समाजात महिलांवरील अत्याचार

* गरिमा पंकज

महिला हिंसाचाराच्या विरोधात युद्ध: Truecaller मुळे, समाजात महिलांवरील हिंसाचार मोठ्या प्रमाणावर आहे आणि याची आकडेवारी अतिशय चिंताजनक आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि त्याच्या भागीदारांकडून मिळालेल्या नवीन डेटामध्ये हे तथ्य स्पष्ट झाले आहे. प्रत्येक 3 पैकी 1 महिला, म्हणजे 736 दशलक्ष स्त्रिया त्यांच्या जोडीदाराकडून शारीरिक किंवा लैंगिक शोषणाच्या बळी असतात किंवा त्यांच्या आयुष्यातील काही क्षणी जोडीदार नसलेल्या लैंगिक शोषणाच्या बळी असतात – ही धक्कादायक आकडेवारी आहे, जी गेल्या दशकभरात बदललेली नाही.

महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षेच्या बाबतीत आपण या दिशेने काही प्रमाणात प्रगती केली असली तरी अजून बरेच काम करायचे आहे. गंमत अशी की, हे सर्व प्रश्न अनादी काळापासून समजून घेतल्यानंतरही स्त्रिया शतकानुशतके पितृसत्तेच्या बळी ठरत आहेत.

आज हे शोषण डिजिटल प्लॅटफॉर्मवरही होत आहे आणि ते व्यापक झाले आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर महिलांचे हे शोषण समजून घेण्यासाठी Truecaller ने अनेक सर्वेक्षणे केली आहेत. आमच्या सर्वेक्षणात धक्कादायक परिणाम मिळाले आहेत: विविध देशांतील लाखो महिलांना दररोज अवांछित कॉल आणि संदेश येतात. पाचपैकी चार देशांमध्ये (भारत, केनिया, इजिप्त, ब्राझील) प्रत्येक 9-10 पैकी 8 महिलांना अत्याचारी म्हटले जाते. भारतात, सर्वेक्षणात 5 पैकी 1 महिलांनी नोंदवले की त्यांना लैंगिक अत्याचार करणारे फोन कॉल किंवा एसएमएस आले आहेत.

सर्वेक्षणात असेही समोर आले आहे की 78 टक्के महिलांना आठवड्यातून किमान एकदा आणि 9 टक्के महिलांना आठवड्यातून 3-4 वेळा असे कॉल येतात. भारत हा पहिला देश आहे जिथे Truecaller ने असे सर्वेक्षण केले आहे. कंपनीने अशा कॉल्स किंवा मेसेजचा महिलांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला.

अलीकडे भारतात, महिला आणि मुलींच्या समर्थनार्थ उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर असे नियम काढून टाकण्याची चर्चा आहे. त्यासाठी महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे, समानतेच्या अधिकारात पुरुषांसह लिंगभाव संवेदनशील शिक्षणाचा प्रसार करणे, या सर्व बाबींवर वर्तुळाबाहेर जाऊन काम करावे लागेल, असा सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारावा लागेल.

लिंगभेदामुळे भारतातील महिला सक्षमीकरणावर परिणाम झाला आहे. या समस्येच्या विरोधात लढण्यासाठी मोठ्या संख्येने संस्था, ब्रँड आणि अधिकारी पुढे आले आहेत.

Truecaller साठी, वापरकर्त्याची सुरक्षितता ही पहिली प्राथमिकता आहे; विशेषत: महिलांची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे, कारण देशातील Truecaller वापरणाऱ्यांपैकी निम्म्या महिला आहेत. महिलांना सुरक्षित आणि सशक्त ठेवण्याच्या उद्देशाने, Truecaller ने सामान्य लोकांना संवेदनशील करण्यासाठी #TakeTheRightCall आणि #ItsNotOk सारख्या अनेक मोहिमा देखील आयोजित केल्या आहेत.

सध्याच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, Truecaller ने गेल्या वर्षी समुदाय-आधारित वैयक्तिक सुरक्षा अॅप गार्डियन्स लाँच केले. पालकांना Android साठी Google Play Store आणि iOS साठी Apple Play Store वरून किंवा GetGuardians.com वरून विनामूल्य डाउनलोड केले जाऊ शकते. अॅप आणि त्याची सर्व वैशिष्ट्ये नेहमी पूर्णपणे विनामूल्य असतील. हे वैयक्तिक सुरक्षेसाठी Truecaller ची वचनबद्धता दर्शवते

या बदलासाठी आज मोठ्या संख्येने महिला स्वत: पुढे येत आहेत हे पाहून बरे वाटते. मात्र, ग्राउंड रिअॅलिटी पूर्णपणे बदललेली नाही. उदाहरणार्थ, आजही भारतात अनेक प्रसंगी महिलांना त्यांचे हक्क मिळत नाहीत.

