आरोग्य परामर्श

 डॉ. संदीप मेहता, बीएलके सुपरस्पेशालि हॉस्पिटल,नवीदिल्ली

प्रश्न : मी ४७ वर्षांची नोकरदार स्त्री आहे. मी वयाच्या ४२व्या वर्षीच रजोनिवृत्त झाले आहे. पण तेव्हापासून कूस बदलल्यावर मला स्तनांमध्ये वेदना जाणवते. मला कोणत्या प्रकारची तपासणी करायला हवीय?

उत्तर : याला मस्टाल्जिया म्हटलं जातं. स्तनांमध्ये वेदना स्तनरोगाचं कोणतंही लक्षण असू शकतं. तुम्ही एखाद्या तज्ज्ञ कॅन्सर सर्जनकडून तुमच्या स्तनांची तपासणी करून घ्यायला हवीय. जर तुमचे स्तन कडक झाले असून तुमच्या डॉक्टरांना तपासणीदरम्यान एखादी गाठ वगैरे दिसत असेल तर तुम्ही तुमच्या ब्रेस्टचा एमआरआय करणं जास्त योग्य ठरेल.

प्रश्न : मी ३७ वर्षांची गृहिणी आहे. गेल्या सहा वर्षांपासून मी गर्भनिरोधक गोळ्या खात आहे. पण मी असं ऐकलं आहे की अशा गोळ्यांचं सेवन केल्याने कॅन्सर होण्याची शक्यता बळावते. हे सत्य आहे का?

उत्तर : पाच वर्षांपेक्षा जास्त काळापासून गर्भनिरोधक गोळ्या खाणाऱ्या स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त असतो. खरंतर अलीकडे गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये हार्मोन्सचं प्रमाण कमी ठेवलं जातं. त्यामुळे याचा धोका बऱ्यापैकी कमी झाला आहे. पण ज्या स्त्रियांच्या कुटुंबात ब्रेस्ट कॅन्सरचा इतिहास राहिला आहे तिने अशा गोळ्यांचं सेवन करणं टाळलं पाहिजे.

प्रश्न : दोन वर्षांपूर्वी माझ्या बहिणीचं ओव्हरियन कॅन्सरमुळे निधन झालं होतं. तिला २ मुली. एक १६ वर्षांची आणि एक १० वर्षांची आहे. डॉक्टर सांगतात की जर आईला कॅन्सर झाला आहे तर मुलांनाही कॅन्सर होण्याची शक्यता असते. म्हणूनच जर भविष्यात अशा कुठच्या धोक्यापासून बचावयाचं असेल तर आम्ही काय करायला हवं?

उत्तर : मुलींना ओव्हरियन कॅन्सरची भीती (सामान्य लोकसंख्येच्या तुलनेत ३ ते ६ पट) जास्त असते. दोन्ही मुलींसाठी सद्या एकच सल्ला आहे की त्यांनी दरवर्षी सीए १२५ची तपासणी करत राहावं आणि ओव्हरियन कॅन्सरची तपासणी करण्यासाठी ट्रांसवेजिनल अल्ट्रासाउंड करून घ्यावा. त्यांनी बीआरसीए १ आणि बीआरसीए २ सारखी अेनेटिक म्यूटेशन तपासणीही करून घ्यायला हवी. जर याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर अपत्य जन्माला न घालण्याचा निर्णय घेऊन त्यांना याचा धोका कमी करणाऱ्या साल्पिंगो उफोरेक्टोमिया (या सर्जिकल प्रक्रियेत स्त्रीची ओव्हरी आणि फॅलोपियन ट्यूब्स काढून टाकल्या जातात) वरही विचार करायला हवाय. अशाप्रकारच्या तपासणीचा सल्ला सामान्यपणे ३०-३५ वर्षांच्या स्त्रीला दिला जातो. पण तुम्ही तुमच्या बहिणीच्या मुलींचा हा सर्जिकल उपचार त्यांची आई ओव्हरियन कॅन्सरने ग्रस्त झाल्याच्या वयापेक्षा १० वर्षं कमी वयातही करून घेऊ शकता. त्या कमी वयात हा धोका कमी करण्यासाठी आपली ओव्हरी काढू शकतात.

प्रश्न : लहानपणी भाजल्यानंतर कोणाला नंतर कॅन्सर होऊ शकतो का? जर होय, तर यापासून बचावण्याचं पहिलं पाऊल काय असायला हवंय?

उत्तर : भाजल्यामुळे अस्थायी डाग पडतात, ज्यामुळे अशी त्वचा आकसली किंवा ताणली जाते आणि त्याची हालचाल सीमित होऊन जाते. जसं की, टाचा किंवा गुडघ्यांच्या सांध्यामध्ये अनेक वर्षांनी कॅन्सरची जखम बनण्याची शक्यता निर्माण होते. भाजल्यामुळे त्वचेला झालेल्या अपायांवर उपचार करण्यासाठी बचावण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे शक्य तितक्या लवकर स्किन ग्राफ्टिंग किंवा फ्लॅप करणं आहे.

प्रश्न : प्रत्येकाला एचपीव्ही लस टोचून घ्यायला हवीय का? ही लस टोचून घेतल्याचा काही धोकाही आहे का?

उत्तर : एचपीव्ही पुरुष आणि स्त्रियांमध्ये आनुवंशिक गाठीचं मुख्य कारण असतं. हे स्त्रियांच्या गर्भाशय, गुप्तांग आणि योनिमार्गाच्या कॅन्सरचंही कारण ठरतं. पुरुषांना लिंग कॅन्सर आणि स्त्री व पुरुष दोघांना यामुळे गुदद्वार आणि गळ्याचाही कॅन्सर होऊ शकतो. यापैकी अनेक रोगांपासून एचपीव्ही लस घेऊन बचावलं जाऊ शकतं.

एचपीव्ही लस ११-१२ वर्षांच्या मुलामुलींना घेण्याचा सल्ला दिला जातो. किशोरावस्थेच्या आधीचं वय लस घेण्यासाठी सर्वात योग्य असतं. कारण पहिल्यांदा यौन संपर्कात येणं आणि वायरसच्या पहिल्या संपर्कात येण्याच्या खूप आधी ही लस फारच प्रभावीपणे काम करते. किशोरावस्था ओलांडणारे आणि   तारुण्यावस्थेत पोहोचणाऱ्यांनाही एचपीव्ही लसीचा फायदा होऊ शकतो. मग ते सेक्सुअलरीत्या सक्रिय असले तरी ही लस त्यांना एचपीव्हीच्या सर्वात सामान्य टाइपपासूनही वाचवेल.

एचपीव्हीचे जवळजवळ ४० वेगवेगळे प्रकार आहेत. मुली वयाच्या सव्वीसाव्या वर्षांपर्यंत ही लस घेऊ शकतात तर मुलं वयाच्या एकविसाव्या वर्षांपर्यंत ही लस घेऊ शकतात.

गृहशोभिकेचा सल्ला

मी २१ वर्षांची तरुणी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मी आपल्या प्रियकरासमवेत त्याच्या फ्लॅटवर जात असे. आमच्यात शारीरिक संबंध बनले. या काळात बॉयफ्रेंडने आवश्यक खबरदारी घेतली नाही, उलट माझ्?या वारंवार आग्रह केल्यानंतर तो माझ्यावर रागावयाचा. मला त्यास गमवायचे नव्हते म्हणून मी विवश होते. परंतु आता मला भीती वाटत आहे की मी यामुळे गरोदर तर होणार नाही ना. मी पुढे काय करावे?

संबंध बनवल्यानंतर जर मासिक पाळी आली नसेल तर तुम्ही घाबरायला हवं. मासिक पाळी आली नसल्यास आपण गर्भधारणा चाचणी किट वापरुन परीक्षण करू शकता. आपण स्वत:देखील घरीच हे परीक्षण करू शकता. किटमध्ये तपासणी केल्यावर दोन लाल रेषा दिसल्या तर तुम्ही तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर तुमचे आणि तुमच्या प्रियकरामधील नाते गहन असेल तर लवकरच तुम्हा दोघांनी लग्न केले पाहिजे. जर तुमचा प्रियकर लग्नासाठी तयार नसेल तर मग त्याचे नाही म्हणण्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्याकडून स्वत: भावनिकरित्या ब्लॅकमेल होणे टाळा. आपण आपल्या इच्छेने संबंध बनवत असल्यास प्रोटेक्शन वापरा.

मी २४ वर्षांची स्त्री आहे. माझे लग्न ३ महिन्यापूर्वी झाले आहे, लग्नापूर्वी माझे दुसऱ्यावर प्रेम होते. कुटुंबातील सदस्यांच्या दबावाखाली माझे लग्न झाले. माझा नवरा खुल्या विचारांचा आहे. त्यांनी आमचे संबंध समजून घेण्यासाठी मला पूर्ण स्वातंत्र्य दिले. या ३ महिन्यांत आमच्यात कोणतेही संबंध नव्हते, परंतु आता मला वाटते की आमच्यातील अंतर संपुष्टात यावे. कृपया योग्य सल्ला द्या?

हे नातं समजून घेण्यासाठी तुमच्या पतीने तुम्हाला पूर्ण वेळ दिला ही एक उत्तम गोष्ट आहे. आता आपणास समजले आहे की आपले सध्याचे कुटुंब आपले पतीच आहेत. त्यांच्यापासून अंतर मिटविण्यासाठी हे उत्तम होईल की आपण आपल्या पतीबरोबर फिरायला जा, त्यांना पुरेसा वेळ द्या. जर तसे झाले नाही तर आपल्या पतीबरोबर रोमँटिक होण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यासाठी आश्चर्यकारक योजना बनवा. रात्री आपल्या बेडरूममध्ये फुले व मेणबत्त्या सजवा. स्वत:ला हॉट आणि मादक बनवा. यादरम्यान असे कपडे घाला, जे आपले सौंदर्य वाढवतील. तर मग पती तुमच्या प्रेमात कुठल्या सीमेपर्यंत स्वत:ला हरवतो ते पहा.

मी २४ वर्षांची तरुणी आहे. लग्नाआधी माझे १-२ बॉयफ्रेंड्सबरोबर लैंगिक संबंध होते. त्यावेळी माझी २ वेळा गर्भधारणाही झाली. मग मी औषध खाऊन गर्भपात करून घेतला. आता माझ्या लग्नाला ३ वर्ष झाली आहेत, पण अद्याप मी गर्भधारणा करू शकले नाही. यामागे पूर्वी औषधे घेण्याचे काही कारण आहे का? कृपया मला मार्गदर्शन करा की मी भविष्यात आई होईन की नाही?

भुतकाळ विसरा. पूर्वी जे घडले त्याच्या भीतीतून स्वत:ला मुक्त करा. योग्य आहार घ्या आणि व्यायाम करा व डॉक्टरांचा सल्ला घेऊन गरोदरपणास उपयुक्त औषधे घ्या. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल.

मी २० वर्षांची मुलगी आहे. मला एक मुलगा आवडतो, तोही माझ्यावर खूप प्रेम करतो. त्याला माझ्याशी लग्न करायचं आहे पण मला आता माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि मग लग्न करायचं आहे. तो लग्नासाठी खूप दबाव आणत आहे आणि मी नकार दिल्यावर त्याने माझ्याशी बोलणेही थांबवले आहे. मी काय करू?

तुम्ही एकदम बरोबर आहात. आजकाल मुलींनी सर्वप्रथम त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी आपल्या प्रियकराला समजावण्याचा प्रयत्न करा. जर तो सहमत नसेल तर हीच वेळ आहे आपण शिकण्याची, म्हणजे करिअर करण्याची. तुमचे करिअर बॉयफ्रेंडपेक्षा महत्त्वाची आहे. आता जर तुम्ही फक्त आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले तर ते अधिक चांगले होईल.

माझा प्रियकर खूप संशयी आहे. प्रत्येक क्षणी माझ्यावर लक्ष ठेवतो आणि माझे कोणत्याही मुलाशी बोलणे त्यास आवडत नाही. खरेतर मी त्याला सर्व काही सांगते. सुरुवातीला मला असे वाटायचे की तो माझी काळजी घेतो, पण आता मला या नात्याने गुदमरल्यासारखे वाटते. मला नेहमी प्रश्न विचारणे, यामुळे मी कळसूत्री बाहुलीसारखे बनले आहे. जेव्हा मी ब्रेकअपबद्दल बोलते तेव्हा तो मला भावनिक ब्लॅकमेल करतो. मला हे सर्व संपवायचे आहे. मी काय करू?

ज्या व्यक्तिबद्दल आपणास आतापासूनच माहीत आहे की संशय घेणे त्याच्या स्वभावामध्ये आहे, तो आपल्याला गुलाम बनवू इच्छित आहे आणि आपल्या स्वातंत्र्याच्या मार्गामध्ये खूप मोठा अडथळा ठरू शकतो, तर अशा व्यक्तिबरोबर आयुष्यात खूप लांबचा प्रवास केला जाऊ शकत नाही.

जेव्हा आपण या नात्यात शांती आणि आनंद मिळवू शकत नसाल तर मग सारे आयुष्य त्याच्याबरोबर राहून तडफडण्यापेक्षा चांगले हे आहे की आपण आताच त्याच्यापासून विभक्त होण्याचे ठरवायला हवे.

त्याच्या भावनिक गोष्टी आपल्याला असा निर्णय घेण्यास थांबवतील, परंतु आपण आपल्या निर्णयावर ठाम रहायला हवे. हळूहळू तोदेखील समजेल आणि योग्य अंतर ठेवेल. जर तरीही तो सहमत नसेल तर संपूर्ण गोष्ट आपल्या कुटुंबातील सदस्यांना सांगा.

आरोग्य परामर्श

* रिता बक्षी, स्त्रीरोग तज्ज्ञ, इंटरनॅशनल फर्टिलिटी सेंटर

प्रश्न : मी ५३ वर्षीय महिला आहे. माझा मेनोपॉज अजून आला नाही आहे. मला माहीत करून घ्यायचे आहे की शरीर या बदलाकडे वाटचाल करत आहे का?

उत्तर : मेनापॉजचे सरासरी वय ४५ ते ५५ वर्ष असते, म्हणून शक्यता आहे की तुमचीसुद्धा या बदलाकडे वाटचाल होत असावी. असे आवश्यक नाही की सगळयाच महिलांचा मेनापॉज या वयात यायला हवा. अनेक अशी कारणं आहेत जी याला प्रभावित करतात. जसे ताण, दैनंदिन जीवनशैली, योग्य आहार इत्यादी. जर तुम्हाला काही लक्षणं जसे योनीमार्गाचा शुष्कपणा, त्वचा कोमेजणे, पोटावर सूज, थकवा आणि मूड स्विंग अनेकदा जाणवत असेल तर, शक्यता आहे की तुमच्या हार्मोन्समध्ये बदल होत आहे. असे होत असेल तर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या आणि एखाद्या स्त्री रोगतज्ज्ञाला भेटा.

प्रश्न : मी ४८ वर्षांची महिला आहे. मी कामेच्छा प्रबळ होण्यासाठी सप्लीमेंट घेऊ शकते का? ४-५ वर्षांपूर्वी आंशिक हिस्टे्रक्टॉमी झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून मला माझ्यात मेनोपॉजची लक्षणं जाणवत आहेत. मला असे वाटते की सर्वात स्पष्ट लक्षण सेक्स ड्राइव्ह कमी होणे हे आहे. सांगा मी काय करू?

उत्तर : लिबीडो म्हणजे कामेच्छा कमी होणे, मेनोपॉजदरम्यान अत्यंत सामान्य असते आणि यात अनेक गोष्टी आपले योगदान देत असतात. मेनोपॉजच्या काळात एस्ट्रोजन हार्मोन्स कमी होणे हे प्रमुख कारणांपैकी एक आहे. हार्मोनल चेंज शरीरावर मोठा ताण आणतो, म्हणून ऊर्जेचा स्तर कमी होतो. एस्ट्रोजनचा स्तर कमी होणे आपल्या मन:स्थितीला प्रभावित करु शकते. यासाठी जडीबुटी, मॅका आणि ब्लॅक रास्पबेरीचे सेवन लाभकारक होऊ शकते.

प्रश्न : मी ४० वर्षीय महिला आहे आणि माझा मेनोपॉज काळ सुरु झाला आहे. लवकर मेनोपॉज आल्याने माझ्या पोटावर खूप ब्लॉटिंग होत आहे. मी काय करू?

उत्तर : मेनोपॉजमध्ये सूज, ब्लॉटिंग अगदी सामान्य गोष्ट आहे. आणि हा त्रास इतर अनेक कारणांमुळे होऊ शकतो. एस्ट्रोजन हार्मोनचा खालावता स्तर, पचनाला प्रभावित करू शकतो, ज्यामुळे सर्व काही मंदगतीत चालते. यामुळे सूज येते. खालावता एस्ट्रोजनचा स्तर कार्बोहायड्रेटच्या पचनावरसुद्धा परिणाम करू शकतो, ज्यामुळे स्टार्च आणि शुगरचे पचन होणे आणखी कठीण जाते व यामुळे अनेकदा थकवासुद्धा जाणवू शकतो.

रोज नियमित चालणे तुमच्यासाठी सहाय्यक ठरेल. यामुळे तुमची पचनशक्ती बळकट होईल. याशिवाय खोल श्वास घ्या आणि शरीराला टोन करा. पास्ता, केक, बिस्कीट आणि पांढरे तांदूळ खाणे टाळा. जर दीर्घ काळ हे दुखणे बरे झाले नाही तर एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटा.

प्रश्न : माझा मेनोपॉज सुरु झाला आहे. मी फॅमिली प्लॅनिंगबाबत सतर्क असायला हवे का?

उत्तर : तुमचा मेनापॉज आताच सुरु झाला आहे. त्यामुळे शक्यता आहे की १ वर्षांपासून तुमची मासिक पाळी आली नसेल. अशावेळी जेव्हा महिलेची वर्षभर मासिक पाळी येत नाही, तेव्हा त्यांनी फॅमिली प्लॅनिंग म्हणजे कंडोम वगैरेचा वापर करायला हवा. मेनोपॉजनंतरसुद्धा स्त्रियांमध्ये लैंगिक संक्रमणाची जोखीम कमी करण्यासाठी कंडोम इत्यादीचा वापर करत रहायला हवे.

प्रश्न : तीन महिन्यांपासून माझी मासिक पाळी आली नाही आहे. आता एकदम एक आठवडयापासून ब्लीडींग होते आहे. हे बरोबर आहे की चूक आणि अशा परिस्थिती मी काय करायला हवे?

उत्तर : अनेक महिलांमध्ये कितीतरी महीने एवढेच नाहीतर वर्षभरसुद्धा मासिक पाळी येत नाही आणि नंतर परत सुरु होते. हा बदल तेव्हाच होतो जेव्हा हार्मोन, ताण, अती व्यायाम, आहारात बदल होतो. अशा परिस्थितिचा सामना करण्यासाठी तुम्ही थोडया दिवसांसाठी आयर्न टॉनिकचा आधार घ्या. जर तरीही या समस्येतून सुटका झाली नाही तर लवकरात लवकर एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञाला भेटा.

प्रश्न : मेनोपॉजच्या काळात मी कसा आहार घ्यायला हवा? मी खूप ठिकाणी याबाबत वाचले आहे, पण अजूनपर्यंत एखाद्या योग्य आहारापर्यंत पोहोचले नाही. कृपया सांगा की या परिवर्तनादरम्यान कसा आहार घ्यायला हवा?

उत्तर : मेनोपॉज संपूर्ण शरीरावर फार मोठा परिणाम करत असतो. म्हणून जितकी जास्त तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्याल तेवढे उत्तम. ताजी फळं, ब्राऊन राईस, मोड आलेली कडधान्य असलेला आहार आपल्या जेवणात जास्त समाविष्ट करा. गव्हाच्या पिठाचे सेवन कमी करा, कारण काही महिलांमध्ये गव्हाचे पचन करण्याची प्रक्रिया मंदावते आणि वजन वाढू लागते. आपल्या आहारात जास्त प्रथिने आणि जर तुम्ही शाकाहारी नसाल तर मांस आणि मासेसुद्धा खाऊ शकता. जर शाकाहारी असाल तर दररोज प्रोटीन शेक पिऊ शकता. पण हे निश्चित करा की यात साखर कमी वा नसल्यातच जमा असावी.

प्रश्न : मी ५७ वर्षाची आहे. मेनोपॉजमुळे माझ्या चेहऱ्यावर खूप केस उगवत आहेत. मला सांगा की मी काय करायला हवे?

उत्तर : मेनोपॉजचे अनेक साईड इफेक्ट्स असतात. नकोसे केस उगवणे यापैकी एक आहे. बॉटनिकल सप्लिमेंट्स मेनोपॉजच्या भक्ष्य असलेल्या महिलांमध्ये एस्ट्रोजनचे प्रमाण नियंत्रित करते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें