* पारुल
काजळने डोळयांचा आकार सुंदर होऊन तुमचं सौंदर्य अधिक उजळतं. काजळ लावण्यात छोटीशी जरी चूक केली तरी तुमचा पूर्ण लुक बिघडू शकतो. अशा वेळी गरजेचे आहे टीप्स जाणून घेणं, ज्यामुळे तुमच्या डोळयांना एक असा लुक मिळेल की लोक तुमची स्तुती करता थकणार नाही.
काजळ असो वा अन्य कोणतं सौंदर्य उत्पादन, कधीही त्याच्या क्वालिटीशी तडजोड करू नका. कारण यामुळे एक तर तुमचा मेकअप बिघडेल आणि दुसरं म्हणजे डोळयांचेदेखील नुकसान होऊ शकेल. म्हणून नेहमी तुमच्या डोळयांच्या सेंसिटीविटीचा विचार करून छान ब्रांडेड काजळच विकत घ्या. बाजारात तुम्हाला हर्बल, जेल बेस्ड, गुलाबखस युक्त, ऑरगॅनिक काजळ मिळेल, जे तुमच्या डोळयांची काळजी घेण्याचं काम करेल.
जर तुमच्या काजळमध्ये कॅफर व आमंड तेलदेखील मिसळलेलं असेल तर यामुळे तुमच्या पापण्यांच्या वाढीबरोबरच तुमच्या डोळयांना कोमलता देण्याचं कामदेखील करेल. अशा प्रकारे काजळ दीर्घकाळ टिकण्याबरोबरच पसरण्याचीदेखील शक्यता राहत नाही.
डोळयांच्या आजूबाजूच्या त्वचेला स्वच्छ करा
जेव्हा तुम्ही आय मेकअप कराल तेव्हा तुमची त्वचा पूर्णपणे स्वच्छ करा. स्वच्छ करूनदेखील तुमच्या त्वचेवर जर तेल दिसून येत असेल तर तुम्ही डोळयांखाली बोटांच्या मदतीने पावडर लावा यामुळे तुमचं काजळ दीर्घकाळ राहण्याबरोबरच पसरणारदेखील नाही.
काजळ कसे लावायचे
काजळ नेहमी डोळयांच्या आकाराच्या व हिशेबाने लावायला हवं. तेव्हाच तुमच्या डोळयांचा लुक अधिक छान दिसेल. जर तुमचे डोळे लहान असतील आणि त्यांना मोठा लुक द्यायचा असेल तर तुमच्या काजळला वॉटर लाईनवर आतल्या बाजूने बाहेरच्या दिशेने नेत कोपऱ्याला अधिक हायलाइट करा वा परत लेयरिंगनेदेखील डोळयांना अधिक उभार देऊन मोठं लुक देऊ शकता.
अशाप्रकारे जर तुमचे डोळे मोठे असतील तर तुम्ही एका लेयरिंगने त्यांना उभारी देऊ शकता वा मग सिंगल स्ट्रोकनेदेखील तुमच्या डोळयांना गॉर्जियस लुक मिळू शकेल. शक्यतो लॉन्ग लास्टिंग काजळ अप्लाय करा, यामुळे तुमचे डोळे दीर्घकाळ सुंदर दिसतील.
स्मोकी आईजसाठी