* सोमा घोष

२३ वर्षीय अभिनेत्री पायल मेमाणेने अनेक मराठी मालिका आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे. लहानपणापासूनच तिला अभिनयाची इच्छा होती. त्यासाठी तिला घरच्यांचाही खूप पाठिंबा मिळाला. हसतमुख आणि विनम्र पायल लावणी आणि कथ्थक नृत्यांगना आहे. तिने मराठी इंडस्ट्रीत रियालिटी शो ‘अप्सरा आली’मधून पदार्पण केले, ज्यात तिच्या नृत्याचे खूपच कौतुक झाले आणि तिला अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. सध्या सोनी मराठीवरील ‘प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची’ या मालिकेत ती एका ट्रान्सजेंडरची दत्तक मुलगी दिशाची भूमिका साकारत आहे. ही तिची सर्वात मोठी आणि मुख्य भूमिका आहे, जी साकारताना ती खूपच आनंदी आहे. या मालिकेमुळे तिला खूप प्रसिद्धी मिळत आहे. या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान तिच्याशी गप्पा मारता आल्या. त्या खूपच मनोरंजक झाल्या. त्याच गप्पांमधील हा काही खास भाग.

अभिनयात येण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली?

अभिनयात येण्याची प्रेरणा आई-वडिलांकडून मिळाली. मी एक नृत्यांगना आहे आणि लहानपणापासूनच माझ्या आईलाही नृत्याची खूप आवड होती. म्हणूनच तिने मला लहान वयातच नृत्याची शिकवणी लावली. हळूहळू शाळा आणि महाविद्यालयात मी माझ्या या कलेचे सादरीकरण करू लागले.

तुला कुटुंबाचा कितपत पाठिंबा मिळाला?

माझ्या आई-वडिलांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. माझे वडील पुण्यात नोकरी करतात. माझ्या यशामुळे त्यांना अत्यानंद होतो. माझ्या चित्रिकरणात काही अडचण आल्यास दोघेही तिथे येऊन माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहातात. सुरुवातीला पुण्यातून ऑडिशनसाठी मुंबईला आईसोबत ६ वाजता जायचे आणि संध्याकाळी पुण्याला परत यायचे. वडिलांनी माझ्यावर कधीच कुठले निर्बंध लादले नाहीत, उलट मला खूप प्रोत्साहन दिले, कारण मुंबईत राहाणे महागडे असते. आता या मालिकेमुळे मला एकटीलाच राहावे लागत आहे, पण माझे आई-वडील रोज फोन करून माझ्या तब्येतीची चौकशी करतात. चांगले काम मिळवण्यासाठी माझी सतत धडपड सुरू असते. कसदार अभिनय करण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली, कारण मी एक नृत्यांगणा आहे, अभिनेत्री नाही.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...