संडे ब्रंचसाठी केशभूषा

* स्वेता कुंडलीया, ब्युटी एक्सपर्ट, ओशिया हर्बल्स

संडे ब्रँच अलीकडे लंच आणि डिनरपेक्षासुद्धा जास्त लोकप्रिय होऊ लागला आहे. आता ब्रंचला जायचे असेल आणि तुम्ही स्टायलिश दिसणार नाही असं होऊ शकेल का? मग, माहीत करून घ्या केसांचा लुक परफेक्ट बनवायच्या पद्धती.

ब्रॅडेड बन

स्टेप १ : आपले केस चांगले धुवून नीट सुकवून त्याचे पोनीटेल बनवून एका रबरबँडने बांधून घ्या.

स्टेप २ : केसांचे तीन भाग करून त्याच्या वेण्या घाला.

स्टेप ३ : वेणीच्या शेवटाला एक रबरबॅंड बांधून एकत्र करून घ्या.

स्टेप ४ : आपल्या पोनीटेलच्या बेसच्या आजूबाजूला या वेण्या चांगल्या गुंडाळून घ्या. गरजेनुसार ब्रॅडेड बनला जागोजागी पिन लावा. तुमचा ब्रॅडेड बन तयार आहे.

हाफ अप हेअर रॅप

स्टेप १ : दाट दिसावे म्हणून हेअर स्प्रे मारून केसांना तयार करा.

स्टेप २ : आपल्या केसांच्या फ्रंटलाईनपासून मागच्या बाजूपर्यंत हाफ पोनीटेल बनवा आणि मग हे केस लहान लहान भागांमध्ये विभागून तयार करा, जेणेकरून तुमचे केस दाट वाटतील.

स्टेप ३ :  समोरच्या केसांना अर्ध्या भागापर्यंत नेऊन एक हाफअप पोनी बनवा आणि रबरबँड लावून एकत्र बांधा.

स्टेप ४ : हाफअप पोनीच्या रबरबँडखाली असलेला सरळ केसाचा १ इंच भाग पकडा आणि रबरबँड लपवायला हाफ पोनीच्या चारीबाजूला केसाचा सैल असा १ इंचाचा भाग गुंडाळा. तुमचा हाफ अप हेअर रॅप तयार आहे.

ब्रॅडेड हाफ अप

स्टेप १ : आपल्या चेहऱ्यासमोरील उजवीकडच्या केसांचे २ इंचाचे भाग बनवण्यासाठी बोटांचा वापर करा.

स्टेप २ : केसांच्या लहान क्लिपने ते एकत्र बांधा.

स्टेप ३ :  आपल्या डोक्याच्या डावीकडेसुद्धा या स्टे्रप अंमलात आणा.

स्टेप ४ : मोठया ब्रॅडच्या स्वरूपात हळुहळू बोटांचा वापर करून प्रत्येक ब्रॅड वेगळा करा.

स्टेप ५ : आपल्या केसांचा थोडा भाग वरून बंद करा आणि विस्कटू नये यासाठी हेअर क्लिप लावा.

स्टेप ६ : दोन्ही ब्रॅड आपल्या डोक्यामागे आणा आणि डोक्याच्या मधोमध केसांच्या लहानशा क्लिपने नीट लावा.

स्टेप ७ : वरील केस खाली आणा, जे लहानशा पोनी सहीत एका लहान रबरबँडने बांधा, जणूकाही रबरबँडने सगळया बॅडला पकडले आहे.

स्टेप ८ : वरील रबरबँडमध्ये एक बॉबी पिन घुसवा आणि ती ब्रॅडच्या खाली रबारबँडच्या सहाय्याने थ्रेड करा, मग डोक्यावर दोन्ही इलॅस्टिक ब्रॅड्स एकत्र करायला हे नीट दाबा. तुमचा ब्रॅडेड हाफअप बन तयार आहे.

गोरा रंग म्हणजेच सौंदर्य नव्हे!

* शकुंतला सिन्हा

तुम्ही चित्रपटांतून हिरोला हिरोइनसोबत गाताना पाहिले असेल, ‘ये काली काली आँखे, ये गोरे गोरे गाल’ किंवा ‘गोरे गोरे मुखडे पे काला काला तिल’ किंवा अशाच प्रकारची काही गाणी ज्यात नायिकेचे गोरे असणे दाखवले जाते किंवा एखाद्या उपवर मुलाच्या विवाहासाठी दिलेली जाहिरात पाहिल्यास ‘वधू पाहिजे, गोरी, स्लिम, सुंदर’ आणि हे तिच्या शैक्षणिक आणि इतर योग्यतांच्या व्यतिरिक्त असते.

स्वत: रंगाने काळ्या असलेल्या वरालाही गोरी वधूच हवी असते. मॉडेलिंग, टीवी सीरियल्स किंवा फिल्म्समध्ये नायिका आणि सेलिब्रिटीजचे काही अपवाद सोडल्यास गोरे आणि सुंदर असणे अनिवार्य असते. एकाच कुटुंबात गोरी आणि काळी अशा मुली असतील तर काळया किंवा सावळया कांतीच्या मुलीच्या मनात हीनभावना निर्माण होते. बऱ्याच मुलींना त्यांच्या लग्नात डार्क कलरमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

काळया किंवा डार्क कलरमुळे फक्त मुलीच नाही तर मुलांनाही त्रास होतो. त्यांच्यातही काही प्रमाणात हीनभावना निर्माण होते.

कालिदासने आपल्या काव्यात नायिकांच्या सावळया रंगाला महत्त्व दिले आहे. जुन्या जमान्यातही महिला शृंगार करत असत, पण नैसर्गिक साधने दूध, साय, चंदन इ. चा वापर हा गोरे दिसण्यासाठी नसून स्किनला ग्लो आणण्यासाठी होत असे. मग हा गोरेपणाचा हव्यास आपल्या डोक्यात आला कधी?

इतिहासात डोकावून पाहिले असता आपल्या लक्षात येते की आर्यांनंतरच बहुदा गोरेपणाला सौंदर्यासोबत जोडून पाहिले. यानंतरही मंगोल, पर्शियन, ब्रिटिश जे जे राज्यकर्ते आले, ते गोऱ्या त्वचेचेच होते. इथूनच आपली मानसिकता बदलू लागली आणि गोऱ्या रंगाला आपण सुंदर समजू लागलो.

लग्न हा मुलींच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा माइलस्टोन आहे. त्यामुळे सुंदर दिसण्याच्या नादात त्या तऱ्हेतऱ्हेच्या पावडर, फाउंडेशन, फेअरनेस क्रीम वापरू लागल्या आहेत. फिल्म्स, टीवी सीरियल्स आणि जाहिरातीत गोऱ्या आणि सुंदर मुलींना उत्कृष्ट समजले जाते. समाजातील गोरेपणाचे महत्त्व आणि आपला हा कमकुवत दुवा लक्षात घेत फेअरनेस क्रीम बनवणाऱ्या कंपन्यांनी बाजारात आपले पाय घट्ट रोवले आहेत. आता तर फक्त महिलांसाठी नव्हे तर पुरुषांसाठीही फेअरनेस क्रीम बाजारात उपलब्ध आहे. अशी क्रीम्स आणि कॉस्मेटिक्स यांची वार्षिक उलाढाल जवळपास ३ हजार कोटी रुपये आहे. जी एका अनुमानानुसार पुढच्या ५ वर्षांत ५ हजार कोटी रुपये एवढी होऊ शकते.

काही वर्षांपूर्वीच ‘डार्क इज ब्युटीफुल’ हे अभियान सुरू झाले होते. आनंदाची गोष्ट ही आहे की काही वर्षांतच सावळया आणि डार्क कलरपासून लोकांचा दृष्टीकोन थोडाफार बदलू लागला. सुशिक्षित मुलगे फक्त त्वचेच्या रंगालाच संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा मापदंड मानत नाहीत. काही प्रसिद्ध कलाकार हे ‘डार्क इज ब्युटीफुल’ या अभियानासोबत जोडले गेले आहेत तर काही प्रसिद्ध कलाकार हे फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीत दिसून येतात. त्यामुळे असे दिसून येते की मुलीसुद्धा अजूनही फेअरनेसच्या मायाजालातून बाहेर पडू शकले नाहीत.

आता हळूहळू सत्य समोर येऊ लागले आहे की कोणतेही फेअरनेस हे सौंदर्याचा पर्याय ठरू शकत नाही.

