* पारुल भटनागर

तुमची त्वचा जितकी नैसर्गिकरित्या सुंदर असेल तितकेच लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुम्हालाही असेच वाटत असेल की, जेव्हा तुम्ही तुमच्या या त्वचेला स्पर्श कराल तेव्हा ती हाताला कोमल लागण्यासोबतच त्वचेतील आर्द्रता किंवा ओलावाही टिकून रहावा. मात्र अनेकदा जाणते अजाणतेपणी किंवा वेळेची कमतरता अथवा सौंदर्य प्रसाधनांचा योग्य वापर न केल्यामुळे त्वचेतील आर्द्रता हळूहळू कमी होऊ लागते, ती त्वचेला रुक्ष, निर्जीव बनवते.

अशावेळी भलेही तुम्ही सौंदर्य प्रसाधनांचा वापर करून बाह्य त्वचेला ओलावा मिळवून देता, मात्र त्वचेवर क्रीमचा प्रभाव असेपर्यंतच ओलावा टिकून राहतो. म्हणूनच त्वचेची चांगली काळजी घेणे गरजेचे आहे, जेणेकरून त्वचेतील ओलावा त्वचेतच लॉक होईल आणि ती नेहमीच नितळ दिसेल.

त्वचेतील ओलावा का गरजेचा आहे?

त्वचेत आर्द्रता किंवा ओलावा लॉक करायचा म्हणजे त्वचेत या सर्व थरांना पोषण मिळवून देणे. जर त्वचेत पुरेशा प्रमाणात ओलावा असेल तर ती स्वत:हून स्वत:मध्ये आवश्यक बदल करून घेण्यास सक्षम ठरते. त्वचेतील ओलावा त्वचेसाठी सुरक्षा कवचाप्रमाणे काम करतो. त्वचेत पुरेशा प्रमाणात ओलावा असल्यास कोरडेपणा, सुरकुत्या, प्रखर सूर्यकिरणे इत्यादींपासून सुरक्षा होते.

तशी तर त्वचा खराब होण्यामागे अनेक कारणे असतात. कोरडी त्वचा हे यातील एक सर्वात मोठे कारण आहे. त्वचेवरील बाह्य थर याला एपिडर्मिस म्हणतात, त्यात स्ट्रेटम कोरनियम नावाचा आणखी एक बाह्य थर असतो. त्यावर त्वचेतील ओलाव्याचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी असते. स्ट्रेटम कोरनियमला त्याच्या या कार्यात केरोटीन आणि फास्फोलिपिड्स हे दोन मुख्य घटक मदत करतात.

योग्य मॉइश्चराइजरची निवड कशी कराल?

मॉइश्चराइजरमध्ये तीन प्रकारचे घटक असतात. त्यांचे कार्य वेगवेगळे असते. त्याची माहिती असणे अत्यंत आवश्यक असते

* हुमेक्टॅट्स हवा आणि त्वचेला या जाडसर थरांमधून ओलावा शोषून घेऊन त्वचेचा बाह्य थर त्याला एपिडर्मिस असे म्हणतात, त्यात ओलावा टिकवून ठेवण्याचे काम करते. सर्वसाधारपणे हुमेक्टॅट्समध्ये ग्लिसरीन, ह्वालुरोनिक अॅसिड आणि प्रोपायलिन ग्लुकोज असते.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...