* अमित सारदा, मॅनेजिंग डायरेक्टर, सोलफ्लॉवर
सणांच्या काळात काम वाढत असल्याने आपल्या त्वचेची देखभाल करण्यासाठी वेळ मिळत नाही. खरं तर या काळात आपल्या त्वचेला जास्त देखभालीची आवश्यकता असते. वेळ न मिळाल्यामुळे आपण त्वचेकडे लक्ष देऊ शकत नाही आणि त्वचेतील कमतरता भरून काढण्यासाठी कॉस्मॅटिक पर्यायांचा वापर करतो. परंतु हे पर्याय चांगले नाहीत, कारण पारंपरिक कॉस्मॅटिक उत्पादने त्वचेला फायदा पोहोचविण्याऐवजी जास्त नुकसान पोहोचवू शकतात.
इथे स्किन केअर रूटीन टीप्स देत आहोत, ज्याद्वारे आपण आपल्या त्वचेसाठी काही मिनिटे खर्च करून संपूर्ण दिवसभर ताजेतवाने राहाल.
* मिंट साबणाने अंघोळ केल्यास आपल्याला ताजेतवाने वाटेल. तुम्ही जर रोज मिंट साबणाचा वापर कराल, तुम्हाला रोजच ताजेपणाचा अनुभव येईल.
* आपला चेहरा आणि गालांना ग्रेप सीड ऑइलने मॉइश्चराइज करा. त्याचप्रमाणे, आपल्या डोळयांखाली व वर काकडी व गुलाबपाण्याचे मिश्रण लावून हलक्या हातांनी मालीश करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून मालीश केल्याने आपल्याला केवळ फ्रेशच वाटणार नाही, तर यामुळे रूक्ष त्वचेला ओलावा मिळेल आणि त्वचा उजळेल.
* साबणाऐवजी लिक्विड क्लींजरचा वापर करा, त्याला फेस येत नाही. फोमयुक्त क्लींजरचा वापर करून त्वचेला नुकसान पोहोचविण्याऐवजी आरोग्यदायी उजळपणा मिळविण्यासाठी त्वचेचे पोषण आवश्यक आहे. आपण ऑलिव्ह ऑइलचा वापर करून त्वचेला नैसर्गिक ओलावा प्रदान करू शकता.
* आपल्या आहारात आंबट फळांचा समावेश करा. कारण त्यात व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे उत्साह वाढतो. अंघोळीसाठी संत्रे किंवा गाजराच्या गुणांचा साबण वापरल्यास आपल्याला टवटवी येईल व जास्त ऊर्जावान वाटेल.
* अनेक एक्सफोलिएंट अशा तत्त्वांनी बनलेले असतात, जे आपल्या त्वचेला सोलवटून क्षतिग्रस्त करतात. त्यामुळे त्वचेचे वय वेगाने वाढू लागते. म्हणून आपण एंजाइमॅटिक एक्सफोलिएंटचा वापर करा. पपईमध्ये नैसर्गिक एंजाइम पपाईन आढळून येते, जे त्वचेला अपेक्षेपेक्षा जास्त उजळपणा प्रदान करते.
* सिंथेटिक सुगंधाचा वापर करू नका. यामध्ये हानिकारक केमिकल असू शकतात. त्याऐवजी आपण शुद्ध एसेंशिअल ऑइलच्या रूपात असणाऱ्या नैसर्गिक सुगंधाचा वापर करा. यात मधुर सुगंध असतोच, परंतु त्याचबरोबर ते रूक्ष किंवा तेलकट त्वचेमध्ये सिबमच्या स्तराचे संतुलन करते.