उत्सवी पाककृती

* प्रतिनिधी

हरभरा कढी

काय लागेल

* १ कप हरभरा

* १ कप दही

* पाव कप बेसन

* १ छोटा चमचा आलं बारीक चिरलेलं

* २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या

* थोडीशी कोथिंबीर चिरलेली

* १ छोटा चमचा मेथी दाणे

* चिमूटभर एल. जी. हिंग

* पाव छोटा चमचा हळद पावडर

* पाव छोटा चमचा लाल तिखट

* दिड छोटा चमचा जिरा

* १ मोठा चमचा तेल

* मीठ चवीनुसार.

कसं कराल

दह्यामध्ये बेसन, मीठ, हळद एकत्रित करून फेटून घ्या. गरजेनुसार पाणी टाकत पातळ घोळ बनवा. प्रेशर कुकरमध्ये अर्धा चमचा तेल गरम करून मेथी दाणे, चिमूटभर एल. जी. हिंग व आले टाका. मेथीदाणे लाल झाल्यावर बेसनाचा घोळ टाका. हरभरा व हिरव्या मिरच्या टाकून मंद आचेवर शिजवा. मधून मधून परतत रहा. जेव्हा हरभरा शिजेल आणि मिश्रण थोडं घट्ट होऊ लागेल तेव्हा आचेवरुन उतरवा. फ्राय पॅनमध्ये उरलेलं तेल गरम करा. जिरे व लाल मिरचीची फोडणी देऊन कढीवर टाका आणि कोथिंबीर भुरभुरवून सर्व्ह करा.

उत्सवी पाककृती

* प्रतिनिधी

फ्लॉवरचे कबाब

काय लागेल

* १ छोटा फ्लॉवर

* अर्धा कप बटाटे उकडलेले व मॅश केलेले

* अर्धा कप ब्रेडक्रम्स

* १ छोटा चमचा आलं बारीक चिरलेलं

* २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या

* १ छोटा चमचा कोथिंबीर बारीक चिरलेली

* चिमूटभर एल. जी. हिंग

* अर्धा छोटा चमचा लाल तिखट

* पाव छोटा चमचा आमचूर पावडर

* पाव छोटा चमचा गरम मसाला
* २ मोठे चमचे टोमॅटो चटणी

* २ मोठे चमचे कोथिंबीर चटणी

* तळण्यासाठी पुरेसं तेल

* मीठ चवीनुसार.

कसं कराल

फ्लॉवरला कुस्करून घ्या. तेल, चिमूटभर एल. जी. हिंग आणि दोन्ही चटण्या सोडून इतर सर्व साहित्य व्यवस्थित एकत्रित करा. तयार मिश्रणाचे १-१ चमचा घेऊन छोटे छोटे कबाब बनवा. तव्यावर तेल गरम करा. सर्व कबाब मंद आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत परतवून घ्या. दोन्ही चटण्यासोबत गरम गरम फ्लॉवर कबाब सर्व्ह करा.

उत्सवी पाककृती

* प्रतिनिधी

डाळ पनीरी

काय लागेल

* १ कप उडीद डाळ अख्या सालींची

* ५० ग्रॅम पनीर

* १ छोटं आलं बारीक चिरलेलं

* १ हिरवी मिरची बारीक चिरलेली

* २ मोठे टोमॅटो वाटलेले

* २ मोठे चमचे कांदा वाटलेला

* १ मोठा चमचा लिंबाचा रस

* १ छोटा चमचा जिरं

* १ छोटा चमचा धने पावडर

* चिमूटभर एल. जी. हिंग

* ६ काळी मिरी

* ३ लवंगा

* दिड छोटा चमचा हळद पावडर

* पाव छोटा चमचा लाल तिखट

* पाव छोटा चमचा आमचूर पावडर

* अर्धा छोटा चमचा गरम मसाला

* १ मोठा चमचा तूप

* मीठ चवीनुसार.

कसं कराल

डाळ स्वच्छ धुऊन अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजवत ठेवा. पनीरला आवडत्या आकाराच्या तुकडयांमध्ये कापून घ्या. डाळीला चार पट पाणी आणि मीठ हळदसोबत प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्या. कढईत तूप गरम करून जिरं, काळी मिरी, चिमूटभर एल. जी. हिंग, लवंग व हिरव्या मिरच्या टाका. जिरा तडतडल्यावर कांदा टाकून ब्राऊन होईपर्यंत परतवा. टोमॅटो पेस्ट, धने, लाल तिखट व आमचूर पावडर टाकून परतवा. मसाला कढई सोडू लागेल तेव्हा पनीर व डाळ टाका. एक मिनिट शिजवा. गरम मसाला आणि लिंबाचा रस टाकून सर्व्ह करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें