* सोमा घोष
लग्नात सर्वांपेक्षा खास दिसणे प्रत्येकालाच आवडते. अशा प्रसंगी महिला केवळ मेकअप आणि कपडयांच्या निवडीकडेच लक्ष देत नाहीत तर त्यांना हेअरस्टाईलही हटके करायची असते. याबाबत स्ट्रिक्स प्रोफेशनलचे एक्सपर्ट अॅग्नेस चेन यांनी सांगितले की, लग्नाच्या वेगवेगळया विधींना नववधू पारंपरिक पोषाखच परिधान करते. अशावेळी तिची हेअरस्टाईलही तिच्या पेहरावाला शोभेल अशीच हवी.
पहायला गेल्यास मोकळे केस कुठल्याही पेहरावासोबत खुलून दिसतात. पण काही जणांना शुभ प्रसंगी, सेलिब्रेशनवेळी मोकळे केस आवडत नाहीत. त्यामुळे अशा खास प्रसंगी या हेअरस्टाईल ट्राय करा :
१. कोंबर करंट : सर्वात आधी केसांच्या मोठमोठया बटा काढून बोटांवर वळवून पिनअप करा. काही वेळाने सर्व पिन काढून केस सोडून दोन भागात स्थितीत करुन घ्या. दोन्ही बाजूंनी केस घेऊन वेण्या घाला. चेहऱ्यावर केसांच्या काही बटा सोडून द्या. शेवटी, दोन्ही वेण्या एकत्र गुंडाळून घ्या आणि हेअरस्प्रेने सेट करा. वेण्यांमध्ये तुम्ही मणी, खडे किंवा फुले लावून सजवू शकता.
२ पर्शियन वेवलेट हेअरस्टाइल : केसांच्या मुळांवर मूस लावा. सर्व केस एकत्र करा. त्याचे रोल करुन पिनअप करा. थोडया वेळाने केस सोडा. ते कुरळे होतील. यानंतर, मागून कंगवा फिरवून डोक्याच्या वरच्या भागावर मुकुटाप्रमाणे पफ काढा. त्यानंतर केसांचे भाग करुन त्याचे गाठीप्रमाणे रोल करुन पिनअप करा. ते विस्कटू नयेत यासाठी स्प्रे मारा.
३ कारमाईन क्रॉस बन : एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत केसांचे दोन भाग घेऊन त्याचा पोनी बांधा. हाच पोनी गुंडाळून आंबाडा तयार करा. आजूबाजूच्या केसांना आंबाडयाच्या जवळ घेऊन पिनअप करा. ते विस्कटू नयेत म्हणून स्प्रे मारा.