‘कशा असतात बायका’ या लघुपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

* सोमा घोष

मुंबई – भावा बहिणीच्या नात्यातले, नाजूक पदर उलगडणारी, एकमेकांना समजून घेत, एकमेकांच्या पाठीशी समर्थपणे उभी राहणारी ही नव्या जमान्यातील भावा बहिणीची जोडी. आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रिची सर्व पातळ्यांवर लढण्याची आणि नाती जपण्याची सक्षमता दाखविणारी एक छोटीशी गोष्ट म्हणजे ‘कशा असतात ह्या बायका’. नुकताच हा लघुपट सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. या लघुपटास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: महिलावर्गाची लघुपटास पसंती मिळत आहे.

भावा-बहिणीच्या नात्याला अधोरेखित करणाऱ्या या लघुपटात अभिनेत्री तेजश्री प्रधान, अभिनेता अभिजीत खांडकेकर यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र आली आहे. कोटा फॅक्टरी फेम अभिनेता मयुर मोरेनेसुद्धा या भावस्पर्शी लघुपटाद्वारे मराठीत पदार्पण केले आहे. या तिघांच्या अभिनयाची सध्या चर्चा सुरु आहे.

या लघुपटामध्ये एक महत्वाची बाब आहे,  ती अत्यंत तरल, हलकाफुलका आणि हळव्या पद्धतीने एक महत्त्वाचा संदेश देते. अप्रत्यक्षपणे, ही शॉर्ट्फिल्म नवीन पिढीच्या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करते. जरी भाऊबीज ह्या थीमवर हा लघुपट असला तरी ही कथा केवळ बहिणीबद्दल नाही. ती आपल्या समाजातील बहुतांश महिलांची भावना व्यक्त करते. तेजश्री, अभिजीत आणि मयूरची जुगलबंदी पाहणं ही एक मेजवानी आहे.

http://

पुरुषांचा ब्रॅंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ’कॉटन किंग’ यांनी स्त्रियांच्या सन्मानार्थ या लघुपटाची निर्मिती केली आहे. महिलांचं भावविश्व खूप वेगळं असतं. माया, ममता, त्याग, विश्वास, नि:स्वार्थ प्रेम, समर्पित भावना हे सारे गुण स्त्रियांच्या ठायी दिसतात. आपल्या परिवारावर या गुणांची त्या मनसोक्त उधळण करतात. स्त्रियांच्या या भावविश्वाचे हळूवार पदर सदर लघुपटाद्वारे उलगड्ण्य़ात आले आहे.

‘कशा असतात ह्या बायका’ हा लघुपट सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम वर पाहायला मिळेल. अदभूत क्रिएटीव्हज निर्मित हा लघुपट दिग्दर्शित केला आहे वैभव पंडित यांनी आणि लिहिला आहे मोनिका धारणकर यांनी.

दिग्दर्शक वैभव पंडित म्हणतात, ”भाऊबीजेच्या निमित्ताने शॉर्ट्फिल्म बनवण्य़ासाठी कॉटनकिंगकडून असा ब्रिफ मिळणे विलक्षण होते. उत्तम चर्चा, विचारमंथन आणि अनेकवेळा लिखाण केल्यानंतर आम्ही कथेची योग्य नस पकडू शकलो. कॉटनकिंगने आम्हाला जी मोकळीक दिली, जो पाठिंबा दिला त्यासाठी आम्ही आभारी आहोत.’’

”आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या स्त्रिया या विविध पातळीवर विविध भूमिका सक्षमपणॆ बजावत असताना त्यांची तारांबळ उडते आणि तरीही घरातील पुरुष मात्र त्यांना गृहीत धरत असतात. हा लघुपट निव्वळ एक कलाकृती नसून प्रत्येक महिलेच्या कर्तृत्वाला मानवंदना देणारी कलाकृती आहे,” असे लघुपटाचे प्रस्तुतकर्ता कॉटन किंगचे संचालक कौशिक मराठे यांनी सांगितले.

चला, थोडे आणखी समजून घेऊया ’कशा असतात ह्या बायका’!

लघुपट पाहण्यासाठी लिंक – https://www.youtube.com/watch?v=2zW1z081xgQ&t=199s

रोहिणी निनावे यांची ‘चंदेरी लेखणी’

* सोमा घोष

  • प्रतिभावंत लेखणीची पंचविशी.
  • मालिकांमध्ये नायिका आणि खलनायिका व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री “चंदेरी लेखणी” च्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर.
  • मराठी मालिकांची सुपरस्टार लेखिका रोहिणी निनावे.

मुंबई – मराठी आणि हिंदी मालिकांच्या सुप्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे यांच्या लेखन प्रवासास नुकतीच पंचवीस वर्षॆं पूर्ण झाली. त्यानिमित्ताने स्नेह भेटीचा कार्यक्रम “चंदेरी लेखणी “कोहिनूर कॉन्टिनेंटल, अंधेरी येथे आयोजित केला गेला होता. प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक महेश कोठारे, ख्यातनाम संगीतकार अशोक पत्की यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा रंगला. त्यांच्या या प्रवासाची साक्षीदार असलेली मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज  मंडळी गायक, अभिनेते, अभिनेत्री, निर्माते, दिगदर्शक आवर्जून “चंदेरी लेखणी” या कार्यक्रमाला उपस्थित होते. गायिका जान्हवी प्रभू अरोरा यांनी रोहिणी निनावे यांनी  लिहिलेल्या मालिकांच्या गाजलेल्या शीर्षक गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. निवेदिका उत्तरा मोने यांनी निवेदनाची सर्व धुरा सांभाळत त्यांची मुलाखत घेतली आणि बऱ्याच गोष्टी नव्याने उलगडत गेल्या. रोहिणी निनावे म्हणाल्या की पंचवीस वर्ष कशी निघून गेली ते कळलंच नाही. मी कृतार्थ आहे की माझ्या हातून काही चांगलं लिहिल्या गेलं. मला पदोपदी चांगली माणसं भेटत गेली. हे लिहिणे कधीच थांबणार नाही, मी शेवटच्या श्वासापर्यंत लिहीत राहीन !

 

मराठी भाषेतील पहिली दैनंदिन मालिका दामिनी लेखिका रोहिणी निनावे यांनी लिहिली. दामिनीच्या अभूतपूर्व यशानंतर आपल्या पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीत दामिनी, अवंतिका, अवघाचि संसार, माझ्या नवऱ्याची बायको, अग्गं बाई सासूबाई, मुलगी झाली हो, अजूनही बरसात आहे तसंच हिंदी मधील कुसुम, संजीवनी, इस प्यार को मै क्या नाम दूं, दिल से दिया वचन, प्यार का दर्द  है, यहाँ मैं घर घर खेली यांसारख्या ७२ मालिकांच्या तब्बल १२ हजार पेक्षा जास्त भागांचे त्यांनी लिखाण केले आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश मालिकांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले. यातील अनेक कलाकार त्यांच्या व्यक्तिरेखेच्या नावावरुनच आज देखील ओळखले जातात. ’चंदेरी लेखणी’ या कार्यक्रमाला उपस्थित सर्व कलाकारांनी रोहिणी निनावे यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

मोनालिसा बागल आणि विठ्ठल काळे या नव्या जोडीमुळे ‘जीव झाला बाजिंद’

* सोमा घोष

टेलिव्हिजनवर आणि सिनेमांत झळकणारी सुंदर, निरागस आणि कमाल अभिनय करणारी अभिनेत्री मोनालिसा बागल प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे म्युझिकल भेट ज्यामुळे सर्वजण म्हणणार ‘जीव झाला बाजिंद’…

आतापर्यंत मोनालिसाने वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका साकारल्या आहेत, त्यामुळे तिच्या अभिनयातला वेगळेपणा जाणवला आणि तिची मेहनत प्रेक्षकांना दिसली आणि म्हणूनच प्रेक्षक तिच्यावर जीव लावतात. आता पुन्हा एकदा एका वेगळ्या गाण्यातून ती प्रेक्षकांसमोर आली आहे. नेहमी पेक्षा वेगळ्या धाटणीचं, गावरान बाज असलेल्या ‘जीव झाला बाजिंद’ या गोड आणि नव्या गाण्यात मोनालिसा बागल दिसणार आहे. गावाकडची प्रेम कथा सांगणाऱ्या या गाण्यात मोनालिसा सोबत अभिनेते विठ्ठल काळे झळकणार आहेत. हे गाणं एक वेगळा अनुभव नक्कीच देऊन जाईल पण या गाण्याच्या निमित्ताने मराठी मनोरंजनसृष्टीत एक नवीन जोडी दिसणार आहे. विठ्ठल काळे आणि मोनालिसा बागल या दोघांची गावातली केमिस्ट्री नक्कीच सर्वांच्या मनात घर करेल असा विश्वास गाण्याचे दिग्दर्शक शुभम गोणेकर यांनी व्यक्त केला आहे. ८ ऑक्टोबरपासून म्हणजेच आजपासून हे गाणं प्रदर्शित झाले आहे.

या गाण्याचे शब्द बारामतीच्या निलेश धुमाळ यांनी लिहिलेले असून मयूर सुकाळे यांनी गायले आहे. तर संगीत संकेत शिर्के यांनी दिले आहे आणि या गाण्याचे संगीत संयोजन अवी लोहार यांनी केले आहे.

एकूणच गावाकडचे वातावरण, दोन कलाकारांमधील केमिस्ट्री, गाणं, आवाज-संगीत आणि शब्द या सगळयाने तुम्हा सर्वांचा जीव बाजिंद होणार आहे हे नक्की… नक्की पाहा ‘जीव झाला बाजिंद’ हे गाणं ‘मराठी Originals’ या यूट्यूब चॅनेलवर…

स्वरदा ठिगळे साकारणार ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’!

* सोमा घोष

सोनी मराठीवरील आगामी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेचा टिझर गेले काही आठवडे चर्चेचा विषय ठरला असून या मालिकेतली मध्यवर्ती भूमिका कोण साकारणार ही उत्सुकता शिगेला पोहोचली होती. यासंदर्भात सोशल मिडियावर विविध अभिनेत्रींच्या नावांची चर्चा सुरू होती. डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स या मालिकेची निर्मिती करत असून आतापर्यंत स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या मालिका या निर्मितीसंस्थेने प्रेक्षकांना दिल्या आहेत.

‘जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राहील आणि त्या औरंग्याची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल!’ हे ताराराणींचे जाज्वल्य निष्ठा आणि करारीपणा व्यक्त करणारे स्वराज्याबद्दलचे शब्द आणि थेट युद्धभूमीवर मोगलांना सळो की पळो करून सोडणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व साकारणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. त्यामुळेच या भूमिकेसाठी अत्यंत कठीण अश्या ऑडिशन्स घेण्यात आल्या. राज्यभरातून तब्बल चारशे ऑडिशन्समधून, ज्यात अनेक नामवंत ते नवोदित अभिनेत्री आवर्जून सहभागी झाल्या, स्वरदा ठिगळे ह्या अभिनयसंपन्न अभिनेत्रीची निवड ताराराणींची मध्यवर्ती भूमिका साकारण्यासाठी करण्यात आली.

मराठी मनोरंजनक्षेत्रात आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवणारी स्वरदा, अभिनयाबरोबरच घोडेस्वारी आणि तलवारबाजीमध्ये निपुण असून या ऐतिहासिक मालिकेच्या निमित्ताने तिने पुन्हा एकदा कसून सरावाला सुरुवात केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करणार्या अपरिचित जाज्वल्य इतिहासाचे पर्व ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत उलगडणार आहे. येत्या १५ नोव्हेंबरपासून हा इतिहास सोनी मराठी वाहिनीवर उलगडणार आहे

अजय-अतुल करणार पहिल्या ‘Indian Idol – मराठी’ या कार्यक्रमाचे परीक्षण

* सोमा घोष

कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘Indian Idol – मराठी’ ही सुवर्णसंधी ठरणार आहे. या इतक्या दर्जेदार कार्यक्रमाचे परीक्षणही संगीत सृष्टीतील दिग्गज जोडी अजय आणि अतुल करणार आहेत. पुण्यात नारायण पेठ येथे भित्तिचित्राद्वारे परीक्षकांची घोषणा करण्यात आली या वेळी पुण्याचे महापौर श्री. मुरलीधर मोहोळ, सोनी मराठी वाहिनीचे बिजनेस हेड श्री. अजय भाळवणकर, क्रिएटिव्ह डिरेक्टर श्री. अमित फाळके आणि फ्रीमेन्टल निर्मिती संस्थेचे केशव कौल उपस्थित होते.

आपल्या संगीताचं गारुड या जोडीनं महाराष्ट्राच्याच नाही तर अवघ्या देशाच्या मनावर घातलं आहे. या जोडीनी आपल्या सांगीतिक प्रवासाला पुण्यातून सुरुवात केली आणि पुण्यात या भित्तचित्राद्वारे त्या दोघांचं नाव ‘Indian Idol – मराठी’ या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून घोषित करण्यात आलं. मराठी मनोरंजन विश्वात पहिल्यांदाच आशा प्रकारे परीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. पुणे शहरात या भित्तिचित्राची सगळीकडे चर्चा आहे. शहराच्या मधोमध असलेलं हे चित्रं पुणे शहरवासीयांचं लक्ष वेधून घेतंय. निखिल सतिश खैरनार या कलाकारानी हे भित्तिचित्र काढलं आहे.

‘अजय-अतुल’ या जोडीनी आत्तापर्यंत उत्तम आणि दर्जेदार कलाकृती  दिल्या आहेत त्याचप्रमाणे इंडियन आयडल या मंचानंही संगीतसृष्टीला अनेक नामवंत आणि गुणी कलाकार दिले आहेत. हा मंच आता सोनी मराठी वाहिनीनी मराठीमध्ये आणला आहे. या एवढ्या मोठ्या मंचाला ‘अजय-अतुल’ हे परीक्षक म्हणून मिळाले आहेत. फ्रीमेन्टल या निर्मिती संस्थेनी ‘इंडियन आयडल – मराठी’ या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. ‘इंडियन आयडल – मराठी’ या कार्यक्रमासाठी ऑनलाईन ऑडिशन्स सोनी लिव्हवर सुरू झाल्या आहेत आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.

‘Indian Idol – मराठी’ लवकरच पाहा, सोनी मराठी वाहिनीवर!

‘जिंदगानी’ चित्रपटाद्वारे नवोदित अभिनेत्री वैष्णवी शिंदेचे चित्रपटसृष्टीत पदार्पण !

* सोमा घोष

नर्मदा सिनेव्हीजन्स निर्मित आणि विनायक भिकाजीराव साळवे दिग्दर्शित ‘जिंदगानी’ चित्रपटाद्वारे वैष्णवी शिंदे हिचे चित्रपटसृष्टीत पदार्पण होत आहे. या चित्रपटात अभिनेते शशांक शेंडे आणि अभिनेते विनायक साळवे यांसमवेत वैष्णवी प्रमुख भूमिकेत आढळून येणार आहे.

‘जिंदगानी’ ह्या वैष्णवीच्या पहिल्याच चित्रपटात काम करतानाच्या तिच्या अनुभवाबद्दल सांगताना वैष्णवी म्हणते की, चित्रीकरणाची संपूर्ण प्रोसेस माझ्यासाठी खूपच नवीन होती. त्यामुळे ‘जिंदगानी’ चित्रपटात काम करायची संधी मला मिळतेय हे कळल्यावर मला खूप आनंद झाला. चित्रीकरणादरम्यान अनेक गोष्टी मला शिकता आल्या. शशांक शेंडेंसारख्या दिग्गज कलाकारांबरोंबर काम करण्याचे अविस्मरणीय क्षण गाठीशी बांधता आले.

अभिनेते शशांक शेंडेंबरोबर काम करतानाच्या तिच्या अनुभवाबद्दल सांगताना वैष्णवी म्हणते की, हा माझा पहिलाच चित्रपट असल्यामुळे आणि शशांक सरांइतके दिग्गज कलाकार समोर असल्यामुळे सुरुवातीला मला खूप दडपण आलं होत. परंतु हे जेव्हा शशांक सरांना कळलं तेव्हा त्यांनी मला खूप छानप्रकारे सर्व गोष्टी समजावून सांगत तेथील संपूर्ण वातावरण एकदम हसतं-खेळतं केलं त्यामुळे शूटिंग करायला खूप मजा आली.

लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेली वैष्णवी ‘जिंदगानी’ चित्रपटात अभिनय करण्याच्या मिळालेल्या संधींसंदर्भात सांगते की, मी शाळा आणि कॉलेजमध्ये नाटकात आणि वार्षिक मोहोत्सवात दरवर्षी न चुकता भाग घेत असे. त्याचबरोबर एखाद्या चित्रपटातील पात्र मला आवडलं तर घरी येऊन तसंच तयार होऊन फोटो काढायला मला आवडतं. माझ्या घरी माझे वेगवेगळ्या पात्रांच्या वेशभूषेतील फोटोजदेखील लावलेले आहेत.

एकदा दिग्दर्शक विनायक भिकाजीराव साळवे सहज एका कामानिमित्त घरी आले असता त्यांनी माझे घरी लावलेले फोटोज पाहून माझ्यातील अभिनय कला जाणली आणि मला ‘जिंदगानी’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली…

नर्मदा सिनेव्हीजन्स निर्मित आणि विनायक भिकाजीराव साळवे दिग्दर्शित ‘जिंदगानी’ हा बदलत्या काळानुसार माणसाच्या बदलत्या जीवनशैलीची जीवनगाथा सांगणारा चित्रपट लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

‘मी टेनिसपटू आहे, चित्रपट स्टार नाही’ – महेश भूपती

* प्रतिनिधी

दुहेरीचा जागतिक क्रमवारीतील नंबर वन टेनिसपटू महेश भूपती याच्याशी कोणीही अपरिचित नाही. त्याने टेनिसपटू लिएंडर पेस सोबत मिळून 1997 साली भारतासाठी प्रथमच यूएस ओपन दुहेरीचे विजेतेपद पटकावले. या दोघांची जोडी 1952 नंतर 1991 मध्ये प्रथमच विजयी जोडी बनली. यानंतर दोघांनी मिळून तीन दुहेरीचे विजेतेपद पटकावले. त्यांच्या जोडीला जागतिक क्रमवारीत पहिला भारतीय संघ होण्याचा मान होता, पण काही कारणांमुळे त्यांनी एकत्र खेळणे बंद केले. 2008 मध्ये पुन्हा, बीजिंग ऑलिम्पिकनंतर, दोघांनी पुन्हा एकत्र खेळायला सुरुवात केली. महेश यांना 2001 मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

महेश भूपतीचा खेळ जीवनासारखा यशस्वी झाला. त्यांचे वैयक्तिक आयुष्य तेवढे नव्हते. त्यांना चित्रपट तारे जवळचे म्हणूनही ओळखले जाते. त्यांची पहिली पत्नी, मॉडेल, उद्योजिका, लेखक आणि सौंदर्य स्पर्धा विजेतेपद विजेते श्वेता जयशंकर यांनी 2002 मध्ये महेशशी लग्न केले, परंतु हे लग्न फार काळ टिकले नाही याचे कारण म्हणजे महेशची अभिनेत्री लारा दत्तासोबत वाढती जवळीक, ज्यासाठी तो ओळखला जातो. श्वेताने एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले आहे. वर्ष 2009 मध्ये, महेशने श्वेताला घटस्फोट दिला आणि 2011 मध्ये त्याने अभिनेत्री लारा दत्ताशी लग्न केले आणि एका मुलीचे वडील झाले.

निर्माता दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी यांनी महेश भूपती आणि लिअँडर पेसच्या वेब सीरिज ‘ब्रेक पॉइंट’चे 7 भाग एकत्र आणण्यासाठी अनेक वर्षे मेहनत घेतली. जरी अनेकांनी त्याला हे डॉक्यु-ड्रामा करण्यास नकार दिला कारण भारताकडे प्रेक्षक नसले तरी मला आणि पिएंडरला ट्रेंड सेटर व्हायचे होते, अनुयायी नव्हे. महेश भूपती या कामगिरीने खूप आनंदी आहेत आणि झूम कॉलवर बोलले. येथे काही विशेष उतारे आहेत.

लिएंडर पेसच्या खेळाचा कोणता गुण तुम्हाला चांगला वाटतो?

खेळाला पुढे नेण्यासाठी आणि देशासाठी चांगली धावसंख्या उभारण्यासाठी मी नेहमीच त्याच्या खेळात असतो. हा गुण कोणत्याही खेळाडूला पुढे नेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

प्रत्येक व्यक्ती जीवनात यश आणि अपयशातून काहीतरी शिकते, तुम्ही काय शिकलात?

मला माझ्या क्रीडा जीवनात खूप अभिमान आहे, जेव्हा मी टेनिसपटू झालो तेव्हा मला माहित नव्हते की माझे नाव ग्रँड स्लॅमशी जोडले जाईल, जे माझे स्वप्न होते. जेव्हा मला एकेरी आणि दुहेरीत यश मिळाले, तेव्हा मला चांगले वाटले.

तरुण खेळाडूंना पुढे जाण्यासाठी तुम्हाला कोणत्या टिप्स द्यायच्या आहेत?

प्रत्येक खेळाडूची खेळण्याची शैली वेगळी असते, त्यानुसार त्यांना सूचना द्याव्या लागतात. खेळाडू अनेकदा मला खेळाबद्दल विचारत राहतात. मग मी त्यांना शिफारस करतो.

मैदानात तुम्हाला लोकांच्या अपेक्षांच्या दबावाशी खेळावे लागते, तर चित्रपटात कोणतेही दडपण नसते, जर काही चूक झाली असेल तर तुम्ही रीटेक घेऊ शकता, तुमच्यात काय फरक पडला आहे?

मी टेनिस खेळाडू आहे, चित्रपट स्टार नाही आणि माझी संपूर्ण कारकीर्द खेळांमध्ये घालवली आहे. प्रदीर्घ संभाषणानंतर मी हे माहितीपट नाटक केले आहे. दोघांमध्ये कोणीही तुलना करू शकत नाही, कारण दोन्ही एकमेकांपासून खूप भिन्न आहेत.

ही वेब सिरीज तुमच्या आयुष्याशी संबंधित ब्रेक अप दाखवेल का?

प्रत्येकाच्या आयुष्यात काही नकारात्मक गोष्टी घडतात आणि त्यापासून पुढे जावे लागते. मला हे आवडेल जेव्हा हजारो लोक मला चित्रपटात पाहतील आणि ते मला खूप चांगले वाटेल.

लारा दत्ताने हा चित्रपट पाहिला आहे का? त्यांची प्रतिक्रिया काय होती?

लारा दत्ताने हा चित्रपट पाहिला आहे आणि खूप आनंदी आहे, कारण ती पहिल्या दिवसापासून या प्रकल्पाशी संबंधित आहे. सुटकेची वाट पाहत आहे.

प्रथमच ग्रँड स्लॅम जिंकण्याबद्दल तुमचे कुटुंब आणि तुमची प्रतिक्रिया काय होती?

ही वेब मालिका 7 एपिसोडमध्ये प्रत्येकाला दाखवली जाईल, त्यामुळे त्यात अनेक तथ्य दाखवले जातील, ज्यात कुटुंब आणि माझी प्रतिक्रियाही दाखवली जाईल. माझ्या टेनिस प्रवासापासून 2006 पर्यंत, वर्षातील सर्व कार्यक्रम घेतले गेले आहेत, जे प्रेक्षकांनादेखील आवडतील.

तुम्हाला लहानपणी टेनिसपटू बनायचे आहे असे कधी वाटले?

मी वयाच्या 3 व्या वर्षी टेनिस खेळायला सुरुवात केली, पण मला माहित नव्हते की मी विमलडेन या उच्च स्तरीय खेळातही खेळणार आहे. विमलडेन येथे खेळणे आणि जिंकणे हे दोघेही आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत. या व्यतिरिक्त, एका एपिसोडमध्ये आमची कथा सांगणे कठीण होते, म्हणून 7 एपिसोड बनवावे लागले, जेणेकरून कथा सांगता येईल.

एखाद्या खेळाडूसाठी देशासाठी मोठे विजेतेपद आणणे किती महत्त्वाचे आहे? तुमचे अनुभव काय होते?

या अनुभवाचे शब्दात वर्णन करणे फार कठीण आहे, कारण जेव्हा एखादा खेळाडू खेळाच्या मैदानात जिंकतो आणि जेव्हा देशाचे राष्ट्रगीत पदक समारंभात वाजवले जाते तेव्हा मनात एक वेगळाच आनंद असतो आणि प्रत्येक खेळाडूबरोबर असे घडते आहे. प्रत्येक खेळाडूला गूज बम्प्स मिळतात. त्याचा अनुभव कोणत्याही भाषेत वर्णन करणे शक्य नाही.

पूर्वीच्या खेळात आणि आजच्या खेळात खूप बदल झाले आहेत, आज खेळाचे तंत्रज्ञान बदलले आहे, तुम्हाला कधी असे वाटले का?

20 वर्षांनंतर, गेममध्ये बदल होणे निश्चित आहे, कारण सर्व खेळांचे तंत्रज्ञान खूप बदलले आहे. पोषण पासून तंत्रज्ञान, माध्यम, पुनर्प्राप्ती इत्यादी, खेळदेखील बदलला आहे. आज लोक काळाबरोबर चालू शकतात.

वेबमध्ये अभिनय करताना तुमचे सर्वोत्तम क्षण कोणते होते?

संपूर्ण वेब सिरीज करताना सर्वोत्तम क्षण होता, कारण मी तो क्षण पुन्हा जिवंत केला.

वर्तमानकाळातील सर्वांत मोठ्या स्वास्थ्यसमस्यांपैकी, गेल्या दीड वर्षे चालू आहे OTT प्लॅटफॉर्मवर पाहिले आहे काय म्हणून?

दररोज मी OTT प्लॅटफॉर्मवर गेलो नाही, पण मध्येच मी काही वेब सिरीज पाहिल्या, ज्यात मुंबई डायरीज, बेलबॉटम असे अनेक चित्रपट आहेत.

हाथी मेरे साथी पुनरावलोकन : हा चित्रपट मनोरंजन करत नाही

* शांतीस्वरूप त्रिपाठी

रेटिंग: दीड तारे

निर्माता: इरोस नाऊ इंटरनॅशनल

दिग्दर्शक: प्रभु सोलोमन

कलाकार: राणा दग्गुबती, पुलकित सम्राट, झोया हुसेन, श्रिया पिळगावकर आणि अनंत महादेवन

कालावधी: दोन तास 41 मिनिटे

ओटीटी प्लॅटफॉर्म: इरोस नाऊ आणि झी सिनेमा

“विकासाच्या नावाखाली जंगले पूर्णपणे नष्ट करणे किती न्याय्य आहे.” आणि हवामान बदलाच्या महत्त्वाच्या प्रश्नावर प्रभु सोलोमनने ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट आणला आहे. जो 18 सप्टेंबरपासून ‘झी सिनेमा’ आणि ‘इरोज नाऊ’ वर प्रसारित होत आहे.

केरळमध्ये चित्रीत झालेल्या या चित्रपटाला छत्तीसगडची कथा सांगितली गेली आहे. हा चित्रपट फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जादव पायेंग यांच्या जीवनापासून प्रेरित असला तरी, जादू पायेंग यांनी माजुलीमध्ये हजारो झाडे लावण्याचे आणि संपूर्ण राखीव जंगल निर्माण करण्याचे ध्येय स्वतःवर घेतले.

उत्कृष्ट छायाचित्रण असूनही, लेखक आणि दिग्दर्शक प्रभू सोलोमन यांच्या उणिवांमुळे संपूर्ण चित्रपट विभागला गेला. वन संवर्धन आणि हत्तींच्या संवर्धनाचा संदेश देण्यात हा चित्रपट वाईट रीतीने अपयशी ठरतो.

कथा

चित्रपटाच्या सुरुवातीला कॅमेरा वरून जंगलाची काही चित्तथरारक दृश्ये, झाडांची छत, सुंदर प्राणी, समृद्ध हिरवी झाडे आणि प्राण्यांच्या आवाजासह सुरू होते. कथेचा केंद्रबिंदू वंदेव (राणा दग्गुबती) भारताचा वन माणूस, ज्यांना भारताचे राष्ट्रपती म्हणून नियुक्त केले आहे. अब्दुल कलाम आझाद जंगलांच्या उत्थानाच्या कार्यासाठी. तो जंगलात फक्त प्राणी आणि पक्षी विशेषत: हत्तींमध्ये राहतो. वनदेव पुन्हा पुन्हा आठवण करून देतो की त्याने या जंगलात एक लाख झाडे लावली आहेत. त्यांचे आजोबा अर्जुन सिंह यांनी त्यांची जमीन सरकारला देखभाल आणि संरक्षणासाठी दान केली. तेव्हा जेव्हा पर्यावरण मंत्री जगन्नाथ सेवक (अनंत महादेवन) त्या संरक्षित वनक्षेत्राच्या पाचशे एकरमध्ये ‘डीआरएल टाऊनशिप’ बांधण्याचा निर्णय घेतात. पर्यावरण मंत्री आपल्या शहरी ग्राहकांना निवासी टॉवर, अॅम्फीथिएटर, व्यायामशाळा, शॉपिंग मॉल आणि जलतरण तलाव पुरवू इच्छित आहेत. म्हणून वंदेव त्याच्या विरोधात उभा राहिला. एक वन अधिकारी (विश्वजित प्रधान) प्रस्तावित टाऊनशिपच्या विरोधात कायदेशीर खटला बनवण्यासाठी वंदेवाला मदत करतो. दुसरीकडे, मंत्र्याच्या आदेशानुसार, कंत्राटदार शंकर (पुलकित सम्राट) नावाच्या कुमकी (प्रशिक्षित) हत्तीच्या माहुताची सेवा घेतो.

 

लेखन आणि दिग्दर्शन:

कबूल करा की ‘हाथी मेरे साथी’ चित्रपटात मांडलेला मुद्दा अतिशय समर्पक आणि तत्काळ आहे. कारण आपल्या देशातील नेते काही रुपयांच्या लोभात जंगलतोड करत आहेत. पण चित्रपट निर्माते प्रभू सोलोमन हा संदेश योग्यरित्या देण्यात अपयशी ठरले आहेत. प्रत्यक्षात भ्रष्ट पर्यावरण मंत्री, पोलिस अधिकारी त्यांच्या मागे बंधनकारक मजुरांसारखे चालत होते, भाषण देत होते, गावकऱ्यांची गर्दी, जंगल आणि हत्ती वाचवण्यासाठी ‘फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया’, माओवादी वादग्रस्त, मृत्युपत्र, कंत्राटदार, वकील, इमारत कामगार, लाचखोर अधिकारी इत्यादी म्हणजे मंथन, प्रभू सोलोमनचा “हाथी मेरे साथी” हा चित्रपट काहीतरी चुकीचा आहे. चित्रपटातील पत्रकार अरुंधती (श्रिया पिळगावकर) चे पात्र जबरदस्तीने अडकलेले दिसते. हे पात्र जरी काढून टाकले तरी कथेवर कोणताही परिणाम होणार नाही. हा चित्रपट उपदेशात्मक भाषणांनी परिपूर्ण आहे. अन्यथा चित्रपट एका तासात संपतो. पण त्यानंतर ते अवर्णनीयपणे काढले जाते. स्क्रिप्ट खूप गोंधळलेली आहे. अनेक दृश्ये आणि संवाद आणि उपदेशात्मक भाषणांची अनेक पुनरावृत्ती आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि सादरीकरण अतिशय वेदनादायक आणि जर्जर आहे. भ्रष्ट राजकारण्यांच्या फायद्यासाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जाण्याच्या प्लॉटवर हजारो चित्रपट बनवले गेले आहेत. यातही तेच पुनरावृत्ती होते. वनदेव आणि हत्ती यांच्यातील दृश्ये हास्यास्पद झाली आहेत. दोघांमध्ये समन्वय नाही, हे दिग्दर्शकाचे सर्वात मोठे अपयश आहे. हत्ती हत्तींच्या कळपाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, यापेक्षा हास्यास्पद दृश्य काय असू शकते. त्याचा हितचिंतक कोण आहे याबद्दल प्रत्येक प्राण्याला इतकी समज असते, पण चित्रपट निर्मात्याने दाखवले आहे की ज्या हत्तींसोबत वंदेव वर्षानुवर्षे आहेत त्याच हत्तींनी त्याला ठार मारायचे आहे. कोणत्याही पात्रात सखोलता नाही. अवर्णनीयपणे, आरव्ही (झोया हुसेन) आणि शंकर (पुलकित सम्राट) यांचा रोमँटिक कोनदेखील चित्रपटात जोडला गेला आहे. पण ही प्रेमकथाही अर्धवट आहे.

 

अभिनय:

राणा दग्गुबाती अस्वलासारखी चाल, संपूर्णपणे त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला मान वळवणारे वनरक्षक आणि जंगलात एक लाख झाडे लावण्याचा दावा करणारा वनदेव, पण कमकुवत स्क्रिप्टच्या भूमिकेत संपूर्ण चित्रपट खांद्यावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. आणि कमकुवत व्यक्तिचित्रण. यामुळे त्यांची मेहनत देखील वाया जाते. पुलकित सम्राट शंकरच्या भूमिकेत बसत नव्हता. अनंत महादेवन हे मंत्र्याच्या भूमिकेत ठीक आहेत. आरव्हीच्या भूमिकेत झोया हुसेन आहे, परंतु तिच्या भूमिकेसाठी तिच्याकडे काहीच आले नाही.

विनोदवीरांना मिळाली महानायकाची कौतुकाची थाप

* सोमा घोष

लाडकी आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारी सोनी मराठी वाहिनीची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही अनेक मोठमोठ्या कलाकारांचीसुद्धा आवडती आहे आणि आता या कलाकारांच्या यादीत नाव जोडलं गेलं आहे दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांचं. अगदी बरोबर वाचलंत मंडळी. महाराष्ट्राच्या लाडक्या हास्यकलाकारांनी फिल्मसिटी इथं जाऊन अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. या वेळी अमिताभजींनी सर्व हास्यवीरांचं आणि हास्यजत्रेचं कौतुक केलं, ‘तुम्ही लोकांना हसवण्याचं अतिशय कठीण असं काम करताहात. ते सतत असंच करत राहा’, असं ते म्हणाले आणि ते स्वतःही हास्यजत्रा पाहत असल्याचं आणि आपल्या कुटुंबालाही हास्यजत्रेबद्दल सांगत असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं.

सर्वांची आवडती हास्यजत्रा ही रविवारी केल्यावर अनेक प्रेक्षकांनी ती पुन्हा चार दिवस व्हावी आणि त्यांचा हास्याचा डोस आठवड्यातून चार दिवस मिळावा, अशी मागणी केली होती. प्रेक्षकांच्या मागणीचा मान राखून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ २० सप्टेंबरपासून, सोमवार ते गुरुवार रात्री ९ वा. असे चार दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलं. समीर-विशाखा, प्रसाद-नम्रता, गौरव-वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी मिळून प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी नवी उमेद दिली आहे.

आता हसण्याचे वार होणार आठवड्यातून चार, पाहायला विसरू नका ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’  आजपासून सोमवार ते गुरुवार, रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

महाराष्ट्राची हास्यजत्रा आता चार दिवस

* सोमा घोष

अवघ्या महाराष्ट्राला खळखळवून हसवणारी आणि सगळ्या प्रेक्षकांच्या  टेन्शनवरची मात्रा ठरलेली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा, आता पुन्हा चार दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. २० सप्टेंबरपासून आता हसण्याचे वार होणार आहेत चार आणि सगळ्यांची लाडकी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोमवार ते गुरुवार असे चार दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

यानिमित्ताने एक धमाल रॅप सॉंग रोहित राऊत यांनी गायलं असून आता चार वार हास्यजत्रेचा चौकार असं म्हणतं सगळे कलाकार बिनधास्त डान्स करताना दिसत आहेत. प्रेक्षकांनादेखील हे गाणं आवडलं असून लाडकी हास्यजत्रा चार दिवस येणार असल्याचा आनंद त्यांना झाल्याचं दिसत आहे.

समीर-विशाखा, प्रसाद-नम्रता, गौरव-वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी मिळून प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी नवी उमेद दिली आहे. प्रसाद-नम्रता यांची जोडी नेहमीच सरस ठरते, गौरव आणि ओंकार यांचे विनोद प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतात. हास्यजत्रा पाहून आनंद आणि मनोरंजन मिळाल्याच्या कित्येक प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून मिळाल्या.

रविवारची हास्यजत्रा झाल्यावर प्रेक्षकांनी चार दिवस हास्यजत्राची मागणी केली होती. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आता विनोदवीर आठवड्यातून चार दिवस यायला सज्ज झाले आहेत.

आता सगळ्यांची लाडकी हास्यजत्रा २० सप्टेंबरपासून आठवड्यातले चार दिवस प्रेक्षकांना भेटायला येणार आहे.

पाहायला विसरू नका, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, २० सप्टेंबरपासून सोम.-गुरू. रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें