गरोदर महिलांचा आहार कसा असावा

* दीपिका विरेंद्र

आई होणं हा प्रत्येक महिलेसाठी सुखद अनुभव असतो. गर्भात वाढणारं मूल आईला बऱ्याच गोष्टी शिकवत असतं. संवदेनशील बनवतं, प्रेम करायला शिकवतं. त्यामुळे गरोदर महिला स्वत:ची विशेष काळजी घेतात. कारण अशावेळी महिला फक्त स्वत:साठीच नाही तर बाळासाठीही अन्न ग्रहण करत असतात.

नोकरी करणाऱ्या गरोदर महिलांना सतत थकवा जाणवतो. ८-९ तास ऑफिसमध्ये काम केल्याने त्या जास्त थकतात. याशिवाय महिलांना घरातली कामं करावी लागतात. त्यामुळे त्यांचा संपूर्ण दिवस श्रमाचा असतो. चला तर मग जाणून घेऊया नोकरी करणाऱ्या गरोदर महिलांचा आहार कसा असावा.

असा असावा नाश्ता

तुम्ही सकाळी उठल्या उठल्याच स्वयंपाक आणि घरातली इतर कामं सुरू करत असाल तर हे योग्य नाही. सकाळी उठताच सर्वात आधी ग्रीन टी प्या. दिवसाची सुरूवात ग्रीन टी ने झाली तर तुम्हाला दिवसभर ऊर्जेची कमतरता जाणवणार नाही. त्यानंतर अंघोळ करून फ्रेश व्हा. दुपारचं जेवण तुम्ही स्वत: करत असाल तर त्याची तयारी रात्रीच करून ठेवा. सकाळी सगळं तयार मिळालं तर जेवण करणं डोकेदुखी ठरणार नाही. जेवण करून झाल्यावर सर्वात आधी नाश्ता करा. नाश्त्याला उकडलेली अंडी, चपाती आणि भाजी खा. त्यानंतर आपला डबा तयार करा. डब्यात फळं, सुका मेवा आणि जेवण भरा. दही किंवा ताक घ्यायला विसरू नका.

ऑफिसमध्ये पोहोचल्यावर

ऑफिसला पोहोचल्यावर सर्वात आधी पाणी प्या. शरीराला पाण्याची कमतरता भासू देऊ नका. त्यानंतर थोडा आराम करा. काम सुरू करण्याआधी डाळिंब किंवा सफरचंद खा. हे तुमच्यासह बाळाच्याही आरोग्यासाठी चांगलं आहे. शक्य असेल तर केळं खा. त्यानंतर आपलं काम सुरू करा.

दुपारचं जेवण चांगलं घ्या

डाळ-भात, भाजी-चपाती, दही किंवा ताक जे तुम्ही आणलं असेल ते व्यवस्थित चावून खा. घाईघाईत खाऊ नका. जेवणासोबत काकडी खा. सलाड तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

संध्याकाळचा नाश्ता

बऱ्याचदा असं दिसून येतं की गरोदर महिला संध्याकाळच्या नाश्त्याला समोसा, जिलेबी इत्यादी पदार्थ खातात. हे पदार्थ चविष्ट तर असतात, पण आरोग्यदायी नसतात. त्यामुळे घरून सुकामेवा घेऊन या आणि तोच खा. चहा किंवा कॉफी प्यावीशी वाटत असेल तर पिऊ शकता. हे दोघांसाठीही फायदेशीर असेल. संध्याकाळी नाश्त्याच्या नावाखाली पूर्ण पोट भरू नका. कारण रात्रीचं जेवणही जेवायचं आहे.

घरी पोहोचण्यासाठी घाई करू नका. ऑफिसची कॅब असेल तर चांगली गोष्ट आहे. नाहीतर संध्याकाळी रस्त्यावर गर्दी असते. त्यामुळे आरामात निघा. थोडा उशिर झाला तरी चालेल. पण घरी आरामात सुरक्षित पोहोचा. घरी पोहोचल्यावर थोडा आराम करा, पाणी प्या. त्यानंतर घरातली कामं करा.

रात्री पौष्टिक जेवण करा

रात्रीच्या जेवणात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. एकवेळ डाळ नक्की खा. सोबत चपाती, सलाड आणि बेबीकॉर्न, ब्रोकोली, पनीर इत्यादी भाज्या खा.

रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नका. थोडं फिरा. दिवसभरात एक ग्लास दूध नक्की प्या. बाळंतपणादरम्यान दूध अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घ्या.

ऑफिससोबत घरातलं काम मॅनेज करायला जमत नसेल तर मेड ठेवा. सगळं काम स्वत:वर घेऊ नका. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

ऑफिस आणि गर्भावस्था राखा ताळमेळ

एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, फरिदाबादच्या स्त्रीरोगतज्ञ  डॉ. अनिता कान्ट यांच्याशी ललीता गोयल यांनी केलेल्या चर्चेवर आधारित

जेव्हा एक नोकरदार स्त्री आई बनण्याचा निर्णय घेते, तेव्हा तिच्या मनात प्रश्न उभा राहतो की कशा गर्भावस्थेसोबत ऑफिसच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडता येतील? गर्भवती असणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नसते. अशा परिस्थितीत शरीर स्वत:चे निर्देश ऐकत नाही. पण असे असले तरी गर्भावस्था हा काही आजार नाही.

एका काम करणाऱ्या स्त्रीला खालील पद्धती अवलंबून ऑफिसच्या जबाबदाऱ्या सहज निभावता येतात :

बॉसला सांगा गोड बातमी : गर्भवती असल्याची गोड बातमी कळताच सर्वात आव्हानात्मक काम असते ते आपल्या बॉसला याबाबत सांगणे. बहुतांश महिला पहिल्या तीन महिन्यांपर्यंत आपल्या गर्भावस्थेची बातमी लपवून ठेवायचा प्रयत्न करतात. त्या आपली ही गोड बातमी ऑफिसमध्ये बॉसला सांगायला संकोचतात. असे अजिबात करू नका.

यासाठी आपल्या सहकाऱ्यांची मदत घेऊन ही बातमी बॉससोबत शेअर करा व त्याला आपल्या विश्वासात घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा संपूर्ण पाठिंबा मिळू शकेल. याशिवाय कंपनीचे धोरण म्हणजे मॅटर्निटी लिव्ह, मेडिकल रीएबर्समेंट, लिव्ह विदाउट पे वगैरेची संपूर्ण माहिती मिळवा.

अपराधीपणाची भावना येऊ देऊ नका : तुम्ही टेलिव्हिजनवर राधिका आपटे अभिनित एक शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल, ज्यात राधिका आपटेची सिनिअर तिच्या ड्रेसमध्ये तिच्या बेबी बम्पला छान लपवल्याबाबत तिची प्रशंसा करते, पण यासोबतच तिला न मिळणाऱ्या प्रमोशनचे कारणसुद्धा सांगते.

राधिका आपटे कोणताही संकोच न करता संपूर्ण आत्मविश्वासाने आपल्या गर्भावस्थेवर अभिमानाने उत्तर देते, ‘‘वास्तविक, आपल्या ऑफिसमध्ये जेव्हा कळते की एखादी स्त्री गर्भवती आहे तेव्हा ना केवळ तिला सल्ल्याचा खजिना भेट म्हणून दिला जातो तर तिच्या कार्यक्षमतेवरही शंका व्यक्त केली जाते की ती गर्भावस्था आणि ऑफिस एकावेळी कसे सांभाळेल? तिला सतत आठवण करून दिली जाते की तिला अडचणींचा सामना करावा लागेल. ‘असे बसू नको, असे चालू नकोस, हे खाऊ नकोस, असे कपडे घालू नकोस.’ यासारख्या अनेक सल्ल्याने तिच्यात अपराधीपणाची भावना निर्माण केली जाते. तिचा गर्भावस्थेसोबत नोकरी करण्याचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

या सगळयाविरुद्ध जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सगळे चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकाल, तुम्हाला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडाल तर मनात कोणताही अपराधीपणाचा  सल ठेवू नका.

स्वत:ला नेहमी आठवण करून द्या की तू सगळे अगदी उत्तम मॅनेज करत आहे. आपले काम आणि गर्भावस्थेचा पुरेपूर आनंद उपभोगा.

लक्षात ठेवा की तुम्ही  स्वत:ला अधिक चांगले ओळखता ना की ते तुमच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट केवळ यावरच लक्ष केंद्रित करा. गर्भावस्था आणि नोकरी करण्याचा निर्णय याबाबत कोणतीही अपराधीपणाची भावना बाळगू नका, असे केल्याने तुम्ही या दोन्ही गोष्टी छान हाताळू शकाल.

स्ट्रेसचा स्तर नीट हाताळा : गर्भावस्थेदरम्यान शारीरिक आणि हार्मोन्सच्या बदलामुळे स्ट्रेसचा स्तर वाढणे सामान्य गोष्ट आहे. पण जसे की तुम्ही आयुष्याच्या सर्वात सुंदर काळातून जात असता, म्हणून सर्व नकारात्मक विचार झुगारून केवळ आपल्या गर्भात वाढत असलेल्या बाळावरच लक्ष केंद्रित करा. ऑफिसमधील घटनांना सामान्य स्वरूपात स्वीकारा. आपले ध्येय साकार करण्यासाठी स्वत: तणावाखाली वावरू नका. जास्त उशिरापर्यंत थांबावे लागणार नाही यासाठी प्रयत्नशील रहा. बाळाच्या विकासात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून रिलॅक्सेशनचे तंत्र आत्मसात करा. आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने प्रिटेनल व्यायामाच्या क्लासेसला जाऊ शकता. तिथे सांगितलेल्या  ब्रीदिंग तंत्राचा वापर ऑफिसमध्ये करू शकता.

आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्यांची यादी बनवून त्यांच्या प्राथमिकतेकडे लक्ष द्या. जर  काम न केल्याने तुम्हाला बरे वाटत नसेल, तर काम करू नका. जड सामान उचलणे, जास्त वेळ उभे राहणे, जास्त कोलाहल असलेल्या ठिकाणांपासून दूर रहा.

संतुलित आहार घ्या : गर्भावस्थेत सगळयात महत्वाचे आहे ते संतुलित आहार घेणे. अनेकदा कामात व्यस्त असल्याने गर्भवती महिला आपल्या आहाराबाबत निष्काळजीपणा करतात. असे अजिबात करता कामा नये.

लोह आणि प्रथिनयुक्त आहार घ्या : गर्भावस्थेतील थकवा लोहाची कमतरता दर्शवतो. अशावेळी आयर्न व प्रथिनयुक्त आहार जसे सीफूड, हिरव्या पालेभाज्या, रेड मीट, बीन्स, धान्य यांचा आपल्या जेवणात जास्तीतजास्त समावेशित करा.

ऑफिसमध्ये स्वत:ला उत्साहित ठेवण्यासाठी ठराविक वेळेनंतर मिनी मिल वा स्नॅक्स म्हणून भाजलेले चणे वा मोड आलेली कडधान्य घेऊन जात जा.

आपल्या ऑफिसच्या ड्रॉव्हरमध्ये सुका मेवा ठेवा. हे तुम्हाला ऊर्जा प्रदान करेल. दर दोन तासांनी काहीनाकाही खात रहा. यामुळे ना केवळ तुमच्या ऊर्जेचा स्तर कायम राहील, तर तुमचा मूडसुद्धा ताजातवाना राहील.

कामाचे ठिकाण सुविधाजनक बनवा : गर्भवस्थेच्या काळात आपल्या कामाचे ठिकाण शारीरिक बदलानुसार सुविधाजनक बनवणे चुकीचे नाही, कारण जशी जशी प्रसूतीची वेळ जवळ जवळ येईल तशी तशी तुमची बसण्याची आणि उभे राहण्याची स्थिती अडचणीची होत जाईल. म्हणून ऑफिसमध्ये बसण्यासाठी अडजस्टेबल लोअर बॅकला आधार देणारी खुर्ची घ्या जेणेकरून दीर्घ काळपर्यंत बसण्यात काही त्रास होणार नाही. जर खुर्ची अडजस्टेबल नसेल तर लहानशी उशी वा कुशन आपल्या कंबरेला आधार देण्यासाठी ठेवा. पाय सोडून बसू नका अन्यथा पायावर सूज येऊ शकते. पायांना आधार देण्यासाठी डेस्कच्या खाली फूट रेस्ट वा लहान स्टूल ठेवा. जिन्यांचा वापर टाळा.

जर खूप वेळ उभे राहावे लागणार असेल तर एक पाय फुटरेस्टवर ठेवा. अशा व्यवस्था दुसऱ्या पायासाठीही करा. वापरायला सोपे पादत्राणे वा सँडेल्स घाला. जर वाकावे लागले तर कंबरेऐवजी गुडघ्यांच्या आधारे वाका. गर्भावस्थेत अॅसिडिटीपासून दूर राहण्यासाठी कामातून लहान लहान ब्रेक घ्या आणि चाला. स्ट्रेचिंग आणि लहानसहान व्यायाम करा (आपल्या गायनोकोलॉजिस्टच्या सल्ल्यानुसार) जेणेकरून रक्ताभिसरण व्यवस्थित सुरु राहील. दिर्घ श्वास घ्या आणि स्वत:ला रिलॅक्स करा.

वार्विक मेडिकल स्कुलच्या फाउंडर्सना असे आढळले की दिवसातून ६ तासांपेक्षा जास्त वाकून बसले तर गर्भवती महिलांच्या वजनात अवाजवी वाढ होते. त्यांनी सांगितले आहे की गर्भवती महिलांनी शक्य तितके वाकून बसणे टाळावे, कारण यामुळे गर्भात असलेल्या बाळाला त्रास होऊ शकतो.

सुपर प्रेग्नन्ट स्त्री बनू नका : अनेक गर्भवती महिला गर्भावस्थेत अती ताण असलेले काम करतात व स्वत:ला सुपर एनर्जीक असल्याचे दाखवतात. असे अजिबात करू नका. तुम्ही एकाच वेळी काम आणि गर्भावस्था अशा दोन जबाबदाऱ्या पार पाडत असता. हेच मुळात खूप महत्वाचे आहे.

तुम्हाला हे कळायला हवे की तुम्ही या वेळी नाजूक परिस्थितून जात आहात. तुम्हाला तुमच्यासोबत आपल्या गर्भात वाढणाऱ्या बाळाचेही रक्षण करायचे आहे. म्हणून आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

अधून मधून आराम करा : आपल्या मिटींग्ज आणि अपॉईंटमेंट्स ट्रॅक करण्याकरिता ई-मेल कॅलेंडर प्रोग्राम वापरा. आपल्या कामाचा आराखडा स्वत: तयार करा की तुम्ही किती जास्तीचे काम करू शकता. ज्या क्षणी तुम्हाला थकवा जाणवेल, तेव्हा लगेच काम थांबवा. गरज भासल्यास ऑफिसच्या कलिग्जची मदत घ्या.

सोयीस्कर व स्टायलिश मॅटर्निटीवेअर : वाढत्या बेबीसोबत सोयीचे व स्टायलिश  मॅटर्निटीवेअर निवडणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. तसे पाहता सुरूवातीचे ३ महिने बहुतांश गर्भवती स्त्रिया मॅटर्निटीवेअरबाबत फार गंभीर नसतात. पण जसाजसा तुमच्या कंबरेचा आकार वाढत जातो आणि तुम्हाला तुमचे कपडे असुविधाजनक वाटू लागतात, तशीतशी मॅटर्निटी वेअरची गरज भासू लागते.

डॉक्टर सल्ला देतात की या दरम्यान फार घट्ट टॉप आणि पॅन्ट घालू नका, कारण या अवस्थेत शरीराचे तापमान वाढत जाते, म्हणून हलके सुती, फ्लोई लायक्रा यासारखे कपडे घाला. ढिल्या शर्टच्यावर जॅकेट घाला. गर्भावस्थेत तंग कपडे घातल्यास रक्ताभिसरणावर परिणाम होतो, तसेच मांस पेशीसुद्धा आकुंचन पावू शकतात. गर्भावस्थेत ऑफिसवेअरमध्ये स्मार्ट आणि सोयीस्कर असा लुक आणण्यासाठी तुम्ही स्ट्रेचेबल जीन्स व निटेड पँट्ससुद्धा वापरू शकता. ओव्हर द टमी स्टाइलच्या या पँट्स स्ट्रेचेबल असण्यासोबतच यात हलके इलॅस्टिक वा वेस्ट बँड असतात, जे वाढत्या पोटाच्या आकारानुसार अॅड्जस्ट होतात. अॅक्सेसरीजमध्ये रंगीत स्कार्फ व स्टोलचा वापर केल्यास तुम्ही स्वत:ला स्टायलिश लुक देऊ शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें