* डॉ. एकता अग्निहोत्री
दिवाळीचा माहौल असतोच असा की लोक दिवसरात्र मजामस्तीच्या रंगात रंगुन जातात. अशात अवेळी खाणं आणि झोपणं तर सामान्य गोष्ट आहे. तर या कारणांनी तुमची तब्येत बिघडू नये म्हणून या काही गोष्टींवर लक्ष नक्की द्या :
आहार
फेस्टिव्ह सीझनमध्ये मिठाई आणि पाटी टाळणं शक्य नसतं. तरीसुध्दा आपल्या डेली रुटीनमध्ये काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही काही प्रमाणात सणांच्या साइड इफेक्ट्सपासून स्वत:ला दूर ठेवू शकता.
* आपल्या शरीरात पाण्याचं खूप महत्व आहे. म्हणून सकाळी उठून २ ग्लास कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील चांगले बॅक्टेरिया शरीरात राहतात आणि पाणी शरीराला नवी उर्जा देतो. याच्या काही वेळानंतर ओवा टाकलेलं पाणी उकळून ते पाणी प्यायल्याने फॅट कंट्रोल होण्यास मदत होते. दिवसातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्यायला विसरु नका.
* सकाळी अनुशापोटी १ चमचा अळशीच्या बिया घेतल्या तर त्यादेखील कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात. बिनमीठाचं जेवण किंवा जेवणात कमी मीठ वापरल्यानेही तुम्ही आपलं वजन कंट्रोल करू शकता. त्याचबरोबर बेली फॅट वाढत नाही. ब्लडप्रेशरही नियंत्रित राहतं. सणांच्या दिवसात रात्रीच्या जेवणापासून ते सकाळच्या नाश्त्यापर्यंत आठवडयातून दोन दिवस मीठाचा प्रयोग करा.
* जेवण जेवण्याच्या अर्धा तास आधी आणि एक तास नंतर पाणी पिऊ नये. पुर्ण दिवसात अति थंड वा अति गरम पाणी पिऊ नये. असं केल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होईल.
* घरात बनविणाऱ्या गोड पदार्थात साखरे ऐवजी गुळ वापरा. दुकानातूनही बेसनानेच बनलेली मिठाई विकत घ्या. बऱ्याच संशोधनाअंती समजलं आहे की साखर, गहू, आणि दूध शरीरात जळजळ निर्माण करतात, ज्यामुळे शरीरात ऊर्जेचा अभाव होऊ लागतो.
* लिंबू पाणी किंवा व्हिटॅमिन सी सप्लिमेंट घेतल्याने जळजळ थांबू शकते.
चांगली झोप
फेस्टिव्ह सीझनमध्ये धावपळीमुळे महिलांना पुरेशी झोप घेता येत नाही, जे खूप नुकसानदायक आहे. त्यामुळे कमीत कमी ६ ते ७ तास झोप नक्की घ्यावी. कारण झोपेदरम्यान शरीरातून निघणारं केमिकल मैलाटोनिन शरीर ऊर्जावान बनवतं.