- प्राची भारद्वाज

ड्रेसिंग टेबल खोलीतील ते फर्निचर आहे, जे प्रत्येक स्त्रीच्या मनाची भावना समजते, तिला सुंदर दिसण्यात मदत करते. परंतु बऱ्याचवेळा आपण ड्रेसिंग टेबलला इतर टेबलांप्रमाणे वस्तू साठवण्याचे ठिकाण समजतो आणि त्यावर अनावश्यक वस्तू ठेवतो. म्हणून आपले ड्रेसिंग टेबल व्यवस्थित ठेवणे महत्वाचे आहे जेणेकरून जेव्हा आपल्याला मेकअप करायचा असेल, तेव्हा आपणास कामाच्या वस्तू त्वरित मिळू शकतील आणि हे देखील जाणून घ्या की ती कोणती कॉस्मेटिक साधने आहेत, जी मेकअप करताना पूर्णपणे हाताशी असावीत.

सर्वप्रथमदररोज आपल्याला कोणत्या कॉस्मेटिक साधनांची आवश्यकता आहे याचा विचार करा. त्यांना समोर ठेवा. मग आपल्या ड्रेसिंग टेबलच्या रचनेत किती जागा आहे ते पहा. प्रत्येक ड्रॉव्हरमध्ये एक ड्रॉव्हर लाइन ठेवा, जेणेकरून वस्तू इकडे तिकडे सरकणार नाहीत. वरच्या ड्रॉव्हरमध्ये मेकअप अॅक्सेसरीज आणि खालच्या ड्रॉव्हरमध्ये हेअर स्टाईलिंग टूल्स ठेवा. आतल्या ड्राव्हरमध्ये कमी वापरले जाणारी मेकअप उपकरणे आणि अॅक्सेसरीज ठेवा. चला, याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया :

कोणत्या वस्तू कुठे ठेवाव्यात

* दररोज त्वचेची देखभाल करणाऱ्या उत्पादनांची आवश्यकता असते - ऑफिससाठी तयार होताना किंवा संध्याकाळी पार्कमध्ये फिरायला जाताना. म्हणून मॉइश्चरायझर, टोनर, परफ्यूम किंवा डिओड्रेन्ट, फेस क्रीम, हँड लोशन, सनस्क्रीन आणि गुलाबजल आपल्या ड्रेसिंग टेबलवर एकत्र ठेवा. या सर्वांसाठी एक खुले बास्केट आणणे चांगले राहील आणि त्यांना ड्रेसिंग टेबलवर सगळयात वरती हाताशी ठेवा.

* ड्रेसिंग टेबलच्या वरील काउंटरवर रात्री वापरले जाणारे अंडर आय जेल, नाईटक्रीम, स्किन लोशन इ. एकत्र ठेवा.

* आता आपल्या मेकअप उत्पादनांचे २ भागांमध्ये विभाजन करा -आपल्याला दररोज आवश्यक असलेल्या वस्तू आणि पार्टी मेकअपसाठी आपल्याला आवश्यक असलेली सौंदर्यप्रसाधने.

* दररोज वापरली जाणारी सौंदर्यप्रसाधने जसे की बीबी क्रीम, कॉम्पॅक्ट, कन्सीलर, आयलाइनर, काजळ, आयब्रो पैंसिल, लिपलाइनर, लिपस्टिक, फेस क्लीनिंग वाइप्स इत्यादींना आपण वरच्या ड्रॉव्हरमध्ये एका जागी ठेवले पाहिजे, जेणेकरुन दररोज सकाळी तयार होताना तुमचा वेळ वाया जाणार नाही.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...