तुम्ही अनेकदा महिलांना रात्री एकट्याने प्रवास करताना पाहिलं असेल. परंतु अशा परिस्थितीत त्यांची सुरक्षा धोक्यात राहते. अशा प्रकरणांमध्ये, कधीकधी महिलांचा पाठलाग केला जातो, अनोळखी व्यक्ती त्यांच्यावर अश्लील टिप्पणी करतात किंवा त्यांचे लैंगिक शोषण देखील होऊ शकते. यामुळेच रात्रीच्या वेळी महिलेने घराबाहेर पडू नये, अशी कुटुंबाची नेहमीच इच्छा असते.

अलीकडे प्रत्येक व्यक्तीने महिला सक्षमीकरणासाठी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. महिला सक्षमीकरण ही आजच्या युगात गरज बनली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महिलांना त्यांचे हक्क आणि स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. त्यांच्या मागण्या आणि गरजा पूर्ण केल्या पाहिजेत.

महिलांनीही उघडपणे पुढे यावे. तुमच्यावर होणाऱ्या लैंगिक शोषणाची प्रकरणे नोंदवावी लागतील. फोनवरून होणाऱ्या शोषणाच्या तक्रारी कराव्या लागतात. या सर्व समस्यांवर तोडगा काढणे ही काळाची गरज आहे.

महिलांना असे करण्यासाठी प्रेरित करण्याच्या प्रयत्नात, Truecaller #ItsNotOk – कॉल इट आउट ही मोहीम सुरू करत आहे, जी त्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन शोषणाचा सामना करण्यास मदत करेल.

अलीकडेच त्याने त्याच्या भागीदार सायबर पीस फाउंडेशनच्या सहकार्याने #TrueCyberSafe लाँच केले. ही मोहीम देशातील पाच विभागांमधील 15 लाख लोकांना सायबर फसवणूक कशी ओळखावी आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबद्दल शिक्षित करेल. अशा प्रशिक्षणामुळे नागरिक सक्षम होतील, महिलांना त्यांच्या सुरक्षेच्या अधिकारांबाबत जागरूक केले जाईल. ही मोहीम भारतातील प्रत्येक मुलीला तिच्या हक्कांसाठी लढण्यासाठी, शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी, त्यांच्या हक्कांसाठी उघडपणे बोलण्याचा आत्मविश्वास देईल.

Truecaller ने सुरू केलेली #ItsNotOk मोहीम महिलांना यासाठी प्रेरित करेल:

* पुढे जा आणि तुमच्या जीवनातील वास्तविक कथा आणि त्यांचा त्यांच्या जीवनावर कसा परिणाम झाला ते शेअर करा.

* कॉल आणि मेसेजद्वारे महिलांच्या लैंगिक शोषणाबाबत सर्वसामान्यांना शिक्षित करा.

* जागरुकता वाढवण्यासाठी, आशा आणि आश्वासनासह मजबूत लढ्याचा संदेश द्या.

Truecaller महिलांना सुरक्षिततेचे एक व्यासपीठ प्रदान करण्याचा प्रयत्न करते ज्यावर त्या अवलंबून राहू शकतात, जिथे त्यांना सुरक्षित वाटू शकते आणि त्यांना धोका निर्माण करू शकतील अशा कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास सक्षम होऊ शकतात.

Truecaller हे प्रयत्न सुरू ठेवतील. संस्था स्थानिक कायदे अधिकार्‍यांसह काम करण्याचे मार्ग देखील शोधत आहे. तसेच अॅप वापरून भारतीय महिलांना जास्तीत जास्त सुरक्षा प्रदान करण्यासाठी प्रयत्नशील आहे. जेणेकरून प्रत्येक वेळी फोन वाजला की महिला घाबरू नयेत. एक ब्रँड म्हणून, आम्ही त्यांच्या सुरक्षेसाठी जबाबदार आहोत – आणि म्हणूनच आम्ही त्या दिशेने सतत प्रयत्न करत आहोत.

निसर्गाच्या नियमांवर धार्मिक रंग कसे आले

* नसीम अंसारी कोचर

आपण कधी पाहिले आहे काय की मुंग्यानी त्यांच्या आवडत्या देवांची मंदिरे बांधली? मुर्ती बनवली आणि पूजा केली, किंवा मशिदी बांधल्या आणि प्रार्थना केल्या? मुंग्या आणि वाळविंच्या वारुळामध्ये, मधमाश्यांच्या पोळयामध्ये एखादी खोली देवासाठीही असते का? आपण कधीही माकडांना उपवास करतांना किंवा उत्सव साजरे करतांना पाहिले आहे काय? अंडी घालण्यासाठी पक्षी किती कार्यक्षमतेने आणि स्वेच्छेने सुंदर-सुंदर घरटे बनवतात, परंतु या घरटयांमध्ये ते देवासारख्या कोणत्याही गोष्टीसाठी उपासनास्थान बनवत नाहीत? देवासारख्या गोष्टीचे भय मानवाशिवाय पृथ्वीवर दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला नाही. देवाची भीती हजारो वर्षांपासून मानवजातीच्या मनात सतत भरवली जात आहे.

या पृथ्वीवर जवळपास ८७ लाख प्राण्यांच्या वेगवेगळया जाती आहेत, या लक्ष्यावधी प्राण्यांपैकी एक मनुष्यदेखील आहे. हे लक्ष्यावधी जीव एकमेकांपेक्षा भिन्न आकाराचे-वर्तुणूकीचे आहेत, परंतु त्यांच्यात एक गोष्ट समान आहे की त्या प्रत्येकामध्ये दोन जाती आहेत, एक नर आणि एक मादी. निसर्गाने या दोन जातींना समान कार्य दिले आहे की ते एकमेकांवर प्रेम आणि सहवासाद्वारे त्यांच्या प्रजातीला पुढे वाढवत राहावेत आणि पृथ्वीवर जीवन चालवत राहावेत.

जीवशास्त्रज्ञांनी पृथ्वीवर आढळणाऱ्या लक्ष्यावधी प्राण्यांचे जीवनचक्र जाणून घेण्यासाठी बरेच शोध, संशोधन आणि प्रयोग केले आहेत. परंतु आजपर्यंत कोणत्याही वैज्ञानिकाला त्याच्या संशोधनात असे आढळले नाही की मानव वगळता या पृथ्वीवरील इतर कोणत्याही प्राण्याने देवासारख्या शक्तीवर विश्वास ठेवला असेल.

देवाच्या सामर्थ्याची जाणीव होण्यासाठी, त्याच्या नावावर धर्मांची स्थापना केली गेली. धर्माच्या नावाखाली मंदिरे, मशिदी, शिवालय, गुरुद्वार, चर्च बनवले गेलेत. यांमध्ये पूजा, भक्ती, नमाज, प्रार्थना यासारख्या गोष्टी सुरू झाल्या. या गोष्टी करण्यासाठी महंत, पुजारी, मौलवी, पाद्री, पोप यांना येथे बसवले गेले आणि त्यानंतर हेच लोक धर्म आणि ईश्वराची भीती दाखवून संपूर्ण मानवजातीला आपल्या इशाऱ्यावर नाचवू लागले. अल्ला म्हणतो की पाच वेळा नमाज वाचा नाहीतर तुम्ही नरकात जाल. देव म्हणतो की दररोज सकाळी स्नान करून उपासना करा अन्यथा नरक प्राप्त होईल, यासारख्या हजारो तर्कविहीन गोष्टी मानवी जगात पसरवल्या गेल्या. हिंसाचाराद्वारे त्यांची भीती मनात भरवली गेली. स्वयंघोषित धर्माचे कंत्राटदार एवढे शक्तिशाली झाले आहेत की त्यांना हे प्रश्न कोणी विचारण्याची हिंमतच केली नाही की देव कधी आला? तो कसा आला? कुठून आला? तो कसा दिसतो? सर्व गोष्टी फक्त तुम्हालाच का सांगून गेला, सर्वांसमोर येऊन का सांगितल्या नाहीत?

मानवजातीने स्वत:घोषित धार्मिक आचार्यांच्या शब्दांवर आंधळेपणाने विश्वास ठेवला, त्यांनी जसे सांगितले तसे केले. धर्माचार्यांनी अनेक नियम तयार केले. असे जगा, असे जगू नका, हे खा, ते खाऊ नका, असे कपडे परिधान करा, असे कपडे घालू नका, येथे जा, तेथे जाऊ नका, याच्याशी प्रेम करा, त्याच्याशी करू नका, हा आपला आहे, तो परका आहे, आपल्या माणसावर प्रेम करा, इतरांचा द्वेष करा. धार्मिक आचार्यांनी मानवजातीला या पृथ्वीवर भयंकर युद्धात झाकले आहे यात शंका नाही. कोणत्याही धर्माची मुळे शोधा, त्या धर्माचा उदय लढाईतूनच झाला आहे, हजारो वर्षांपासून धर्माच्या नावाखाली भयंकर लढाई चालू आहे. आजही पृथ्वीच्या वेगवेगळया भागात अशा लढाया चालू आहेत. यहुदी, मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू हे हजारो वर्षापासून धर्म आणि ईश्वराच्या नावाखाली लढवले जात आहेत.

आपण या पृथ्वीवर असणाऱ्या इतर कोणत्याही सजीव प्राण्याला धर्म आणि ईश्वराच्या नावाखाली भांडतांना पाहिले आहे का? ते भांडत नाहीत, कारण हे दोन शब्द (देव आणि धर्म) त्यांच्यासाठी अस्तित्त्वात नाहीत, ते निसर्गाच्या आणि सृष्टीच्या नियमांवर आनंदाने, प्रेमळपणे, आयुष्य पुढे सरकवत जगत आहेत.

पुरुषापेक्षा शारीरिक दृष्टया दुर्बल असलेल्या स्त्रीवर धर्माने सर्वात जास्त अत्याचार आणि दडपशाही केली आहे. जर तिने तिच्यावर लादलेले नियम पाळण्यास नकार दिला तर तिच्या नवऱ्याला तिचा छळ करण्यास उद्युक्त केले गेले. त्याला सांगण्यात आले की हे तुझ्या बायकोकडून करवून घे नाहीतर देव तुला शिक्षा करेल. तू नरकात जाशील. आणि पुरुष त्याच्या प्रियशीचा छळ करू लागला. त्या महिलेवर अत्याचार करू लागला, जी त्याच्या मदतीने या पृथ्वीवर मानवी जीवनाची उन्नती करण्याची जबाबदारी निभावते.

वेश्याव्यवसाय ही धर्माची देणगी आहे

निसर्गाने पुरुष आणि स्त्रीला हे स्वातंत्र्य दिले होते की तरुण झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या आवडीनुसार जोडीदाराची निवड करावी, त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करावेत आणि सृष्टीच्या प्रगतीसाठी आपले योगदान द्यावे. धर्माने मानवजातीला वेगवेगळया मंडळात बांधले. हिंदू मंडळ, मुस्लिम मंडळ, ख्रिश्चन मंडळ, पारशी, जैन इत्यादी. या मंडळामध्येही अनेक मंडळ तयार केली गेली आहेत. माणूस विभक्त होत गेला.

प्रत्येक परिघावर नियंत्रण ठेवणाऱ्या धर्माचार्यांनी वीरांची किंवा राजांची निवड केली आणि त्यांना सर्व अधिकारांनी सुसज्ज केले. या अधिकारांपैकी एक म्हणजे स्त्रीचा आनंद लुटणे, धार्मिक लोकांनी लैंगिक समानतेचा नैसर्गिक कायदा नाकारला आणि पुरुषाला स्त्रीच्या वरचा दर्जा दिला.

धर्माचार्यानी राजांना आणि वीरांना समजावून सांगितले की स्त्री ही केवळ उपभोग्य वस्तू आहे. रंगमहालामध्ये, अंत:पुरामध्ये या उपभोगाच्या वस्तू जबरदस्तीने गोळा केल्या जाऊ लागल्या. एक-एक राजाजवळ शेकडो राण्या होऊ लागल्या. नवाबांच्या अंत:पुरामध्ये सेविका जमू लागल्या. या बहाण्याने धर्माचार्यांनी त्यांच्या भोगविलासाचे सामानदेखील गोळा केले.

देवदासी प्रथा सुरू झाली. स्त्री नगरवधू बनली. इच्छा नसताना सर्वांसमोर नाचवली जाऊ लागली. प्रत्येकाने तिचा जबरदस्तीने उपभोग केला. देवदासींचा छळ एक प्रथा बनली. कालांतराने महिला कलावंतीण, वेश्या म्हणून वाडयां/खोल्यांमध्ये डांबली गेली आणि आता हॉटेलमध्ये वेश्या किंवा बार नर्तकीच्या रूपात दिसते. महिलेच्या या परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे? फक्त धर्म.

विधवापण ही धर्माची देणगी आहे

पुरुष जोडीदाराच्या मृत्यूनंतर धर्मगुरूंनी धर्म आणि देवाची भीती दाखवून महिलेला दुसरा जोडीदार निवडण्यास बंदी घातली. पुरुष कोणत्याही कारणास्तव मरण पावला असेल, यासाठी महिलेला दोषी ठरविण्यात आले. तिला शिक्षा देण्यात आली. तिच्याकडून कपडे हिसकावले गेले. केस काढून टाकले गेले. शृंगारावर बंदी घालण्यात आली.

तिला तुरूंगाप्रमाणे तिच्याच घरात राहायला भाग पाडले गेले. तिला उघडया जमिनीवर झोपायला विवश केलं. ज्याने इच्छा केली तिच्यावर बलात्कार केला. तिला नीरस-कोरडे अन्न दिले गेले. स्त्रीच्या इच्छेविरूद्ध ही सर्व हिंसक कृत्ये धर्मगुरुंनी देवाची भीती दाखवून पुरुष समाजाकडून करवून घेतली. विधवेला वेश्या बनविण्यातही ते मागे राहिले नाहीत.

या पृथ्वीवरील कोणत्याही इतर प्राण्याच्या जीवनात असे होतांना पाहिले गेले आहे काय? काही कारणास्तव नराच्या मृत्यूनंतर, मादी इतर नराबरोबर प्रेमक्रीडा करत सृष्टीच्या नियमाला गतिशील ठेवते. मादीच्या मृत्यूनंतर पुरुषही असेच करतो. त्रास देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, तेथे फक्त प्रेम असते.

सती आणि जौहर प्रथा धर्माच्या देणगी आहेत

धर्माचार्यांनी सर्वप्रथम त्यांच्या धर्माच्या प्रसारासाठी लढाया करविल्या. त्यात लाखो माणसे मारली गेली. लूटमार झाली, विजयी राजे आणि त्यांच्या सैन्याने हरवलेल्या राजांच्या आणि त्यांच्या कुळातील स्त्रियांवर अत्याचार केले. सैनिकांनी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केले. त्यांना ठार मारले, त्यांना दासी बनवून नेले. धर्माचार्यांनी या कृत्याचे कौतुक केले. यास योग्य कृत्य म्हणून सांगितले. या कृत्यावर कोणत्याही धर्माचार्यांनी कधी बोट ठेवले नाही. छळ, शोषण, अत्याचार आणि कैदी बनविणे जाण्याच्या भीतीने महिलांनी आपल्या राजाच्या सैन्याचा पराभव झाल्यानंतर त्यांनी सती व जौहरचा मार्ग स्वीकारला. धर्माचार्यांनी या कृतीलाही योग्य ठरविले. महिलांनी आपल्या पुरुष सैनिकांच्या प्रेतांबरोबर स्वत:ला जाळून संपवण्यास सुरूवात केली. एकत्रितपणे गोळा होऊन आगीत उडी मारून जौहर करु लागली.

जरा विचार करा की त्यांनी किती त्रास सहन केला असेल. जर आपले बोट जळले, फोड आले तर ते खूप दुखवते आणि त्या संपूर्ण शरीरासह अग्नीत जळत राहिल्या, कोणत्याही धर्माचार्याला त्यांची वेदना जाणवत नव्हती, ही त्या काळातील सर्वात पवित्र धार्मिक कृती असल्याचे म्हटले जाते.

बालविवाहदेखील धर्माचीच देणगी

धर्माच्या कंत्राटदारांनी आपापल्या धर्मांची व्याप्ती निश्चित केली आणि त्यांनी स्त्री-पुरुषांच्या इच्छा-अनिच्छेला नियंत्रित केले. पुरुष आणि स्त्रियांनी त्यांचा धर्म सोडून इतरांच्या धर्मात प्रवेश करू नये. इतर कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला आपला जोडीदार बनवू नये, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बालविवाह प्रथा सुरू केली गेली. नवजात बालकांचेदेखील विवाहसोहळे सुरू केले गेले जेणेकरुन तरुण झाल्यानंतर, ते त्यांच्या पसंतीनुसार किंवा आवडीनुसार त्यांच्या प्रेमाचे जोडीदार निवडू नयेत.

बुरखा प्रथेच्या मुळाशी धर्म

आपण कधीही एखाद्या सिंहिनीला तिचा चेहरा लपवत फिरत असल्याचे पाहिले आहे किंवा मादी कबुतराला बुरखा ओढलेले पाहिले आहे? जर निसर्गाचा असा हेतू असता की स्त्री जातीने आपले तोंड पुरुषापासून लपवावे तर त्याने सर्व प्राण्यांसाठी काही ना काही व्यवस्था केली असती. भले पानांचा पदर राहिला असता, पंखांचा मुखवटा राहिला असता तरी मादी पक्षीने त्यातून आपले तोंड लपवले असते. परंतु हे कोठेही दिसत नाही. असे केवळ मानवी जगातच दिसून येते की स्त्री बुरखा घालण्यास विवश आहे. तोंड आणि शरीर लपविण्यासाठी तिला भाग पाडले जाते, का? कारण धर्माचार्यांनी असे म्हटले आहे की जर स्त्रीने पुरुषापासून बुरखा केला नाही तर हे पाप आहे, ती नरकात जाईल.

नुकतीच भारताचे क्रेंद्रशासित राज्य अंदमान येथे एक घटना घडली. अंदमानच्या सेंटिनेल बेटात ६० हजार वर्ष जुनी एक प्राचीन आदिवासी जमात राहते. निसर्गाच्या नियमांचे पालन करत तेथील स्त्री-पुरुष आजही या पृथ्वीच्या इतर प्राण्यांसारखेच जीवन जगतात. तेथे धर्म, देव, धार्मिक कट्टरता, कपडे, दागदागिने यासारख्या गोष्टींसाठी स्थान नाही. तेथे स्त्री-पुरुष एकसारखेच कपडयांविना जंगलात फिरत असतात. शिकार करून त्यांना त्यांचे भोजन मिळते आणि मोकळेपणाने सहवास करून ते आपले आयुष्य जगतात.

तेथे पुरुष आणि स्त्रिया समान आहेत. तेथे कोणीही मोठे किंवा लहान नाही. या बेटावर पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी आहे. पण ख्रिस्ती धर्माच्या एका अनुयायाने त्यांच्या आयुष्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याचा हेतू हा होता की त्यांच्यामध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार-प्रसार करणे. आपल्या तर्कहीन गोष्टींमध्ये अडकवून देवाचा आणि धर्माचा धाक त्यांच्यात बसवू शकेल.

त्याने फुटबॉल, मेडिकल किट इत्यादी वस्तूदेखील आपल्याबरोबर त्यांना मोहात पाडण्यासाठी नेल्या, जसे ख्रिस्ती मिशनरी सहसा आपला धर्म पसरवण्यासाठी करतात. जॉन एलन चाऊ नावाच्या या अमेरिकन नागरिकाने या बेटावर पोहोचून आदिवासींशी संपर्क साधला, त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण आदिवासींना त्याचा घृणास्पद हेतू कळला. जॉन एलन चाऊ घेरला गेला आणि त्यांच्या बाणांनी घायाळ झाला.

या एका घटनेवरून हे स्पष्ट झाले आहे की ज्यांना निसर्गाचे नियम समजतात ते आजही ते नियम बदलू इच्छित नाहीत, परंतु धर्म आणि देव यासारख्या तर्कविहीन गोष्टी निर्माण करणारे निसर्गाचे नियम पायदळी तुडवून चुकले आहेत, त्यांचे मूळ रूप एवढे खालावले आहे की पुन्हा त्यात सुधार होण्यासाठी एखाद्या प्रलयाचीच प्रतीक्षा करावी लागेल. मानवांमध्ये बुद्धिमत्तेचा विकास हा पृथ्वीवरील इतर प्राण्यांपेक्षा जास्त आहे, परंतु विध्वंसक कार्यात याचा अधिक उपयोग केला गेला आहे. याउलट, जर आपण स्त्री-पुरुषांमधील संबंधांच्या संदर्भात निसर्गाचे नियम अधिक खोलवर समजून घेण्याचा प्रयत्न केला असता तर त्याचे परिणाम बरेच चांगले राहीले असते.

पोटगी कायदा काय म्हणतो

* गरिमा पंकज

लग्न हे प्रेम आणि विश्वासाचे नाते आहे. २ लोक एकत्र येऊन नवीन आयुष्याची सुरुवात करतात आणि एकमेकांचा आधार बनतात, परंतु जेव्हा नात्यात प्रेम कमी आणि गुदमरणे जास्त होते तेव्हा अशा नात्यापासून वेगळे होणेच शहाणपणाचे मानले जाते. पण वेगळे झाल्यानंतरचा रस्ता ही तितकासा सोपा नाही.

पती-पत्नीचे नाते तुटल्यानंतर अनेकदा महिलांना अधिक समस्यांना सामोरे जावे लागते. असे घडते कारण महिला सहसा आर्थिक गरजांसाठी त्यांच्या पुरुष जोडीदारावर अवलंबून असतात. वाद

पत्नी नोकरी करत नसल्यास, वाद झाल्यास न्यायालय महिलेचे वय, शैक्षणिक पात्रता, कमाईची क्षमता लक्षात घेऊन पोटगीचा निर्णय देते. मुलाची देखभाल करण्यासाठी वडिलांना वेगळे पैसे द्यावे लागतात.

सर्वोच्च न्यायालयाने मासिक पोटगीची मर्यादा निश्चिंत केली आहे. ती पतीच्या एकूण पगाराच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. पतीच्या पगारात बदल झाल्यास ती वाढवली किंवा कमी केली जाऊ शकते.

परंतु अनेक वेळा असे दिसून येते की पती पोटगीची रक्कम देण्यास टाळाटाळ करतात आणि कसेही करून ही रक्कम कमीत कमी करून घेण्याचा प्रयत्न करतात. आपले उत्पन्न खूपच कमी असल्याचे ते न्यायालयासमोर सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.

भत्ता देण्यास नकार

हैदराबादमधील नुकतेच घडलेले एक प्रकरण लक्षात घेण्यासारखे आहे. एका डॉक्टरने आपल्या वेगळया राहत असलेल्या पत्नीला दरमहा १५,००० रुपये पोटगी देण्याच्या आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. परंतु न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की या दोघांचे १६ ऑगस्ट २०१३ रोजी लग्न झाले होते आणि दोघांना १ अपत्यही आहे. मुलाच्या जन्मानंतर पती-पत्नीमध्ये काही मतभेद निर्माण झाले. पत्नीने कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणासह पोटगीसाठी अर्ज दाखल केला. पतीला दरमहा 80 हजार रुपये पगार आणि घर व शेतजमिनीतून 2 लाख रुपये भाडयाचे उत्पन्न मिळत असल्याचा दावा पत्नीने केला होता. तिने स्वत:च्या आणि मुलाच्या उदरनिर्वाहासाठी मासिक रुपये 1.10 लाखांची मागणी केली.

कौटुंबिक न्यायालयाने मुख्य याचिकेचा निकाल लागेपर्यंत पत्नी आणि मुलाला दरमहा रुपये १५ हजार पोटगी देण्याचे आदेश दिले. मात्र या निर्णयाविरोधात पतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.

सुप्रीम कोर्टाने प्रश्न उपस्थित केला की आजच्या काळात केवळ रुपये 15 हजारात मुलाचे संगोपन करणे शक्य आहे का? लोकांच्या क्षुद्र प्रवृत्तीकडे लक्ष वेधत खंडपीठाने सांगितले की आजकाल बायकांनी भरणपोषणाची मागणी केल्यावर नवरे म्हणतात की ते आर्थिक संकटातून जात आहेत किंवा गरीब झाले आहेत. हे योग्य नाही. लग्नाच्या बाबतीत विचित्र ढोंगीपणा आपल्या देशात पाहायला मिळतो. जेव्हा नातेसंबंध जोडण्याची गोष्ट येते तेव्हा मुलाचे उत्पन्न आणि राहणीमान शक्य तितके फुगवून सांगितले जाते, परंतु जेव्हा लग्नानंतर बेबनाव होऊ लागतो आणि मुलाला पत्नीपासून मुक्त व्हावेसे वाटू लागते तेव्हा परिस्थिती उलट होते. कोर्टात पती स्वत:ला अधिकाधिक असहाय्य आणि गरीब सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. ही दुहेरी मानसिकता अनेक महिला आणि त्यांच्या मुलांसाठी यातनांचे कारण बनते.

अलीकडेच दिल्लीतील रोहिणी येथील न्यायालयात यासंबंधीच्या एका प्रकरणाची सुनावणी झाली. तक्रारदार ही ३ वर्षाच्या मुलाची आई आहे. ती तिच्या पतीपासून वेगळी राहते आणि तिच्या पालकांच्या खर्चावर उदरनिर्वाह करत आहे. तिचा पती भोपाळचा मोठा व्यापारी आहे. त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय भक्कम आहे.

मात्र जेव्हा पत्नी आणि मुलाला पोटगी देण्याची वेळ आली तेव्हा प्रतिवादी पतीने आपली आर्थिक परिस्थिती खराब असल्याचे सांगून आपल्या नावाने घेतलेले संगणक आणि लॅपटॉपही आपल्या आईच्या नावे हस्तांतरित केले. पूर्वी त्याच्या मालकीची असलेली कंपनीदेखील त्याने त्याच्या आईच्या नावावर केली होती जेणेकरून त्याला पत्नी आणि ३ वर्षाच्या मुलाचा देखभालीचा खर्च टाळता यावा. त्याने तात्काळ कंपनीचा राजीनामा दिला आणि आता त्याच्या नावावर एक पैसाही नाही.

त्याच्या या वागण्यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले आणि म्हटले की लोकांच्या या दुहेरी मानसिकतेला काय म्हणावे, ते स्वत:च्या मुलाचा खर्च उचलण्यास तयार नाहीत. नंतर न्यायालयाने पतीला कनिष्ठ न्यायालयाने ठरवून दिलेली पोटगीची रक्कम पत्नी आणि मुलाला देण्याचे निर्देश दिले.

या प्रकरणी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने महिला आणि तिच्या अजाण बाळासाठी १५ हजाराची अंतरिम रक्कम देण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाला पतीने सत्र न्यायालयात आव्हान दिले असता सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

यासारखी प्रकरणे दर्शवतात की काही लोकांसाठी नातेसंबंधांचे काहीही महत्त्व नसते. त्यांच्यासाठी पैशांपेक्षा काहीही महत्वाचे नाही. पैसे वाचवण्यासाठी हे लोक प्रामाणिकपणा बाजूला ठेवून कितीही खालच्या स्तरावर जाऊ शकतात. याचा फटका मुलाला सहन करावा लागतो.

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

या गोष्टी लक्षात घेऊन नुकताच सर्वोच्च न्यायालयाने वैवाहिक वादाच्या प्रकरणात पोटगीची रक्कम ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोर्टाने म्हटले आहे की कोर्टातील कामकाजादरम्यान दोन्ही पक्षांना त्यांची मालमत्ता आणि दायित्वे यांचा खुलासा अनिवार्यपणे करावा लागेल. तसेच न्यायालयात अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासूनच पोटगीचा निर्णय घेतला जाईल.

सुप्रीम कोर्टाने सांगितले की देखभालीची रक्कम दोन्ही पक्षांच्या स्थितीवर अवलंबून आहे. पत्नीची गरज, मुलांचे शिक्षण, पत्नीचा व्यावसायिक अभ्यास, तिचे उत्पन्न, नोकरी, पतीची स्थिती असे सर्व मुद्दे पहावे लागतील. दोन्ही पक्षांची नोकरी आणि वयही पाहावे लागेल. या आधारे महिलेला किती पैसे द्यायचे हे ठरवले जाईल.

अनेकवेळा असेही घडते की पतीच्या क्षमतेपेक्षा जास्त पोटगीची मागणी केली जाते. अशा परिस्थितीत जर पतीने हे सिद्ध केले की तो इतकेही कमावत नाही की स्वत:ची काळजी घेऊ शकेल किंवा पत्नीचे उत्पन्न चांगले आहे किंवा तिने दुसरे लग्न केले आहे, पुरुषाचा त्याग केला आहे किंवा इतर पुरुषाशी तिने संबंध ठेवला आहे, तर त्याला उदरनिर्वाह खर्च द्यावा लागणार नाही. स्वत:च्या कमी उत्पन्नाचा किंवा तुमच्या पत्नीच्या पुरेशा उत्पन्नाचा पुरावा सादर केला तरीही पोटगीचा बोजा पडणार  नाही.

फेब्रुवारी, २०१८ मध्ये पंजाब-हरियाणा हायकोर्टाने पोटगीबाबत असाच एक आदेश जारी करताना हे स्पष्ट केले होते की जर पत्नी स्वत:ला सांभाळू शकत असेल तर ती पतीकडून पोटगी मिळविण्यासाठी पात्र नाही म्हणजेच पतीने उच्च न्यायालयाला सांगितले होते की याचिकाकर्ता ही सरकारी शिक्षिका असून ऑक्टोबर २०११ मध्ये तिचा पगार ३२ हजार रुपये होता. या आधारावर न्यायालयाने तिची पोटगीची मागणी फेटाळून लावली.

नाते तुटल्यानंतरही एकमेकांप्रती माणुसकी आणि प्रामाणिकपणा जपणे आवश्यक आहे विशेषत: मुले असताना, कारण या गोष्टींचा परिणाम कुठे न कुठेतरी मुलांच्या भविष्यावर होत असतो.

 

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें