स्टाईलसह आजारही देते हॅण्डबॅग

* एनी अंकिता

हण्डबॅगेमध्ये तुम्ही तुमच्या गरजेच्या सर्व वस्तू ठेवता जेणेकरून गरज भासल्यास लगेच ती वस्तू वापरता येईल. पण तुम्हाला कल्पना नाही की तुमच्या बॅगेत तुम्ही दुसरंही काही तरी घेऊन फिरत असता? हो, तुमच्या पर्समध्ये अनेक प्रकारचे विषाणू तयार होत असतात, जे तुम्हाला आजारी करू शकतात.

एका नवीन संशोधनानुसार, ९० टक्यांहून अधिक विषाणू तयार होतात. संशोधनात असं आढळलं आहे की स्वयंपाकघर, स्नानगृह अशा ठिकाणांच्या तुलनेत पर्समध्ये अधिक बॅक्टेरिया तयार होतात, जे आरोग्यासाठी घातक आहेत.

डेली मेलने जनरल अॅडव्हान्स बायोमेडिकलच्या आधारे हे स्पष्ट केलं आहे की महिलांमध्ये व पुरुषांमध्येही संसर्गजन्य आजार पसरण्याचे मुख्य कारण त्यांची बॅग हे असू शकतं. वास्तविक संशोधनानुसार पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या पर्समध्ये अधिक बॅक्टेरिया असतात.

संशोधनात असंही आढळून आलं आहे की २.१ टक्के स्त्रियाच महिन्यातून एकदा आपली पर्स स्वच्छ करतात व ८१.५ टक्के स्त्रिया कधीच आपली पर्स स्वच्छ करत नाहीत.

अलीकडच्या काळात तसंही आजारांचे प्रमाण वाढलेलं आहे. त्यासाठी तुम्ही सृहृढ राहू इच्छित असाल तर तुमच्या हॅण्डबॅगची स्वच्छता नक्की करा. बॅगेत फक्त गरजेच्या वस्तूच ठेवा व त्याही योग्यपद्धतीने ठेवा.

हॅण्डबॅगची सफाई कशी कराल?

* कोमट पाण्यात थोडा लिक्विड साबण मिसळा व त्याने हॅण्डबॅग बाहेरून स्वच्छ करून घ्या. लिक्विड साबणाऐवजी तुम्ही शाम्पूसुद्धा वापरू शकता. यामुळे बाहेरील भागाची स्वच्छता होईल.

* वाइन्स किंवा इतर कुठल्याही घरगुती वस्तू बॅगेच्या स्वच्छतेसाठी वापरू नका. या उत्पादनांमध्ये रसायनांचा वापर असल्याने बॅगेचा रंग खराब होण्याची शक्यता असते.

* लेदर पर्स सुती कपाड घेऊन हलक्या हाताने स्वच्छ करा. पेट्रोलियम जेलीसुद्धा तुम्ही वापरू शकता.

* बॅगेतील कोपरे स्वच्छ करण्यासाठी टूथपिकचा वापर करावा.

* बॅग स्वच्छ केल्यानंतर लगेचच वस्तू भरू नयेत. काही वेळ तशीच हवेत राहू द्यावी.

हे करू नये

* सौंदर्य प्रसाधनांनी बॅग भरू नये. रोज ज्या वस्तूंचा तुम्ही वापर करता त्याच वस्तू ठेवाव्यात व त्याही एखाद्या पाऊचमध्ये व्यवस्थित बांधून ठेवाव्यात किंवा त्याही वेळोवेळी स्वच्छ कराव्यात.

* खाण्यापिण्याच्या वस्तू बॅगमध्ये ठेवू नयेत. खासकरून तेव्हा जेव्हा तुम्ही खाण्याचे पाकीट उघडलेले असेल. यामुळे बॅगेला मुंग्या लागू शकतात.

* बॅग कुठेही ठेवू नका. ज्या ठिकाणी जिवाणू तयार होतात अशा ठिकाणी बॅग ठेवू नये.

* हॅण्डबॅगला कचऱ्याचा डबा बनूव नये. काही स्त्रियांना आपल्या सगळ्या वस्तू बॅगेत ठेवायची सवय असते.

हेही लक्षात ठेवा

* नेहमी वॉटरप्रूफ बॅगच विकत घ्या कारण साध्या बॅगेमधून पावसाळ्यात आतील सामान ओले होण्याची शक्यता असते, त्यामुळे बॅक्टेरिया तयार होतात.

* बॅग विकत घेताना पट्ट्याकडेही लक्ष ठेवा. कारण पातळ व कडक पटट्यायांमुळे खांद्यांच्या मांसपेशी दुखावू शकतात. नेहमी रूंद व मऊ पटट्यांच्या बॅग घ्या.

* बॅगेचे वजनदेखील पाहा, कारण काही बॅग आधीच वजनाने जड असतात व त्यात वस्तू ठेवल्या की त्या जास्तच जड होतात.

* हॅण्डबॅग कधीही प्लास्टिक पिशवीत ठेवू नयेत. यामुळे बॅग लवकर खराब होते. यासाठी जुन्या उशीच्या अभ्यांचा वाप करा किंवा सुती पिशवीचा वापर करा.

* जेव्हा बॅगेचा वापर करायचा असेल तेव्हा त्यातील सर्व सामान काढून टाकून टिशू पेपर घालून ठेवावेत म्हणजे बॅगेचा आकार बिघडत नाही व त्यात बॅक्टेरियाची निर्मिती होत नाही.

* बॅगेमध्ये ओलसरपणा राहू देवू नये, यामुळे बॅक्टेरिया उत्पन्न होतो.

कोरोनापासून असे सुरक्षित ठेवा कुटुंब

* गरिमा पंकज

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात पसरत चालला आहे. कोरोनाबाधित आणि मृतांच्या दिवसागणिक वाढत जाणाऱ्या आकडयांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑफीस बंद होत आहेत. शाळा, महाविद्यालयेही बंद झाली आहेत. संपूर्ण कुटुंब घरात कैद झाले आहे. अशावेळी महिलांची जबाबदारी वाढली आहे. त्यांना कुटुंबाच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे लागत आहे.

मुलांची काळजी कशी घ्यावी?

मुलांना विश्वास द्या : मुले अनेकदा वस्तूंना हात लावतात. खाण्याचे पदार्थ इतरांशी शेअर करतात. म्हणजे ते संसर्ग पसरवण्याचे मोठे माध्यम आहेत. अशावेळी कोरोना म्हणजे काय आणि त्यापासून दूर राहणे किती गरजेचे आहे, हे तुम्हाला मुलांना सांगावे लागेल. मुलांसोबत या विषयावर मनमोकळेपणाने बोला. त्यांना आवश्यक ती काळजी घ्यायला सांगा.

कोरोना संसर्गासारख्या महामारीबाबत मुलांशी कशाप्रकारे बोलावे, हे त्या मुलांच्या वयानुसार ठरवावे. लहान मुले म्हणजे सर्वसाधारणपणे ६-७ वर्षांच्या मुलांना या विषयावर बोलायला आवडत नाही. याबाबत सांगितलेले ती लक्षपूर्वक ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांना प्रेमाने जवळ बसवून या आजाराबाबत प्राथमिक माहिती  द्या. कोरेना संसर्गाबाबत सावध करा. मोठया मुलांनाही हात धुणे आणि मास्क लावण्याचे महत्त्व समजावून सांगा. त्यांना सांगा की, काही जणांना कोरोना झाला असेल, पण खबररदारी बाळगल्यास काहीच होणार नाही. असे काय करायला हवे ज्यामुळे कोरोना संसर्ग होणार नाही, याचीही माहिती मुलांना द्या. सोबत कोरोना संसर्गापासून वाचणे आपल्याच हाती आहे, याची जाणीव त्यांना करुन द्या.

तुमच्याकडून मुले शिकतात : लहान मुलांवर आईवडिलांचा मोठा प्रभाव असतो. त्यांच्याकडूनच ती शिकतात. त्यांच्यासारखेच वागायचा प्रयत्न करतात. तुम्ही बाहेर पडताना मास्क घातलात, वेळोवेळी हात धुतले आणि सॅनिटायजरचा वापर केल्यास मुलेही तुमचेच अनुकरण करतील. युवा अवस्थेतील मुलांचे विश्व वेगळे असते. ते जगभरातील माहिती जाणून घेण्यासाठी आईवडिलांवर फारशी अवलंबून नसतात. त्यांना याबाबतची माहिती जास्त करुन मित्रांकडून मिळते. त्यामुळेच सर्वकाही ठीक आहे, असे एखाद्या १४ वर्षांच्या मुलाला सांगितले तर त्याचा त्यावर विश्वास बसणार नाही. कारण तुम्ही जेव्हा असे सांगाल त्यावेळी तुम्हाला काहीच माहिती नाही, असे उत्तर तो तुम्हाला देईल. तुम्ही मुलाशी इतके मनमोकळेपणे वागायला हवे की, मनातील प्रत्येक गोष्ट तो तुमच्याशी शेअर करेल.

सर्वाधिक धोका कोणाला? : पुरुषांच्या तुलनेत महिला आणि मुलांना कोरोनाचा धोका कमी असल्याचे पहायला मिळते. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा आकडा कमी आहे. पण म्हणून खबरदारी घेणे गरजेचे नाही, असा याचा अर्थ होत नाही.

वयाचा विचार केल्यास कोरोना संसर्गामुळे ०.२ टक्के लहान मुले आणि युवकांचा, तर ८० वर्षांहून अधिक वय असलेल्या १५ टक्के लोकांना जीवास मुकावे लागले आहे. वाढत्या वयासोबत आजारी पडण्याचे प्रमाणही वाढते कारण, त्यांच्यातील रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. वय झालेल्या, आधीपासूनच रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या तसेच दम्यासारखे गंभीर आजार असलेल्यांमध्ये कोरोनाचा जास्त संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. म्हणूनच वृद्ध आणि आजारी व्यक्तींची जास्त काळजी घ्या. त्यांना घराबाहेर पाठवू नका.

कोरना संसर्गापासून कसे करावे रक्षण

भेटीगाठी घेणे टाळा : आजारी लोकांना भेटणे टाळा. स्वत: आजारी असाल तर डॉक्टरांकडे जाण्याव्यतिरिक्त इतर कुठेही जाणे टाळा. सर्दी, खोकला झाल्यास रुमालाचा वापर करा. कुटुंबाच्या संपर्कात येणे टाळा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. दरवाजाचे हँडल, स्वीचबोर्ड आदींना सतत हात लावणे टाळा.

घरातील स्वच्छतेकडे लक्ष द्या : घरात ज्या वस्तू दररोज वापरल्या जातात त्या रोज स्वच्छ करा. खुर्ची, जेवणाचे टेबल, विजेची बटणे, दरवाजा इत्यादींचा वापर घरातील सर्वच करतात. म्हणूनच दिवसातून दोनदा त्यांची साफसफाई करा.

हात २० सेकंदांपर्यंत धुवा : पाणी, साबण किंवा हँड वॉशने २० सेकंदांपर्यंत चोळून हात धुवा. जेवणापूर्वी आणि जेवणानंतर, टॉयलेटला जाऊन आल्यानंतर साबणाने हात धुवा. ज्यात ६० टक्के अल्कहोल असेल अशाच सॅनिटायजरचा वापर करा.

मास्कचा वापर : तोंड मास्कने झाकून घ्या. खोकताना किंवा शिंकताना टिश्यू पेपर वापरा व नंतर तो कचऱ्यात फेकून द्या. बाहेर जातानाही मास्कचा वापर करा. जर तुमच्या जवळपास एखादा विषाणू आलाच तरी तोंड आणि नाक झाकलेले असल्यामुळे तो तुम्हाला संक्रमित करू शकणार नाही आणि तुम्ही सुरक्षित रहाल.

डाएट कसा असावा? : कुठलातरी एखादा खाद्यपदार्थ तुम्हाला कोरोनापासून वाचवू शकत नाही. पण पौष्टिक आणि समतोल आहार तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढवू शकतो. यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी तुमचे शरीर मजबूत होईल. आहारात वैविध्य हवे. विविध प्रकारची फळे, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.

फळे आणि पालेभाज्या : रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. संत्री, मोसंबी, आवळा, लाल किंवा पिवळी शिमला मिरची, किवी, पपई, गाजर, लिंबू इत्यादींपासून तुम्हाला अगदी सहजपणे व्हिटॅमिन सी मिळू शकते.

अंडी आणि डाळी : शरीरात झिंक म्हणजे जस्ताची कमतरता असल्यास तुम्ही सहजपणे आजाराचे शिकार होऊ शकता. गहू, बीन्स, मटार, डाळी इत्यादी झिंकचे महत्त्वपूर्ण स्रोत आहेत.

आल्याचा चहा : तुम्हाला सर्दी, खोकला असेल तर आहारात आल्याचा नक्की वापर करा. आल्याची चहा पिणे हे सर्वात उत्तम. आल्यात लोह, जस्त, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते.

खोबरेल तेल : घरात जेवण बनवताना सरसोचे तेल किंवा रिफाईंडऐवजी खोबरेल तेलाचा वापर करणे जास्त उपयुक्त ठरेल. यात लॉरिक अॅसिड, आर कॅप्रिलिक अॅसिड असते, जे तुमच्यातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवून तुमचे विषाणूंपासून संरक्षण करते.

व्हिटॅमिन ए : तुमचे आरोग्य आणि रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन ए खूपच महत्त्वपूर्ण आहे. मासे, अंड्यातील पिवळा बलक, चीज, डाळी आणि मेथी, पालकासारख्या हिरव्या पानांच्या भाज्यांमधून तुम्हाला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन ए मिळू शकेल.

लसूण : यात एलिसीन असते, ज्याच्या सेवनामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दररोज लसणाच्या दोन पाकळया गरम पाण्यासोबत खा किंवा तुम्ही याचे सूप बनवूनही पिऊ शकता. लसूण खाल्लयाने सर्व प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन आणि संसर्गापासून स्वत:चे रक्षण करता येते.

व्हिटॅमिन डी : सूर्यकिरणांपासून नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळते. सुरमई, मासे, अंडी, चीज, मशरममधूनही व्हिटॅमिन डी मिळते.

पाणी : पुरेशा प्रमाणात पाणी प्या. कोमट पाणी प्या. स्वत:ला हायड्रंट ठेवा.

आराम आणि व्यायाम : पुरेशी झोप घ्या. सोबतच सकाळच्या वेळेस फेरफटका मारा. व्यायाम अवश्य  करा. व्यायामामुळे शरीर आतून मजबूत होते आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

मुलीला अवश्य सांगा मासिक पाळीसंबंधी या टीप्स

* प्रतिनिधी

बहुतांश आया मासिक पाळीबाबत मुलीशी मोकळेपणाने बोलत नाहीत. हेच कारण आहे की या दरम्यान मुली हायजिनच्या महत्वाकडे दुर्लक्ष करतात आणि अनेक समस्यांच्या भक्ष्य बनतात.

मासिक पाळीबाबत जागरूकता नसणे याचे मोठे कारण आहे. सादर आहेत काही टीप्स ज्या प्रत्येक आईने आपल्या किशोरवयीन मुलीला द्यायला हव्या. जेणेकरून ती मासिकपाळीदरम्यान येणाऱ्या सगळया समस्यांना तोंड देऊ शकेल.

कपडयाला नाही म्हणा : आजही आपल्या देशात जागरूकता कमी असल्याने मासिक पाळी दरम्यान तरुणी कपडा वापरतात. असे केल्याने त्यांना गंभीर आजार होऊ शकतात. कपडयाचा वापर केल्याने होणाऱ्या आजारांबाबत आपल्या मुलीला जागरूक बनवणे हे प्रत्येक आईचे कर्तव्य आहे. मुलीला सॅनिटरी नॅपकीनचे फायदे सांगा आणि तिला याची माहिती द्या की हे वापरल्यास ती आजारांपासून दूर तर राहीलच, शिवाय या दिवसातही मोकळेपणाने वावरू शकेल.

केव्हा बदलावे पॅड : प्रत्येक आईने आपल्या मुलीला हे नक्कीच सांगावे की साधारणत: दर ६ तासांनी सॅनिटरी नॅपकीन बदलवायला हवे. याशिवाय आपल्या गरजेनुसारसुद्धा सॅनिटरी नॅपकीन बदलायला हवा. जास्त स्त्राव असल्यास तुम्हाला सतत पॅड बदलावे लागते, पण जर स्त्राव कमी असेल तर सतत पॅड बदलायची गरज नसते. तरीही ४-६ तासांनी सॅनिटरी नॅपकीन बदलत राहावे जेणेकरून इन्फेक्शनपासुन सुरक्षित राहू शकू.

गुप्तांगांची नियमित स्वच्छता : मासिक पाळी दरम्यान गुप्तांगांच्या आजूबाजूच्या त्वचेत रक्त गोळा होते, जे संक्रमणाचे कारण बनू शकते. म्हणून गुप्तांगांची नियमित स्वच्छता करण्याचा सल्ला द्या. यामुळे व्हजायनातुन दुर्गंधी येणार नाही.

हे वापरू नका : व्हजायना आपोआप स्वच्छ ठेवण्याची एक नैसर्गीक प्रक्रिया असते, जी चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियाचे संतुलन कायम ठेवते. साबण योनी मार्गात असलेल्या चांगल्या बॅक्टेरियाना नाहीसे करू शकते. म्हणून याचा वापर करू नका, असा सल्ला द्या.

धुण्याची योग्य पद्धत : मुलीला सांगा की गुप्तांगांना स्वच्छ ठेवण्यासाठी योनीकडून पार्श्वभागाच्या दिशेने स्वच्छ करा म्हणजे समोरून मागच्या दिशेने. उलटया दिशेला कधीही करू नका. उलटया दिशेने धुतल्यास पार्श्वभागात असलेले बॅक्टेरिया योनीत जाऊ शकतात आणि संक्रमणाचे कारण बनू शकतात.

सॅनिटरी पॅडची विल्हेवाट : वापरलेले पॅड योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने फेकायाला सांगावे, कारण हे संक्रमणाचे कारण बनू शकतात. पॅडस फ्लश करू नका, कारण यामुळा टॉयलेट ब्लॉक होऊ शकते. नॅपकीन फेकल्यावर हात नीट धुणे आवश्यक आहे.

रॅशेशपासून कसे दूर राहाल : मासिक पाळीत जास्त स्त्राव झाल्यास पॅडसचे रॅशेश येण्याची संभावना खूप वाढते. असे साधारणत: तेव्हा होते जेव्हा पॅड खूप काळ ओला राहतो आणि त्वचेववर घासल्या जातो. म्हणून मुलीला वेळोवेळी पॅड बदलायला सांगा. जर रॅश आलाच तर आंघोळीनंतर आणि झोपताना अँटीसेप्टीक ओइन्टमेन्ट लावा. जर ओइन्टमेन्ट लावूनही रॅश बरा झाला नाही तर तिला डॉक्टरकडे घेऊन जा.

एकाच प्रकारचा सॅनिटरी नॅपकीन वापरा : ज्या किशोर वयीन मुलींमध्ये स्त्राव जास्त होतो, त्या एकाच वेळी २ पॅड्स अथवा एका पॅडसोबत टोपोन वापरू शकतात किंवा कधीकधी सॅनिटरी नॅपकिनसोबत कपडासुद्धा वापरू वापरतात म्हणजे असे केल्याने त्यांना दीर्घ काळ पॅड बदलावे लागत नाही. अशा वेळी मुलीला सांगा की एका वेळी एकाच प्रोडक्ट वापर. जेव्हा एकाच वेळी दोन प्रकारचे प्रॉडक्ट वापरल्या जातात तेव्हा जाहीर आहे की हे बदलता येत नाहीत, ज्यामुळे इन्फेक्शनची संभावना आणखीनच वाढते.

सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छता हाच मूलमंत्र

* मोनिका गुप्ता

बुहानच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना नामक रोगाने आता भारतासोबाबत इतर अनेक देशांमध्ये पाय पसरले आहे. हे इतके भयानक संक्रमण आहे कि हे एका व्यक्तिकडून दुसऱ्या व्यक्तिपर्यंत सहज पोहोचते. कोरोना संक्रमणापासून दूर राहायचे असेल तर सर्वात आवश्यक आहे ते हात चांगले धुणे. तसे पाहता लोक हात धुण्याकडे नेहमी दुर्लक्ष करतात. अनेक लोक तर हात धुणे याचा अर्थ  पाणी आणि साबण वाहू देणे असाच घेतात. म्हणजे बहुतांश लोकांना हात धुण्याची योग्य पद्धतच माहीत नाही. ज्यामुळे लोकांमध्ये संक्रमण आणि निरनिराळे आजार पसरत आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ति वर्षानुवर्षे हे मानत आले आहेत की आजारांपासून दूर राहायचे असेल तर हात धुण्याची प्रक्रिया सर्वात महत्वाची आहे. एका शोधानुसार आपल्या देशातील ४० टक्के लोक जेवणाआधी हात धूत नाहीत. जर आपण हात धुण्याची प्रक्रिया प्रामाणिकपणे पाळली तर आपण अशा अनेक रोगांपासून दूर राहू शकतो. कोणत्याही आजाराशी लढण्याचे हात धुणे हे पहिले हत्यार आहे.

का आवश्यक असते हात धुणे

आपण दिवसभर जे काही काम करतो, त्यात आपल्या हातांची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे हातांवर किटाणू असणे अतिशय सामान्य गोष्ट आहे. जेव्हा केव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी जातो, आपण लिफ्टचा वापर करतो. बटणांना स्पर्श करतो, मेट्रोमध्ये हॅण्डल, ऑफिसमध्ये दरवाजाला स्पर्श करणे, नळाची तोटी, रेलिंग इत्यादींना स्पर्श करत जातो. जर आपण आपले संक्रमित हात न धुता जेवण घेतले, कोणाशी हस्तांदोलन केले, घरात लहान मुलांसोबत खेळलो वा त्यांना काही खाऊ घातले तर हातावर असलेले किटाणू रोगजंतू बनून आपल्या लोकांपर्यंत सहज पोहोचतात.

कोरोनापासून दूर राहण्यासाठी अमेरिकेतील डॉक्टर्सनी ‘डोन्ट टच युअर फेस’ ही  मोहीम चालवली होती. या मोहिमेद्वारे डॉक्टरांना सांगायचे होते की कोविड -१९ पासून वाचण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे आपल्या चेहऱ्याला कमीतकमी हात लावा. जर आपण सतत चेहऱ्याला हात लावण्याची सवय सोडून दिली तर कोरोना व्हायरसचे संक्रमण पसरण्याची शक्यता कमी होते. एका संशोधनातून हे लक्षात आले की माणूस एका तासात जवळपास २३ वेळा आपल्या चेहऱ्याला स्पर्श करतो.

यासाठी जागतिक आरोग्य संघटना व रोग नियंत्रण व निवारण केंद्र सीडीसीने अनेक उपाय जाहीर करत लोकांना कोरोनापासून वाचण्याबाबत जरुरी सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. यात हात धुणे, मास्क घालणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे प्रमुख आहेत. याशिवाय चेहरा, डोळे, नाक, तोंड यांना हात न लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

यावर आयुस्पाईन हॉस्पिटलमधील सिनियर फिजिओथेरपिस्ट डॉ. सत्यम भास्कर यांच्याशी बोलत असता त्यांनी संगितले की हात कसे धुतले पाहिजे आणि किती वेळ धुतले पाहिजेत.

सॅनिटायझरपेक्षा जास्त चांगले आहे की तुम्ही साबणाने हात धुवा. कारण बाजारात जरुरी नाही की अल्कोहोल बेस्डच सॅनिटायझर असतील. लहान मुलं असो वा वयस्कर लोक सर्वानी कमीतकमी २० सेकंद हात धुवायला हवेत, वास्तविक तुम्ही हात धुण्याची योग्य पद्धत अवलंबली तर हात नीट स्वच्छ होतील आणि तुम्हाला २० सेकंड मोजावे लागणार नाहीत.

हात धुण्याच्या योग्य स्टेप्स

हातांना किटाणूंपासून दूर ठेवण्याच्या या ७ स्टेप्सचे अवश्य पालन करा.

स्टेप्स १ : हात धुण्यासाठी जंतूनाशक साबण वापरा. सर्वात आधी हात ओले करा आणि योग्य प्रमाणात साबण वापरा.

स्टेप्स २ : दोन्ही हातांचे तळवे चांगले चोळा.

स्टेप्स ३ : आता हातांना उलटया बाजूने स्वच्छ करा.

स्टेप्स ४ : आपली बोटे दुसऱ्या हाताच्या बोटांना जोडून स्वच्छ करा.

स्टेप्स ५ : आपली नखे चांगली स्वच्छ करा.

स्टेप्स ६ : आपला अंगठा आणि मनगटे चांगली चोळा.

स्टेप्स ७ : आता पाण्याने हात स्वच्छ धुवा.

जर तुम्ही बाहेर असाल जिथे हात धुण्यासाठी तुम्ही साबण अथवा पाणी वापरू शकत नसाल, अशावेळी तुम्ही अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर वापरू शकता. हॅन्ड सॅनिटायझरचा वापर करताना तुम्ही हे निश्चित करायला हवे की त्यात ६० टक्के अल्कोहोल असावे तरच हे तुम्हाला लाभदायक ठरेल.

मुलांना असे शिकवा हात धुणे

लहान मुलांची रोग प्रतिकार शक्ति कमी असते, ज्यामुळे त्यांच्यावर संक्रमण लवकर पसरते. तुम्ही कधी हा विचार केला आहे का की मुलं लवकर लवकर आजारी का पडतात? वास्तविक मुलांचे अस्वच्छ हात त्यांच्या शरीरावर संक्रमण पसरवण्यास जबाबदार असतात. जर मुलाचे हात स्वच्छ नसतील तर त्याच हाताने तो जेवण घेईल, तेच हात डोळे आणि चेहऱ्याला लावेल. मुलाने हात धुणे केव्हा आवश्यक असते याबाबत पालकांना माहिती असायला हवी. हात धुणे किती महत्वाचे आहे हे मुलांना सांगणे अत्यंत आवश्यक आहे. जर मुलाला वेळेत हे शिकवले की कोणती वस्तू खराब आहे आणि अशा वस्तूला हात लावल्यास हात धुणे अत्यावश्यक असते तर मुलं व्हायरल इन्फेक्शन आणि इतर आजारांपासून वाचू शकतात.

सीडीसी च्या रिपोर्टनुसार ५ वर्षापेक्षा कमी वयाची मुलं दरवर्षी डायरिया आणि न्यूमोनियाचे भक्ष्य बनतात. डायरिया हा घाणीमुळे पसरणारा आजार आहे. त्यामुळे अशावेळी घर स्वच्छ ठेवणे व स्वत:ला स्वच्छ ठेवणे अतिशय गरजेचे आहे.

केव्हा मुलांनी हात धुवायला हवे

* वॉशरुम वापरल्यावर.

* शिंकताना, खोकताना व नाकात बोट

घातल्यास.

* खाण्याआधी व नंतर हात धुणे आवश्यक

आहे.

*  खेळल्यावर.

* द्य दुसऱ्याशी हात मिळवल्यास.

* पैशांना हात लावल्यास.

* बूट, चपलांना हात लावल्यास.

* वर्गात इतर कोणाचे साहित्य वापरल्यास.

* कोणत्याही जखमेला हात लावल्यास.

असे शिकवा आपल्या मुलाला हात धुणे

मुलांना हात धुणे शिकवायला आधी तर त्यांना इंग्रजीतील ही ६ अक्षरं एस, यु, एम, ए, एन, के हे पाठ करायला सांगा. आता याचा अर्थ त्यांना सांगा :

एस : एस चा अर्थ अगदी सोपा आहे – आधी हात सरळ बाजूने स्वच्छ करा.

यु : यु चा अर्थ आहे उलटा, आता हात उलटा करून धुवा.

एम : एम चा अर्थ मूठ. दोन्ही हात जोडा आणि त्याची मूठ  तयार करा आणि रगडा.

ए : ए म्हणजे अंगठा. अंगठा स्वच्छ करा.

एन : एन म्हणजे नखं. आता दोन्ही हाताची नखं साफ करा.

के : के म्हणजे कलाइ (मनगट) नखांनंतर मनगट चोळा.

इंग्रजीतील ही सहा अक्षरं तुमच्या मुलाला अगदी सहज हात धुवायला शिकवतील जे ते कधीच विसरणार नाहीत.

आनंदी पीरियड्ससाठी टिप्स

* डॉ. रंजना शर्मा

बहुसंख्य महिलांना आपल्या पीरियड्सबाबत बोलायला आवडत नाही. हेच कारण आहे की यादरम्यान त्या हायजीनच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करतात आणि नवीन समस्यांच्या शिकार बनतात.

मासिक पाळीबाबत जागरूकतेचा अभाव हेदेखील या समस्यांमागील मोठे कारण आहे. पीरियड्सदरम्यान होणाऱ्या समस्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी काही सुचना लक्षात घ्या :

1) नियमित बदल : सर्वसाधारणपणे दर ६ तासांनी सॅनिटरी पॅड बदलायला हवे. तुम्ही टँपॉन वापरत असाल तर दर २ तासांनी ते बदला. याशिवाय तुम्ही आपल्या गरजेनुसारही सॅनिटरी पॅड बदलायला हवे. जसे की जास्त अंगावरून जात असल्यास तुम्हाला सतत पॅड बदलावे लागतात. फ्लो कमी असेल तर सतत बदलण्याची गरज नाही. तरीही दर ४ ते ८ तासांनी पॅड बदला, जेणेकरून स्वत:ला इन्फेक्शनपासून वाचवू शकाल.

2) आपल्या गुप्तांगाला नियमित धुवून साफ करा : पीरियड्सदरम्यान गुप्तांगाच्या आसपासच्या त्वचेजवळ रक्त साचते, ते संसर्गाचे कारण ठरू शकते. म्हणूनच गुप्तांगाला नियमित धुवून साफ करा. यामुळे योनीला दुर्गंधीही येणार नाही. दरवेळी पॅड बदलताना गुप्तांग चांगल्या प्रकारे साफ करा.

3) हायजीन प्रोडक्ट्स वापरू नका : योनस्वत:हूनस्वच्छहोण्याची नैसर्गिक प्रक्रिया असते, जी चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियांना संतुलित ठेवते. साबण योनीतील चांगल्या बॅक्टेरियांना नष्ट करू शकतो, म्हणून त्याचा वापर करू नका. तुम्ही फक्त पाण्याचा वापर करू शकता.

4) धुण्यासाठी योग्य पद्धत वापरा : गुप्तांग स्वच्छ करण्यासाठी योनीपासून गुद्द्वाराकडे साफ करा. म्हणजे पुढून पाठच्या दिशेपर्यंत जा. उलटया दिशेने कधीच धुवू नका. उलटया दिशेने धुतल्यास गुद्द्वारातील बॅक्टेरिया योनीत जाऊन संसर्ग होऊ शकतो.

5) वापरलेले सॅनिटरी प्रोड्क्ट योग्य ठिकाणी फेका : वापरलेले सॅनिटरी प्रोड्क्ट योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणीच फेका, कारण ते संसर्गाचे कारण ठरू शकतात. फेकून देण्यापूर्वी ते गुंडाळा जेणेकरून दुर्गंधी किंवा संसर्ग पसरणार नाही. पॅड किंवा टँपॉन फ्लश करू नका, कारण यामुळे टॉयलेट ब्लॉक होऊ शकतो. नॅपकिन फेकल्यानंतर हात चांगल्याप्रकारे धुवा.

6) पॅडमुळे होणाऱ्या रॅशेसपासून बचाव करा : पीरियड्समध्ये हेवी फ्लोवेळी पॅडमुळे रॅशेस होण्याची शक्यता खूपच वाढते. असे सर्वसाधारपणे तेव्हा होते जेव्हा पॅड जास्तवेळ ओला राहतो आणि त्वचेशी घासला जातो. म्हणून स्वत:ला कोरडे ठेवा. नियमितपणे पॅड बदला. रॅशेस पडल्यास आंघोळीनंतर आणि झोपण्यापूर्वी अॅण्टीसेप्टिक मलम लावा. यामुळे रॅशेस बरे होतील. मलम लावूनही ते बरे न झाल्यास त्वरित डॉक्टरकडे जा.

7) एकावेळी एकाच प्रकारचे सॅनिटरी प्रोडक्ट वापरा : काही महिला ज्यांच्या जास्त अंगावरून जाते त्या एकाचवेळी दोन पॅड्स किंवा एका पॅडसोबतच टँपॉन वापरतात. कधी सॅनिटरी पॅडसोबतच कपडाही वापरतात. त्यामुळे त्यांना दीर्घकाळपर्यंत पॅड बदलण्याची गरज भासत नाही. पण तुम्ही एका वेळी एकच प्रोडक्ट वापरणे आणि ते सतत बदलणे हेच उत्तम आहे. जेव्हा एकाचवेळी दोन प्रोड्क्टचा वापर केला जातो, तेव्हा तुम्ही सतत ते बदलत नाही, यामुळे रॅशेस, संसर्गाची शक्यता वाढते. तुम्ही पॅडसोबत कपडाही वापरत असाल तर संसर्गाची भीती अधिकच वाढते, कारण जुना कपडा अनेकदा हायजिनिक नसतो. पॅड्सच्या वापराबाबत बोलायचे तर ते आरामदायक नसतात आणि रॅशेसचे कारणही ठरू शकतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें