* प्रतिभा अग्निहोत्री, दीपिका शर्मा

हिवाळ्यात शाल आणि स्टोल दोन्हींचा वापर होतो. स्टोल सामान्यत: शालपेक्षा किंचित अरुंद असतो. आजकाल शाल आणि स्टोल विविध डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत. ते थंडीपासून संरक्षण आणि फॅशन स्टेटमेंट दोन्ही आहेत. स्टायलिश लूकसाठी तुम्ही यासोबत प्रयोग करू शकता. अशा प्रकारे स्टाईल करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही साध्या शाल किंवा स्टोललाही स्टायलिश बनवू शकता. चला, काही सोप्या टीप जाणून घेऊया :

क्लासिक ट्रॅप लूक

ही एक अतिशय सामान्य शैली आहे ज्यामध्ये शाल दोन्ही खांद्यावर गुंडाळली जाते आणि समोर ठेवली जाते. हा लूक थंड संध्याकाळसाठी परिपूर्ण आहे. तो थंडीपासून तुमचे रक्षण करतो आणि तुमची स्टाईलही टिकवून ठेवतो.

बेल्ट स्टाईल

जर तुमच्याकडे लांब, पातळ कापडाचा स्टोल असेल तर तुम्ही असा एखादा प्रयोग करू शकता. स्टोल तुमच्या कंबरेभोवती बेल्टप्रमाणे बांधा आणि समोर एखाद्या मोठ्या बांगडीप्रमाणे किंवा अंगठीप्रमाणे एखादी डिझाईन लावा किंवा तुम्ही स्टोल समोरच्या बाजूला घेऊन त्यावर बेल्ट लावू शकता.

हेड स्कार्फ

दिवसाच्या सध्या लूकसाठी, स्टोल मध्यभागी घडी करा आणि तुमच्या डोक्याभोवती गुंडाळा, तुमच्या डोक्याचा कोणताही भाग उघडा राहू देऊ नका. या स्टाईलसाठी, बारीक प्रिंट किंवा साधा, पातळ कपडा असलेला स्टोल निवडा.

रॅप स्कर्ट

थंड हिवाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी, रॅप स्कर्ट म्हणून लांब शाल वापरा. ही स्टाईल ईशान्येकडील महिलांमध्ये लोकप्रिय आहे. तुम्ही यासोबत लेगिंग्ज किंवा लोअर्स घालू शकता.

टॉप स्टाईल

जर तुम्हाला बोल्ड लूक हवा असेल तर शाल मागून समोर आणा, गाठ बांधा आणि ती टॉप म्हणून वापरा. यासाठी पातळ कापडापासून बनवलेली शाल वापरा.

एका खांद्यावर घेणे

जर तुम्हाला हटके आणि सुंदर लूक हवा असेल तर एका खांद्यावर स्टोल घ्या, ही स्टाईल औपचारिक प्रसंगी परिपूर्ण ठरते.

लेयर्ड लूक

कडाक्याच्या थंडीत, तुम्ही स्वेटर किंवा जाकीटवर शालदेखील घेऊ शकता. यामुळे थंडीपासून संरक्षण मिळू शकते. स्टोल अरुंद असल्याने, शालसह ही स्टाईल वापरायला हरकत नाही.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...