* सुनील शर्मा
एके दिवशी, दहा वर्षीय नीरज अचानक आईला म्हणाला, ‘‘मम्मी, मामाच्या घरी जाऊया.’’
हे ऐकून त्याच्या आईने समजावले की, ‘‘बाळा, सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग आहे, म्हणून आपण कुठेही जाऊ शकत नाही.’’
हे ऐकून नीरज निराश झाला आणि पाय आपटत रागाने म्हणाल, ‘‘हे काय आहे... किती दिवस झाले, आपण कुठेच गेलोलो नाही.’’ फक्त घरातच राहायचे. उद्यानात किंवा मित्रांना भेटण्यासाठीही जाता येत नाही. सतत थोडया-थोडया अंतराने सॅनिटायझरने हात धुवावे लागतात आणि जरा जरी घराबाहेर गेल्यास तोंडावर मास्क लावावा लागतो. खेळण्यासाठी फक्त टेरेसवरच जाता येते...
‘‘मी आता कंटाळलो आहे. जेव्हा तुझ्याकडे मोबाइल मागतो, तेव्हा बाबा ओरडतात आणि तू मात्र दिवसभर इअरफोन लावून मोबाइलवर वेब सीरीज पाहत बसतेस.’’
मार्च २०२१ च्या अखेरच्या आठवडयापासून संपूर्ण देश कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गाशी झुंज देत आहे. कितीतरी लोक घरात बंद आहेत, विशेषत: मुले घरात कैद झाली आहेत. ती शाळेत जाऊ शकत नाहीत. पार्क सामसूम झाले आहेत.
सुरुवातीला मुलांना असे वाटले होते की, शाळा बंद झाल्या म्हणजे आता दिवसभर मजा करायची. परंतु हळूहळू त्यांना समजले की, हे सुट्टीचे दिवस नाहीत, तर त्यांच्या निरागस बागडण्यावर जणू कर्फ्यू लावण्यात आला आहे.
याचा परिणाम असा झाला की, नीरजसारख्या लहान मुलांच्या मनात अनेक नकारात्मक विचार येऊ लागले आहेत. ही एक गंभीर समस्या आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्याचे नुकसान करू शकतो.
सध्या तरी ही समस्या प्राथमिक टप्प्यात आहे, म्हणूनच मुले वैतागत असल्यास मोठयांनी रागावू नये. उलट त्यांनी मुलांना या मोकळया वेळेत एखादे चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे.
गॅझेट बनले आधार
केमिकल लोच्याबाबत बोलायचे झाल्यास, लहान मुले असोत किंवा मोठी माणसे, तणावामुळे त्यांच्या हार्मोन्समध्ये बदल होतात. लॉकडाऊनमुळे प्रत्येकाचा दिनक्रम बदलला आहे. मोठी माणसे कुठल्या ना कुठल्या कारणाने घराबाहेर पडतात, पण मुले मात्र ‘बिग बॉस’ या रिएलिटी शोच्या स्पर्धकांप्रमाणे घरातच बंदिस्त झाली आहेत.