डार्क कलरला मुळीच घाबरू नका. जर तो तुमच्या त्वचेचा नैसर्गिक रंग असेल तर तुमच्या सोबत राहील. तुम्ही जर आतून मजबूत असाल तर कोणीही तुमचे काही बिघडू शकत नाही. तुम्ही तुमचे लक्ष हे इतर प्रॉडक्टिव्ह आणि कंस्ट्रक्टिव्ह कामांवर केंद्रित करा. पुढील काही गोष्टींमुळे तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास नक्कीच वाढू शकतो.

आपले बलस्थान ओळखा : तुमचा रंग हा काही तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाची ओळख नसतो. हे निश्चित आहे की तुमच्यात इतर काही विशेषता असतील, ज्यांपुढे तुमचा रंग गौण ठरेल. तुमची हीच बलस्थाने ओळखा आणि ती बळकट करा. जसे एखादा विशेष खेळ, अभ्यास, संगीत यात रुची असल्यास त्यात प्रावीण्य मिळवा. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या मनात सकारात्मक विचार उत्पन्न करू शकता.

आपल्या त्वचेच्या रंगावर प्रेम करा : जरी हे फार सोपे नसले तरी फार कठीणही नाही. तुम्ही हा विचार करा की तुमच्या शरीरावर सोन्याचे दागिने किती सुंदर चमकताना दिसतात. इतरांच्या तुलनेत त्वचेच्या कमतरता ठळकपणे दिसणार नाहीत आणि त्वचेचे स्वास्थ्यही चांगले राहील. सौंदर्य हे फक्त गोरेपणात नसते.

त्वचेच्या रंगाव्यतिरिक्त नाकीडोळी नीटस आणि शरीराची ठेवणही खूप महत्त्वाची असते आणि याबाबतीत नेहमीच सावळया आणि डार्क कलरच्या मुली बाजी मारतात.

आपल्या त्वचेच्या रंगाशी मेळ साधणारा मेकअप करा : तुम्ही वेगवेगळया वेळी वेगळया मेकअपमध्ये स्वत:चे फोटो पहा. तुम्हाला  स्वत:लाच समजून येईल की कोणता मेकअप किंवा फाउंडेशन तुम्हाला सूट करतो. यासाठी कोणत्याही सेल्स गर्लचा सल्ला घेण्याची आवश्यकता नाही. ती तर प्रॉडक्ट विकण्यासाठीच तिथे बसलेली असते. हीच गोष्ट तुमच्या ड्रेसलाही लागू होते. ज्या रंगाचे कपडे तुम्हाला शोभून दिसतात पार्टी किंवा ऑफिसमध्ये तेच घाला.

दुसऱ्यांशी तुलना करू नका : ज्यांच्यात मनोबल आणि आत्मविश्वासाचा अभाव असतो, त्या लगेच इतरांशी तुलना करण्याची चूक करतात. प्रचार आणि सोशल मिडियावर तुम्ही जे पाहता आणि जेव्हा वास्तव तुमच्यासमोर येते, तेव्हा तुम्हाला स्वत:लाच समजते की मेकअपच्या थरांखाली काही औरच कहाण्या दडलेल्या असतात. प्रत्येकाची समस्या आणि दृष्टिकोन वेगळा असतो. हल्ली बॉलीवूडपासून ते हॉलीवूडपर्यंत डार्क कलरच्या मुली यशस्वी होत आहेत. विश्वसुंदरी किंवा ऑलिम्पिक स्पर्धेत डार्क कलरच्या मुली सफल होत आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घ्या.

मायाजाळात अडकू नका : मिडियात फेअरनेस क्रीम किंवा इतर वस्तूंचा फार जोरात प्रचार केला जातो. ते तुमच्या मनातील डार्क कलरची भीती आणि हीनभावना याचा फायदा घेतात. त्यांचे काम हे त्यांचे प्रॉडक्ट विकणे असते. त्याआधारावर तुम्ही तुमच्या योग्यतेबाबत निर्णय घेऊ नका. उद्या जर सावळेपणा स्वीकारला गेला तर ते ही उजळवण्यासाठी क्रीम उपलब्ध होतील.

निंदा सहन करा आणि तिचा सामना करा : त्वचेच्या रंगामुळे तुमची निंदा होऊ शकते किंवा तुमच्यावर शेरेबाजी होऊ शकते. तुमची निंदा करणाऱ्यात मिडिया, किंवा तुमच्या जवळील व्यक्ती अथवा कोणी अनोळखी व्यक्तीही असू शकते. तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही. त्यामुळे तुम्ही सरळ त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. त्यांच्यामुळे विचलित होण्याची चूक करू नका. आपल्या आंतरिक शक्तिला साद घाला आणि ती सिद्ध करून निंदा करणाऱ्यांना सणसणीत चपराक द्या.

त्वचेनुसार काळजी घेण्याच्या २० टीप्स

* सलोनी उपाध्याय

बहुतेक स्त्रियांना त्यांच्या त्वचेचा प्रकार माहित नसतो. त्या चेहऱ्यावर कोणतीही फेस क्रीम लावतात. बाजारात नवीन काही आले किंवा टीव्हीवर नवीन क्रीमची एखादी जाहिरात दिसली नाही की तो विकत घेतला आणि लावला. परिणाम म्हणजे डागांनी भरलेली त्वचा बनते. कुठे चेहरा कोरडा तर कुठे तेलकट दिसू लागतो, सुरकुत्या, चट्टे आणि काळेपणा चेहऱ्यावर दिसू लागतो.

जर आपल्याला असे वाटत असेल की आपल्या त्वचेबरोबर ही असे होऊ नये तर सर्वप्रथम आपल्या त्वचेचा प्रकार काय आहे ते जाणून घ्या. नंतर त्यानुसारच कॉस्मेटिक उत्पादने निवडा. यासाठी कोणत्याही त्वचेच्या डॉक्टरांकडे जाण्याची किंवा ब्युटीशियनची आवश्यकता नाही. चला, आपल्या त्वचेचा प्रकार कसा जाणायचा हे आम्ही आपल्याला सांगत आहोत :

त्वचेचा प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठी, सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम आपला चेहरा टिश्यू पेपरने पुसून टाका.

नॉर्मल स्किन : जर टिश्यू पेपरवर कोणताही डाग दिसत नसेल, म्हणजे टिश्यू पेपर पूर्वीसारखाच स्वच्छ असेल तर याचा अर्थ तुमची त्वचा सामान्य म्हणजेच नॉर्मल आहे.

तेलकट त्वचा : जर टिश्यू पेपरने आपला चेहरा पुसल्यानंतर तुम्हाला टिशू पेपरवर तेल दिसले तर याचा अर्थ तुमची त्वचा तेलकट आहे. अशा त्वचेवर सुरकुत्या किंवा वृद्धत्वाची कोणतीही समस्या नसते.

ड्राय स्किन : जर टिश्यू पेपरवर कुठला डाग नसेल परंतु त्वचा ताणल्यासारखी जाणवत असेल आणि चेहऱ्यावर चमक नसेल तर याचा अर्थ त्वचा कोरडी आहे.

संवेदनशील त्वचा : जर आपल्या त्वचेला स्पर्श केल्यानेही जळजळ आणि खाज सुटत असेल तर आपली त्वचा संवेदनशील आहे.

काँबिनेशन त्वचा : जर त्वचेचा काही भाग कोरडा असेल तर काही भाग तेलकट असेल तर ती काँबिनेशन त्वचा आहे. आपल्या नाकावर टिश्यू पेपर लावला आणि त्यावर तेलाचे डाग दिसले परंतु जर तुम्ही तुमच्या गालावर टिश्यू पेपर लावल्यास तो कोरडा दिसला तर याचा अर्थ तुमची काँबिनेशन त्वचा आहे.

तेलकट त्वचेची काळजी

* तेलकट त्वचेसाठी दही खूप चांगले असते. दही आणि बेसनाचे पीठ मिसळा आणि चेहऱ्यावर लावा.

* बटाटयाचा रस काढा आणि चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या किंवा बटाटा बारीक करा आणि फेस पॅकप्रमाणे त्याचा उपयोग करा. यामुळे चेहऱ्याची चमक वाढेल.

* मुलतानी माती गुलाबजलबरोबर मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. कोरडी झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

* बेसनाच्या पिठात लिंबू पिळून पेस्ट बनवा आणि हे चेहऱ्यावर लावा. दहा मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. लिंबू त्वचेचे तेल सहजतेने साफ करतो.

* अंडयाच्या पांढऱ्या भागामध्ये लिंबाचा रस घालून चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

कोरडी त्वचा

* चेहरा आणि मानेवर कापसाने कच्चे दूध लावा. वीस मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवा. जर आपल्याला चेहऱ्यावर अधिक मॉइश्चरायझर हवे असेल तर मलईने मालिश करा आणि मग १०-१५ मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचा चमकदार होईल.

* कॉटन पॅड किंवा कापसामध्ये ऑलिव्ह तेल घ्या आणि हे मेकअप रीमूव्हरप्रमाणे वापरा. त्वचा स्वच्छ करण्याबरोबरच हे त्वचेला आर्द्रतादेखील देईल.

* कोरडी त्वचा प्रदूषण आणि सूर्याच्या अतिनील किरणांना अगदी सहज बळी पडते. म्हणून नेहमी सनस्क्रीन वापरा. याचा उपयोग त्वचेला अनेक समस्यांपासून दूर ठेवतो.

* पपईचा गाभा आणि केळीची पेस्ट बनवून ते चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

* दोन चमचे कोरफडीच्या जलमध्ये १ अंडयाचा पांढरा भाग मिसळा. मग या पेस्टने चेहऱ्यावर मालिश करा. मालिश केल्यानंतर चेहऱ्यावर हे अर्धा तास ठेवा.

संवेदनशील त्वचा

* क्लीन्सरने चेहरा स्वच्छ करा. यासाठी, सौम्य सल्फेट फ्री क्लीन्सर अधिक चांगला असेल.

* टोनिंगसाठी ग्रीन टी अधिक चांगला वापरला जातो. परंतु जर त्वचेवर काही मुरुम असतील तर अल्कोहोल फ्री टोनर वापरा.

* संवेदनशील त्वचेसाठी अशा मॉइश्चरायझरचा वापर केला पाहिजे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सुगंध वापरला जात नाही अन्यथा यामुळे एलर्जी होऊ शकते.

* संवेदनशील त्वचा स्वच्छ करण्यासाठी, जास्त थंड पाणी किंवा जास्त गरम पाणी वापरु नका.

* अशा प्रकारच्या त्वचेवर प्रत्येक प्रकारचा फेस मास्क काम करत नाही. यासाठी दही आणि ओटचे पीठ मिसळा आणि चेहऱ्यावर लावा.

काँबिनेशन स्किन

* काँबिनेशन त्वचेच्या काळजीसाठी दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी अवश्य प्या. यामुळे त्वचा ओलसर राहील. पाणी त्वचेत असलेले विषारी द्रव बाहेर काढण्यास मदत करते.

* चेहऱ्यावर संत्री आणि दहीची पेस्ट लावा. १५ मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. संत्रीपासून त्वचेला व्हिटॅमिन सी मिळेल, ज्यामुळे त्वचा तरुण आणि चमकत राहील. दहीमुळे त्वचेत घट्टपणा येईल आणि यामुळे चेहऱ्यावर आर्द्रताही येते.

* काकडीचा रस मधात मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. दहा मिनिटांनी चेहरा धुवा. हे त्वचेला घट्ट आणि ओलसरपणा देईल, तसेच त्वचेची टॅनिंगदेखील दूर होईल.

* अर्धा चमचे तांदूळ पावडर, १ चमचे एलोवेरा जेलमध्ये मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनंतर पॅक चेहऱ्यावरून स्क्रब करा आणि नंतर पाण्याने धुवा. याचा सतत वापर केल्याने त्वचा स्वच्छ राहील.

* दही आणि ओट्सची पेस्ट बनवून टी झोनवर लावा. हा पॅक गालांवर लावू नका. थोडया वेळाने कोमट पाण्याने धुवा. आठवडयातून एकदा हा पॅक अवश्य वापरा. नक्कीच त्वचेत उजळपणा येईल.

मान्सून वेडिंगसाठी मेकअप टीप्स

* आसमीन मुंजाल, ब्यूटी ऐक्सपर्ट

मान्सूनमधील मेकअप हा असह्य वाटतो. अशात मान्सूनमध्ये लग्न असेल तर या मेकअपसंबंधीच्या सूचना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

* पावसाळ्यात त्वचेची रोमछिद्रे खुली होतात. म्हणूनच मेकअप करण्यापूर्वी त्वचा व्यवस्थित स्वच्छ करून मॉइश्चराइज करावे. मेकअप करण्याच्या एक दिवस आधी अॅक्सफॉलिएशन किंवा स्क्रबिंगचा वापर करा. यामुळे त्वचेवरील मृत त्वचा निघून जाऊन त्वचा चमकदार व सुंदर दिसू लागेल.

* मान्सूनमध्ये असा मेकअप निवडा जो दिर्घकाळ त्वचेवर टिकून राहील. अशी उत्पादने निवडा, जी दिर्घकाळ आणि वॉटरप्रूफ असतील. कारण घामामुळे आणि वातावरणातील आद्रतेमुळे मेकअप पसरू लागतो किंवा फाटतो. अशावेळी ७ ते ८ तास टिकणारा मेकअप निवडा.

* आपल्या त्वचेच्या प्रकाराबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. आपल्या त्वचेचा प्रकार ओळखा. उदाहरणार्थ ड्राय, सेंसेटिव्ह, ऑयली, डिहायडे्रटेड, कॉम्बिनेशन, मॅच्योर इत्यादी. मान्सूनमध्ये त्वचेला हायडे्रट करणे म्हणजेच त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवणे गरजेचे आहे. बाहेरील तापमानाप्रमाणे शरीराचे तापमान संतुलित ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे विशिष्ट प्रमाणात लस्सी, नारळ पाणी आणि सामान्य पाण्याचे सेवन करा. चहा, कॉफीचे सेवन कमी करावे.

* सर्वप्रथम चेहरा आणि मानेवर बेस आणि प्रायमर लावा. प्रायमर त्वचेतील पी.एच संतुलित करेल. मग त्वचा घामामुळे जास्त ऑयली दिसणार नाही. यामुळे मेकअप दीर्घकाळ टिकेल. जर त्वचा ऑयली असेल आणि घाम अधिक येत असेल तर मेकअप करण्यापूर्वी बर्फाच्या सहाय्याने कोल्ड कंप्रेशन करू शकता. बेस लावल्यानंतर वॉटरप्रूफ फाऊंडेशन किंवा सुफले किंव सिलिकॉन बेस एअरब्रश फाऊंडेशन लावा. डोळ्यांच्या मेकअपसाठी मॅटेलिक, शिमर, मॅट आयशॅडो निवडा, जो मान्सूनच्या लग्नासाठी एक उत्तम पर्याय आहे.

* मेकअप केल्यानंतर मेकअप फिक्सर स्प्रे लावण्यास विसरू नका. चेहऱ्यापासून  ६ इंच दूर ठेवून स्प्रे करा. हा मेकअप लॉक करून दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी सहाय्यक ठरतो.

* जर कोणाच्या लग्नात किंवा साखरपुडयाला जात असाल तर असे कपडे परिधान करा ज्यात सहज वावरता येईल आणि आरामदायक वाटेल. कपडे शरीराला चिकटलेले नसावेत. कारण घामाने अशा कपड्यात अस्वस्थ वाटू लागते.

* आजकाल कमी दागिने घालण्याचा ट्रेंड आहे. मान्सून लग्नासाठी फ्लोरल, वुडन आणि शैलचे नेकपीस निवडा. आवडत असेल तर मेटलचा नेकपीस घालू शकता.

* कपडे आणि दागिन्यांनंतर वेळ येते चपलांची. चपलांमधून हवा आरपार गेली पाहिजे. जेणेकरून पायांना घाम कमी येतो.

* मान्सूनच्या मोसमात बन, पफ, क्रॉस ब्रॅड्स, साइड फ्रेंच ब्रॅड्स इत्यादी हेअर स्टाइल निवडू शकता.

मान्सून स्पेशल : पावसाळ्यात त्वचेची काळजी

* सोमा घोष

पावसाच्या आगमनामुळे जितके आल्हादायक वाटते, तितक्याच समस्याही आपल्यापुढे निर्माण होत असतात. पावसाळी दिवसात तुम्ही घरी असा, ऑफिसमध्ये किंवा कुठे बाहेर असा पण सगळीकडेच तुम्हाला दमटपणा जाणवतो. याचा सर्वाधिक परिणाम त्वचेवर होतो. म्हणून पावसाळ्यात त्वचेची काळजी सर्वात जास्त घ्यावी लागते. त्वचेला कधीकधी फंगल इन्फेक्शनसुद्धा होते. जर काळजी घेतली तर हे दूर ठेवता येईल ही मुंबईतील ‘द कॉस्मेटिक सर्जरी’ इंस्ट्रीस्ट्यूटच्या डर्मेटोलॉजिस्ट डॉ. सोमा सरकार म्हणतात की पावसाळ्यात त्वचेसंबंधी समस्या तसेच फंगल इन्फेक्शन अधिक असतं, कारण त्वचेत ओलावा अधिक काळ राहतो. या सर्वांपासून बचाव करण्यासाठी कोमट पाण्याने स्नान करणे आणि अॅटीफंगल क्रिम, साबण आणि पावडरचा उपयोग करणे गरजेचे असते. पण खालील टीप्स जास्त उपयोगी ठरतील.

* त्वचा तीन ते चारवेळा दर्जेदार फेशवॉशने धुवा.

* अॅण्टीबॅक्टेरियल टोनरचा प्रयोग या दिवसात करणे अधिक फायदेशीर ठरते. यामुळे त्वचेला काही संसर्ग होत नाही व त्वचा फाटत नाही.

* पावसाळ्यात बऱ्याचदा सनस्क्रिन लावणे टाळले जाते. पण या दिवसातही अतिनिल किरणे आपल्यापर्यंत पोहोचतातच.

* या मोसमात लोक पाणी कमी पितात. यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते. नियमितपणे ७ ते ८ ग्लास पाणी जरूर प्यावे.

* चांगल्या स्क्रिन स्क्रबरने रोज चेहरा स्वच्छ करावा.

* पावसाळ्यात कधी हेवी मेकअप करू नये.

* आहारात ज्यूस, सूप जास्त प्रमाणात घ्यावे, कुठलीही भाजी शिजवण्याआधी स्वच्छ धुवून घ्यावी. शक्य झाल्यास कोमट पाण्याने धुवावी.

* जेव्हा तुम्ही बाहेरून घरी याल, तेव्हा कोमट पाण्याने साबण लावून हातपाय स्वच्छ धुवून व्यवस्थित कोरडे करावेत व त्यानंतर मॉइश्चरायजर लावावे.

या मोसमात पायांची विशेष काळजी घ्यावी लागते. ओलावा आणि जास्त वेळ गोळे राहिल्याने पायांना फंगल इन्फेक्शन जास्त होण्याची शक्यता असते. या मोसमात बंद आणि ओले बूट घालू नयेत, तर तुमचे बूट भिजले असतील तर ते काढून सुकवण्याचा प्रयत्न करावा. याबरोबरच पेडिक्योरही करवून घ्यावे.

विशेषत: केसांची काळजी मान्सूनमध्ये घ्यावी लागते. यावेळी केस अनेकदा घामाबरोबर पावसानेही ओले होतात. म्हणून आठवड्यातून २ ते ३ वेळा शाम्पू करावा. सोबतच कंडिशनर लावणे विसरू नये. याशिवाय केस जर पावसाने ओसे झाले असतील तर टॉवेलने व्यवस्थित सुकवावेत. आठवड्यातून एक दिवस केसांना तेल लावावे.

यापुढे डॉ. सोमा सरकार सांगतात की मान्सूनमध्ये कधीही घट्ट कपडे घालू नयेत. नायलॉन कपड्यांऐवजी सुती कपडे वापरावेत. तसेच यादरम्यान दागिने कमीत कमी वापरावेत म्हणजे तुमच्या त्वचेला मोकळा श्वास घेता येईल.

मान्सूनसाठी काही घरगुती पॅक आहेत जे तुम्ही वेळोवेळी लावू शकता :

* डाळींब दाणे अॅण्टीऐजिंगचे काम करतात व व्हिटामिन सी ने युक्त असल्याने हे कोरड्या त्वचेसाठी लाभदायक असतात. वाटलेले अनारदाणे २ चमचे, १ कप ओटमील एका वाटीत घेऊन त्यात २ मोठे चमचे मध व थोडे दही मिसळून पेस्ट बनवा व चेहऱ्यावर १० मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.

* एक सफरचंद कुस्करून त्यात १-१ चमचा साखर व दूध मिसळावं. व्यवस्थित मिसळून त्यात काही थेंब कॅमोमिल मिसळावं. याचा फेसपॅक बनवून १५ मिनिटे चेहऱ्यावर लावावा. नंतर चेहरा स्वच्छ धुवावा. चेहऱ्याचा डलनेस कमी होईल.

मान्सून स्पेशल : २५ मॉन्सून फिटनेस टीप्स

* सोमा घोष

फिटनेस राखणे हे फार गरजेचे आहे. अनेक महिला या मोसमात सुस्त होतात. मग त्या गृहिणी असोत किंवा नोकरदार महिला. मॉन्सूनमध्ये बाहेर पडून वर्कआउट करणं कोणाला फारसे रूचत नाही. अशामुळे पचनशक्ती कमकुवत होते आणि याबरोबरीनेच अनेक आजारही उद्भवतात. अशावेळी जर सोप्या फिटनेस टीप्स मिळाल्या तर घरी वर्कआउट करणेही सोपे होऊन जाईल.

मुंबईतील साईबोल डान्स अॅन्ड फिटनेस सेंटरच्या फिटनेस एक्सपर्ट मनीषा कपूर अनेक वर्षांपासून महिलांना ट्रेनिंग देत आहेत. मनीषाने सुचवलेल्या फिटनेस टीप्स पुढीलप्रमाणे :

  1. या दमट ऋतुत घाम जास्त येतो. त्यामुळे पाणी जास्त प्यावे. दिवसभरात १०-१२ ग्लास पाणी जरूर प्यावे.
  2. या ऋतुत काकडी, मोसमी फळे ज्यात कलिंगड, टरबूज इ. फळे जास्त प्रमाणात खावीत. यामध्ये पाण्याचे प्रमाण सर्वांधिक असते.
  3. वर्कआऊट एंजॉयमेंटच्या रूपाने करावा. फक्त व्यायाम म्हणून करू नये. जर तुम्हाला डान्स आवडत असेल तर तोही करू शकता. कमीत कमी १५ ते २० मिनिटे वर्कआऊट करा.
  4. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात बाहेर जाणे शक्य नसते. त्यामुळे घरी राहूनच बॉडी वेट एक्सरसाइज, स्टे्रचेस इ. केले जाऊ शकते.
  5. वर्कआऊटच्या आधी प्रॉपर वॉर्मअप करायला विसरू नये अन्यथा पेशींना हानी पोहोचू शकते.
  6. वर्क आऊटनंतर कूल डाऊन पोजीशनमध्ये अवश्य राहा.
  7. तसे तर तुम्ही कधीही वर्कआऊट करू शकता, पण सकाळी आणि संध्याकाळी वर्कआऊट करणे चांगले असते. यावेळी वातावरण थोडे थंड असते.
  8. वर्कआऊटच्या दरम्यान श्वास नेहमी नाकानेच घ्यावा. यामुळे तुमचा वेग थोडा मंदावेल. पण तुमच्या कॅलरीज न थकताच बर्न होतील.
  9. वर्कआऊटच्यावेळी नेहमी फिक्या रंगाचे आरामदायक कपडे घालावेत.
  10. वर्कआऊट करताना जर थकल्यासारखे वाटले तर ताबडतोब थांबा आणि पंख्याखाली निवांत बसा.
  11. व्यायाम करताना मन शांत ठेवण्यासाठी एखादे आवडीचे गाणे ऐकू शकता. यामुळे मनात काही इतर विचारही येणार नाहीत. कारण दिवसभर जरी तुम्ही पळापळ करत असता अणि त्यावेळी एखादे काम उरकण्याचा तुमचा मानस असतो. अशावेळी वर्कआउट करताना तुमचा मेंदू हाच ताण अनुभवतो.
  12. कुटुंबासोबत किंवा मैत्रीणींसोबतही तुम्ही व्यायाम करू शकता. यामुळे आळस येणार नाही व फिटनेस रूटिन निर्माण होईल.
  13. या मोसमात योग्य डाएट जरूरी असतो. मिठाई, तळलेले तेलकट पदार्थ टाळावेत. आहारात फळे, भाज्या यांचा समावेश करावा.
  14. पावसात बाहेर गेलात तर केळी, टरबूज, सफरचंद इ. कापून स्वत:जवळ ठेवावे. याशिवाय लिंबूपाणी, कैरीचे पन्हे, ताक, कोकम सरबत हेही ठेवू शकता.
  15. बाहेर पडताना पाण्याची बाटली अवश्य जवळ बाळगावी. या पाण्यामध्ये पुदिन्याची पाने, काकडी आणि लिंबू लहान आकारात कापून टाकावेत. पाणी प्यायल्यानंतर त्यामध्ये या सर्वांचा स्वाद आणि थंडपणा येतो. त्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल.
  16. जंक फूडमध्ये मिठाचे प्रमाण अधिक असते, विशेषत: वेफर, लोणचे आणि चटण्या कमी खाव्यात.
  17. जेवण बनवताना कोथिंबीर, पुदिन्याची पानं, आणि बडिशेपचा वापर अधिक प्रमाणात करावा. कारण यामुळे शरीर थंड राहतं. गरम मसाल्यांचा वापर कमी करावा.
  18. बराच वेळ कापून ठेवलेली फळे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातही खाऊ नयेत. कारण या मोसमात जीवजंतूची उत्पत्ती जास्त प्रमाणात होत असते.
  19. भाज्या शिजवण्याआधी व्यवस्थित धुवून घ्या. गरज पडल्यास कोमट पाण्यात मीठ घालून त्यात भाज्या धुवून घ्याव्यात.
  20. ७-८ तास जरूर झोपा.
  21. या ऋतुत एखादा छंद जोपासण्याचा प्रयत्न करावा.
  22. बाहेरून घरी येताच मेडिकेटेड साबणाने सर्वप्रथम हातपाय धुऊन स्वत:ला फ्रेश ठेवावे. वैयक्तिक स्वच्छतेसाठी हे गरजेचे आहे.
  23. या मोसमात पायांकडे विशेष लक्ष द्यावे लागते, कारण पावसात बाहेरील घाणेरड्या पाण्यामुळे पायाच्या बोटांना इन्फेक्शन होऊ शकते. पाय कोरडे राहू द्या. गरज पडल्यास बोरिक अॅसिड पावडर पायाला लावावी.
  24. विनाकारण पावसात भिजणे आजाराला आमंत्रण ठरू शकते. त्यामुळे याबाबत काळजी घ्या.
  25. वातावरण जरी खराब असले तरी वेळ चांगला जावा म्हणून आवडीचे संगीत ऐकावे. पुस्तके वाचावीत आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. यामुळे मानसिक आरोग्य उत्तम राहते.

आजपासूनच या टीप्स अंमलात आणा आणि पावसाच्या शिडकाव्यासोबत आनंदी आणि सुदृढ राहा.

मान्सून स्पेशल : रिमझिमधील मेकअप ट्रिक्स

* शैलेंद्र सिंह

मान्सून सीजनमध्ये घाम आणि पावसाचे पाणी मेकअप खराब करते. अशात मेकअप तुम्हाला सुंदर नाही तर कुरूप बनवतो. मेकअपच्या दुनियेत वॉटरप्रूफ मेकअप प्रॉडक्ट्सने पदार्पण केल्यानंतर मेकअपचे टेंशन आता दूर झाले आहे.

वॉटरप्रूफ मेकअपची सर्वात मोठी खासियत म्हणजे पावसाचे पाणीही याचे काहीही बिघडवू शकत नाही. फक्त पावसातच नाही तर रेन डान्स आणि स्विमिंग पूलचा आनंद घेतानाही वॉटरप्रूफ मेकअप आपली कमाल दाखवतो. घाम आल्यावर मेकअप त्वचेच्या रोमछिद्रांत झिरपत जातो. ज्यामुळे तो खराब होतो.

त्वचेच्या रोमछिद्रांतून मेकअप शरीरात जाणार नाही हे काम वॉटरप्रूफ मेकअप करतो. त्वचेची रोमछिद्रे बंद करून केलेला मेकअपच वॉटरप्रूफ मेकअप असतो.

मान्सूनमध्ये वॉटरप्रूफ मेकअप उत्पादने वापरणे हा सोपा उपाय आहे. तुम्हाला हवे असल्यास कॉम्पॅक्ट पावडर आणि फाउंडेशनही वापरू शकता. ते तुम्ही हळुवारपणे ओल्या स्पंजने लावू शकता किंवा मग सुकी पावडरही लावू शकता. नेहमी लिपस्टिक, मस्कारा, आयलाइनर यांचे २ कोट लावा म्हणजे ते बराच वेळ टिकून राहतील. कोणतेही उत्पादन खरेदी करताना हे तपासून घ्या की ते वॉटरप्रूफ आहे की नाही आणि ते किती वेळ टिकून राहते.

ब्लशर : पावडर ब्लश ऐवजी तुम्ही क्रीम ब्लशचा वापर करू शकता. जर तुम्हाला कलर आणखी थोडा हायलाइट करायचा असेल तर क्रीम ब्लशवर पावडर ब्लश लावा. ज्यामुळे तो जास्त वेळ तुमच्या गालांवर टिकून राहील. हा तुमच्या चेहऱ्यावर चमक आणि कलर आणण्यासोबतच तुमचे सौंदर्यही वाढवतो.

बँग्स : बँग्स म्हणजे डोक्यावरील पुढचे आखूड केस अनेक महिला पसंत करतात, पण ते अनेकदा मान्सूनमध्ये गुंततात. बँग्स जवळजवळ चेहऱ्याचा अर्धा भाग झाकतात. ज्यामुळे त्वचा श्वास घेऊ शकत नाही आणि वातावरणातील ओलाव्यामुळे घाम येऊ लागतो. यामुळे न केवळ केस चिकट दिसू लागतात तर गरमी आणि घाम यामुळे तुम्हाला मुरुमही होऊ शकतात.

काजळ : काजळ लावलेले डोळे नेहमीच सुंदर दिसतात, पण जेव्हा हवेत ओलावा असतो, तेव्हा काजळ पसरण्याची शक्यता असते. मग डोळयांकडे पाहताना असे वाटते की तुमच्या  डोळयांखाली डार्क सर्कल्स आले आहेत. त्यामुळे वॉटरप्रूफ लिक्विड लायनर लावा.

वॉटरप्रूफ मस्कारा : पावसाळयात वॉटरप्रूफ मेकअपच केला गेला पाहिजे. वॉटरप्रूफ मस्कारा वापरा किंवा मग क्लिअर मस्काराही उत्तम पर्याय असू शकतो.

लिक्विड फाउंडेशन : आर्द्र मोसमात लिक्विड फाउंडेशन चेहऱ्यावर वितळू लागते. जास्त फाउंडेशन लावणे त्यामुळे योग्य नसते. एकसारखे टेक्श्चर आणि डागविरहित बेस मिळवण्यासाठी बीबी क्रीम किंवा ऑइल फ्री कुशन फाउंडेशन वापरा.

क्रीमी कंसीलर : मान्सूनमध्ये कंसीलरचा वापर टाळा, कारण घामाचा हा मोसम कंसीलरला चेहऱ्यावर टिकू देत नाही, पण जर कंसीलरची खरोखरच आवश्यकता असेल तर क्रीमी कंसीलरचा पर्याय निवडता येतो.

ग्लिटर आयशॅडो : ग्लिटर आयशॅडो अनेक महिलांच्या पसंतीस उतरते, मात्र मान्सूनमध्ये याचा वापर तुम्हाला एक भयावह लुक देऊ शकतो. हवेतील ओलावा ग्लिटरला चिपचिपीत आणि डागयुक्त दर्शवू शकतो आणि जर पाऊस पडला तर नक्कीच तुमचा आयशॅडो तुमच्या गालांना एक डागाळलेली चमक देईल. ग्लिटर वाहून डोळयांतही जाऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला डोळयांच्या तक्रारी उद्भवू शकतात.

स्ट्रेट हेअर : ओलाव्यामुळे केस चिपचिपीत आणि विस्कटलेले दिसू लागतात. जर तुम्ही यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी हेअर स्ट्रेटनिंग करण्याचा पर्याय अवलंबणार असाल तर ही चूक मुळीच करू नका. कारण फक्त काही दिवसच तुमचे केस मुलायम आणि चमकदार दिसतील, पण हे दीर्घकाळ टिकून राहणार नाही. याऐवजी केसांना पोषण देणाऱ्या ट्रीटमेंट्स करून पहा.

मान्सून स्पेशल : मान्सून हेअर अँड स्किन केअर

* डॉ. अप्रतिम गोयल

पावसात त्वचेच्या अनेक समस्या उद्भवत असतात. हवेतील आर्द्रतेमुळे त्वचेवर अनेक प्रकारचे बॅक्टेरिया, फंगस तसेच इतर संसर्ग यांची लागण होते. त्याचबरोबर पहिल्या पावसाच्या सरीमध्ये भरपूर प्रमाणात आम्ल असते, ज्यामुळे सर्वात जास्त त्वचा आणि केसांचे नुकसान होते. अशात या मोसमात काही गोष्टींची काळजी घेतल्यास त्वचा आणि केसांच्या समस्यांपासून संरक्षण मिळते.

मान्सूनमध्ये त्वचेची देखभाल

सफाई किंवा क्लिंजिंग : पावसाच्या पाण्यात रसायने मोठया प्रमाणात असतात. त्यामुळे मान्सूनमध्ये त्वचेची योग्य प्रकारे सफाई होणे जरूरी असते. मेकअप काढायला मिल्क क्लिंजर किंवा मेकअप रिमूव्हरचा वापर केला गेला पाहिजे. त्वचेतील अशुद्धता धुऊन काढल्यामुळे त्वचेवरील रोम उघडले जातात. साबण वापरण्याऐवजी फेशिअल, फेस वॉश, फोम इ. अधिक परिणामकारक असते.

टोनिंग : क्लिंजिंगनंतर हे केले पाहिजे. मान्सूनदरम्यान वायू आणि जल याद्वारे अनेक मायक्रोब्स निर्माण होतात. यामुळे स्किन इन्फेक्शन तसेच त्वचा फाटण्यापासून वाचण्यासाठी अँटी बॅक्टेरियल टोनर अधिक उपयुक्त असतो. कॉटन बडचा वापर करून त्वचेवर हळुवार टोनर फिरवा. जर त्वचा अधिकच शुष्क असेल तर टोनरचा वापर टाळला पाहिजे. होय, अतिशय सौम्य टोनरचा वापर करू शकता. तेलकट आणि मुरूम असेलल्या त्वचेवर टोनर चांगला परिणाम करतो.

मॉइश्चरायजर : उन्हाळ्याप्रमाणेच पावसातही मॉइश्चरायझिंग आवश्यक असते. मान्सूनमुळे शुष्क त्वचेवर डिमॉश्चरायजिंग प्रभाव पडू शकतो तसेच तेलकट त्वचेवर याचा ओव्हर हायड्रेटिंग प्रभाव पडतो. पावसात हवेत आर्द्रता असतानाही त्वचा पूर्णपणे डिहायड्रेट होऊ शकते. परिणामी त्वचा निस्तेज होऊन आपली चमक हरवून बसते.

सर्व प्रकारच्या त्वचेसाठी दररोज मॉश्चराइज करणे खूप आवश्यक असते. जर असे केले नाही तर त्वचेला खाज सुटू लागते. जर तुम्ही पाण्यात वारंवार भिजत असाल तर नॉन वॉटर बेस्ड मॉइश्चरायजरचा वापर करा. लक्षात ठेवा की जरी तुमची त्वचा तेलकट असली तरी रात्री तुम्ही वॉटर बेस्ड लोशनच्या पातळ थराचा वापर केला पाहिजे.

सनस्क्रीन : सनस्क्रीनचा वापर न करता घरातून बाहेर पडू नका. असेपर्यंत ऊन तुमच्या त्वचेला युवीए तसेच युवीबी किरणांपासून संरक्षणाची गरज भासेल. घरातून बाहेर पडताना कमीतकमी २० मिनिटे आधी २५ एसपीएफ असेलेले सनस्क्रीन लावा आणि दर ३ ते ४ तासांनी हे लावत राहा. सर्वसाधारणपणे हा चुकीचा समज असतो की सनस्क्रीनचा वापर फक्त तेव्हाच करावा, जेव्हा ऊन असते. ढगाळ/पावसाळी दिवसातील वातावरणामधील अल्ट्राव्हायोलेट किरणांना कमी लेखू नका.

शरीर कोरडे ठेवा : पावसात भिजल्यावर शरीर कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्द्रता असलेल्या हवेत शरीरावर अनेक प्रकारचे किटाणू वाढीस लागतात. जर तुम्ही पावसाच्या पाण्यात भिजला असाल तर स्वच्छ पाण्याने आंघोळ करा. घरातून बाहेर पडताना पावसाचे पाणी पुसायला जवळ काही टिश्यू किंवा छोटा टॉवेल बाळगा.

त्वचेची देखभाल : चमकत्या तसेच डागविरहित त्वचेसाठी त्वचारोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार स्किन ट्रीटमेंट घेत राहा. पील्स तसेच लेजर ट्रीटमेंटसाठी मान्सून हा सर्वात चांगला मोसम असतो, कारण सूर्याची किरणे बहुतांशवेळा नसल्यामुळे उपचार केल्यानंतर विशेष देखभाल करावी लागत नाही.

मान्सूनमध्ये केसांची देखभाल

* जर पावसात केस भिजले असतील तर जितक्या लवकर शक्य होईल तेवढे माइल्ड शॅम्पूने केस धुवा. केसांना जास्त काळ पावसाच्या पाण्याने ओले ठेवू नका, कारण त्यात रसायनांचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते.

* डोक्याचे सुकेच मालिश करा जेणेकरून रक्ताभिसरण व्यवस्थित होईल. आठवडयातून एकदा कोमट तेलाने डोक्याला मसाज करणे चांगले असते, पण जास्त वेळ तेल केसांत राहू देऊ नका म्हणजे काही तासांतच ते धुवून टाका.

* दर दुसऱ्या दिवशी केस धुवावेत. जर लहान केस असतील तर तुम्ही ते रोज धुवू शकता. केस धुण्यासाठी अल्ट्राजेंटल किंवा बेबी शॅम्पू वापरणे अधिक चांगले असते. हेअर शॉफ्ट्सवर कंडिशनर लावल्याने केस मजबूत होतात.

* मान्सूनमध्ये हेअर स्प्रे किंवा जेलचा वापर करू नका, कारण हे स्कॅल्पला चिकटू शकतात आणि त्यामुळे कोंडा होऊ शकतो. ब्लो ड्राय करणेही या दिवसांत टाळा. जर रात्री केस ओले असतील तर त्यांना कंडिशनर लावून ब्लोअरच्या थंड हवेने सुकवा.

* पातळ, वेव्ही आणि कुरळया केसांत अधिक ओलावा शोषला जातो. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे स्टायलिंग करण्याआधी ह्युमिडिटी प्रोटेक्टिव्ह जेल वापरावे.

* आपल्या केसांच्या प्रकारानुसार हेअर केअर उत्पादनांची निवड करा. साधारणपणे गुंतलेले, कोरडे आणि रफ केस हे हेअर क्रीम लावून सरळ करता येतात.

* मान्सूनमध्ये हवेत अधिक आर्द्रता आणि ओलावा असल्याकारणाने कोंडा ही एक कॉमन समस्या असते. त्यामुळे आठवडयातून एकदा चांगल्या अँटी डँड्रफ शॅम्पूचा वापर करावा.

* मॉन्सूनमध्ये पाण्यात क्लोरिनचे प्रमाणही अधिक असते, जे केसांना ब्लीच करून खराब करू शकते. त्यामुळे शक्य असल्यास केस पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.

* पावसाचा मोसम हा केसांत उवा होण्यासाठीही अनुकूल असतो. जर केसांत उवा झाल्या असतील तर परमाइट लोशन वापरा. १ तास डोक्याला लावून ठेवा आणि मग धुऊन टाका. ३-४ आठवडे असे करत रहा.

मान्सून स्पेशल : काय करावे की मेकअप टिकून राहील

* भारती तनेजा, डायरेक्टर ऑफ एल्प्स ब्युटी क्लिनिक अँड अकॅडमी

पावसाळयात ना केवळ आपले केस चिपचिपे होऊ शकतात तर तुमचा सुंदर मेकअपही बिघडू शकतो. थोडा विचार करा, पावसाळयात तुम्ही छान तयार होऊन पार्टीसाठी निघाला आहात आणि अचानक पाऊस सुरु झाला, तर तुमचा सगळा मेकअप पावसात भिजून निघून जाईल.

या समस्या दूर करण्यासाठी या मोसमात मेकअप करण्याचे काही उपाय :

क्लिनिंग

मान्सूनमध्ये त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी चेहरा नियमित धुवा. चेहरा धुतल्यावर १० मिनिटांनी त्यावर बर्फ चोळा. यामुळे मेकअप अधिक काळ टिकून राहतो आणि यासोबतच मान्सूनमध्ये निस्तेज त्वचेलासुद्धा उजाळा मिळतो.

जर तुमची त्वचा ऑयली असेल तर ऐस्टिंजैंटचा वापर करा, ज्यांची त्वचा सामान्य अथवा रुक्ष असेल त्यांनी या ऋतूत चेहरा धुतल्यावर टोनरचा वापर करावा.

प्रायमर

जर तुमच्या चेहऱ्यावर डाग आणि हलके खड्डे किंवा पुरळ असेल तर प्रायमर लावा, कारण असे करणे या ऋतूत उपयुक्त असते. प्रायमर त्वचेच्या पृष्ठभागाला समान करते, ज्यामुळे मेकअप जास्त वेळ टिकून राहतो, पण ज्यांना ही समस्या नाही त्यांना प्रायमर लावायची आवश्यकता नाही.

मान्सूनमध्ये मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर जेली प्रायमरचा वापर करा. प्रायमर लावून २-३ मिनिटं तसेच राहू द्या. त्यानंतर पुढची स्टेप करा. यामुळे प्रायमर जास्त वेळ टिकते. पावसाळयात कंसिलर लावणे टाळा, कारण पावसाळयाचा धामधूम करणारा ऋतू चेहऱ्यावर कंसिलर टिकू देणार नाही. तरीही तुम्हाला कंसिलर लावायची अतिशय गरज भासली तर क्रेयॉन कंसिलरचा पर्याय निवडा.

आयशॅडो

मान्सूनदरम्यान आपल्या आयाब्रोज नेहमी सेट ठेवा आणि आयब्रो पेन्सिलचा वापर चुकूनही करू नका. अशा दिवसात पेन्सिल पुसली जायची शक्यता असते. शक्य असेल तर आयशॅडोचासुद्धा वापर करू नका, जर करावाच लागला तर आयशॅडोमध्ये क्रीमऐवजी पावडरचा वापर करा. जेणेकरून ते वितळून आपल्या चेहऱ्याला खराब करणार नाही. हे क्रीम आयशॅडोच्या तुलनेत जास्त वेळ टिकते, यातसुद्धा अनेकदा नॅचरल शेड्स जसे पिंक वा ब्राऊन वापरा. पापण्यांवर वॉटरप्रुफ मस्कारा लावा. हा जास्त वेळ टिकेल. मान्सूनमध्ये काळया मस्कऱ्याऐवजी रंगीत लाइनसहित पारदर्शक मस्कारा लावा.

लिपस्टिक

लिपस्टिक तुमच्या चेहऱ्यावरचा इलनेस दूर करते. मित्रांना भेटायचे असेल वा आऊटींगला जायचे असेल तर उत्तम ब्रॅड व आपल्या स्किन टोननुसार शेड लावा पण त्यावर लिप ग्लॉस लावू नका, कारण लिप ग्लॉस सहज नाहीसे होते. (पर्याय म्हणून तुम्ही जास्त वेळ टिकणारे शीअर ग्लॉस लावू शकता.)

जर लिपस्टिक लावत नसाल तर आपल्या पर्समध्ये चांगल्या ब्रॅण्डचा लीप बाम अवश्य ठेवा. हे या दिवसात २-३ वेळा लावा, कारण फाटलेले ओठ लुक खराब करतात. म्हणून लीप बाम लावून ओठ मुलायम बनवा. लिपस्टिक बराच काळ टिकावी यासाठी आधी आपल्या ओठांवर पावडरचा हलका थर द्या. मग कापसाने जास्तीची पावडर झटकून टाका. हे तुमच्या लिपस्टिकसाठी योग्य बेसचे काम करते.

जर तुमचे ओठ पातळ असतील तर लिप लाईनच्या बाहेच्या बाजूने लिप लायनरचा वापर करा. जर तुम्हाला तुमचे ओठ पातळ दिसावे असे वाटत असेल तर ओठांच्या आत लिप लायनर लावा. लिपस्टिक लावल्यावर परत एकदा ओठांवर पावडरचा एक थर द्या.

फाउंडेशन

दमट हवामानात मेकअप घामासोबत वाहून जायची शक्यता असते. क्रीम फाउंडेशनऐवजी ऑइलफ्री माइश्चरायझरचा एक थर लावा. टचअपसाठी हलकी कॉम्पॅक्ट पावडर लावा. फाउंडेशच्या जागी मॉइश्चरायझरचासुद्धा वापर करता येतो.

मान्सूनमध्ये नेहमी याकडे लक्ष द्यायला हवे की तुमचे ब्लश व नेहमी सौम्य पण तुमच्या वेशभूषेला जुळणारे असावे. या काळात शिमरी ब्लश वापरू नये, कारण यामुळे चिपचिपा लुक दिसतो, शिवाय पाण्याच्या संपर्कात आल्यास वाहूनसुद्धा जातो. पावडर ब्लशऐवजी तुम्ही क्रीम ब्लश वापरू शकता. जर तुम्हाला थोडे रंग व उठाव हवा असेल तर क्रीम ब्लशवर पावडर ब्लश लावा जेणेकरून ब्लश गालांवर जास्त वेळ टिकून राहील, जे तुमच्या चेहऱ्यावरील चमक आणि रंग वाढवण्यासोबत सौंदर्यसुद्धा वाढवते.

हेअर सिरम

मान्सूनमध्ये चेहऱ्यानंतर केसांनाही खूप त्रास होतो, कारण या ऋतूत जास्त भिजणे व दमटपणामुळे स्कॅल्पमध्ये ओलसरपणा राहतो. त्यामुळे केस जास्त प्रमाणात तुटतात व ओलसरपणामुळे आपली चमक गमावून निर्जीव वाटू लागतात. म्हणून केसांवर सिरमचा वापर करा आणि केसांना गुंतण्यापासून दूर ठेवण्याकरिता त्याची वेणी अथवा अंबाडा बांधा.

मिस्टी स्प्रे

आपला चेहरा चमकदार व ताजातवाना दिसावा यासाठी मिस्टी स्प्रेचा वापर कमीतकमी १० ते १२ इंच अंतरावरुन करा. स्प्रे केल्यावर  ६ ते ७ सेकंद ते सेट होऊ द्या.

घरगुती टीप्स

* पावसाळयात रात्री त्वचेला टोन अवश्य करा. यासाठी एका लहान चमचा दुधात ५ चमेलीच्या तेलाचे थेंब मिसळा आणि हे मिश्रण चेहरा व मानेवर लावा.

* चिपचिप्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी चंदन पावडरमध्ये गुलाबजल मिसळून चेहरा, मान व दंडांवर लावा.

* त्वचेवर नैसर्गिक तेज येण्यासाठी मध आणि दही समान प्रमाणात मिसळून चेहरा व मानेवर  लावा. १५ मिनिटं ठेवल्यावर पाण्याने धुवा.

* जर त्वचा शुष्क असेल तर एक मोठा चमचा सायीत गुलाबजल चांगले एकत्र करून चेहरा व मानेवर लावा व  १५ मिनिट ठेवा आणि नंतर धुवून टाका.

मान्सून स्पेशल : मान्सून आणि अॅलर्जी

* डॉ. पी. के मल्होत्रा

पावसाळयाच्या दिवसांत थोडे जरी बेफिकीर राहिलात, तरी तुम्ही अॅलर्जी आणि इन्फेक्शनचे शिकार होऊ शकता. पावसाळा सुरू होताच, अनेक आजार आपल्यावर हल्ला करतात. त्याचबरोबर, त्वचा आणि डोळयांसंबंधी विकार डोके वर काढतात.

स्किन इन्फेक्शन

पाऊस सुरू होताच सर्वप्रथम त्वचेवर त्याचा विपरित परिणाम होतो. या काळात वातावरणात आर्द्रता अर्थात ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे बॅक्टेरिया, वायरस, फंगस वेगाने वाढू लागतात आणि हे त्वचेच्या संपर्कात आल्यास त्वचेला इन्फेक्शन होतं. अर्थात, या दिवसांत त्वचेला सर्वाधिक संक्रमणाची भीती कोणापासून असेल, तर ते आहे फंगस. पावसाळयाच्या दिवसांत सर्वात जास्त फंगस म्हणजेच शेवाळामुळे त्वचेला आजाराचं संक्रमण होते. अशा वेळी अनेक प्रकारचे स्किन डिसीझ होण्याची शक्यता असते.

रेड पॅच किंवा लाल चट्टे

फंगल इन्फेक्शनमुळे त्वचेला खासकरून काख, पोट आणि जांघांचे सांधे, तसेच स्तनांखाली गोल, लाल रंगाचे पपडी निघणारे चट्टे दिसू लागतात. त्यांना खूप खाज येते.

या समस्येपासून वाचण्यासाठी काख, ग्रोइन व शरीराच्या ज्या भागांमध्ये सांध्यांचा जोड आहे, तिथे अँटिफंगल पावडर लावा, जेणेकरून घाम आणि ओलावा एकत्र होणार नाही. वाटल्यास, मेडिकेटेड पावडरचा वापर करा.

हीट रॅशेज

या मोसमात जास्त घाम येतो, त्यामुळे त्वचेची रोमछिद्रं म्हणजेच स्किन पोर्स बंद होतात. त्यामुळे त्वचेवर लाल फोडया म्हणजेच घामोळं येतं. त्याला खूप खाज तर येते व जळजळही होते.

अशा वेळी प्रिकली हीट पावडर लावा, सैल आणि सुती कपडे वापरा. त्वचेच्या स्वच्छतेबाबत पूर्णपणे काळजी घ्या. घामोळे आलं असेल, तर कॅलामाइन लोशनचा वापर करा. त्यामुळे खाजेपासून आराम मिळेल.

पायांचे इन्फेक्शन

फंगल इन्फेक्शनमुळे पायांच्या बोटांमधील पेरांना संक्रमण होतं. खरं तर या मोसमात उघडया पायांनी ओल्या फरशीवर चालल्यास किंवा जास्त काळ पाण्याच्या संपर्कात राहिल्यास, त्यात असलेले फंगस बोटांना संक्रमित करतात. या संक्रमणामुळे बोटे लाल होऊन सुजतात आणि त्यांना खाज येऊ लागते. या संक्रमणामुळे रुग्णाला चालणंही कठीण होतं. या संक्रमणामुळे अनेकदा अंगठयांची नखं म्हणजेच टो नेल्स आणि इतर बोटांची नखंही संक्रमित होतात. या संक्रमणामुळे नखं खराब तर दिसतातच, शिवाय ती कमजोर होतात.

फूट आणि नेल इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी ओल्या फरशीवरून उघडया पायांनी चालू नका. पायांना जास्त काळ ओले ठेवू नका. खूप वेळ सॉक्स व बूट घालून राहू नका. कारण त्यामुळे घाम येतो आणि तो तसाच राहातो. त्यामुळे फंगल इन्फेक्शन होतं. या मोसमात सँडल्स आणि फ्लोटर्सचाच वापर करा. नखं वेळोवेळी कापत जा आणि त्यांच्या स्वच्छतेचीही काळजी घ्या. सुती मोजे वापरा.

साइट संक्रमण (रांजणवाडी)

पावसाळयात डोळयांना सर्वात जास्त त्रास साइट संक्रमणाचा होतो. या संक्रमणामुळे पापण्यांवर एक प्रकारची गाठ होते. त्यामुळे डोळयांना खूप वेदना होतात. हे संक्रमण बॅक्टेरियांचे डोळयांना संक्रमण झाल्यामुळे होते. गरम पाण्यात कपडा बुडवून शेकल्याने, तसेच २-३ तासांनी सतत डोळयांची सफाई केल्याने रुग्णाला आराम मिळतो.

याबरोबरच या मोसमात डोळे लाल होणं, त्यांची जळजळ, टोचल्यासारखे वाटणं आणि खाज येणं हा त्रासही नेहमीच उद्भवतो.

अॅथलीट फूट

हा आजार जास्त काळ दूषित पाण्यात राहाणाऱ्यांना होतो. या संक्रमणाची सुरुवात अंगठयाने होते. येथील त्वचा सफेद किंवा हिरवट होते. त्यात खाज येऊ लागते. अनेकदा या त्वचेतून दुर्गंधीयुक्त स्त्राव निघू लागतो.

अशा संक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी पाण्यातून बाहेर आल्यानंतर पाय गरम पाण्याने साबण लावून स्वच्छ धुवा. त्यानंतर ते चांगल्याप्रकारे कोरडे करा.

आय इन्फेक्शन

या दिवसांत हवेतील परागकण, धुलीकण व इतर अॅलर्जिक गोष्टींमुळे डोळयांना इन्फेक्शन होऊन ते लाल होतात. याला अॅलर्जिक कंजक्टिवायटिस म्हणतात. यामुळे डोळयांना सूज येते. डोळयांतून पाणी येत नसले, तरी त्यांना खूप खाज येते. या त्रासापासून वाचण्यासाठी अॅलर्जिक गोष्टींपासून स्वत:चं संरक्षण करा. थोडया-थोडया वेळाने डोळयांत आयड्रॉप टाका.

अस्थमा

पावसाळी हवेत परागकण व फंगससारखे अॅलर्जन असल्यामुळे अस्थमाचा त्रास वाढतो. पावसाळयात अस्थमा बळावण्याची अनेक कारणं आहेत :

विजेच्या कडकडाटासह पाऊस पडल्यास, या मोसमात रुग्णाला अस्थमाचा अॅटॅक येतो. या मोसमात वेगाने वारे वाहात असल्यामुळे मोठया प्रमाणात फुलांतील परागकण बाहेर पडून हवेत मिसळतात. ते श्वासासोबत रुग्णाच्या शरीरात प्रवेश करतात. परिणामी, रुग्णाचा त्रास आणखी वाढतो.

* या मोसमात ह्युमिडिटी म्हणजेच आर्द्रता वाढल्यामुळे फंगल स्पोर्स किंवा मोल्ड्स वेगाने वाढतात. हे फंगस किंवा मोल्ड्स दम्याच्या रुग्णासाठी खूप स्ट्राँग अॅलर्जन असतात. अशा वेळी वातावरणात यांचं प्रमाण वाढणं अस्थमा रुग्णांसाठी त्रासाला आमंत्रण देण्यासारखं असतं. याच कारणामुळे या मोसमात दम्याचे सर्वाधिक अॅटॅक येतात. पावसामुळे हवेत सल्फरडायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइडचं प्रमाण वाढतं. परिणामी, वायुप्रदूषणात वाढ होते. हे सल्फरडायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइड दम्याच्या रुग्णांवर सरळ हल्ला करतात. त्यामुळे त्यांचा त्रास वाढतो. पावसाळयात गाडयांमुळे होणारे वायुप्रदूषण सहजपणे नष्ट होत नाही. त्यामुळे अस्थमाच्या अॅटॅकचा धोका वाढतो.

* पावसाळयात कुत्रा, मांजर यांसारखे प्राणी घरातच असतात. पावसामुळे त्यांचं बाहेर जाणं कमी होतं. परिणामी, त्यांच्या केसांतील कोंडयाचं प्रमाण वाढतं. हा कोंडा अस्थमा रुग्णांसाठी त्रासदायक ठरतो.

* पावसाळयात व्हायरल इन्फेक्शनमध्ये वाढ होते. त्यामुळे दम्याची लक्षणं वाढतात.

या मोसमात अस्थमापासून संरक्षण करण्यासाठी खालील काळजी घ्या :

* या काळात नियमितपणे दम्याचं औषध घेत राहा. ज्यांना गंभीर प्रकारचा अस्थमा आहे, त्यांनी इन्हेलरद्वारे घेतलं जाणारं औषध घेत राहा. जेणेकरून, त्यांच्या वायुनलिकांमध्ये सूज येणार नाही.

* आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी आणि ओलसर जागांना वेळीच कोरडे व हवेशीर बनवा.

* गरज वाटल्यास एअर कंडिशनचा वापर करा.

* नियमितपणे बाथरूमची सफाई करा. सफाईसाठी क्लीनिंग उत्पादनांचा वापर करा.

* वाफेला बाहेर काढण्यासाठी एक्झस्ट फॅनचा वापर करा.

* या दिवसांत इनडोअर प्लाण्ट्सना बेडरूमच्या बाहेर ठेवा.

* बाहेरील स्रोत उदा. ओली पानं, बागेतील गवत, कचरा यापासून दूर राहा. कारण तिथे शेवाळ असण्याची शक्यता असते.

* फंगसला नष्ट करण्यासाठी ब्लीच आणि डिटर्जंट असलेल्या क्लीनिंग सोल्युशनचा वापर करा.

* ज्या वेळी सर्वात जास्त परागकण हवेत पसरलेले असतील, त्यावेळी सकाळीच बाहेर जाणं टाळा.

* फरच्या उशा आणि बेडचा वापर टाळा.

* आठवडयातून एकदा गरम पाण्याने चादरउशांची कव्हर्स स्वच्छ करा.

* या दिवसांत गालिचा अंथरू नका. जर गालिचा अंथरलेला असेल, तर त्याला साफ करताना मास्कचा वापर अवश्य करा.

* घरात धूळ साचणार नाही, या गोष्टीची काळजी घ्या. ओल्या कपडयाने लँपशेड व खिडक्यांच्या काचांना स्वच्छ ठेवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें