* पाककृती सहकार्य : ओम प्रकाश गुप्ता

  • व्हेज आप्पे

साहित्य

*  १ कप बारीक रवा

*  १ कप दही

*  १ मोठा चमचा बारीक चिरलेला कांदा
*  १ मोठा चमचा बारीक चिरलेला टोमॅटो

*  १ मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर

*  अर्धा छोटा चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची

*  १ छोटा चमचा फ्रुट सॉल्ट द्य  मीठ चवीनुसार.

कृती

फ्रुट सॉल्ट सोडून सर्व साहित्य एकत्रित करून घ्या. गरजेपुरतं पाणी घालून घट्टसर घोल बनवा. फ्रुट सॉल्ट टाकून मिक्स करून घ्या. अप्पम मेकरमध्ये मिश्रण टाका आणि मंद आचेवर ठेवा. दोन्ही बाजुंनी भाजल्यावर आप्पे बाहेर काढून हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

  • ब्रेडचे बोन्डे

साहित्य

* ६ ब्रेड स्लाईस

* १ उकडलेला बटाटा मॅश करून

* २ मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर

* पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर

* १ छोटा चमचा हिरवी मिरची पेस्ट

* अर्धा छोटा चमचा आलं पेस्ट

* २ मोठे चमचे चाट मसाला

* अर्धा छोटा चमचा आमचूर पावडर

* १ छोटा चमचा अनारदाना

* तेल तळण्यासाठी

* मीठ चवीनुसार.

कृती

ब्रेडचे छोटेछोटे तुकडे करून एका बाऊलमध्ये घ्या. कॉर्नफ्लॉवर आणि तेल सोडून इतर सर्व साहित्यदेखील एकत्रित करून कणिक प्रमाणे मळून घ्या. आता या मिश्रणाचे लिंबाच्या आकाराचे बॉल्स बनवा. कॉर्नफ्लॉवरमध्ये २ चमचे पाणी मिसळवून घोल बनवा. कढईत तेल गरम करा. ब्रेड बॉल्स कॉर्नफ्लॉवरच्या घोळमध्ये बुडवून मध्यम आचेवर सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून हिरवी चटणी आणि टोमॅटो केचपसोबत सर्व्ह करा.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...