकार द्या. आपण असे म्हणू शकता की जर संदेश कामाशी संबंधित असेल तर ते ठीक आहे अन्यथा फालतू व्हाट्सएप करू नका. ऑफिसच्या वेळी व्हॉट्सअॅपवर वेळ घालवून त्याची प्रतिमा चुकीची होऊ शकते असेही आपण त्याला सांगू शकता आणि ही गोष्ट साहेबांपर्यंत पोहोचल्यानंतर त्याच्या प्रगतीवर ग्रहण लागेल असेही आपण त्याला सांगू शकता.

तसे, त्याने पाठविलेल्या व्हॉट्सअॅप संदेशाकडे जर तुम्ही सतत दुर्लक्ष कराल आणि उत्तर देण्याचे टाळाल तर काही दिवसांनी तो स्वत: व्हाट्सएप करणे थांबवेल. यामुळे सापही मरेल व काठीही तुटणार नाही.

  • मी २१ वर्षांची अविवाहित तरुणी आहे. आम्ही घरात २ भावंडे आहोत. भावाच्या लग्नाला ३ वर्ष झाली आहेत. मला अजून पुढे शिकायचं आहे आणि माझ्या पालकांना याबद्दल काहीच हरकत नाही. समस्या भावजयीविषयी आहे, जी नेहमी सर्वांसमोर माझा अपमान करण्याचा प्रयत्न करीत असते. कधी-कधी तर मला खूप रडायला येतं. मला सांगा मी काय करू?

घरातल्या प्रत्येक सदस्याचे समान विचार किंवा कल्पना असणे शक्य नाही. जर आपल्या वहिनीचा स्वभावच असा असेल, तर मग तिच्याबद्दल काळजी करण्याची काय गरज आहे? आपल्याला अजून पुढचं शिक्षण घ्यायचे आहे, जर आपणास आपले भविष्य चांगले बनवायचे असेल तर उगीच दुसऱ्याच्या गोष्टींकडे लक्ष देण्यात काय उपयोग?

येथून पुढे जेव्हा-जेव्हा ती तुम्हाला अपमानित करण्याचा प्रयत्न करेल किंवा प्रत्येक गोष्टीत टोकेल तेव्हा तुम्ही तिला म्हणू शकता की वहिनी, मी तुमचा खूप आदर करते, माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप सन्मान आहे. मला तुमच्याकडूनही आदर मिळेल अशी आशा आहे.

अभ्यासामधून थोडा वेळ काढून घरगुती कामात तिला मदत करण्याचा प्रयत्न करा. वहिनीबरोबर खरेदी करायला जा, तिच्यासाठी भेट म्हणून कधीतरी काही आणा. लवकरच आपण दोघीही चांगल्या मैत्रिणी व्हाल. वहिनीसोबत जुळवून ठेवणे म्हणजे आयुष्यभराची एक फिक्स्ड डिपॉजिट आहे. छोटया कुटुंबात आईनंतर वहिनीच एकटी अशी असते, जिच्याशी आपण लग्नानंतरही सर्व काही सामायिक करू शकतो. कोणत्याही परिस्थितीत वहिनीशी भांडण करू नका.

आरोग्य परामर्श

* डॉ. यतीश अग्रवाल

प्रश्न : मी ४५ वर्षांची गृहिणी आहे. माझा नवरा कपडयांचा एक मोठा व्यापारी आहे आणि तो माझ्यापेक्षा ४ वर्षांहून मोठे आहेत. आमचा २२ वर्षांचा १ मुलगा आणि १९ वर्षांची १ मुलगी आहे. काही काळापूर्वीच फॅमिली डॉक्टरांच्या सांगण्यावरून आम्ही सर्वांनी आमची युरिन, मल आणि रक्ताच्या चाचण्या करून घेतल्या, इतर सर्व अहवालांमध्ये तर कुठली काही कमतरता नव्हती, परंतु आम्हां सर्वांमध्ये व्हिटॅमिन-डी फारच कमी प्रमाणात मिळालं. आमचे खाणे-पिणे चांगले आहे, घरात हिरव्या भाज्या आणि फळे रोज येतात, प्रत्येकजण ते आनंदाने खातात, परंतु तरीही आमच्या शरीरात व्हिटॅमिन डी कमी आहे. कदाचित असे तर नाही की हा चाचणी अहवालच चुकीचा असावा? निरोगी राहण्यासाठी आपल्याला दररोज किती प्रमाणात व्हिटॅमिन डी आवश्यक असते? त्याची पूर्तता करण्यासाठी आपण कोण-कोणते साधे उपाय करू शकतो? शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो?

उत्तर : गेल्या एका दशकात देशाच्या विविध भागात व्हिटॅमिन डीची पातळी तपासण्यासाठी बरेचसे मोठे अभ्यास झाले आहेत. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की निरोगी दिसणाऱ्या सामान्य लोकांमध्ये केल्या गेलेल्या या विस्तृत अभ्यासात ५० ते ९४ टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची पातळी असमाधानकारक आढळून आली आहे. आपल्या कुटुंबातदेखील ही कमतरता मिळणे यासाठी अनैसर्गिक म्हटले जाऊ शकत नाही.

तपासणी केल्यावर भारतीय लोकांमध्ये व्हिटॅमिन डीच्या या कमतरतेमागील अनेक कारणे आढळली आहेत. बहुतेक भारतीय शाकाहारी आहेत आणि शाकाहारी आहार, ज्यामध्ये भाज्या, कडधान्य (डाळी), अन्न, फळे यांचा समावेश आहे, व्हिटॅमिन डीच्या बाबतीत हे अत्यंत कमकुवत आहे. अशा प्रकारे आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डीचा सर्वात मोठा नैसर्गिक स्त्रोत म्हणजे शरीराच्या यंत्रणेद्वारे स्वत:च त्याचे उत्पादन करणे. जेव्हा सूर्याची अतिनील प्रकाश किरणे आपल्या त्वचेला वेधून त्यात असलेल्या ७ डायहायड्रोकोलेस्ट्रॉलवर आपला प्रभाव टाकतात तेव्हा त्याच रासायनिक प्रक्रियेद्वारे आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी ३ तयार होतो. हे खरं आहे की आपल्या देशावर सूर्य देवाची पूर्ण कृपा आहे, परंतु वाढत्या वायू प्रदूषणामुळे अल्ट्राव्हायोलेट प्रकाश किरणे आपल्या त्वचेपर्यंतचा प्रवास पूर्ण करू शकत नाहीत. दुसरे म्हणजे, आमचा गव्हाळी सावळा रंग, जो त्यामध्ये असलेल्या मेलेनिन रंगद्रव्यामुळे आहे, उरलेल्या अतिनील प्रकाश किरणांना आत प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतो. तिसरे, आपल्या जीवनशैलीत आपल्याला उघडया उन्हात उठा-बसायलाही वेळ मिळत नाही.

शाकाहारी लोकांसाठी दूध, दही, तूप, लोणी, पनीर आणि खुंबी तर मांसाहारींसाठी अंडयातील पिवळे बलक, मासे आणि डुकराचे मांस हे व्हिटॅमिन डी ३ चे नैसर्गिक स्त्रोत आहेत. परंतु शरीराची व्हिटॅमिन डी ३ ची दैनंदिन गरज पूर्ण करण्यासाठी व्हिटॅमिन डी ३ चे पूरक आहार घेणे नेहमी आवश्यक असते.

शरीरातील व्हिटॅमिन डीची मुख्य उपयोगिता हाडांमध्ये कॅल्शियम साठा करून ठेवण्यात आहे. यामुळे हाडे मजबूत होतात. शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडांमध्ये साठलेला कॅल्शियम कमी होतो, ज्यामुळे मुलांमध्ये रिकेट्सची समस्या उद्भवते आणि प्रौढांमध्ये हाडे कमकुवत होतात.

प्रश्न : सामाजिक अंतर, मुखवटा घालणे आणि वेळोवेळी हात धुणे यासारख्या खबरदाऱ्या घेण्याव्यतिरिक्त कोविड १९पासून सुरक्षित राहण्यासाठी आपण काय-काय उपाय करू शकतो? अशा काही युक्त्या आहेत काय ज्याद्वारे आपण आपल्या शरीराची शक्ती वाढवू शकतो? काही होमिओपॅथी डॉक्टर म्हणतात की ऑर्सीनिक आणि कॅफर औषधे घेतल्यास आपण स्वत:मध्ये कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती विकसित करू शकतो. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर असे काही व्हिडिओदेखील चालू आहेत की दिवसभर गरम पाणी, ग्रीन टी, आले, दालचिनी, वेलची आणि तुळसीचा चहा पीत राहिल्याने कोरोना विषाणू जवळ येत नाही. या सर्व गोष्टींमध्ये किती सत्य आहे?

उत्तर : लॉकडाऊन असूनही शक्य तितके शरीर आणि मन स्वस्थ व तंदुरुस्त ठेवण्याच्या सर्व सामान्य उपायांकडे लक्ष द्या. घराच्या छतावर, बाल्कनीमध्ये किंवा खोलीतच उठता-बसतांना साधे व्यायाम करा. रात्री ७-८ तासांची झोप घ्या. निरोगी संतुलित आहार घ्या..

अशी काही कामे करत राहा की मन प्रसन्न आणि आल्हाददायक राहील. घरामध्ये खेळले जाणारे खेळ, टीव्हीवरील विनोदी चित्रपट आणि मालिका, मुले व कुटुंबियांसह मनातील गोष्ट, घरातील वनस्पतींची काळजी घेणे यासारख्या छोटया-छोटया गोष्टींनी मन निरोगी ठेवू शकता. नेहमीच टीव्हीवर कोविड १९शी संबंधित नकारात्मक बातम्या पाहत राहणे अजिबात चांगले नाही.

घरात कोणी धूम्रपान करत असेल तर त्यावर बंदी घाला. जर तुम्हाला अल्कोहोलची आवड असेल तर ते घेऊ नका. हे ते सुपरिचित उपाय आहेत, ज्याद्वारे शरीराची अंतर्गत बायोकेमिस्ट्री निरोगी राहते आणि ज्याचा शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अर्थात इम्युनिटीवरदेखील अनुकूल परिणाम होतो.

जिथपर्यंत होमिओपॅथ डॉक्टरांच्या दाव्यांची बाब आहे, तर आतापर्यंत त्यांचे कोणतेही वैज्ञानिक पुष्टीकरण झालेले नाही. म्हणून त्यांच्यापासून काही फायदा होत असेल हे सांगणे कठीण आहे. जिथपर्यंत दिवसभर गरम पाणी, ग्रीन टी, आले, दालचिनी, वेलची आणि तुळसीचा चहा पिण्याचे उपाय आहेत, त्यांच्या बाजूनेही कोणतेही ठोस पुरावे तर उपलब्ध नाहीत, परंतु जर कोणाची इच्छा असेल तर ते अवलंबण्यात काही नुकसानदेखील नाही.

सौंदर्य समस्या

* शंकांचे निरसन ब्युटी एक्सपर्ट, इशिका तनेजा यांच्याकडून

  • मला नेलपॉलिश लावायला आवडते. परंतू नखांवरती पॉलिश जास्त दिवस टिकत नाही. असा कुठला उपाय आहे का ज्यामुळे नेलपॉलिश जास्त दिवस नखांवर टिकून राहील?

हातांना सुंदर दाखवण्यासाठी नेलपॉलिश लावणे एक सामान्य बाब आहे. अनेक रंगामध्ये उपलब्ध नेलपॉलिश हात सुंदर दिसावेत म्हणून वापरली जाते. परंतु अनेक वेळा असं होतं की नेलपॉलिश लावल्यानंतर जसे आपण पाण्याशी निगडित काही काम करता, त्यामुळे नेलपॉलिश निघून जाते. एवढेच नव्हे तर ती एकसाथ जात नाही, जे चांगले दिसत नाही. अशावेळेस पर्मनंट जेल नेलपॉलिश जी पर्मनंट मेकअपचा भाग आहे, त्याचा वापर करून कोणत्याही प्रकारच्या नखांना कृत्रिम स्वरूपात सुंदर बनवू शकता. जेल नेलपॉलिश नखांवर १० दिवसांपासून ते ३ आठवडयांपर्यंत टिकून राहते.

  • माझे वय ३३ वर्ष आहे. माझ्या हाताच्या एका बोटामध्ये रेड पॅच झाला आहे. हा काढण्यासाठी काही उपाय सांगा?

त्वचेवर रेड स्पॉट येण्याची बरीच कारणे असू शकतात. जसे इन्फेक्शन,अॅलर्जी आणि सुजेमुळे असे होऊ शकते. लाल डाग शरीराच्या कुठल्याही भागावर दिसू शकतात. कधी-कधी तर ते अचानक उमटणारे लाल डाग चिंताजनक नसतील, पण हे ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सरचे लक्षणसुद्धा असू शकतात. हे डाग कधीकधी अचानक उमटतात आणि नाहीसे होतात. कधी-कधी दीर्घकाळपर्यंत राहतात. म्हणून सावधानी म्हणून अगोदर कुठल्या तरी डर्मेटोलॉजिस्टला दाखवावे. जर अॅलर्जी, ड्राय स्किन किंवा मग अॅक्नेमुळे लाल डाग झालेच तर मधाचा लेप फायदेशीर ठरू शकतो. मधाला नैसर्गिक औषध म्हटले जाते. जर सूर्याच्या उष्ण हवेमुळे किंवा सनबर्नमुळे त्वचेवर लाल डाग आले असतील तर मधाचा लेप लावू नये.

  • माझे वय २१ वर्षं आहे. मी सध्या लाईट मेकअप करू इच्छिते. कृपया मला यासाठी उपयुक्त उपाय सांगावा?

मेकअप करण्याअगोदर तुमचा चेहरा पूर्णपणे साफ आहे ना हे बघा. टोनरचा उपयोग केल्यास मेकअप पसरत नाही. लाईट मेकअप करताना काजळाचा उपयोग जरूर करावा. लाईट मेकअप करत असताना गडद रंगाची शॅडो वापरण्याचे टाळावे आणि जर लावायचीच असेल तर न्यूट्रल कलर वापरावा. लाईट कलरची लिपस्टिक ग्लॉसबरोबर लावणे अधिक चांगले. ग्लिटरचा वापर टाळावा. दिवसा ऊन आणि गरमीमुळे तुमचा चेहरा खराब होऊ शकतो. म्हणून नेहमी वाटरप्रूप ब्युटी प्रॉडक्ट्सचाच उपयोग करावा. मेकअप करण्याच्या २० मिनिटे अगोदर सनस्क्रीन लावायला विसरू नये.

  • एएचए क्रीम लावल्याने काळी वर्तुळे आणि डाग नाहीसे होऊ शकतात का? याच्या नियमित वापरामुळे त्वचा चमकदार बनू शकते का?

एएचए म्हणजे अल्फा हाईड्रोक्सी अॅसिड क्रीम, ज्याच्यात फळातून काढलेले असे उपयुक्त अॅसिड असतात आणि जे त्वरित कोलोजनची पातळी वेगाने वाढवून त्वचेवर सुरकुत्या पडू देत नाहीत. ते डोळयांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासही सहाय्यक ठरते. या क्रीमच्या उपयोगामुळे एक्सफॉलिएशन आणि नवीन पेशी बनण्याची प्रक्रिया वाढते. ज्यामुळे त्वचेत नाविन्य दिसून येते. रोज रात्री चेहरा साफ केल्यानंतर आपल्या रिंग फिंगरमध्ये थोडीशी एएचए क्रीम घेऊन डोळयांच्या चारी बाजूला हळू-हळू गोलाकार मसाज करावा. अशाप्रकारे रोज ही क्रीम लावल्याने डाग कमी होतात आणि त्याचबरोबर त्वचासुद्धा उजळलेली दिसते. फक्त लक्ष असू द्या की क्रीम डोळयात जाता कामा नये.

  • माझे वय ३४ वर्षं आहे. मी एक वर्ष अगोदर हेअर रिबॉण्डिंग केलं होतं. परंतु आता माझे केस पुन्हा कोरडे होऊ लागलेत. कृपया सांगा की हेअर -रिबॉण्डिंग किती वेळा करून घेऊ शकतो?

आजकाल जपानी थर्मल प्रक्रिया स्ट्रेटनिंग केसांना करण्याचा सगळयात लोकप्रिय उपाय बनला आहे, ज्याला रिबॉण्डिंगही म्हटले जाते. पुर्ण रिबॉण्डिंग प्रक्रियेचा प्रभाव १ वर्षापर्यंत राहतो. याचा प्रभाव नवीन उगवलेल्या केसांवरही अनुभवता येतो. हे सांगणे आवश्यक आहे की केसांचं रिबॉण्डिंग केसांनां सरळ करण्याचा महाग परंतु प्रभावशाली उपाय आहे.

  • माझे वय ३२ वर्षं आहे. मी कधी अप्पर लिप्स केले नाहीत, करण्याचा सगळयात सोपा आणि योग्य उपाय काय आहे?

लिप हेयर हटवणं थोडं वेदनादायी आहे, परंतु हे हटवणंही आवश्यक आहे. जर तुम्हालाही अप्पर लिप्स करून घेताना खूप वेदना होत असतील तर आपण घरगुती उपायसुद्धा करू शकता. २ लिंबांचा रस काढून त्यात थोडे पाणी आणि थोडी साखर मिसळून घ्या. ही पेस्ट तोपर्यंत मिसळा जोपर्यंत पेस्ट पातळ होत नाही. आता तयार केलेली पेस्ट आपल्या ओठांच्या वरच्या भागावर लावा. १५ मिनिंटानंतर पाण्याने चेहरा धुवून घ्या.

  • माझे वय २६ वर्षं आहे. मी रंगाने सावळी आहे. माझ्या चेहऱ्यावर मुरुमांचे काळे डाग आहेत. कृपया हे नाहीसे करण्याचा घरगुती उपाय सांगा.

जर डाग जुने, गंभीर गहिरे असतील तर तुम्ही हे हटवण्यासाठी एखाद्या विशेषज्ज्ञाचा सल्ला घेणे जरुरी आहे. चेहऱ्यावरचे डाग हटवण्यासाठी १ मोठा चमचा सफरचंदाचा रस (साइड व्हिनेगर), २ छोटे चमचे मध, आवश्कतेनुसार पाण्यात मिळवून पेस्ट तयार करून घ्या आणि याचा उपयोग करा. अँटी साइडर व्हिनगरमध्ये मायक्रोबियल गुण असतात.

हे मिश्रण कापसाच्या मदतीने आपल्या चेहऱ्यावर आणि पिंपल्सवर लावावे. १५ मिनिटांनंतर चेहरा धुवून घ्यावा. तुम्ही हे मिश्रण रोज किंवा एक दिवसाआड लावू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें