लेहंग्यात सजलेली नववधू

* भारती तनेजा

जेव्हा सौभाग्याचे तेज हातांवर लावलेल्या मेहेंदीपासून शरीरावर शोभणाऱ्या लेहंग्यापर्यंत पसरते, तेव्हा कुणाचे तरी होणार असल्याच्या भावनेतूनच रूप खुलते. जी बाब लेहंग्यात आहे, ती इतर कुठल्या पेहरावात कशी असेल. विवाह सोहळयात नववधूच्या लेहंग्यासह मेकअपसाठी कोणत्या गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे, हे ऐल्पस ब्युटी क्लिनिक आणि अकॅडमीच्या संस्थापक भारती तनेजा यांच्याकडून जाणून घेऊया.

स्ट्रेट कट लेहंगा

बर्ड ऑफ पॅराडाईज मेकअप स्ट्रेट कट लेहंग्यावर सूट होतो. ही नवी स्टाईल आहे, जी स्मोकी आय किंवा कॅट आय मेकअपचे सुधारित वर्जन आहे. हा आय मेकअप करण्यासाठी जास्त रंगांचा भरपूर वापर केला जातो. तुम्हाला हा रंग जास्त गडद वाटत असेल तर त्याला काळया रंगासोबत आकर्षक बनवता येईल. असे लुक मिळवण्यासाठी निऑन किंवा गुलाबी रंगाऐवजी मोरपिशीसारख्या रंगाची निवड करा.

मेकअप करताना या गोष्टीकडे लक्ष द्या की हे रंग एकसारखे नसावेत. यासाठी नरिशिंग मॉइश्चरायजरने चेहरा आणि मानेवर मसाज करा. गाल आणि कपाळाच्या वरील भागावर कंटुरिंगसाठी गडद शेड लावा. डोळयांखाली करेक्टर लावा.

चेहऱ्याच्या बहुतांश भागावर फाउंडेशन लावा. ओल्या स्पंजच्या मदतीने ते एकसमान पसरवा. गालांच्या वरील भागावर हायलायटर लावा आणि गालांच्या फुगीर भागावर गुलाबी ब्लश लावा. नॅचरल लुकसाठी ते एकसमान पसरवा. गडद शेडच्या जांभळया रंगाच्या आयशॅडोला पेन्सिल ब्रशच्या मदतीने पंखांच्या आकाराप्रमाणे लावा. याची सुरुवात लॅशलाईनपासून करून ते डोळयांच्या बाहेरील भागापर्यंत लावा आणि त्यानंतर तुमच्या नॅचरल क्रीझ लाईनपर्यंत न्या. पापण्यांच्या मधोमध चमकदार निळी आयशॅडो लावा. निळयातील गडद शेड घ्या आणि जांभळया व चमकदार निळया आयशॅडोला एकजीव करण्यासाठी त्याचा वापर करा. खालच्या लॅशलाईनवर गुलाबी किंवा जांभळी आयशॅडो लावा. तर खालच्या वॉटरलाईनवर काजळ लावा. गुलाबी न्यूड लिप कलरने आपला लुक कम्प्लिट करा.

अनारकली लेहंगा

अनारकली लेहंग्यासोबत पारंपरिक लुकमधील मेकअप खूपच शोभून दिसतो. पारंपरिक मेकअपसाठी काजळ खूप गरजेचे आहे. जर एखाद्या डे इव्हेंटसाठी साधा अनारकली लेहंगा घातला असेल तर बेसिक आयलायनर लावल्यानंतर खालच्या लॅशलाईनवर काजळ लावा.

रात्रीचा इव्हेंट असेल तर स्मोकी आईज मेकअपसाठी डार्क काजळ लावून सौंदर्यात भर घालता येईल. पारंपरिक पेहेरावासोबत जी ज्वेलरी घालणार असाल त्याला अनुसरून मेकअप करणे गरजेचे आहे.

हेवी गोल्ड ज्वेलरीसोबत हायलाइट मेकअप जसे की ग्लिटरी ड्रेमेटिकल मेकअप करणे सौंदर्याच्या पायाभूत नियमांच्या विरुद्ध आहे. पारंपरिक लुकसाठी ब्लश केलेला चेहरा चांगला दिसतो.

यासाठी मेकअप करण्यापूर्वी चेहरा क्लीन करून त्याला फ्रेश लुक द्यायला हवा. पारंपरिक लुकसाठी फिक्या शेडऐवजी उठावदार रंगाची लिपस्टिक खुलून दिसते.

फिश कट लेहंगा

फिश कट लेहंग्यासोबत न्यूड मेकअप करून तुम्ही उजळ आणि आकर्षक लुक मिळवू शकता. न्यूड मेकअप तुमच्या त्वचेला एकसारखा पोत देतो. मेकअप बेस जितका न्यूट्रल असेल तितक्या तुम्ही सुंदर दिसाल. डार्क स्किनच्या न्यूड मेकअपसाठी ब्रोंज गोल्डन कलरची लिपस्टिक तुम्हाला चमकदार लुक देईल. डार्क स्किन टोनवर गोल्डन बाऊन आयशॅडोसोबत पिंक ब्राऊन शेडमधील ब्लशर वापरा. मिडियम स्किनवरील न्यूड मेकअपसाठी मोव कलरची लिपशेड खुलून दिसते. अशा प्रकारच्या त्वचेसाठी पेल गोल्डन ब्राऊन आयशॅडोसह पिंक ब्राऊन कलरचे ब्लश करा. हे तुम्हाला नॅचरल लुक देईल.

फेअर स्किनच्या न्यूड मेकअपसाठी गालांवर हनी अॅप्रिकोट कलरचे ब्लश लावा. कपाळावर लाईट कलरच्या शिमरी आयशॅडोचा वापर करा. ओठांना मॅट लावू नका किंवा ओव्हरग्लॉसी होऊ देऊ नका. तुम्ही क्रीम बेस्ड लिपशेड किंवा लिपबाम वापरू शकता. यामुळे तुमचा चेहरा अधिकच खुलून दिसेल. नॅचरल मेकअपसह मोकळे सोडलेले सिल्की केस, छोटीशी बिंदी आणि मांगात सजवलेली भांगपट्टी हा लग्नाच्या दिवशी तुमचा परफेक्ट लुक ठरेल.

हेवी वर्क लेहेंगा

यासोबतच तुम्ही अरेबिक मेकअप ट्राय करू शकता. अरेबियन लुकमध्ये डोळयांचा मेकअप सर्वात महत्त्वाचा असतो. यात डोळयांचा मेकअप खूपच व्हायब्रंट आणि कलरफूल केला जातो. डोळयांना आकर्षक बनवण्यासाठी त्यांच्या आतील कॉर्नरवर सिल्वर, मध्यभागी गोल्डन व बाहेरील कॉर्नरवर गडद रंगाचे आयशॅडो लावतात. त्यानंतर कट क्रीझ लुक देऊन काळया रंगाने डोळयांच्या आजूबाजूला कंटुरिंग केले जाते. यामुळे डोळे स्मोकी, मोठे व आकर्षक दिसतात. आयब्रोजखाली पर्ल गोल्ड शेडने हायलायटिंग करतात. डोळयात चमक दिसण्यासाठी पापण्यांवर ग्लिटर्स लावतात.

डोळयांना सेन्सुअल लुक देण्यासाठी पापण्यांवर आर्टिफिशिअल लॅशेज नक्की लावा. लॅशेज आयलॅश कर्लरने कर्ल करून मस्काऱ्याचा कोट लावा, जेणेकरून हे नैसर्गिक भासतील. वॉटर लाईनवर ठळकपणे काजळ लावून डोळयांचा मेकअप पूर्ण करा.

ब्रायडल ज्वेलरी काय आहे खास

* पूजा भारद्वाज 

लग्नाच्या शॉपिंग लिस्टमध्ये लेहंग्यानंतर दुसरा नंबर ब्रायडल ज्वेलरीचाच असतो आणि जेव्हा इंडियन ब्रायडल लुकची गोष्ट येते, तेव्हा त्यात ज्वेलरीची वेगळीच शान असते. तसेही मार्केट दागिन्यांनी भरलेले आहे, परंतु योग्य ज्वेलरीनेच परफेक्ट ब्रायडल लुक मिळतो. त्यामुळे दागिन्यांची खरेदी करण्यासाठी बाजारात जाण्यापूर्वी आणि शोरूमच्या फेऱ्या मारण्यापूर्वी दागिन्यांच्या वेगवेगळ्या डिझाइन आणि पॅटर्नबाबत जरूर जाणून घ्या.

रवि कपूर ब्रायडल ज्वेलरी रेंटवर देतात. त्यांचं म्हणणं आहे की आजकाल बाजारात कुंदन, पोल्की व रिवर्स अॅडी खूपच ट्रेंडमध्ये आहे. दुसरीकडे काही वधूंना राणीहार घ्यायलाही आवडतो. पण आपण ज्याची निवड कराल, ती खूप विचारपूर्वक करा. जेणेकरून आपल्याला परफेक्ट ब्रायडल लुक मिळेल.

जी.जे. इंटरनॅशनलचे अभिज्ञान वर्मा सांगतात, ‘‘आजकालच्या वधू सब्यसाची व हजूरीलाल ज्वेलरीची कॉपी मागतात. त्याचबरोबर, त्यांना पद्मावत व महाराणी कलेक्शन पाहायलाही आवडतं. लग्नाबरोबरच साखरपुडा, मेंदी व कॉकटेल पार्टीसाठी इंग्लिश ज्वेलरीलाही खूप मागणी आहे. त्यात डायमंड लुकचा फ्लोरल सेट व व्हाइट डायमंड फॅशनमध्ये आहे. याबरोबरच आपण पेस्टल कलरचा लेहंगा घालणार असाल, तर मिंट कलर मीनाकारी किंवा पिंक कलर मीनाकारीची ज्वेलरी आपल्यावर खुलून दिसेल.’’

ज्वेलरी फॅशनच्या या बदलत्या ट्रेंड्सवरही नजर ठेवा :

राणीहार

जर आपल्याला आपल्या लग्नात ट्रेडिशनल लुक हवा असेल, तर राणीहार आपल्यासाठी एक योग्य पर्याय आहे. हा एक हार आपल्या लुकला रॉयल आणि एलिगंट बनवतो. अर्थात, याच्या नावावरूनच कळून येतं की राणीहार. हा खूप मोठा व भव्य असतो. यात मोत्यांच्या माळांमध्ये सोन्याच्या तुकड्यांची डिझाइन बनवलेली असते. हा हार घालून आपण स्टनिंग दिसू शकता.

चोकर्स

हा ज्वेलरी ट्रेंड यावर्षीही खूप प्रचलित आहे. ट्रेडिशनल ड्रेस असो किंवा वेस्टर्न दोन्हीसोबत हा खूप शोभून दिसतो. बहुतेक वधू आजकाल चोकरला प्राधान्य देत आहेत, कारण हा खूप हलका आणि दिसायला स्टाइलिश दिसतो. खरे पाहिलं तर चोकर कंफर्ट आणि स्टाइलचा अद्भुत मेळ आहे. हा कुंदन, पोल्की व गोल्ड प्रत्येक व्हरायटीमध्ये बाजारात उपलब्ध आहे.

कुंदन सेट

कुंदन कोणत्याही प्रसंगी उत्तम आहे आणि हा एक असा ज्वेलरी ट्रेंड आहे, जो कधी फॅशनमधून बाहेर जात नाही. आजही या ज्वेलरीची क्रेझ कमी झालेली नाही. ब्राइडचा लुक ज्वेलरीशिवाय अपूर्ण आहे आणि कुंदन ज्वेलरी या लुकला पूर्ण करते. नुकतेच अंबानी कुटुंबातील विवाह सोहळ्यात कुंदन ज्वेलरीचा बोलबाला पाहायला मिळाला.

लेयरिंग नेकलेस

वेडिंग ज्वेलरीमध्ये लेयरिंग नेकलेसबाबत बोलायचं, तर हा आजकाल ट्रेंडमध्ये आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा लग्नाच्या लाल पेहरावात लेयरिंग नेकलेस घालून खूप सुंदर दिसत होती. तसेच आपण ईशा अंबानीला लेयरिंग नेकलेसमध्ये पाहिलं असेल, तर तिच्यावरही तो खूप खुलून दिसत होता. ही ज्वेलरी नक्कीच आपल्याला एकदम हटके लुक देईल.

पोल्की

पोल्की ब्रायडल ज्वेलरीही खूप ट्रेंडमध्ये आहे. मुलींना ती आपल्या लग्नात घालायला खूप आवडते. पोल्की ज्वेलरीवर केलेली मीनाकारी याच्या सुंदरतेला आणखी खुलवतात आणि जेव्हा आपण ही घालून येता, तेव्हा लोकांच्या नजरा आपल्यावर खिळल्याशिवाय राहत नाहीत.

पारंपरिक पोशाखाला फ्यूजनचा तडका

* प्राची भारद्वाज

आजकाल फ्जुजन वेअरची बरीच चलती आहे. फ्युजन वेअर म्हणजे दोन भिन्न संस्कृतींचा मेळ घालत तयार केलेला पोशाख. जसे की भारतीय पोशाख आणि विदेशी कपडयांचा सुंदर मिलाफ. म्हणजे असे समजा की विदेशी गाऊनवर भारतीय भरतकाम किंवा काचांचे काम अथवा ट्यूब टॉपसोबत राजस्थानी घागरा. फ्युजन पोशाखाने भारतीय फॅशनच्या दुनियेत नवी खळबळ उडवली आहे. नेहमीच नवे क्रिएटिव्ह पेहराव समोर येत आहेत.

ऐका फॅशनच्या दुनियेतील गुरू काय सांगतात

अमित पांचाळ, श्रीबालाजी एथ्निसिटी रिटेलचे डायरेक्टर सांगतात की महिला पारंपरिक पोशाखांकडून फ्युजन वेअरच्या दिशेने वेगाने जात आहेत. जास्तीतजास्त २२ ते २३ वर्षांपर्यंतच्या तरुणी अशाप्रकारची फॅशन करण्यात पुढे असतात. अशा पोशाखांच्या स्पर्धेत सर्वात पुढे आहे तो साडीसोबत ऑफशोल्डर ब्लाऊज, धोती पॅण्टसह क्रॉपटॉप किंवा मग घागरा अथवा साडीसोबत जॅकेट.

‘स्टुडिओ बाई जनक’च्या डायरेक्टर वैंडी मेहरा सांगतात की फ्युजन वेअर हे फॅशन करू इच्छिणाऱ्यांसोबतच आजच्या महिला ज्यांना फॅशनसोबतच आरामदायी पोशाख आवडतो त्यांच्यासाठीही आहे.

आपलीशी करा नवी फॅशन

काही फ्युजन वेअर जे तुम्हीही परिधान करू शकता :

* घागऱ्यावर पारंपरिक चोळी घालण्याऐवजी तुम्ही फॉर्मल शर्ट घालू शकता. याच्यासोबत ऑक्सिडाईज्ड दागिने शोभून दिसतात. घागऱ्यासोबत टँक टॉप किंवा हॉल्टर नेक टॉपही एक चांगला पर्याय आहे. हा आता पारंपरिक घागरा चोळीचा पर्याय ठरत आहे.

* जंपसूटची खूपच फॅशन आहे. या विदेशी पोशाखाला देशी तडका देण्यासाठी तो सुती कपडयात तयार केला जाऊ शकतो. याशिवाय या पोशाखाला एखाद्या पंजाबी ड्रेससारखे परिधान करून सोबत रंगीत दुपट्टा घेऊन तो आणखी खुलवता येईल. याच्यासोबत दागिने असतील तर आणखीनच चांगले.

* कुर्ता ड्रेस हे नवे फ्युजन आहे. लांब कुर्ता मॅक्सीसारखा घाला किंवा अनारकली कुर्ता चुडीदार सलवारशिवाय घाला. ऑप्शन म्हणून पाश्चिमात्य गाऊनवर विविध प्रकारचे भारतीय भरतकामही करता येऊ शकते.

* धोती पँटची स्टाईल ही लैगिंग किंवा मिनी स्कर्टलाही मात देऊ शकते. हा सेक्सी पोशाख तेव्हा जास्तच खुलून दिसतो जेव्हा तो क्रॉप टॉपसोबत परिधान केला जातो.

* फ्युजन साडीने फॅशनच्या दुनियेत खळबळ माजवली आहे. बॉलिवूड सौंदर्यवतींसह सर्वसामान्य महिलाही पारंपरिक साडीसोबत नवे प्रयोग करू लागल्या आहेत. आजकाल रफल साडीचा सर्वत्र बोलबाला आहे.

* ब्लाऊजच्या विविध डिझाईनबाबत तर विचारूच नका. बॅकलेस ही तर कालची गोष्ट झाली. बदलत्या जगात ब्लाऊजचे नवे नवे कट जसे की काही जॅकेटसारखे तर काही कोटस्टाइल, काहींमध्ये पुढून कट तर काही मागून लांब गळयाचे अशा ब्लाऊजची चलती आहे. क्रिएटिव्हिटीची येथे अजिबात कमतरता नाही.

फ्युजनचा प्रभाव केवळ भारतातच पाहायला मिळतो असे नाही तर विदेशातील फॅशन डिझायनरवरही भारतीय पेहराव भूरळ घालत आहेत. ब्रिटन डिझायनर जॉन गॅलियानो सिल्क साडीवर छोटे जॅकेट घालून पाहायला मिळतात तर प्रसिद्ध मॉडेल नाओमी कँपबेल, न्यूयॉर्कमध्ये एमटीव्ही, म्युझिक अवॉर्डवेळी साडी नेसून आली होती.

पारंपरिक पोशाखात ऑफशोल्डर ब्लाऊज, पोंचू स्टाईलचा टॉप किंवा मग एकाच बाजूचा कुर्ता असे फ्युजन वेअरचे काही प्रचलित ट्रेंड आहेत. फ्युजन वेअरवर केवळ महिलांचा अधिकार आहे असे मुळीच नाही. पुरुषही आता जीन्सवर कुर्ता घालू लागले आहेत.

साडी ड्रेपिंग नो टेंशन

– तोषिनी

तसं बघता साडी नेसणं ही एक अंगभूत कला आहे, पण जर याच्याशी निगडित महत्वपूर्ण गोष्टी आणि ट्रिक्स शिकून घेतल्या, तर याहून सोपं दुसरं काम नाही.

मुंबईची फेमस सेलिब्रिटी साडी ड्रेपर डॉली जैन काही सोप्या उपायांद्वारे साडी ड्रेपिंग या कलेची ओळख करून देत आहे :

* डॉली सांगते की साडी ३ स्टेप्समध्ये नेसली जाते. सर्वात आधी साडी बेसिक खोचून घ्यायला हवी. त्यानंतर साडीचा पदर काढायला लागतो. लक्षात घ्या की जितका लांब साडीचा पदर असणार, तितत्या उंच तुम्ही दिसणार. पदराला खांद्यावर सेट केल्यानंतर कंबरेपर्यंत घेऊन या आणि मग कंबरेजवळ निऱ्या करून त्या आत खोचा.

* जर तुम्हाला सकाळीच साडी नेसून जायचं असेल, तर रात्रीच साडीचा पदर सेट करून तो पिनअप करून घ्या आणि हँगरला लावून ठेवा. यामुळे साडी नेसताना तुमचा अर्धा वेळ वाचेल.

* सिल्कची साडी नेसताना ब्रॉड निऱ्या काढायला हव्या, जर तुम्ही याची नॅरो निरी काढाल, तर त्याने तुमचं पोट फुगलेलं दिसेल, ज्यामुळे तुमचा लुक बिघडू शकतो.

* जास्त वजन असलेल्या महिलांनी नेटची साडी नेसणं टाळावं, नेटची साडी शरीराच्या शेपला पूर्णपणे कवर करते, ज्यामुळे लठ्ठपणा ठळकपणे दिसून येतो.

* लग्नविधीच्या दरम्यान गुजराती स्टाइलची साडी तुमच्यासाठी खूप आरामदायी ठरेल. या स्टाइलमध्ये साडीचा पदर समोरच्या बाजूला असतो. ज्यामुळे तुम्ही त्याला चांगल्याप्रकारे सांभाळू शकता.

* साडीबरोबर कंबरपट्टा लावायची पद्धत खूप जुनी आहे, पण आजकाल साडीवर लेदर बेल्ट आणि राजस्थानी तगडी घालायची फॅशन आहे. डॉली सांगते की तगडी एक प्रकारचा कंबरपट्टा आहे, जो कंबरेच्या एका बाजूला लावला जातो.

साडी नेसण्याआधी ही काळजी घ्या

आजकाल तरूणी साडीसोबत डिझायनर ब्लाउज घालणं पसंत करतात, ज्याची किंमत जवळ जवळ साडी इतकीच असते. डॉलीच्या मते, अशा महागड्या ब्लाऊजची काळजी घेण्यासाठी अंडरआर्म्स पॅड लावले पाहिजेत. हे पॅड्स घाम थांबविण्यात मदत करतात आणि ब्लाउजला आपल्या जागेवरून हलू देत नाहीत. अशाप्रकारे तुम्ही कंफर्टेबलदेखील राहाल आणि घामाने तुमचा ब्लाउज खराबही नाही होणार.

मरमेड स्टाइल साडी ड्रेपिंग

डॉलीच्या म्हणण्यानुसार मरमेड स्टाइलची फॅशन आजकाल अधिक प्रचलित आहे. कारण ही स्टाइल साडी नेसायच्या पारंपरिक पद्धतीमध्ये आधुनिकतेचं मिश्रण आहे. लग्न, पार्टीसारख्या समारंभात स्त्रिया ही स्टाइल कॅरी करू शकतात. या स्टाइलला फॉलो करायच्या स्टेप्स खालील प्रमाणे आहेत :

* साडीचं एक टोक खोचून एक पूर्ण राउंड रॅप करावी.

* लक्ष ठेवा साडी जमीनीपासून जवळजवळ १ इंच वर राहील.

* साडी जमिनीपासून जवळपास १ इंच असेल याची काळजी घ्या.

* आता साडीच्या दुसऱ्या टोकापासून पदराच्या प्लेट्स बनवा.

* पदराच्या प्लेट्स मागून पुढच्या बाजूला आणताना डाव्या खांद्यावर ठेवा.

* पदर हा फ्लोरपासून जवळपास ५ इंच वर राहीला पाहिजे.

* साडीचा बाकी भाग आता खोचून घ्या.

* लेटसचं एका बाजूचं टोक पकडून कंबरेच्या मागून फिरवून पुढे आणा आणि कमरेच्या थोडा खाली पिन लावा.

* या स्टाइलसाठी कॉन्ट्रक्स्ट कलरच्या पदराच्या साडीची निवड करा.

विंटर वेडिंगसाठी ब्रायडल डे्सेस

– शिखा जैन

लग्नाच्या तयारीत नववधूचे पेहराव सर्वाधिक महत्त्वाचे असतात. लेटेस्ट फॅशन, उत्तम डिद्ब्राइन, बजेट, रंग या सर्व गोष्टी लक्षात घेऊन वधूचे कपडे निवडले जातात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी ब्रायडल वेअरमध्ये कोणते नवीन टे्रंड आहेत हे सांगत आहेत फॅशन डिझायनर अनुभूति जैन.

लहंगा चोली : ही स्टाइल विंटरसाठी एकदम नवीन आणि परफेक्ट आहे. वधूसाठी हा एकदम कम्फर्टेबल पेहराव आहे. हा आउटफिट अशा वधूंसाठी आहे, ज्यांना थंडीच्या दिवसातही गरम राहायचं आहे. यामध्ये ब्लाऊजसोबत लाँग किंवा शॉर्ट जॅकेट असतं. यामुळे जॅकेटला रॉयल लुक येतो.

लहंगा विद टेल : यामध्ये लहंग्याचा घेर मागच्या बाजूने जास्त असतो आणि जमिनीवर लोळत असतो. त्यामुळे लहंगा मागच्या बाजूने कोणीतरी पकडावा लागतो. यामुळे वधूच्या चालण्यात ऐट येते.

जॅकेट लहंगा : हा बराचसा शरारासारखाच असतो आणि यामध्ये लहंग्यावर एक हेवी जॅकेट असतं. यामुळे पूर्ण लहंग्याला हेवी लुक येतो. हे जॅकेट लहंग्याच्या रंगाचं किंवा कान्ट्रॉस्ट रंगाचंही असू शकतं.

नेटचा लहंगा : तुम्हाला गुलाबी रंग आवडत असेल तर तुम्हाला बारीक हस्त कलाकुसर असलेला नेटचा लहंगा शोभून दिसेल. यासोबत पूर्ण बाह्यांचा ब्लाऊज चांगला वाटेल. यामध्ये सोनेरी तारेनं काम केलेलं असतं आणि यामुळे लहंग्याला सोन्याची चमक मिळते.

लहंगा विद मिरर अॅन्ड क्रिस्टल : या संपूर्ण लहंग्यावर काचांची नक्षी असते. यामुळे लहंग्याची चमक वाढते. लग्नाच्या दिवशी वधूला सर्वात वेगळं दिसायचं असतं. त्यामुळे अशा प्रकारचा लहंगाही घेतला जाऊ शकतो.

लाँग स्लिव्ह लहंगा : विंटरमधल्या वधूसाठी हा चांगला पर्याय आहे. यामध्ये नेट किंवा सिल्कचे स्लिव्हज असतात. हे डेस्टिनेशन वेडिंगसाठीही परफेक्ट आहे. लहंग्यावर खालच्या बाजूला आणि स्लिव्हजवर एम्ब्रॉयडरी असते.

वेल्व्हेटचा लहंगा : वेल्व्हेटचा लहंगा पुन्हा फॅशनमध्ये झाला आहे. यावर पॅचवर्क असतं, जे बऱ्याचदा गोल्डन कलरमध्ये केलं जातं. मरून रंगाच्या लहंग्यावर सोनेरी पॅचवर्क उठून दिसतं.

रिसेप्शनसाठी : रिसेप्शनसाठी वेगळं काहीतरी घालायचं असेल तर सोनेरी रंगाची साडी नेसा. यावर तुम्ही दागिन्यांमध्ये एक्सपेरिमेंट करू शकता. याशिवाय रॉयल आणि कंटेम्पररी लुक येण्यासाठी रा सिल्क, जरदोसीमध्ये निळ्या रंगाची साडी रिसेप्शनसाठी चांगली वाटेल. अधिक बोल्ड आणि ब्राइट दिसण्यासाठी यामध्ये लाल किंवा पिवळ्या रंगाची साडी किंवा फक्त ओढणी घेऊ शकता. या रंगाच्या साड्यांसोबत मिक्स अॅन्ड मॅच करू शकता. गोटापट्टी वर्कची शिफॉन साडी वास्तविक हलकी असते, परंतु या वर्कमुळे हेवी वाटू लागते. याशिवाय बनारसी सिल्क साडीसुद्धा वधूला शोभून दिसते. यामुळे वधू सगळ्यांत वेगळी दिसते.

वधूने नवे रंगही वापरून पाहावेत. खरंतर वधू लग्नात लाल रंगच घालते. पण काळानुसार वधूच्या कपड्यांचा रंगही बदलत आहे. आजकाल नवनवीन रंग वापरून पाहिले जात आहेत. त्या पेस्टलपासून न्योनपर्यंत प्रत्येक प्रकारचा लहंगा ट्राय करतात. पण तुम्हाला पारंपरिक मरून रंगाचा लहंगाच घालायचा असेल तर ओढणी वेगळ्या रंगाची घेऊन वेगळं कॉम्बिनेशन तयार करू शकता. बबलगम पिंक, स्काय ब्ल्यू, लाइट ग्रीन, ऑरेंज, रेड, पंपकिन ऑरेंज, गोल्डन इत्यादी रंग ट्राय करू शकता.

मेंदीच्या आकर्षक डिझाईन

– भारती तनेजा, ब्युटी एक्सपर्ट

नववधू सजतेय आणि मेंदी लावलेली नाही, हे शक्य आहे का? विवाहाचे सुंदर क्षण आयुष्यभर आठवणींमध्ये गुंफण्यासाठी नववधू आपल्या श्रृंगारात मेंदीला विशेष महत्त्व देते. लग्नाच्या या सीजनमध्ये कोणकोणत्या मेंदी डिझाईन पसंत केल्या जातात, हे जाणून घेऊया.

मारवाडी मेंदी

मारवाडी मेंदीही हिरव्या मेंदीचीच एक स्टाइल आहे. यामध्ये खूप पातळ टोक असलेल्या कोनचा वापर केला जातो. हातावर मेंदी डिझाईन खूप सुंदरतेने काढली जाते. याच्या विविध प्रकारच्या डिझाईनमध्ये सनई, चौघडे, बँडबाजा, मोर, चौघडे इत्यादी असतात. जे राजस्थानच्या संस्कृतीला खूपच सुंदरतेने दर्शवितात. या डिझाईन खूप बारीक आणि दाट असतात. या मेंदीची खासियत ही आहे की ही दोन्ही हातांवर समान काढली जाते.

अरेबियन मेंदी

अरेबियन मेंदीमध्ये ब्लॅक केमिकलने आउटलाइन केली जाते आणि मग पारंपरिक हिरव्या मेंदीने शेडींग केली जाते किंवा ती पण भरली जाते. यामुळे डिझाईन उठावदार दिसतेच, शिवाय मेंदीही हातावर छान शोभून दिसते. गडद-लाल रंगाच्या मेंदीवरही तुम्ही आपल्या पेहेरावाशी मेळ खाणारे रंगीबेरंगी खडे आणि कुंदनही लावू शकता.

कलरफुल फॅनशी मेंदी

आजच्या फॅशनच्या युगात ज्वेलरी, फुटवेअर, अक्सेसरीज जेव्हा सगळं काही ड्रेसला मॅचिंग करून वापरलं जातं, तर अशात मेंदी मागे कशी राहील. कलरफुल मेंदीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या हातांवर ड्रेसला मॅचिंग अशी रंगीत मेंदीची डिझाईन काढू शकता.

ज्वेल मेंदी

ज्वेल मेंदी शब्द ज्वेलरी आणि मेंदी २ शब्दांना जोडून बनला आहे, ज्याचा अर्थ आहे मेंदीची ज्वेलरी. यात मेकअप आर्टिस्टला आपल्या कल्पनाशीलतेत उतरून मेंदीने या प्रकाराचा लुक द्यायचा असतो, जो पाहून असं वाटतं की तुम्ही ज्वेलरी घातली आहे. ही काढण्यासाठी मेंदी आणि विविध रंगांबरोबर सोन्याचांदीच्या स्पार्कल डस्टचाही वापर केला जातो. ही मेंदी काढताना लक्ष दिलं पाहीजे की ती तुमच्या ड्रेस आणि ज्वेलरीला मॅचिंग असेल.

जरदोजी मेंदी

एखाद्या विशेष पार्टी, फेस्टीव्हल किंवा लग्नाच्या प्रसंगी मुली ही मेंदी आपल्या हातांवर, पायांवर, दंडांवर आणि बेंबीवर काढू शकतात.

टँटू मेंदी

या दिवसात मुलींमध्ये टॅटू मेंदीची चलती जास्त आहे. यामध्ये दंडांवर, पाठीवर किंवा शरीराच्या अन्य भागावर टॅटू काढला जातो. हा टॅटू सुंदर लुक तर देतोच, त्याचबरोबर तुम्हाला स्टायलिश आणि फॅशनेबलच्या कॅटेगरीतही नेऊन ठेवतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें