लग्नातील वारेमाप खर्च निरर्थक

* शाहनवाज

तुम्ही कधी विचार केला आहे की २ व्यक्तींना नात्यात बांधण्यासाठी बाजारात किती किंमत मोजावी लागते? साहजिकच जेव्हा गोष्ट खर्चाची येते तेव्हा त्याकडे डोळेझाक करून चालत नाही.

मला २ वर्षांपूर्वी माझ्या मित्राने त्याच्या काकाच्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण दिले होते. लग्न उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे होणार होते. लग्नाच्या एक दिवस आधी मी तिथे पोहोचलो. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, हे घर पाहून माझ्या लक्षात आले. त्याचे काका छोटयाशा जमिनीवर शेती करायचे आणि शेतीचा हंगाम संपला की शहरात जाऊन मजुरी करायचे.

माझ्या मित्राने मला सांगितले की, मुलाकडून कोणत्याही प्रकारची हुंडयाची मागणी करण्यात आलेली नाही. फक्त त्यांनी लग्नात येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींच्या स्वागतात कोणतीही कमतरता ठेवू नका, असे सांगितले आहे.

जेव्हा वधू आणि वराला ७ फेऱ्या मारण्यासाठी उभे केले जात होते, तेव्हा मला मंडपाच्या बाहेर एक ट्रक दिसला, ज्यामध्ये टीव्ही, फ्रीज, पलंग, कपाट इत्यादी घरगुती वस्तू ठेवण्यात येत होत्या. अचानक मला माझ्या मित्राने हुंडा न घेण्याबाबत जे सांगितले होते ते आठवले, पण त्यावेळी त्याच्याशी या विषयावर काही बोलणे मला योग्य वाटले नाही.

लग्न आटोपून आम्ही दिल्लीला निघालो. बसमधून प्रवास करत असताना मी त्याला विचारले की, नवऱ्या मुलाकडून हुंडा मागण्यात आला नाही, असे तूच मला सांगितले होतेस ना? मग ते  सामान का भरले जात होते?

त्याने उत्तर दिले की, काकांनी ते सर्व सामान स्वत:च्या वतीने भेट म्हणून दिले होते, जेणेकरून उद्या काहीही घडले तरी कोणीही त्यांच्या मुलीला नावे ठेवू नयेत. मुलीला रिकाम्या हाती पाठवले असे टोमणे नवऱ्याकडच्या मंडळींसह काकांच्या स्वत:च्या नातेवाईकांनीही मारू नयेत, हे त्यामागचे कारण होते.

त्याने सांगितले की, कुटुंबातील इतर लग्नांमध्येही काकांना अशाच पद्धतीने मुलींना घरासाठीच्या सर्व वस्तू  द्याव्या लागल्या होत्या. कारण या वस्तू न दिल्यामुळे आपल्याच नातेवाईकांमध्ये रंगणाऱ्या गप्पा, कुजबूज, टोमणे त्यांना ऐकायचे नव्हते. आपल्या नातेवाईकांच्या गोतावळयात असलेली चांगली प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी ते हा सर्व खर्च झेपत नसतानाही करत होते.

काही अशा प्रकारचे असते सामाजिक दडपण

तुम्हीही तुमच्या आयुष्यात कधीतरी असे घडताना पाहिले असेलच. हे फक्त एक प्रकारचे दडपण असते, जे वडिलांवर येते. या यादीत इतर अनेक प्रकारची सामाजिक दडपणे येतात आणि ती आपण नेहमीच पाहत असतो, पण पाहूनही त्याकडे दुर्लक्ष करतो.

मी जिथे राहतो तिथे माझ्या शेजारीच रामदासजी राहतात. नुकतेच त्यांनी त्यांचा मुलगा रवीचे लग्न लावून दिले. एकतर आधीच कोरोनामुळे सर्वांचे खिसे रिकामे झाले आहेत, अशातच लग्नावर होणारा खर्चही तुटपुंजा नसून भरमसाठ असतो.

तसे तर रामदासजींचे दिल्लीत स्वत:चे घर आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या या कठीण काळात त्यांना एखाद्या भाडेकरूप्रमाणे खोलीचे भाडे भरण्याची गरज नाही. पण कोरोना सुरू झाल्यापासून आणि लॉकडाऊन लागल्यानंतर इतर अनेक लोकांप्रमाणेच त्यांनाही नोकरी गमवावी लागली.

समाजातील प्रतिमा तर मलीन होणार नाही ना?

याच काळात रवी आमच्याच परिसरात राहणाऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्न करण्याचा त्याने हट्ट धरला. रामदासजींनी त्याला बरेच समजावले की, घरची आर्थिक परिस्थिती सध्या ठीक नाही, सर्व पूर्वपदावर आल्यानंतर लग्न लावून देतो, पण रवी काही केल्या ऐकायला तयार नव्हता. अखेर रामदासजी मुलाच्या लग्नासाठी तयार झाले. त्यांनी असा विचार केला की, कोरोना काळ असल्यामुळे जास्त लोकांना आमंत्रण द्यायचे नाही आणि मुलीच्या घरच्यांकडेही कुठलीच मागणी करायची नाही.

रवीचे मित्र, नातेवाईक आणि काही ओळखीचे मिळून पन्नासच्या आसपास लोकांना आमंत्रण द्यायचे ठरले. लग्न झाल्यानंतर रवीला त्याच्या सासरच्या मंडळींकडून एक बाईक आणि काही संसारोपयोगी वस्तू मिळाल्या.

लग्नाच्या ३ दिवसांनंतर मुलीच्या घरच्यांना आणि काही मित्रांना बोलवून घरीच छोटेखानी रिसेप्शन देण्याचा हट्ट रवीने वडिलांकडे धरला. असे केले नाही तर नातेवाईक आणि मुलीच्या कुटुंबीयांमध्ये आपली काय इज्जत राहणार, असे तो म्हणाला. त्यामुळे अखेर नाईलाजाने रामदासजींना त्याचे ऐकावेच लागले.

रामदासजी आणि रवीच्या अशा वागण्यावरून हेच स्पष्ट होते की, केवळ सामाजिक दडपणच नाही तर आपल्या मुलाचा किंवा अनेक ठिकाणी आपल्या मुलीचाही दबाव वडिलांवर असतो. आता या छोटयाशा लग्नातील खर्चाचा विचार तुम्हीच करू शकता. खिशात पैसे नसतानाही सामाजिक दबावामुळे लोकांना अशा लग्न सोहळयासाठी खर्च करावाच लागतो, जेणेकरून त्यांची समाजातील प्रतिमा खराब होऊ नये, त्यांची लाज जाऊ नये.

लोक काय म्हणतील?

आता कोणी असेही म्हणेल की, हे सर्व ऐकून लग्नच करायचे नाही का? किंवा लग्नात आपल्या नातेवाईकांना बोलवायचेच नाही का? इथे लोकांनी एकत्र येऊन आनंद सोहळा साजरा करण्यावर चर्चा सुरू नाही किंवा कोणाला लग्न न करण्याचा सल्लाही द्यायचा नाही, पण या विषयाचे तात्पर्य अगदी सहज सोपे असेच आहे. ते म्हणजे लोक लग्नावर खर्च करण्यापूर्वी इतर लोक किंवा समाज काय म्हणेल, याचा विचार करून खर्च करतात, अर्थात समाजाचा विचार करतात एवढेच.

सध्याच्या काळात समाजाची अर्थव्यवस्था खेळती राहण्यासाठी लग्नांमध्ये होणारा खर्च अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्याशी अनेक प्रकारचे व्यवसाय जोडले गेले आहेत, उदाहरणार्थ, कॅटरर्सकडून जेवण घेणे, बँक्वेट हॉल बुक करणे किंवा कम्युनिटी हॉल बुक करणे, वेटरचे काम, लग्न लावण्यासाठी ब्राह्मण, मौलवी किंवा पाद्री इत्यादी. म्हणूनच या लोकांसाठी लग्न होत राहणे खूप गरजेचे आहे.

प्रवीणच्या वडिलांनी प्रवीणचे लग्न मोठा बँक्वेट हॉल किंवा मोठया पार्कमध्ये नव्हे तर परिसरातील एसडीएम कार्यालयात जाऊन कायदेशीररित्या विवाह नोंदणी करून लावून दिले. नोंदणीच्या २ किंवा ३ दिवसांनंतर, त्यांनी स्वागत समारंभासाठी एक सरकारी कम्युनिटी हॉल बुक केला. त्यांनी १५० लोकांना आमंत्रण दिले होते. मुलाचे लग्न पारंपारिक पद्धतीने केले असते तर त्यांना कदाचित सध्याच्या खर्चाच्या ३ पट जास्त खर्च आला असता. त्यांनी त्या उर्वरित पैशांची एफडी प्रवीणच्या नावे करून घेतली, जी त्याच्या वाईट काळात त्याला उपयोगी पडेल. मुलीकडच्या लोकांनीही बँकेत वधूच्या नावे एफडी करून घेतली, जेणेकरून ती गरजेच्या वेळी मोडता येईल.

प्रवीणच्या वडिलांनी त्याचे लग्न किती समजूतदारपणे लावून दिले, याचा अंदाज तुम्ही स्वत: लावू शकता. सध्याच्या काळात समाजाची गरज आहे की, त्याने वाढत्या महागाईकडे दुर्लक्ष करू नये. समाजाच्या या ओझे बनत चाललेल्या मानसिकतेला मोडून काढण्यासाठी आपण सर्वांनी एक पाऊल पुढे टाकून विवाह पारंपरिक पद्धतीने वारेमाप खर्च करून न करता फक्त कायदेशीर नोंदणी करून करणे गरजेचे आहे.

३ लेटेस्ट ब्रायडल हेअरस्टाईल

* सोमा घोष

लग्नात सर्वांपेक्षा खास दिसणे प्रत्येकालाच आवडते. अशा प्रसंगी महिला केवळ मेकअप आणि कपडयांच्या निवडीकडेच लक्ष देत नाहीत तर त्यांना हेअरस्टाईलही हटके करायची असते. याबाबत स्ट्रिक्स प्रोफेशनलचे एक्सपर्ट अॅग्नेस चेन यांनी सांगितले की, लग्नाच्या वेगवेगळया विधींना नववधू पारंपरिक पोषाखच परिधान करते. अशावेळी तिची हेअरस्टाईलही तिच्या पेहरावाला शोभेल अशीच हवी.

पहायला गेल्यास मोकळे केस कुठल्याही पेहरावासोबत खुलून दिसतात. पण काही जणांना शुभ प्रसंगी, सेलिब्रेशनवेळी मोकळे केस आवडत नाहीत. त्यामुळे अशा खास प्रसंगी या हेअरस्टाईल ट्राय करा :

१. कोंबर करंट : सर्वात आधी केसांच्या मोठमोठया बटा काढून बोटांवर वळवून पिनअप करा. काही वेळाने सर्व पिन काढून केस सोडून दोन भागात स्थितीत करुन घ्या. दोन्ही बाजूंनी केस घेऊन वेण्या घाला. चेहऱ्यावर केसांच्या काही बटा सोडून द्या. शेवटी, दोन्ही वेण्या एकत्र गुंडाळून घ्या आणि हेअरस्प्रेने सेट करा. वेण्यांमध्ये तुम्ही मणी, खडे किंवा फुले लावून सजवू शकता.

२ पर्शियन वेवलेट हेअरस्टाइल : केसांच्या मुळांवर मूस लावा. सर्व केस एकत्र करा. त्याचे रोल करुन पिनअप करा. थोडया वेळाने केस सोडा. ते कुरळे होतील. यानंतर, मागून कंगवा फिरवून डोक्याच्या वरच्या भागावर मुकुटाप्रमाणे पफ काढा. त्यानंतर केसांचे भाग करुन त्याचे गाठीप्रमाणे रोल करुन पिनअप करा. ते विस्कटू नयेत यासाठी स्प्रे मारा.

३ कारमाईन क्रॉस बन : एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत केसांचे दोन भाग घेऊन त्याचा पोनी बांधा. हाच पोनी गुंडाळून आंबाडा तयार करा. आजूबाजूच्या केसांना आंबाडयाच्या जवळ घेऊन पिनअप करा. ते विस्कटू नयेत म्हणून स्प्रे मारा.

मिलनाची रात्र ठरावी स्मरणीय

* प्रतिनिधी

तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबतची पहिली रात्र अविस्मरणीय बनवायची असेल तर आपल्याला थोडी तयारी करावी लागेल, त्याचबरोबर काही गोष्टींची काळजीही घ्यावी लागेल. तेव्हाच आपले पहिले मिलन जीवनातील एक अविस्मरणीय क्षण ठरेल.

खास तयारी करा : पहिल्या मिलनाला एकमेकांना पूर्णपणे खूश करण्याची खास तयारी करा, जेणेकरून एकमेकांना इम्प्रेस करता येईल.

डेकोरेशन असावे खास : जिथे आपण शारीरिक रूपाने एकरूप होणार आहात, तेथील वातावरण असे असले पाहिजे की आपण आपले संबंध पूर्णपणे एन्जॉय करू शकाल.

खोलीत विशेष प्रकारचे रंग आणि सुगंधाचा वापर करा. आपली इच्छा असल्यास आपण खोलीमध्ये अरोमॅटिक फ्लोरिंग कँडल्सने रोमांचक वातावरण बनवू शकता. याबरोबरच खोलीत दोघांच्या आवडीचे संगीत आणि मंद प्रकाशही वातावरण उत्साही बनविण्यात मदत करेल. तुमची खोली रेड हार्टशेप बलून्स आणि रेड हार्टशेप कुशन्सनी सजवा. हवं तर खोलीत सेक्सी पेंटिंग्सही लावू शकता.

फुलांनीही खोली सजवू शकता. या सर्व तयारीमुळे सेक्स हार्मोन्सचा स्राव वाढवण्यास मदत मिळेल आणि आपले पहिले मिलन कायमचे आपल्या मनावर कोरले जाईल.

सेल्फ ग्रूमिंग : पहिल्या मिलनाचा दिवस निश्चित झाल्यानंतर आपण आपल्या ग्रूमिंगवरही लक्ष द्या. स्वत:ला शारीरिक आणि मानसिक रूपाने तयार करा. त्यामुळे केवळ आत्मविश्वासच वाढणार नाही, तर आपण तणावमुक्त होऊन उत्तम प्रदर्शन करू शकाल. पहिल्या मिलनापूर्वी पर्सनल हायजीनलाही महत्त्व द्या, जेणेकरून आपल्याला संबंध ठेवताना संकोच वाटणार नाही आणि आपण पहिले मिलन पूर्णपणे एन्जॉय करू शकाल.

प्रेमपूर्ण भेटवस्तू : पहिले मिलन अविस्मरणीय बनवण्यासाठी आपण एकमेकांना गिफ्टही घेऊ शकता. यात आपल्या दोघांची पर्सनल फोटोफ्रेम किंवा अंगठी किंवा सेक्सी इनवेयरही असू शकतात. असे करून आपण वातावरण रोमँटिक आणि उत्तेजक बनवू शकता.

मोकळेपणाने बोला : पहिले मिलन रोमांचक आणि स्मरणीय बनवण्यासाठी स्वत:ला मानसिकरीत्या तयार करा. आपल्या जोडीदाराशी याबाबत मोकळेपणाने बोला. आपल्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर उपाय विचारा. एकमेकांच्या आवडीनिवडीबाबत विचारा. शक्य तेवढे पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा.

सेक्स सुरक्षा : संबंध ठेवण्यापूर्वी सेक्शुअल सुरक्षेची पूर्ण तयारी करा. सेक्शुअल प्लेजरला एन्जॉय करण्यापूर्वी सेक्स प्रीकॉशन्सवर लक्ष द्या. आपला जीवनसाथी कंडोमचा वापर करू शकतो. यामुळे नको असलेल्या प्रेग्नंसीची भीतीही राहणार नाही आणि आपले लैंगिक रोगांपासून संरक्षणही होऊ शकेल.

सेक्सच्या वेळी

* सेक्सी क्षणांची सुरुवात सेक्सी पदार्थ उदा. स्ट्रॉबेरी, द्राक्षे किंवा चॉकलेटने करा.

* जास्त वाट पाहायला लावू नका.

* मिलनाच्या वेळी अशी कोणतीही गोष्ट बोलू नका, ज्यामुळे एकमेकांचा मूड जाईल किंवा एकमेकांचे मन दुखावेल. या वेळी वर्जिनिटी किंवा जुन्या गर्लफ्रेंड वा बॉयफ्रेंडविषयी काहीही बोलू नका.

* संबंधांच्या वेळी कल्पना बाजूला ठेवा. पॉर्न मूव्हीची तुलना स्वत:शी किंवा पार्टनरशी करू नका आणि वास्तविकतेच्या आधारावर एकमेकांना खूश करण्याचा प्रयत्न करा.

* बेडरूममध्ये बेडवर जाण्यापूर्वी जर आपण घरात किंवा हॉटेलच्या खोलीत एकटया असाल तर थोडीसी मस्ती, थोडीशी छेडछाड करू शकता. अशा प्रकारच्या मस्तीने पहिल्या रोमांचक सहवासाची उत्सुकता आणखी वाढेल.

* सेक्ससंबंधांच्यावेळी बोटांनी छेडछाड करा. जोडीदाराच्या शरीराच्या उत्तेजित करणाऱ्या अवयवांना गोंजारा आणि मिलनाच्या सर्वोच्च सुखापर्यंत नेऊन पहिले मिलन अविस्मरणीय बनवा.

* मिलनापूर्वी फोरप्ले करा. जोडीदाराचे चुंबन घ्या. त्याच्या खास अवयवांना आपला प्रेमपूर्ण स्पर्श सेक्स प्लेजर वाढविण्यास मदत करेल.

* सेक्सच्या वेळी सेक्सी बोला. वाटल्यास सेक्सी फॅन्टसीजचा आधार घेऊ शकता. असे केल्यास आपण सेक्स अधिक एन्जॉय करू शकाल. पण लक्षात ठेवा सेक्शुअल फॅन्टसीज पूर्ण करण्यासाठी जोडीदारावर दबाव टाकू नका.

* संयम ठेवा. ही पहिल्या मिलनाच्या वेळी सर्वात जास्त लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. कारण पहिल्या मिलनाच्या वेळी कोणत्याही प्रकारची घाई ना केवळ आपल्यासाठी नुकसानदायक ठरेल, तर आपली पहिली सेक्स नाइटही खराब होईल.

सेक्सच्या वेळी गप्पा मारत सहज राहून संबंध बनवा, तेव्हाच तुम्ही पहिले मिलन लक्षात राहण्याजोगे बनवू शकाल. संबंधांच्या वेळी एकमेकांच्या नजरेला नजर भिडवा. त्यामुळे जोडीदाराला जाणवेल की आपण सेक्स संबंध एन्जॉय करत आहात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें